Maharashtra

Jalna

CC/10/85

Shivaji Trimbak pungle - Complainant(s)

Versus

Kohinoor Prooffing Industries - Opp.Party(s)

S. S. Tawarawala

29 Oct 2010

ORDER


REPORTSSurvey No.488 Opp. Krida Bhavan bypass road Jalna
CONSUMER CASE NO. 10 of 85
1. Shivaji Trimbak pungleAt Nandni rajur Tal- Bhokardhan JalnaMaharashtara ...........Appellant(s)

Vs.
1. Kohinoor Prooffing Industries1380/2 Bhawani peth PunePuneMaharashtara ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :Y. N. Dawale, Advocate

Dated : 29 Oct 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकाल
(घोषित दि. 29.10.2010 व्‍दारा श्री.डी.एस.देशमुख, अध्‍यक्ष)
जिओमेम्‍ब्रेन शीट सदोष असल्‍याच्‍या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
      तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, त्‍याने त्‍याच्‍या शेतामधे शेततळयासाठी गैरअर्जदार कोहिनूर प्रूफिंग इंडस्‍ट्रीज यांचेकडून वॉटर प्रूफिंग जिओमेम्‍ब्रेन शिट 11 जुलै 2008 रोजी खरेदी केले होते. सदर जिओमेम्‍ब्रेन शिट शेततळयामधे लावल्‍यानंतर असे दिसून आले की, तो वॉटरप्रूफ नव्‍हता. शेततळयामधे पाणी थांबत नव्‍हते. सदर जिओमेम्‍ब्रेन शिट बद्दल पाच वर्ष सेवा देण्‍याचे अश्‍वासन गैरअर्जदाराने दिले होते. गैरअर्जदाराने निकृष्‍ट व दोषयुक्‍त जिओमेम्‍ब्रेन शिट पुरविले. त्‍यामुळे शेततळयात पाणीसाठा होऊ शकला नाही. त्‍यामुळे उन्‍हाळयामधे तो पीकांना पाणी देऊ शकला नाही. म्‍हणून त्‍याचे नुकसान झाले. म्‍हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराकडून त्‍यास रुपये 15,00,000/- नुकसान भरपाई देण्‍यात यावी.
      गैरअर्जदार कोहिनूर प्रूफिंग इंडस्‍ट्रीजने लेखी निवेदन दाखल केले. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, तक्रारदाराची तक्रार खोटी असून त्‍याच्‍या शेतजमिनीच्‍या संरक्षणासाठी व चांगल्‍या उत्‍पादनासाठी गैरअर्जदाराने वॉटरप्रूफ टेंट कॅनव्‍हास क्‍लॉथ लावण्‍याची हमी दिली होती हे म्‍हणणे नाकबूल आहे. तक्रारदाराला विक्री करण्‍यात आलेले जिओमेम्‍ब्रेन शिट दोषयुक्‍त नाही. तक्रारदाराने जिओमेम्‍ब्रेन शिट विकत घेतल्‍यानंतर दोन वर्षांनी ही तक्रार दाखल केली असून त्‍याने जिओमेम्‍ब्रेन शिटचा दोन वर्षापर्यंत उपभोग घेतलेला आहे. त्‍यामुळे सदर शिटमधे कोणताही दोष नव्‍हता हे सिध्‍द् होते. तक्रारदाराकडे सदर जिओमेम्‍ब्रेन शिट बसविल्‍यानंतर त्‍याची काळजी कशी घ्‍यावी व निगा कशी राखावी याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन करण्‍यात आलेले होते. तक्रारदाराला विक्री करण्‍यात आलेले जिओमेम्‍ब्रेन शिट चांगल्‍या दर्जाचे असून त्‍यामधे कोणताही दोष नाही. तसेच सदर तक्रार या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात चालू शकत नाही. कारण तक्रारदाराने जिओमेम्‍ब्रेन शिट गैरअर्जदाराच्‍या पुणे येथे कार्यालयातून खरेदी केले होते. तक्रारदार मंचासमोर स्‍वच्‍छ हाताने आलेला नसून त्‍याच्‍याकडे गैरअर्जदाराचे रुपये 6,382/- येणे बाकी आहे. सदर रक्‍कम देण्‍याचे टाळण्‍याकरिता तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. म्‍हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे.
दोन्‍ही पक्षाच्‍या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
           
            मुद्दे                                       उत्‍तर
1.प्रस्‍तुत तक्रार या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात
 चालू शकते काय ?                                             होय
2.तक्रारदार हे सिध्‍द् करु शकतो का की त्‍याने
 गैरअर्जदाराकडून खरेदी केलेले जिओमेम्‍ब्रेन
 शिट सदोष आहे ?                                            नाही                         
 
 
 
3.आदेश काय ?                                        अंतिम आदेशा प्रमाणे
 
 
कारणे
 
मुद्दा क्रमांक 1     युक्‍तीवादाचे वेळी तक्रारदाराच्‍या वतीने कोणीही हजर नाही. गैरअर्जदार कोहिनूर प्रूफिंग इंडस्‍ट्रीजच्‍या वतीने अड.वाय.एन.डवले यांनी युक्‍तीवाद केला.
      तक्रारदाराने गैरअर्जदाराच्‍या पुणे येथील कार्यालयातून जिओमेम्‍ब्रेन शिट खरेदी केलेले असून खरेदीच्‍या पावतीवर सदर व्‍यवहाराबाबत कोणताही वाद उदभवला तर तो पुणे येथील न्‍यायालयामधे चालेल असे नमूद केलेले असल्‍यामुळे ही तक्रार या मंचात चालू शकत नाही, असा मुद्दा गैरअर्जदाराने उपस्थित केला आहे.
      गैरअर्जदाराने उपस्थित केलेला मुद्दा योग्‍य नाही. कारण तक्रारदाराने जरी गैरअर्जदाराच्‍या पुणे येथील कार्यालयातून जिओमेम्‍ब्रेन शिट खरेदी केलेले असले तरी वादातील विषय वस्‍तू म्‍हणजेच जिओमेम्‍ब्रेन शिट या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात बसविण्‍यात आलेले असून तक्रार दाखल करण्‍याचे कारण या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात घडलेले असल्‍यामुळे ही तक्रार या मंचात चालू शकते असे आमचे ठाम मत आहे. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले. 
 
मुद्दा क्रमांक 2 तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेले जिओमेम्‍ब्रेन शिट दोषयुक्‍त असल्‍याचे सिध्‍द् करण्‍यासाठी स्‍वत:च्‍या शपथपत्राशिवाय कोणताही पुरावा दिलेला नाही. वादग्रस्‍त जिओमेम्‍ब्रेन शिटमधे दोष आहे किंवा नाही ही बाब सदर जिओमेम्‍बेन शिटचा नमुना प्रयोगशाळेत तपासल्‍याशिवाय कळू शकणार नाही. हे विचारात घेऊन तक्रारदाराने वादग्रस्‍त जिओमेम्‍ब्रन शिटचा नमुना मंचासमोर सादर करण्‍याबाबत तक्रारदाराला आदेश देण्‍यात आले होते. परंतू तक्रारदाराने वादग्रस्‍त जिओमेम्‍ब्रेन शिटचा नमुना संधी देऊनही मंचासमोर सादर केला नाही. वादग्रस्‍त जिओमेम्‍ब्रेन शिट सदोष असल्‍याचे सिध्‍द् करण्‍यास तक्रारदार असमर्थ ठरलेला आहे. म्‍हणून मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले. 
 
म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
 
आदेश
  1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्‍यात येते.
  2. तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
  3. संबंधितांना आदेश कळविण्‍यात यावा.  

HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, MemberHONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT ,