जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 378/2008. प्रकरण दाखल दिनांक – 02/12/2008. प्रकरण निकाल दिनांक –12/05/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. अड.अनंत दत्ताञय भुर्कापल्ले (रेडडी) वय,45 वर्षे, धंदा वकिली, अर्जदार रा.संन्मिञ कॉलनी, रिजनल वर्कशॉप जवळ, नांदेड. विरुध्द प्रोप्रायटर/पार्टनर, कोनाळे-माकणे-मुंडे, गैरअर्जदार कोचिंग क्लासेस, श्रीनगर रोड, विवेक नगर,नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.शिवराज दुगांवकर गैरअर्जदारा तर्फे - अड.पी.जी.नरवाडे. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार कोनाळे-माकणे-मुंडे यांचे सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांची मूलगी कू. अक्षदा हिच्या शिक्षणासाठी बारावी विज्ञान ला तिला फिजीक्स यावीषयांची टयूशन लावण्यासाठी वर्तमानपञातील जाहीरात वाचून व घराचे जवळ असल्यामूळे गैरअर्जदाराकडे टयूशन लावण्यात आले. याप्रमाणे दि.06.07.2008 रोजी क्लास चालकाकडे गेले असता कोनाळे-माकणे-मूंडे यांच्या नांवाची मोठी पाटी दिसली व या सर्वाचे कार्यालयाचे एकच कॅबीन होते. कोनाळे सरांना भेटून फिजिक्सची टयूशन लावयाची आहे व त्याकरिता किती फिस आहे असे विचारले असता त्यांनी रु.4000/ फिस सांगितली. त्यातील रु.2500/- सूरुवातीला दिले व उर्वरित रक्कम एक ते दोन महिन्यात देऊ असे सांगितले. आपण एक रकमी फिस भरीत नसल्यास आपल्यास रु.5,000/- लागेल असे त्यांनी सांगितले. यावर त्यांनी रु,1000/- व्याज म्हणून आकारता कि दंड म्हणून अशी विचारणा केली. नंतर रु.1500/- दि.24.9.2008 रोजी गैरअर्जदार यांना दिले. ओळखपञाचे मागे लिहून दिले. टयूशन फिस ठरल्याप्रमाणे भरलेली असतानाही त्यांनी परत रु.1,000/-ची मागणी केली. गैरअर्जदार यांनी रु.4,000/- ची फिस ठरविली असता परत रु.1,000/- मागण्याचा प्रश्नच येत नाही परंतु त्यांनी ते मान्य केले नाही. फारच तगादा केल्यामूळे रु.1,000/- दि.25.11.2008 रोजी भरले. मी बाहेरगांवाहून वापस आल्यानंतर फिस मागणी केली परंतु त्यांनी फिस वापास केली नाही. गैरअर्जदार हे जास्तीची फिस घेतात शिवाय पावती देत नाहीत. कोडवर्ड मध्ये फिजीक्स रु.100/- वेगळे अशी आकडे लिहीतात. गैरअर्जदार यांचे टयूशन चालकाकडे दिवसातून 5-5 बॅचेस मध्ये शिकवल्या जाते प्रत्येक बॅच मध्ये सरासरी संख्या 100 असते. म्हणजेच 500विद्यार्थी असतात. त्यापैकी 80 टक्के च्या वर मार्क मिळवीणा-याची संख्या 20-22 असते मग बाकीच्या विद्यार्थ्यानी किती मार्क मिळविले ही बाजू टयूशन चालक जाहीरातीमध्ये दाखवित नाहीत. त्यांची जाहीरात चूकीची आहे, वस्तूस्थितीची एकच बाजू दर्शविते व सदरील जाहीरातीस फसून त्यांच्याकडे विद्यार्थी जातात. रोजचे 500 विद्यार्थी येत असल्यामूळे त्यांची बसण्याची व्यवस्था बरोबर नाही. पार्कीगची व्यवस्था नाही. मोटार सायकल रोडवर लावल्या जातात व वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. विद्यार्थीनी साठी बाथरुमंची व्यवस्था नाही. त्यामूळे या सर्वसोयी गैरअर्जदार यांनी पूरवाव्यात व जास्तीची घेतलेली फिस वापस दयावी व झालेल्या मानसिक ञासाबददल मंचाला योग्य वाटेल तो आदेश करावा म्हणून ही तक्रार नोदंविली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नेमकी गैरअर्जदारा विरुध्द किंवा नेमकी कोणा विरुध्द तक्रार आहे हे स्पष्ट होत नाही. त्यामूळे तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार ही चूकीची आहे. सत्य परिस्थिती फिजिक्स षय हे माकणे सर शिकवतात व कोनाळे सर हे केमेस्ट्री वीषय शिकवतात व दोघेही स्वतंञ आहेत. तक्रारदाराची फिजिक्स या वीषयाची टयूशन ही माकणे सराकडे आहे. प्रवेशपञ तक्रार यांच्या मूलीने भरुन दिलेले आहे. फिस घेतलेल्या मूददयानुसार गैरअर्जदार यांचे म्हणणेप्रमाणे सत्य परिस्थिती अशी आहे की, मंगल हीने दोन्ही विषयाची पूर्ण फिस भरलेली आहे. त्यामूळे मागील रु.100/- ही राऊंड परिक्षेची फिस आहे. कोनाळे-माकणे-मुंडे यांची कोणतीही भागीदारी नाही. सर्व आपआपले स्वंतञ वर्ग घेतात. त्यांची शिकवणी वर्गासाठी येणा-या विद्यार्थ्यानसाठी स्वतंञ पार्कीग व बांथरुमची व्यवस्था आहे. अर्जदाराची तक्रार ही फसवणूक करणारी आहे म्हणून तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी जे ओळखपञ दाखल केलेले आहे. त्यावर स्पष्टपणे कोनाळे-माकणे-मुंडे कोचिंग क्लासेस, श्रीनगर, नांदेड असा उल्लेख केलेला आहे व तक्रारदाराच्या मूलीचे नांव अक्षदा रेडडी फ्रेश 2009 चा कोर्स ओनली फिजीक्स असा उल्लेख केलेला आहे. त्यावर पाठीमागे दि.6.7.2008 रोजी रु.2500/, दि.25..11.2008 रोजी रु.1500/- व दि.24.9.2008 रोजी रु.1000/- घेतल्याची नोंद करण्यात आलेली आहे. एक वीषयासाठी गैरअर्जदाराने रु.4,000/- फिस सांगितली व हप्त्यात फिस भरावयाची असल्यास रु.1,000/- जास्तीचे म्हणजे रु.5,000/-‘ असे सांगितले आहे. अर्जदाराने आठ ते दहा दिवसांतच पूर्ण फिस भरली आहे. त्यामूळे रु.1,000/- फिस गैरअर्जदाराने जास्तीची घेतली आहे. मूलीकडून अशा प्रकारे रु.1,000/- फिस जास्तीची वसूल करणे म्हणजे अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला हे स्पष्ट होते. तक्रारदाराने दोन व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. गंगाखेडकर यूगा हिला दोन विषयाची म्हणजे फिजीक्स व केमीस्ट्रीची टयूशन आहे. तेजश्री आजंनसोडकर हिला फक्त फिजीक्स वीषयाची टयूशन आहे. हिच्याकडून रु.100/- व रु.100/- असे कोडवर्ड मध्ये लिहीलेले आहे. गैरअर्जदार हे पावती देत नाहीत व ओळखपञा मागे लिहून देतात व हा सरळसरळ अडजेस्टमेंन्टचा प्रकार दिसतो. फोटोमध्ये असे दिसून येते की, पार्कीगची व्यवस्था अतीशय अपूरी आहे. बोर्ड कोनाळे-माकणे-मुंडे असा एकच आहे. यात क्लालेस वरुन वेगवेगळे असले तरी संस्था ही एकच असल्याचे दिसून येते. गैरअर्जदाराने जे महाराष्ट्र शासनाचे लायसन्स दाखल केलेले आहे. त्यात वेगवेगळे व्यवसाय असल्याचे दिसून येते. तसेच सहायक आयूक्त ऑफ सेंट्रल एक्साईज यांचे रेकॉर्ड बघीतले असता प्रत्येकाचे रजिस्ट्रेशन हे वेगळे आहे. परंतु प्रथमदर्शनी कोनाळे-माकणे-मुंडे हे क्लासेस एकञित चालतात. शासकीय लायसन्स हा अडजेस्टमेंटचा प्रकार दिसतोञ यात विद्यार्थ्याची बॅचेस जास्त आहेत त्यामूळे विद्यार्थीनी साठी स्वंतञ बांथरुमची व्यवस्था असावी अशी अर्जदाराची मागणी योग्य आहे. तसेच विद्यार्थ्यानीची बसण्याची व्यवस्था व पार्कीगची व्यवस्था ही अतीशय अपूरी आहे व रोडवर पार्कीग केल्यामूळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो ही बाब निदर्शनास येते. गैरअर्जदार हे शिकवणीच्या माध्यमातून भरपूर पैसा कमवतात तेव्हा शिकवणीसाठी येणा-या विद्यार्थ्याना चांगल्या प्रकारच्या सवलती उपलब्ध करुन देणे हे त्यांचे कर्तव्य आहे व गैरअर्जदारांनी आपले कर्तव्य पूर्णतः निभावले नाही. यावरुन त्यांनी सेवेत ञूटी केली हे सिध्द होते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार यांनी एकञितरित्या व संयूक्तरित्या अर्जदारास हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत जास्तीची घेतलेली फिस रु.1,000/- वापस करावी. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- देण्याचे आदेश करण्यात येतात. 4. गैरअर्जदार यांनी शिकवणीला येणा-या विद्यार्थ्यानीसाठी स्वतंञ बांथरुमची व्यवस्था व पार्कीगसाठी सूव्यवस्थित जागा उपलब्ध करुन दयावी, आदेशाची अंमलबजावणी केल्याबददलचे पुरावे मंचात सादर करावेत. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |