Maharashtra

Kolhapur

CC/10/229

Smt. Anuradha Krishnarao Ghorapade - Complainant(s)

Versus

Kolhapur Zilla Urban Co-op Credit Society - Opp.Party(s)

P.B.Jadhav

04 Sep 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/229
1. Smt. Anuradha Krishnarao Ghorapade 372, Mirajkar Tikatti Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Kolhapur Zilla Urban Co-op Credit Society Shahu Road, Laxmipuri Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :P.B.Jadhav, Advocate for Complainant

Dated : 04 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1, 2, 3 व 10 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले अनुपस्थित.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद व दामदुप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
व्‍याजदर
आजअखेर येणे रक्‍कम
1.
2933
10000/-
9%
10300/-
2.
2927
10000/-
9%
12400/-
3.
2926
10000/-
9%
12400/-
4.
2924
10000/-
9%
12400/-
5.
2925
10000/-
9%
12400/-
6.
2928
10000/-
9%
25100/-
7.
2919
10000/-
9%
13000/-
8.
2920
10000/-
9%
13000/-
9.
2921
10000/-
9%
13000/-
10.
2922
10000/-
9%
13000/-
11.
2923
10000/-
9%
13000/-
12.
2917
10000/-
9%
13000/-
13.
2916
10000/-
9%
13000/-
14.
2918
10000/-
9%
13000/-
15.
2914
10000/-
9%
18160/-
16.
2913
10000/-
11%
18160/-
17.
2756
10000/-
12%
17000/-
18.
940
10000/-
16%
28266/-
19.
463
5500/-
16%
16866/-
20.
440
9900/-
16%
30228/-
21.
422
9900/-
16%
60624/-
22.
292
15000/-
16%
45200/-
23.
308
10000/-
16%
29999/-
24.
309
10000/-
16%
29999/-
25.
368
5990/-
16%
14999/-
26.
274
21000/-
15%
66588/-
27.
21
25000/-
15%
86464/-
28.
275
20000/-
15%
63500/-
29.
2934
10000/-
9%
10900/-
30.
सेव्हिंग खाते क्र.774
10000/-
7%
22502/-
31.
 धनरत्‍न ठेव370
3020/-
--
3588/-

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्‍कमांची औषधोपचारासाठी व उपजिवीकेसाठीच्‍या गरजा भागविण्‍यासाठी आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.12.11.2005, दि.21.0;8.2006, दि.09.09.2006, दि.21.01.2008 रोजी लेखी अर्ज देवून सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तसेच, दि.23.11.2009 रोजी जिल्‍हा उपनिबंधक यांचेकडे तर दि.26.08.2008 व दि.07.12.2008 रोजी जिल्‍हाधिकारी, कोल्‍हापूर यांचेकडे विनंती अर्ज देवून सामनेवाला यांचेकडील ठेव रक्‍कमांची मागणी केली आहे. तक्रारदार या स्‍वातंत्र्य सैनिकाची विधवा पत्‍नी असून जेष्‍ठ नागरिक आहे. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, सेव्हिंग्‍ज खात्‍यांचे पासबुक व पत्रव्‍यवहार इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.1 ते 3 व 10 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांची तक्रार मुदतबाहय आहे. तसेच, या मंचात चालणेस पात्र नाही. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत नमदू केलेल्‍या रुपये 7,52,043/- इतक्‍या ठेव व व्‍याजाचा तपशील विसंगत व चुकीचा असून संस्‍थेच्‍या रेकॉर्ड प्रमाणे रुपये 4,61,541/- इतकी रक्‍कम देय आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(6)        तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे ठे़वी ठेवलेल्‍या आहेत. सामनेवाला पतसंस्‍था ही ठेवी स्विकारते. तसेच, सभासदांना कर्जे देते याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(O) या तरतुदीखाली येते. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यास पूर्वाधार म्‍हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्‍च न्‍यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्‍द मेसर्स युनायटेड वैश्‍य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्‍ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे.
 
 
 
 
 
 
(7)      सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद ठेवींची रक्‍कम अद्याप मागणी करुनही तक्रारदारांना दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारीस अद्यापि सातत्‍याने कारण घडत आहे. सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत आहे.
 
(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही.  तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 13 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       तसेच, तक्रारदारांनी धनरत्‍न ठेव पावती क्र.370 ही दामदुप्‍पट ठेवीची असून तिची मुदत संपलेली आहे असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर पावतीवरील मुदतपूर्ण रक्‍कम रुपये 3,020/- मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
 
(11)        तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कमा ठेवल्‍याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्‍ज खाते क्र. 6/21/774 वर दि.31.03.2008 रोजीअखेर रुपये 19,739/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(12)       तक्रारदार या स्‍वातंत्र्य सैनिकाच्‍या पत्‍नी असून वरिष्‍ठ नागरीक आहेत. त्‍यांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
2933
10000/-
2.
2927
10000/-
3.
2926
10000/-
4.
2924
10000/-
5.
2925
10000/-
6.
2928
10000/-
7.
2919
10000/-
8.
2920
10000/-
9.
2921
10000/-
10.
2922
10000/-
11.
2923
10000/-
12.
2917
10000/-
13.
2916
10000/-
14.
2918
10000/-
15.
2914
10000/-
16.
2913
10000/-
17.
2756
10000/-
18.
940
10000/-
19.
463
5500/-
20.
440
9900/-
21.
422
9900/-
22.
292
15000/-
23.
308
10000/-
24.
309
10000/-
25.
368
5990/-
26.
274
21000/-
27.
21
25000/-
28.
275
20000/-
29.
2934
10000/-

 
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना धनरत्‍न ठेव पावती क्र.370 वरील दामदुप्‍पट रक्‍कम रुपये 3,020/- (रुपये तीन अजार वीस फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमांवर दि.09.12.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र. 6/21/774  वरील रक्‍कम रुपये 19,739/- (रुपये एकोणीस हजार सातशे एकोणचाळीस फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.31.03.2008 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(5)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT