Maharashtra

Nagpur

CC/12/283

Shri Gurumindarsingh Satnamsingh Timanna - Complainant(s)

Versus

Kotak Mahindra Bank, Through Branch Manager, - Opp.Party(s)

Adv. A.T.Sawal

12 Oct 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/283
 
1. Shri Gurumindarsingh Satnamsingh Timanna
House No. 19, Tej Bahadru Nagar, Nari Road,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Kotak Mahindra Bank, Through Branch Manager,
Shri Mohini Complex, Near Kasturchand Park, Kingsway
Nagpur 440001
Maharashtra
2. Kotak Life Insurance, Through Branch Manager
M.M.B.L. (Commercial Vehicle Division), 6th floor, Vinay Bhavya Complex, C.T.S.Road, Kalina, Santakruz (East)
Mumbai 400 098
Maharashtra
3. Kotak Mahindra Old Mutual Life Insurance Ltd., Through Customer Care Officer (Claim Dept)
1/12, Krushna House, 2nd floor, Raghuvanshi Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel,
Mumbai 400 013
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MRS. ALKA PATEL MEMBER
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:Adv. A.T.Sawal, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती रोहीणी कुंडले - अध्‍यक्षा यांचे आदेशांन्‍वये)
 
                          -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 12/10/2012)
 
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरुध्‍द मंचात दि.13.04.2012 रोजी दाखल केली. तक्रारकर्त्‍याच्‍या वडीलांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 कोटक महिन्‍द्र बँक यांचेतर्फे कर्ज घेतले होते ते कर्ज सुरक्षीत करण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्र.2 मार्फत विमा पॉलिसी आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा मृत्‍यू दि.31.12.2011 रोजी झाला. म्‍हणून उर्वरित कर्ज विम्‍याच्‍या रकमेतून कापून विम्‍याची उरलेली रक्‍कम तक्रारकर्त्‍याला मिळावी म्‍हणून तक्रार दाखल आहे.
 
2.          मुळ विमीत व्‍यक्ति सतनामसिंग रेशमसिंग तिमन्‍ना यांचा मुलगा गरुमिंदरसिंग सतनामसिंग तिमन्‍ना याने वारस आणि लाभार्थी म्‍हणून तक्रार दाखल केली आहे.
3.          मृतक विमीत सतनामसिंग यांनी ट्रक खरेदीसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेकडून रु.11,71,100/- करार नं. सी.व्‍ही.1656278, दिनांक 25.03.2008 रोजी कर्ज घेतले होते. मासिक हत्‍पा दरमहा रु.27,208/- एकूण हप्‍ते 58 ठरले होते. या कर्जाची हमी म्‍हणून सतनामसिंगने विमा पॉलिसी, ‘कोटक ट्रान्‍सफर सुरक्षा’ किंमत रु.1,00,000/- दहा लाख प्रिमियम रु.10,100/- (दहा हजार शंभर) भरुन घेतली.
4.          तक्रारकर्ता म्‍हणतो की, त्‍याचे वडिल विमा धारक यांनी जवळपास 10 किश्ति भरल्‍या, त्‍याचा मृत्‍यू दि. 31.12.2011 रोही अचानक झाला. म्‍हणून उर्वरित थकित कर्ज विम्‍याच्‍या रकमेतून देय ठरते, विमा रु.1,00,000/- (दहा लाखाचा) होता. दहा लाखातून विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी कर्ज कापून घेऊन विम्‍याची उरलेली रक्‍कम तक्रारकर्त्‍याला द्यावी. दि.23.02.2012 रोजी तक्रारकर्त्‍याने वरिलप्रमाणे विम्‍याचा लाभ मिळण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 नागपूर येथील कोटक महिन्‍द्र बँक यांचेकडे क्‍लेम सादर केला, त्‍यावर विरुध्‍द पक्ष क्र.1,2 व 3 यांचा प्रतिसाद मिळाला नाही. कर्ज थकीत झाल्‍याने विरुध्‍द पक्षांकडून तक्रारकर्त्‍याला धमक्‍या मिळत आहेत, असे तक्रारकर्ता म्‍हणतो.
 
5.          दि. 12.03.2012 रोजी तक्रारकर्त्‍याने तीनही विरुध्‍द पक्षांना (1. कर्ज देणारी बँक, 2. विमा कंपनी, 3. विमा कंपनीचे मुंबई येथील मुख्‍यालय) नोटीस देऊन विमा रकमेची मागणी केली. त्‍यावर विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेने उत्‍तर देऊन कळविले की, अट क्र.10 प्रमाणे रु.28,129/- एवढी क्‍लेमची रक्‍कम कर्ज खात्‍यात जमा केली आहे, त्‍यामुळे पॉलिसी संपुष्‍टात आली आहे, हे उत्‍तर तक्रारकर्त्‍याला मान्‍य नाही. विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसला उत्‍तर दिले नाही. कर्ज डोक्‍यावर आहे, विमा लाभ्‍ मिळाला नाही, ट्रक जप्‍तीची भीती आहे, ‘कर्ज भरा, नाही तर ट्रक जप्‍त करु’ अशा धमक्‍या विरुध्‍द पक्ष क्र.1 देत आहे. या सर्व प्रकाराचा शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रचंड ताण तक्रारकर्त्‍याला सहन करावा लागत आहे. याबद्दल नुकसान भरपाईची जबाबदारी तीनही विरुध्‍द पक्षांची आहे, असे तक्रारकर्ता म्‍हणतो.
6.          तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍याच्‍या कायदेशिर लाभापासुन वंचित ठेवले ही विरुध्‍द पक्ष क्र.1,2 व 3 च्‍या सेवेतील त्रुटी आहे असे तक्रारकर्ता म्‍हणतो.
 
7.          तक्रारकर्त्‍याची प्रार्थना
1)      विमा दावा (कव्‍हर नारेट प्रमाणे) रु.10,00,000/- (दहा लाख) 24% व्‍याजासह
  मिळावा,
2) कर्ज खात्‍यात जमा करावा व उर्वरित रक्‍कम तक्रारकर्त्‍याला द्यावी.
3) शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्‍हणून रु.50,000/- मिळा,
4) विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी कर्ज व व्‍याजाची मागणी तक्रारकर्त्‍याला करु
  नये, तो ही रक्‍कम भरण्‍यांस असमर्थ आहे,
5) तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा, अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
8.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत एकूण 9 दस्‍त दाखल केलेले आहेत, दि.13.04.2012 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या अंतरिम अर्जावर मंचाने विरुध्‍द पक्ष क्र.1,2 व 3 यांना कर्ज वसुली व ट्रक जप्‍तीबद्दल ‘जैसे थे’, स्थिती दि.30.04.2012 पर्यंत ठेवावी असा आदेश दिला होता.
9.          विरुध्‍द पक्षांचे उत्‍तर व युक्तिवाद थोडक्‍यात खालिल प्रमाणे...
            दि.30.04.2012 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 ने स्‍टे (जैसे थे) वर तसेच मुळ तक्रारीवर उत्‍तर दाखल केले, तक्रारकर्ता एकमेव वारस असल्‍याबद्दल दस्‍त सक्‍शेशन सर्टीफिकेट नाही. संतोकसिंग बिरसिंग बालीगन, जमानदार (मुळ कर्जासाठी) यांना पार्टी केले नाही, कर्ज परतफेडीची जबाबदारी त्‍यांचीही आहे. सतनामसिंग यांनी दि.25.03.2008 रोजी ट्रक खरेदीसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून घेतले, कर्ज रु.11,71,100/- होते व एकूण मासिक हप्‍ते 58 ठरले होते. सतनामसिंगने काही हप्‍ते भरले, त्‍यांचा मृत्‍यू दि.31.12.2011 रोजी झाला, तेव्‍हा रु.6,50,449/- एवढे कर्ज बाकी होते ते वसुल करण्‍याचा अधिकार विरुध्‍द पक्ष क्र.1 ला आहे. त्‍यापैकी रु.28,129/- विमा दावा विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 कडून प्राप्‍त झाला कर्ज वसुलीसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 तक्रारकर्त्‍याला ट्रकजप्‍तीच्‍या धमक्‍या देतात ही बाब ते नाकारतात. विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या सेवेत त्रृटी नसल्‍याने तक्रार खारिज करण्‍याची विनंती ते करतात, उत्‍तरासोबत एकूण 11 दस्‍त जोडले आहे.
 
10.         विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 चे उत्‍तर व युक्तिवाद...
            विरुध्‍द पक्ष क्र.2 ही विमा कंपनीची शाखा आहे, विरुध्‍द पक्ष क्र.1 विरुध्‍द पक्ष क्र.2 चे मुख्‍यालय आहे. तक्रारकर्त्‍याने facts and law  संबंधी प्रश्‍न तक्रारीत उपस्थित केले आहेत, त्‍यावर मंचाच्‍या समरी प्रोसिडिंगमधे निकाल देणे अपेक्षित नाही. या प्राथमिक आक्षेपावर तक्रार खारिज करावी असे ते म्‍हणतात. विरुध्‍द पक्ष क्र.1 कोटक महिन्‍द्र बँक व विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनी यांच्‍यामधे गट-विमा योजनेचा करार झाला होता. सतनामसिंग रषमसिंग तिमन्‍ना याने दि.25.03.2008 रोजी ट्रक खरेदीसाठी रु.11,71,100/- चे कर्ज विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेकडून घेतल्‍याने त्‍याला गट-विमा योजनेचे सदस्‍यत्‍व देण्‍यांत आले होते, सतनामसिंगचा मृत्‍यू दि.31.12.2011 रोजी झाला. सतनामसिंगचा मृत्‍यूदावा मिळण्‍यासाठीचा दस्‍त प्राप्‍त झाल्‍यानंतर दि.31.03.2012 रोजी दावा मंजूर करुन रु.28,129/- धनादेश क्र.202071 व्‍दारे कोटक महिन्‍द्र बँक (विरुध्‍द पक्ष क्र.1) यांचे नावे ‘संपूर्ण दावा’ म्‍हणून जमा करण्‍यांत आला. हिशेबासंबंधीचा तक्‍ता सोबत जोडला आहे.
11.         रु.10,00,000/- (दहा लाख) ची विमा सुरक्षा मृतक इन्‍शुअर्डला दिली होती ही तक्रारीतील बाब व त्‍यासंबंधीचे प्रमाणपत्र विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 ठामपणे नाकारतात. प्रमाणपत्रामधे विमा रक्‍कम रु.1,00,000/- (एक लाख) नमूद आहे. हा विरुध्‍द पक्ष क्र.1 कर्ज देणारी बँक आणि विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनी यांच्‍यात झाला होता. तक्रारकर्त्‍याशी सरळ व्‍यवहार झाला नव्‍हता.
12.         तक्रारकर्त्‍याची दि.31.12.2012 ची नोटीस विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांना मिळाली. विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 तक्रारीतील त्‍याच्‍या विरुध्‍दचे अन्‍य सर्व आरोप नाकारतात त्‍यांच्‍या मते तक्रारीस कारण घडले नाही. तक्रारकर्त्‍याला कोणताही आर्थिक शारीरिक मानसिक त्रास झाला नाही, त्‍यामुळे तक्रारकर्ता विमा दावा मिळण्‍यांस पात्र नाही. पॉलिसी ही गट-विमा योजने अंतर्गत दिली होती. विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी 4 दस्‍त उत्‍तरासोबत जोडले आहेत.
            मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला रेकॉर्डवरील कागदपत्रे तपासली.      
 
                 
            - // नि री क्षणे व नि ष्‍क र्ष // -
 
13.         तिनही विरुध्‍द पक्षांनी उपस्थित केलेल्‍या, ‘ग्राहक नाही’, ‘कारण घडले नाही’, मंचाला ‘अधिकार क्षेत्र नाही’, यात मंचाला तथ्‍य वाटत नाही. तक्रारकर्ता लाभार्थी म्‍हणून ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 ने पॉलिसी करारानुसार सेवा दिली नसल्‍याने तक्रारीस कारण घडले आहे व मंचाला त्‍यावर निर्णय देण्‍याचा अधिकार आहे, जमानतदारास पार्टी करण्‍याचा गरज नाही, असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.
14.         मृतक इन्‍शुअर्ड सतनामसिंग याने ट्रक खरेदीसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 बँक यांच्‍याकडून कर्ज रु.11,71,100/- घेतले होते व हे कर्ज विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेने विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 इन्‍शुरन्‍स कंपनीकडून कर्जाच्‍या हमीबद्दल अतिरिक्‍त सुरक्षा म्‍हणून सतनामसिंगच्‍या नावे पॉलिसी देऊन सुरक्षित करुन घेतले होते. असा रेकॉर्डवरील कागदपत्रांवरुन मंचाचा निष्‍कर्ष आहे. सर्व पक्ष इथपर्यंतचा तथ्‍यांचा भाग मान्‍य करतात, उपरोक्‍त पॉलिसी ही गट-विमा योजना होती, तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीत व युक्तिवादात ते ही पॉलिसी रु.10,00,000/-(दहा लाख) होती म्‍हणतात. विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनी ही पॉलिसी केवळ रु.1,00,000/- (एक लाख)ची होती असे म्‍हणतात. तक्रारकर्त्‍याने विम्‍याचे प्रमाणपत्र दाखल केले आहे त्‍यात पॉलिसीची रक्‍कम रु.10,00,000/- (दहा लाख) नमुद आहे. विरुध्‍द पक्षाने ती एक लाखाची आहे असा युक्तिवाद करतांना पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा आधार घेतला आहे. मंचाने तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले पॉलिसी प्रमाणपत्र व विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 ने दाखल केलेला पॉलिसीचा दस्‍त तपासला असता त्‍या प्रमाणपत्रातील नमूद भाग खालिल प्रमाणे आहे...
Kotak
TRANSPORT
S U R A K S H A
ZINDAGI BHAR KI KHUSHIYAN
 
Certificate of Cover
 
Certificate No.: CV 06740                                        Loan Agreement No.: CV1656278.
 
Customer Name: Satnbamsingh R. Timana
Amount Charged Rs. 10100/-
 
Our valued customer,
 
We take great pride in welcoming you Mr/Ms. S. R. Timana to the family of Kotak Mahindra Bank Ltd. KMBL Commercial Vehicle Division’s customers and thank you for taking up Kotak Transport Suraksha (KTS). KMBL (Commercial Vehicle Division) has arranged for your loan to be protected through a group insurance policy arrangement (Poliicy Contract No.F6), with Kotak Mahindra Old Mutual Life Insurance Ltd. (Kotak Life Insurance) that will provide you with a life insurance cover- to the extent of the outstanding principal loan amount (not exceeding Rs.10 Lakhs across one or more certificate of cover issued under KTS). This life insurance cover under the Policy Contract is restricted to the outstanding principal loan amount as at the date of death and the balance outstanding, if any, due from you would be governed by the loan agreement between you and KMBL (Commercial Vehicle Division). The insurance cover is valid from the date of loan agreement, this is however, subject to the terms and conditions of the Policy Contract.
 
 
15.         विमाधारकाने जेवढे कर्ज मृत्‍यूसमयी बाकी असेल तेवढे सर्व कर्ज (अधिकतम मर्यादा रु.1,00,000/- दहा लाख) पॉलिसीव्‍दारे सुरक्षीत केले आहे. असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. सतनामसिंगच्‍या मृत्‍यूच्‍यावेळी त्‍याच्‍यावर रु.6,50,449/- एवढे कर्ज बाकी होते, असे विरुध्‍द पक्ष क्र.1 कर्ज देणारी बँक म्‍हणते. कर्ज देणा-या विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेने आपले कर्ज विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 कडून कर्जाच्‍या हमीसाठी सुरक्षीत करुन घेतले आहे. म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेला तक्रारकर्त्‍याकडून कोणत्‍याही प्रकारे कर्ज वसुली करण्‍याचा अथवा त्‍यासाठी ट्रक जप्‍त करण्‍याचा अधिकार नाही, असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.
16.         विमा पॉलिसीचा करार विरुध्‍द पक्ष क्र.1 कर्ज देणारी बँक आणि विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनी यांच्‍यात झाला विमाधारक सतनामसिंग हा त्‍याअंतर्गत लाभार्थी होता. त्‍याच्‍या मृत्‍यूनंतर मुलगा/वारस म्‍हणून लाभार्थी ठरतो. विमा पॉलिसीची अधिकतक रक्‍कम रु.10,00,000/- आहे म्‍हणजेच दहा लाखापर्यंत जरी कर्ज बाकी असले तरी ते विरुध्‍द पक्ष क्र.1 बँक, विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 कडून प्रत्‍यक्षपणे वसुल करुन घेऊ शकते.
17.         तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे की, दहा लाखातून कर्जाची बाकी रु.6,50,449/- कापून घेऊन उर्वरित रक्‍कम तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 ने रोख द्यावी. अथवा संपूर्ण रक्‍कम रु.10,00,000/- त्‍यावरील व्‍याजासहीत तक्रारकर्त्‍याला प्रदान करावी. या रकमेतून तो उर्वरित रक्‍कम अदा करेल.
18.         मंचाला तक्रारकर्त्‍याच्‍या उपरोक्‍त म्‍हणण्‍यात तथ्‍य वाटत नाही, पॉलिसी दस्‍त तपासला असता तक्रारकर्ता कोणत्‍याही प्रकारे रोख रक्‍कम मिळण्‍यांस पात्र ठरत नाही, तो अप्रत्‍यक्षपणे पॉलिसीचा लाभ मिळण्‍यांस पात्र ठरतो. ट्रकवर असलेले विरुध्‍द पक्ष क्र.1 चे उर्वरित कर्ज रु.6,50,449/- विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 ने विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेला मृतक इन्‍शुअर्डच्‍या वतीने अदा करायला पाहिजे. कारण त्‍यांनी रु.10,00,000/- पर्यंतच्‍या कर्जाची हमी घेतली व सुरक्षा दिली आहे व कर्ज रु.6,50,449/- एवढेच बाकी असल्‍याने पॉलिसी तेवढयाच रकमेची ठरते.
 
19.         विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेला मृतक इन्‍शुअर्डच्‍या कर्जखात्‍यासाठी केवळ रु.28,129/- पॉलिसीची रक्‍कम अदा केली आहे. त्‍यांचे म्‍हणणे आहे की, पॉलिसी दहा लाखाची नसून केवळ एक लाखाची आहे, या संदर्भात पॉलिसी दस्‍त तपासले असता त्‍यात नमूद आहे की,
 
BENEFITS PAYABLE
 
The sum assured is based on the Member Data provided to the Company and u pdated from time to time and shall be subject, inter alia to the limits and all the terms and conditions appearing herin.
 
Cover cannot be increased for any member unless prior written approval of the Company is taken.
 
Benefits payable on the death of the member :
 
 

Benefits description
Benefits Structure
Category(ies) Elligible
Basic Life Cover (BLC)
Amount equivalent to the outstanding principal loan amount disbursed to and due from the member as on the date of death, reckoned on the basis that all EMIs are duly paid by him/her (subject to the original principal loan amount and an overall maximum of Rs.10,00,000/- per life)
All members

 
 
BENEFICIARY
 
The benefits would be released in favour of the policy holder to the extent of amount of loan outstanding and the balance if any shall be retained by the policyholder under trust for the:-
 
·                     Nominees of the member as intimated by the policyholder to the Company or
·                     The l\Legal Representatives/assigns of the member or
·                     Such other person as directed by a court of competent jurisdiction in India.
 
The benefits shall be limited at all times to the monies payable under this policy.
 
20.         यावरुन रु.10,00,000/- पर्यंतची कर्जाची रक्‍कम सुरक्षित होते हे स्‍पष्‍ट होते, असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.
Claims
 
Any claim arising as a result of a member under this policy committing suicide within one year of commencement of his/her cover, will be disallowed. Further where any member commits suicide with a year of any increase in his/her cover, the portion of cover equal to such increase will be disallowed.
 
No claim arising from the death of member due to any cause other than an accident shall be payable where such death occurs with 3 months from the date of  his/her commencement of cover herein stated, in such cases the premium would be refunded.
 
In the unfortunate event of a member’s death, a benefit amount equal to the outstanding principal loan amount (as per the repayment schedule applicable to the loan as on the date of his/ her death will be paid out to the policyholder.
 
21.         रु. 10,00,000/- (दहा लाखाच्‍या) पॉलिसीसाठी मृतक इन्‍शुअर्डने रु.10,100/- (दहा हजार शंभर) एवढा हप्‍ता भरला असेही निष्‍पन्‍न प्रमाणपत्रावरुन होते. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने KTS चेक लिस्‍ट व अर्ज रेकॉर्ड पेज 53 आणि 54 वर दाखल केली आहे. त्‍यात विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/-(एक लाख) व हप्‍ता भरल्‍याची रक्‍कम रु.4,100/- नमुद आहे. दोन्‍ही दस्‍त मंचाला अजिबात ग्राह्य वाटत नाहीत, कारण मृतक इन्‍शुअर्डच्‍या त्‍यावर सह्या नाहीत. विरुध्‍द पक्ष क्र.1 किंवा विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांच्‍या प्राधिकृत अधिका-यांच्‍या सह्या नाहीत तारीख टाकलेली नाही, पुरावा म्‍हणून हे दस्‍त अत्‍यंत संदिग्‍ध म्‍हणून मान्‍य होण्‍यासारखे नाहीत. या दस्‍तावेजांवरुन पॉलिसी रु.1,00,000/-(एक लाख) ची होती असा निष्‍कर्ष काढणे चूक ठरते.
22.         विरुध्‍द पक्ष क्र.1 कर्ज देणारी बँक म्‍हणते की, त्‍यांना विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 कडून चेक मिळाल्‍याने पॉलिसी संपुष्‍टात आली, पॉलिसी अंतर्गत आता काही देणे-घेणे शिल्‍लक नसल्‍याने तक्रारकर्त्‍याला उर्वरित कर्जाची फेड करावी लागेल, न केल्‍यास तक्रारकर्त्‍याच्‍या ताब्‍यातील ट्रक जप्‍त करावा लागेल. कर्ज सुरक्षीत करण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 ने सतनामसिंग (मृतक इन्‍शुअर्ड) याला रु.10,100/- हप्‍ता भरायला लावुन रु.10,00,000/-(दहा लाख) ची पॉलिसी घ्‍यायला लावली होती. आता तक्रारकर्त्‍याकडून उर्वरित कर्जाची वसुली करण्‍याचा अधिकार त्‍यांना पोहचत नाही. त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 कडून कर्जवसुली करुन घ्‍यावी.
23.         विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 चे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी पॉलिसीची रक्‍कम रु.28,129/- विरुध्‍द पक्ष क्र.1 बॅंकेकडे सतनामसिंगच्‍या कर्ज खात्‍यात जमा केली. रु.28,129/- ही रक्‍कम कशी काढली याबद्दल त्‍यांनी रे.पे. वर 47,48,49 व 50 वर विरुध्‍द पक्ष क्र.1 चे दस्‍त दाखल केले हे दस्‍त मंचाला अजिबात ग्राह्य नाहीत, कारण त्‍यांचा विमा पॉलिसी प्रमाणपत्र व अटी, शर्ती यांच्‍या शी ताळमेळ लागत नाही.
24.         रु.10,00,000/- (दहा लाख) पर्यंतचे कर्ज विमा पॉलिसीअन्‍वये सुरक्षीत केले होते, असा निष्‍कर्ष पॉलिसी प्रमाणपत्र व पॉलिसी दस्‍ताच्‍या अटी व शर्तींवरुन निघतो, जेवढे कर्ज बाकी असेल तेवढी विम्‍याची रक्‍कम देय ठरते असा पॉलिसीचा अर्थ आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1,2 व 3 यांच्‍या सेवेत त्रुटी आहे असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.
            सबब आदेश.
 
                  -// अं ति म आ दे श //-
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    विरुध्‍द पक्ष क्र.1 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून त्‍यांच्‍या उर्वरित कर्जाची वसुली करु नये किंवा त्‍यासाठी ट्रक जप्‍त करु नये.
3.    विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी विमाधारक सतनामसिंगच्‍या नावे असलेल्‍या विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेकडील कर्ज खात्‍यात विम्‍याची संपूर्ण रक्‍कम रु.6,50,449/- भरुन कर्ज खाते बंद करावे.
4.    विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी मृतक इन्‍शुअर्डचे  उर्वरित संपूर्ण कर्ज रु.6,50,449/- सतनामसिंगच्‍या कर्जखात्‍यात जमा केले नाही,     ही त्‍यांच्‍या सेवेतील त्रुटी ठरते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक व      आर्थीक त्रास झाला. त्‍याची नुकसान भरपाई रु.10,000/- विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 ने तक्रारकर्त्‍याला द्यावी.
5.    विरुध्‍द पक्ष क्र.1 बँकेने तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.5,000/- तक्रारकर्त्‍याला द्यावे.
6.    दि.13.04.2012 रोजी दिलेला ‘जैसे थे’, चा स्‍थगनादेश या निर्णयान्‍वये  आपोआपच संपुष्‍टात येतो.
7.    विरुध्‍द पक्षांनी वरील आदेशाची पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 30 दिवसांचे      आंत करावी.
 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. ALKA PATEL]
MEMBER
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.