Maharashtra

Thane

CC/662/2015

Shri Ajay Chamanlal soi - Complainant(s)

Versus

Konark Industries - Opp.Party(s)

Adv Rajendra Narvankar

21 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/662/2015
 
1. Shri Ajay Chamanlal soi
At Flat No 706, Dhiraj Enclave 2, Bhor Industries Frantside,western Express Highway, Boriwali east, Mumbai 400066
Mumbai
MH
...........Complainant(s)
Versus
1. Konark Industries
Office add.75B,Dattani park, B No 2, western Express Highway,Boriwali east Mumbai 400101
Mumbai
MH
2. Shri Sunik K Arora Prop Conark Industries
At 75B., Dattaji Park,B No 2, western Express highway, Borivali east Mumbai 105
Mumbai
MH
3. Gaurav Sunil Arora Prop Conark Industries
Office add.75B,Dattani park, B No 2, western Express Highway,Boriwali east Mumbai 400101
Mumbai
MH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 21 Aug 2015

         तक्रार दाखलकामी आदेश

        (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

                                                           

  1. तक्रारदार यांचा “कॅस्‍का इंडस्‍ट्रीज” नांवाचा विक्री व्‍यवसाय असून त्‍यांना हायड्रोलिक पॉवर प्रेसबाबत माहिती आहे. सामनेवाले यांचा हायड्रोलिक पॉवर प्रेस, वायर रोप व इतर मशिन निर्मिती व विक्री करण्‍याचा “कोणार्क इंडस्‍ट्रीज” नांवाचा व्‍यवसाय करतात.

  2. तक्रारदारांनी त्‍यांचे कॅस्‍का इंडस्‍ट्रीजकरीता 300 टन वजनाचा व रक्‍कम रु. 3,82,500/- किंमतीचा हायड्रोलिक पॉवर प्रेस खरेदी करण्‍यासाठी दि. 21/12/2012 रोजी रु. 1,00,000/- व दि. 22/05/2013 रोजी रु. 2,00,000/- चेकद्वारे सामनेवाले यांना दिले. तक्रारदारांनी उर्वरीत रक्‍कम रु. 82,500/- सामनेवाले यांना पॉवर प्रेसमध्‍ये त्रुटी नसल्‍याची खात्री केल्‍यानंतर दयावयाचे ठरले होते. परंतु सामनेवाले यांनी मशिन पाठविली नाही.

  3. तक्रारदार सामनेवाले यांचे कारखान्‍यात मशिनचा ताबा घेण्‍यासाठी गेले असता मशिन अर्धवट स्थितीत होती. तसेच तक्रारदारांच्‍या अटी व शर्ती नुसार बनवली नव्‍हती. त्‍यामुळे तक्रारदारांनी मशिनचा ताबा घेण्‍यास नकार दिला होता.

  4. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना मशिन वसईच्‍या कारखान्‍यातील कुशल कामगारांच्‍या मदतीने चालविण्‍यासाठी न्‍यावयाची सांगितली. मशिन निर्मितीतील त्रुटीमुळे मशिनमधून मोठया प्रमाणात तेल बाहेर पडत होते. सामनेवाले यांनी सदोष मशिनची विक्री केल्याची बाब तक्रारदारांना स्‍पष्‍ट झाली.

  5. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दोषयुक्‍त मशिन घेऊन जाण्‍यास सांगितले. सामनेवाले यांचे सूचनेनुसार तक्रारदारांना मशिनबरोबर 400 लिटर हायड्रोलिक ऑईल रु. 50,000/- एवढया किंमतीचे सामनेवाले यांना पाठवले.

  6. त्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारांना मशिनमधील दोष दूर करुन अदयापपर्यंत मशिनचा ताबा दिला नाही अथवा मशिन खरेदीची

    रक्‍कम रु. 3,00,000/- (तीन लाख) परत केली नाही व त्‍यामुळे तक्रारदारांनी मशिन किंमत रु. 3,00,000/- व हायड्रोलिक ऑईलची किंमत रु. 50,000/-, तसेच मशिन न दिल्‍यामुळे व्‍यवसायाच्‍या नुकसान भरपाईपोटी रु. 1,00,000/- तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम         रु. 40,000/- सामनेवाले यांचेकडून वसूल होऊन मिळणेसाठी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.

     

  7. तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदार कॅस्‍का इंडस्‍ट्रीज नांवाचा विक्री व्‍यवसाय करतात. तक्रारदारांनी सदर मशिनचा त्‍यांचे व्‍यवसायासाठी वाणिज्‍य स्‍वरुपात उपयोगात आणतात. तक्रारदार सदरचा व्‍यवसाय उपजिविकेसाठी (self employment) करतात असे तक्रारीमध्‍ये नमूद नाही. तक्रारदारांनी सदर मशिन (Profit) नफा कमविण्‍याचेदृष्‍टीने, वाणिज्‍य हेतूने (Commercial purpose) सामनेवाले यांचेकडून विकत घेतली असल्‍यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये ग्राहकाचे नाते प्रस्‍थापित होत नाही व त्‍यांचेमधील वाद हा ग्राहक वाद (Consumer Dispute) होत नाही.

  8.       सबब प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात येत नाही असे मंचाचे मत आहे.

           सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

                आ दे श़

  1. तक्रार क्र. 662/2015 ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3) प्रमाणे फेटाळण्‍यात येते.

  2. खर्चाबाबत आदेश नाही.

  3. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.