Maharashtra

Satara

CC/15/191

Pratiksha Jitendra Rokde - Complainant(s)

Versus

Kolpe Patil Multistate Co-operative Credit Society Ltd - Opp.Party(s)

Kadam

05 Dec 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/15/191
 
1. Pratiksha Jitendra Rokde
383, shanivar peth, Satara
Satara
MH
...........Complainant(s)
Versus
1. Kolpe Patil Multistate Co-operative Credit Society Ltd
Sansthapak Shridhar Udhavrao Kolpe patil, Main office, Unit 313/317, Third floor, Mahalaxmi market yard Pune
Pune
MH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                     तक्रार अर्ज क्र. 191/2015

                      तक्रार दाखल दि.19-08-2015.

                            तक्रार निकाली दि.05-12-2015. 

कु. प्रतीक्षा जितेंद्र रोकडे,

रा.383,शनिवार पेठ, सातारा,

ता.जि. सातारा.                                        .... तक्रारदार.                                                 

       विरुध्‍द

1. कोळपे-पाटील मल्‍टीस्‍टेट को-ऑप.क्रेडीट

   सोसायटी लिमिटेड, पुणे तर्फे

   मुख्‍य कार्यालय- युनिट नं.313/317, तिसरा मजला,

   महालक्ष्‍मी मार्केट, मार्केट यार्ड, पुणे 411 037

   तर्फे संस्‍थापक श्रीधर उध्‍दवराव कोळपे-पाटील

2. संस्‍थापक श्री. श्रीधर उध्‍दवराव कोळपे-पाटील,

   कोळपे-पाटील मल्‍टीस्‍टेट को-ऑप.क्रेडीट

   सोसायटी लिमीटेड,पुणे

3. अध्‍यक्षा, सौ. सरस्‍वती श्रीधर कोळपे-पाटील

   कोळपे-पाटील मल्‍टीस्‍टेट को-ऑप.क्रेडीट

   सोसायटी लिमिटेड, पुणे

4. उपाध्‍यक्षा, श्री. संजय कांतीलाल लोढा

   कोळपे-पाटील मल्‍टीस्‍टेट को-ऑप.क्रेडीट

   सोसायटी लिमिटेड, पुणे.

5. मुख्‍य कार्यकारी अधिकारी, श्री. मल्‍हारराव धोंडीबा सुर्यवंशी,

   कोळपे-पाटील मल्‍टीस्‍टेट को-ऑप.क्रेडीट

   सोसायटी लिमीटेड,पुणे

   नं. 1 ते 5 रा. 3. अध्‍यक्षा, सौ. सरस्‍वती श्रीधर कोळपे-पाटील

   कोळपे-पाटील मल्‍टीस्‍टेट को-ऑप.क्रेडीट

   सोसायटी लिमिटेड, पुणे,

   मुख्‍य कार्यालय - युनिट नं.313/317, तिसरा मजला,

   महालक्ष्‍मी मार्केट, मार्केट यार्ड, पुणे 411 037.

6. शाखाधिकारी, कोळपे-पाटील मल्‍टीस्‍टेट को-ऑप.क्रेडीट

   सोसायटी लिमीटेड,पुणे, शाखा सातारा गाळा नं. 2,

   गणेशचंद्र चेंबर्स, 172, रविवार पेठ, माय.डी.बी.आय.

   बँकेसमोर, सातारा 415 002.                          ... जाबदार.                                                       

                                  

                                   ....तक्रारदारतर्फे अँड.ए.आर.कदम.                    

                                   ....जाबदार क्र.1 ते 5 एकतर्फा.

                                   ....जाबदार क्र.6 स्‍वतः

 

                               न्‍यायनिर्णय

मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्ष यांनी न्‍यायनिर्णय पारित केला.

 

1.    तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारदारांचे तक्रार अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे-

      तक्रारदार  हे सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवाशी आहेत तर जाबदार कोळपे-पाटील मल्‍टीस्‍टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.पुणे, ही सहकार कायद्यानुसार स्‍थापन झालेली सहकारी संस्‍था असून सदरील पतसंस्‍था ग्राहकांकडून ठेवी स्‍वरुपात रकमा स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतपूर्व ग्राहकांनी रक्‍कम परत मागितल्‍यास सदरच्‍या रकमा व्‍याजासह परत देणे अशा उद्देशाने जाबदार संस्‍था ही स्‍थापन झालेली आहे. जाबदार क्र. 2 हे जाबदार क्र. 1 पतसंस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष, जाबदार क्र. 3 व 4 हे अनुक्रमे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व जाबदार क्र. 5 हे मुख्‍य कार्यकारी संचालक असून जाबदार क्र. 6 ही या पतसंस्‍थेची शाखा आहे. प्रस्‍तुत तक्रारदाराने जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये दामदुप्‍पट ठेव योजनेमध्‍ये खालील परिशिष्‍टाप्रमाणे रक्‍कम ठेव स्‍वरुपात गुंतविली होती व आहे.

अ.नं.

पावती नंबर

ठेव रक्‍कम

ठेव तारीख

मुदत संपलेची तारीख

1

   1

 10,000/-

11/07/2014 

11/01/2020 

2

   2

 10,000/-

26/07/2014 

26/01/2020 

 

एकूण  रु.

 20,000/-

 

 

   

       वर नमूद तपशिलाप्रमाणे जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना दामदुप्‍पट ठेवीची रक्‍कम रु. 20,000/- (रुपये वीस हजार मात्र) व त्‍यावरील होणारे व्‍याजासह देय लागत आहे.  तक्रारदार यांना प्रस्‍तुत ठेवीची रक्‍कम आर्थीक अडचणीमुळे अत्‍यंत निकड असल्‍यामुळे ठेवपावत्‍यांची मुदत संपण्‍यापूर्वी मुदतपूर्व मोडून रक्‍कम मागणी केली.   तक्रारदार यांनी प्रस्‍तुत दाम दुप्‍पट ठेव पावतीतील मुदतपूर्व रकमेची व्‍याजासह जाबदारांकडे वारंवार मागणी केली असता, जाबदार यांनी खोटी आश्‍वासने देवून तक्रारदार यांना रक्‍कम देणेस टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदाराला दामदुप्‍पट रक्‍कम होणा-या व्‍याजासह रक्‍कम अदा केलेली नाही व तक्रारदार यांनी वारंवार रकमेची मागणी केली असता, जाबदाराने तक्रारदार यांचेबरोबर अरेरावीची भाषा वापरुन, भांडण करुन रक्‍कम परत देणेस नकार दिला आहे. वास्‍तविक पाहता, तक्रारदारानी दामदुप्‍पट ठेवपावतीच्‍या रकमेची मुदतपूर्व मागणी केली असता सदरची रक्‍कम आजअखेर होणा-या व्‍याजासह देणे जाबदार यांचेवर बंधनकारक होते व आहे. तक्रारदार यांना त्‍यांचे आर्थिक अडचण असलेने, व रक्‍कमेची नितांत गरज असलेने सदर दामदुप्‍पट ठेवपावतीमधील रक्‍कम मिळावी म्‍हणून जाबदार यांना सदरच्‍या रकमेची लेखी व तोंडी तक्रारदाराने वेळोवेळी मागणी केली असता, जाबदाराने रक्‍कम देणेस टाळाटाळ केली व रक्‍कम परत दिली नाही व शेवटी रक्‍कम देणेस नकार दिला.  त्‍यामुळे तक्रारदाराला जाबदार यांनी सदोष सेवा पुरविली आहे. सबब तक्रारदार यांची प्रस्‍तुत जाबदार यांचेकडून वर नमूद दामदुप्‍पट ठेव पावतीची रक्‍कम जाबदारांकडून व्‍याजासह वसूल होवून मिळणेसाठी व मानसिकत्रास व खर्चाची रक्‍कम मिळणेसाठी प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.   

     2. तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी दामदुप्‍पट ठेवपावतीमधील एकूण रक्‍कम रु.20,000/- पावतीवर नमूद व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह  जाबदारकडून वसूल होवून मिळणेसाठी व्‍याजासह वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या वसूल होवून मिळावी.  तसेच प्रस्‍तुत रक्‍कमेवर दि. 11/7/2014 पासून रक्‍कम तक्रारदार यांचे पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्‍के प्रमाणे व्‍याज जाबदार यांनी तक्रारदार यांना अदा करावे, तक्रारदारास झालेल्‍या मानसीक व शारीरिक त्रासाबाबत रक्‍कम रु.25,000/-(रुपये पंचवीस हजार फक्‍त)  व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) जाबदारकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या वसूल होवून तक्रारदाराला मिळावेत अशी विनंती प्रस्‍तुत कामी मागणी तक्रारदाराने केलेली आहे.

    3.  प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने त्‍याचे अर्जातील कथनाच्‍या सिध्‍दतेसाठी नि.क्र. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे दामदुप्‍पट ठेवपावती क्र. 1 व 2 च्‍या व्‍हेरीफाईड प्रती, नि. 5/2 कडे संचालक मंडळाची यादी, नि.15 कडे तक्रारदाराने मुळ तक्रार अर्जासोबत दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हेच पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद हाच पुरावा समजणेत यावा म्‍हणून दिलेली पुरसीस, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.

    4.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ते 6 यांना मंचामार्फत पाठवलेल्‍या नोटीस जाबदार यांना लागू होवूनसुध्‍दा जाबदार क्र. 1 ते 5 हे मे. मंचात हजर राहीले नाहीत व त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणेही दाखल करुन तक्रारदाराचे तक्रार अर्जातील म्‍हणणेही खोडून काढलेले नाही सबब प्रस्‍तुत जाबदार क्र. 1 ते 5 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे. तर जाबदार क्र.6 हे स्‍वतः याकामी हजर होवून त्‍यांनी नि. 13 कडे त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफीयत व नि. 14 कडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

     जाबदार क्र. 6 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन पूर्णपणे नाकारलेले आहे.  त्‍यांचे कथनानुसार, सदर जाबदार क्र. 6 हे वर नमूद पतसंस्‍थेच्‍या सातारा शाखेमध्‍ये कंत्राटी पध्‍दतीवर सातारा शाखेचे शाखाधिकारी म्‍हणून काम पहात होते. संस्‍थेच्‍या अंतर्गत कारभाराशी कोणतेही देणे-घेणे नव्‍हते व नाही.  प्रस्‍तुतचे जाबदार हे संस्‍थेच्‍या संचालकांनी दिलेल्‍या आदेशाचे पालन करुन त्‍या अनुषंगाने काम पहात होते.  सदरची पतसंस्‍था जाबदार क्र. 1 ते 5 हे चालवीत असून रक्‍कम परत देण्‍याची कायदेशीर जबाबदारी सदर पतसंस्‍थेचे जाबदार क्र. 1 ते 5 यांचेवर आहे.  तक्रारदारांनी सदर जाबदार हे शाखाधिकारी असलेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा या अर्जाचे कामी दिलेला नाही.  तक्रारदारांची ठेवीची रक्‍कम जाबदार क्र. 1 ते 5 यांनी देण्‍यास या जाबदारांची कोणतीही हरकत नाही. सबब जाबदार हे जाबदार पतसंस्‍थेच्‍या सातारा शाखेत नाममात्र पगारावर नोकरी करीत होते. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा अर्ज या जाबदारांविरुध्‍द फेटाळणेत यावा व यांचे नाव तक्रार अर्जातून वगळण्‍यात यावे अशी विनंती या जाबदारांनी म्‍हणण्‍यामध्‍ये केली आहे.

   5.  वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्‍तुतचा तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे

मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.                                                                                                                                                                                                              

अ.नं.           मुद्दा                                        उत्‍तर

1- तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहे का?-                       होय.

2- जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय?-      होय.

3- अंतिम आदेश?                                     खालील आदेशात  

                                                    नमूद केलेप्रमाणे.

विवेचन -

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे  उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- प्रस्‍तुत तक्रारदाराने जाबदार क्र. 1 पतसंस्‍थेमध्‍ये खालीप्रमाणे परिशिष्‍टामध्‍ये नमूद रक्‍कम दामदुप्‍पट ठेव योजनेमध्‍ये गुंतविली होती व आहे.

अ.नं.

पावती नंबर

ठेव रक्‍कम

ठेव तारीख

मुदत संपलेची तारीख

1

   1

 10,000/-

11/07/2014 

11/01/2020 

2

   2

 10,000/-

26/07/2014 

26/01/2020 

 

    प्रस्‍तुत दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रती तक्रारदाराने नि.5/1 कडे दाखल केलेल्‍या आहेत. तसेच नि.5/2 कडे जाबदार पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी दाखल केली आहे. यावरुन तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार  आहेत हे सिध्‍द होते.  प्रस्‍तुत कामी तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्‍थेत दामदुप्‍पट ठेव योजनेत एकूण रक्‍कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) ठेवलेले होते. तक्रारदाराने त्‍यांच्‍या आर्थिक अडचणीकरीता जाबदार यांचेकडे ठेवीच्‍या रकमेची मुदतपूर्व वारंवार लेखी व तोंडी मागणी केली असता जाबदार यांनी प्रस्‍तुत ठेवींची रक्‍कम तक्रारदाराला अदा करणेस टाळाटाळ केली व शेवटी तक्रारदारबरोबर भांडणे काढून नकार दिलेला आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. प्रस्‍तुत तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन खोडून काढणेसाठी जाबदार क्र. 1 ते 5 यांना नोटीस लागू होऊनही ते मे. मंचात गैरहजर आहेत, त्‍यामुळे सदर जाबदार क्र. 1 ते 5 यांचेविरुध्‍द नि. 1 वर ‘एकतर्फा’ आदेश पारीत झालेला आहे. सदर जाबदारांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तर जाबदार क्र. 6 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये ते प्रस्‍तुत पतसंस्‍थेच्‍या सातारा शाखेमध्‍ये पगारी नोकर म्‍हणून कंत्राटी बेसीसवर शाखाधिकारी म्‍हणून काम करीत होते. त्‍यामुळे तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास हे जाबदार जबाबदार नसलेने त्‍यांचेविरुध्‍दची तक्रार फेटाळणेत यावी व त्‍यांचे नाव तक्रार अर्जातून वगळणेत यावे असे शपथेवर कथन केले आहे. त्‍यामुळे या जाबदारांना संस्‍थेचा पगारी नोकर असल्‍याने तक्रारदाराची ठेवीची रक्‍कम देणेस जबाबदार धरणे न्‍याय होणार नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेले कथन योग्‍य व खरे आहे असे या मे. मंचाचे मत आहे. 

     वरील सर्व विवेचन व स्‍पष्‍टीकरण तसेच कागदपत्रे यांचे अवलोकन करता, जाबदार क्र. 1 ते 5 यांनी तक्रारदाराचे दामदुप्‍पट ठेवीची एकूण रक्‍कम रु.20,000/- तक्रारदाराला संस्‍थेच्‍या मुदतपूर्व नियमाप्रमाणे नमूद व्‍याजासह अदा करणे गरजेचे व बंधनकारक असतानाही जाबदाराने तक्रारदाराची ठेवीची रक्‍कम व्‍याजासह अदा केलेली नाही, अदा करणेस टाळाटाळ केली व नकार दिला.  म्‍हणजेच जाबदार क्र. 1 ते 5 यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे हे स्‍पष्‍ट होते.  सबब आम्‍ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

7.    वरील सर्व विवेचनावरुन प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ते 5 हे तक्रारदाराने अनुक्रमे दामदुप्‍पट ठेव पावती क्र.1 व 2 ची प्रत्‍येकी रक्‍कम रु.10,000/- अशी एकूण रक्‍कम रु.20,000/- दामदुप्‍पट ठेवीच्‍या रकमा ठेव ठेवले तारखेपासून म्‍हणजेच अनुक्रमे दि. 11/7/2014 व दि.26/7/2014 पासून  संस्‍थेच्‍या मुदतपूर्व व्‍याजदराचे नियमाप्रमाणे होणा-या व्‍याजासह रक्‍कम तक्रारदार यांना अदा करणेसाठी वैयक्तिक व संयुक्तिकपणे जबाबदार आहेत असे आमचे मत आहे.  मात्र जाबदार क्र.1 ते 5 यांनी तक्रारदाराचे दामदुप्‍पट ठेव पावतीची  रक्‍कम ठेव ठेवले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत संस्‍थेच्‍या मुदतपूर्व व्‍याजदराचे नियमाप्रमाणे होणा-या व्‍याजासह तक्रारदारास अदा करणेसाठी वैयक्तिक व  संयुक्‍तीकपणे Co-Operative  नुसार जबाबदार धरणे न्‍यायोचित होणार आहे. सदर कामी आम्‍ही मे. उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांचेकडील रिटपिटीशन नं.117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडत्‍वाचा आधार घेतला आहे.

8.    सबब याकामी जाबदार क्र. 1 ते 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्‍या यांनी तक्रारदार यांना तक्रारदाराचे दामदुप्‍पट ठेव पावतीची रक्‍कम ठेव ठेवले तारखेपासून तक्रारदाराला रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत संस्‍थेच्‍या मुदतपूर्व व्‍याजदराचे नियमाप्रमाणे होणा-या व्‍याजासह अदा करणे न्‍यायोचीत होणार आहे. तसेच तक्रारदाराला प्रस्‍तुत जाबदार क्र. 1 ते 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे मानसीक त्रासासाठी रक्‍कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.3,000/- अदा करणे न्‍यायोचीत होणार आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.

9.    सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश करणेत येतो. 

    आदेश

1.    तक्रारदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2.    जाबदार क्र 1 ते 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांची खाली नमूद परिशिष्‍टामधील दामदुप्‍पट ठेवपावतींची प्रत्‍येकी रक्‍कम रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) परिशिष्‍टात नमूद ठेव ठेवले तारखेपासून तक्रारदाराला रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत संस्‍थेच्‍या मुदतपूर्व मागणीच्‍या व्‍याजदाराचे नियमाप्रमाणे होणा-या व्‍याजासह अदा तक्रारदारांना अदा करावी.

अ.नं.

पावती नंबर

ठेव रक्‍कम

ठेव तारीख

मुदत संपलेची तारीख

1

   1

 10,000/-

11/07/2014 

11/01/2020 

2

   2

 10,000/-

26/07/2014 

26/01/2020 

 

एकूण

 20,000/-

 

 

 

3.  तक्रारदार यांना झाले मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच  हजार मात्र) व तक्रार अर्जाचा खर्च  म्‍हणून रक्‍कम रु.3,000/-  (रुपये तीन  हजार मात्र)  जाबदार क्र. 1 ते 5 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्‍या    तक्रारदार यांना अदा करावी.

4.  जाबदार क्र. 6 हे पतसंस्‍थेचा पगारी नोकर असल्‍यामुळे त्‍यांना जबाबदारीतून

    वगळणेत येते.

5.  वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 ते 5 यांनी आदेश पारीत

    तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.

6.  आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेने तक्रारदाराला ग्राहक संरक्षण

    कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रीया करणेची मुभा

    राहील.

7.  पस्‍तुत आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य द्याव्‍यात.

8.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

 

ठिकाण- सातारा.

दि.05-12-2015

सौ.सुरेखा हजारे   श्री.श्रीकांत कुंभार    सौ.सविता भोसले

सदस्‍या          सदस्‍य             अध्‍यक्षा

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.