Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/475/2015

S.K. TAPURIAH - Complainant(s)

Versus

KOTAK MAHINDRA BANK LTD. AND ORS. - Opp.Party(s)

30 Jan 2017

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. CC/475/2015
 
1. S.K. TAPURIAH
B,1201,1202, ELDORADO KASHINATH DHURU ROAD. PRABHADEVI MUMBAI 400 025
...........Complainant(s)
Versus
1. KOTAK MAHINDRA BANK LTD. AND ORS.
27, BKC,C,27, G B LOCK BANDRA KURLA COMPLEX BANDRA EAST, MUMBAI 400 051
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 30 Jan 2017
Final Order / Judgement

 तक्रारदार  -  स्‍वतः

 

आदेश - मा. एम.वाय.मानकर, अध्‍यक्ष,          ठिकाणः बांद्रा (पू.)    

 

                                                                   तक्रार दाखलकामी आदेश

                

1.   तक्रारदार यांना तक्रार दाखलकामी ऐकण्‍यात आले. तक्रार व त्‍यासोबत दाखल करण्‍यात आलेली कागदपत्रे पाहण्‍यात आली.

2.  तक्रारदार यांचे सामनेवाले क्र 3 या बँक शाखेमध्‍ये खाते क्र 09580120020307 आहे. सामनेवाले क्र 1 हे बँकेचे मुख्‍यालय असल्‍याचे दिसून येते व सामनेवाले क्र 2 हे सामनेवाले क्र 3 चे नोडल अधिकारी आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र 1 यांच्‍या कोलकत्‍ता  येथील शाखेमध्‍ये एक धनादेश खात्‍यामध्‍ये जमा केला होता व तो छप्‍पन दिवसानंतर बराच पाठपुरावा केल्‍यानंतर न वटविता तक्रारदार यांना परत करण्‍यात आला. त्‍यानंतर तो सामनेवाले क्र 3 कडे जमा केला असता तो वटविण्‍यात आला. तक्रारदार यांनी कोलकत्‍ता  शाखेनी सेवेत केलेल्‍या दिरंगाईमध्‍ये व कसुरा करिता ही तक्रार दाखल केली व छप्‍पन दिवसाकरिता धनादेशमधील रकमेवर व्‍याज व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

3.   तक्रारदार यांनी वेळोवेळी मुदत घेऊन सुध्‍दा धनादेश बँकेनी परत केल्‍याचे पत्र/मेमो मंचात सादर केले नाही. तक्रारदार यांचा संपूर्ण रोष हा कोलकत्‍ता शाखेविरूध्‍द आहे. परंतू त्‍या शाखेला पक्ष म्‍हणून  या तक्रारीमध्‍ये सम्‍मीलीत करण्‍यात आलेले नाही. प्रत्‍येक शाखा ही स्‍वतंत्रपणे एक आस्‍थापना असते, त्‍यामुळे जर त्‍या शाखेला सम्‍मीलीत केले नाही तर, आमच्‍या मते ही तक्रार दाखल करून घेता येत नाही. याकरीता आम्‍ही मा. सर्वोच्‍च न्‍यायालयानी विमलचंद्र ग्रोवर विरूध्‍द बँक ऑंफ इंडिया II (2000) CPJ पृ.क्र 11 (SC) मध्‍ये प्रकाशीत न्‍यायनिर्णयाचा आधार घेत आहोत.

4.   तक्रारीच्‍या बाबीवरून हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारीचे कारण कोलकत्‍ता येथे उद्दभवले व ही तक्रार मुंबई येथे दाखल करण्‍यात आली. मुंबई येथील शाखेचा छप्‍पन दिवसांच्‍या दिरंगाईशी काही संबध नाही जी शाखा आवश्‍यक होती तिला सम्‍मीलीत केलेले नाही व जी अनावश्‍यक आहे ती सम्‍मीलीत करण्‍यात आली ही बाब मिस. जॉईंडर व नॉन जॉईंडर पार्टीज ठरते.

5. सर्वात महत्‍वाचे, धनादेश शाखेत जमा पर्ची/डिपॉझीट स्पिलवर खाते धारकाचे नांव अनुश्री असे नमूद आहे. ही तक्रार मिस. अनुश्रीनी दाखल केलेली नाही. तक्रारदार यांनी कोणत्‍या अधिकारा खाली ही तक्रार दाखल केली हे तक्रारीवरून स्‍पष्‍ट होत नाही. सबब  खालील आदेश.  

                        आदेश    

  1. तक्रार क्र 475/2015 ग्रा.सं.कायदा कलम 12 (3) प्रमाणे फेटाळण्‍यात येते.
  2.  खर्चाबाबत आदेश नाही.
  3.  आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍या.
  4.  अतिरीक्‍त संच तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे. 

npk/-

 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.