नि का ल प त्र :- (दि. 11/10/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र. 2 गैरहजर. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांचे वकिल गैरहजर. सामनेवाला क्र. 1 यांचेतर्फे वकिलांनी युक्तीवाद केला. (2) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांचा शेती व्यवसाय आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र. 2 संस्थेचे सभासद आहेत. तक्रारदारांच्या शेतातील ऊस कारखानेस गाळप झाला त्याचे होणारे बिल सामनेवाला क्र. 1 बँकेचे खात्यावर जमा झाले. त्यांचे बिल सामनेवाला क्र. 2 चे सामनेवाला क्र. 1 चे बँकेकडे खात्यावर जमा झाले. सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदारांनी घेतले तक्रारदारांनी घेतलेल्या खते, लागवड व तत्सम बाबींची रक्कम तक्रारदारांचे ऊस बिलातून कपात केली आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी ऊस बिलाची उर्वरीत रक्कम रु. 98,621/- या रक्कमेची सामनेवाला क्र. 1 बँकेचा दि. 16/05/2011 रोजीचा चेक क्र. 021788 तक्रारदारांना दिला. सदरचा चेक हा तक्रारदारांनी बँक ऑफ बडोदाकडे असलेल्या सेव्हिंग्ज खात्यामध्ये दि. 24/05/2011 रोजी जमा केला. परंतु सामनेवाला क्र. 1 कडे तो चेक वटण्यासाठी गेला असता सदर बँकेने चेक न वटवता “नवहिंद नागरी पतसंस्था थकबाकीत असून त्यांचे संचालक असलेने आमच्या हेड ऑफीसशी संपर्क साधणे” या शे-यानिशी मेमोसह सदरचा चेक बँक ऑफ बडोदाकडे पाठविला. व सदर मेमो बँक ऑफ बडोदाकडून तक्रारदारांना दि. 24/05/2011 रोजी दिला. याबाबत तक्रारदारांनी चौकशी केली असता सामनेवाला क्र. 1 नवहिंद पतसंस्थेची रक्कम भरा अशीही धमकी देऊन रक्कम आडविली असलेचे सांगितले. सामनेवाला बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली असल्याने बँकींग रेग्युलेशन अक्ट व सहकार कायद्याप्रमाणे चालते. सदर कायद्याचा भंग सामनेवाला यांनी केलेला आहे. सबब, तक्रारदारांना दिलेला सामनेवाला क्र. 2 यांनी रक्कम रु. 98,621/- चा चेक वटविणेबाबत आदेश व्हावा, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व आर्थिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 7,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला क्र. 1 यांनी दिलेला मेमो, सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदारास सामनेवाला क्र. 1 बँकेचा दिलेला मेमो इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केलेली आहेत. (4) सामनेवाला क्र. 1 बँकेने यांनी त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात सामनेवाला क्र. 2 संस्थेने तक्रारदारांना दिलेला चेक हा त्यांनी संगनमताने दिलेला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 बँकेने तो चेक वटविला नाही. नवहिंद नागरी सहकारी पतसंस्थेचे तक्रारदारांसह संस्थेच्या अन्य संचालकांना सामनेवाला क्र. 1 बँकेकडे दि.1/12/1999 रोजी क्लिन क्रेडीट कर्ज रक्कम रु. 50 लाखाची मागणी केली असता बँकेने रक्कम रुपये 30 लाख इतके कर्ज मंजूर केले आहे. तसेच पुढे वाढीव कर्ज मागणी केली असता बँकेने कर्ज मर्यादा 25 लाख करुन उचल दिली व जादा रक्कम भरण्यास सांगितले. तसेच दि. 25/02/2000 रोजी आणखी 10 लाख कर्ज मागणी केली असता रक्कम रुपये 7 लाख वाढवून दोन्ही कर्जे दि. 31/12/2000 अखेर परतफेड करणेस सांगूनसुध्दा सदरचे कर्ज परतफेड झालेले नाही. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 बँकेने नवहिंद नागरी पतसंस्था, नागाव, ता. हातकणंगले संस्थेच्या संचालक मंडळाविरुध्द सहकार न्यायालय क्र. 1 कोल्हापूर येथे सी.सी.एस.नंबर 982/2002 कर्ज रक्कमेच्या वसुलीसाठी दावा दाखल केला. व सदर कर्जफेडीची वैयक्तीक जबाबदारी तक्रारदारांचेवर आहे. तसेच सामनेवाला क्र. 1 बँकेस दि. 3/04/1999 रोजीचा ठराव क्र. 5 व इतर कागदपत्रे लिहून दिलेली आहेत. सहकार न्यायालयातील दाखल केलेले सी.सी. नं. 982/2002 या कामी तक्रारदार व अन्य संचालकांनी सामनेवाला क्र. 1 बँकेकडून खतपुरवठा व पतपुरवठा व्हावा अशी आज्ञार्थी मनाई आदेश मिळावेत याबाबत मनाई अर्ज दिला. सदरचा अर्ज दि. 6/05/2011 रोजी नामंजूर झाला. या निर्णयाविरुध्द तक्रारदारांनी महाराष्ट्र स्टेट को.ऑप. अपिलेट कोर्टाकडे अपिल दाखल न करता सामनेवाला क्र. 2 शी संगनमत करुन रक्कम रु. 98,621/- चा चेक घेऊन तो वटविणेसाठी बँक ऑफ बडोदाकडे जमा केला. सदरचा चेक सामनेवाला क्र. 1 कडे वटविणेसाठी आला असता रिटर्न मेमोमध्ये तक्रारदार हे नवहिंद नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्ज थकीत असून ते त्यांचे संचालक आहेत त्यामुळे हेड ऑफीसशी संपर्क साधावा असा मेमो दिला परंतु अद्याप तक्रारदारांनी संपर्क साधलेला नाही. नवहिंद नागरी सहकारी पतसंस्थेचे असलेले थकीत कर्ज रक्कम फेडण्याची वैयक्तीक व संयुक्तिक जबाबदारी तक्रारदारांची आहे. सदर सामनेवाला यांचेविरुध्द खोटी तक्रार दाखल केलली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती केलेली आहे. (5) सामनेवाला त्यांच्या म्हणणेसोबत सामनेवाला सी.सी.एस. नं.982/2002 चे कामातील नि. 1 ची नक्कल, तक्रारदार यांनी सहकार न्यायालयात दिलेला तुर्तातुर्त मनाई अर्ज व अर्जावरील आदेश, कर्ज मागणी अर्ज, कर्ज मंजूरीचे पत्र, वचनचिठठी, कंटीन्यूईंग गॅरंटी बॉंन्ड, दि. 3/04/1999 रोजीच्या मिटींमधील ठराव क्र. 5 चा उतारा, करारनामा, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 1 बँकेस लिहून दिलेला रजिस्टर तारणगहाण दस्त, सामनेवाला क्र. 1 बँकेचा ठराव, तक्रारदारांचा नागांव येथील गट नंबर 213 चा 7/12 उतारा इत्यादीच्या प्रती व शपथपते दाखल केलेली आहेत. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदार हे नवहिंद नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आहेत. सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांचे म्हणण्यात म्हटल्याप्रमाणे सदर पतसंस्थेने कर्ज उचल केलेली आहे. व सदरचे कर्ज थकीत आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिलेली आहे. तसेच त्यासंबंधीचे कागदपत्र प्रस्तुत कामी दाखल केलेले आहेत. सदरचे कर्ज थकीत झालेने सामनेवाला क्र. 1 बँकेने नवहिंद नागरी सहकारी पतसंस्था तसेच तक्रारदारासह अन्य संचालक यांचेविरुध्द सी.सी. नं. 982/2002 हा दावा कर्ज वसुलीसाठी दाखल केलेला आहे. सदर दाव्याची प्रत प्रस्तुत कामी दाखल केलेली आहे. तसेच सदर दाव्यामध्ये सामनेवाला क्र. 1 बँकेने तक्रारदारांना खत व पतपुरवठा करणेबाबत आज्ञार्थी मनाई अर्ज दि. 7/04/2002 रोजी अर्ज दाखल केलेला आहे. व सहकार न्यायालयाने दि. 6/05/2011 रोजी तक्रारदारांसह अन्य संचालकांनी दाखल केलला मनाईचा अर्ज नांमजूर केलेला आहे. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता सामनेवाला क्र. 1 बँकेने तक्रारदारांचा चेक वटविलेला नाही यामध्ये त्यांची कोणतीही सेवा त्रुटी नाही. सामनेवाला क्र. 1 बँकेने तक्रारदारांचा चेक न वटविण्याबाबत घेतलेला निर्णय हा धोरणात्मक स्वरुपाचा आहे व अशा धोरणात्मक निर्णयात हे मंच हस्तक्षेप करीत नाही. तसेच तक्रारदारांच्या तक्रारीचा विचार करता प्रस्तुत तक्रारीमध्ये कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |