( आदेश पारित द्वारा- श्री नितीन घरडे, मा.सदस्य )
- आदेश -
(पारित दिनांक –07 सप्टेंबर 2013)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे –
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं.1 ही ले-आऊट विकसक संस्था असुन विरुध्द पक्ष
क्रं. 2 व 3 त्यांचे भागीदार आहेत. त्यांचे मौजा चिंचकोटा, प.ह.नं.84, खसरा नं.1, मधील भुखंड क्रं. 97,98 एकुण आराजी 2985 स्के.फुट, तह.जि.नागपुर रुपये 2,37,587/-मध्ये विकत घेण्याचा दिनांक 25/01/2010 रोजी विरुध्द पक्षासोबत करारनामा केला. सदर कराराचे वेळी तक्रारकर्त्याने बयाणा रुपये 50,000/- विरुध्द पक्षास दिली व उर्वरित रक््कम प्रती माह रु.8840/- प्रमाणे देण्याचे ठरले होते.ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने परिशिष्ठ-1 नुसार विरुध्द पक्षाकडे आजपर्यत रुपये 1,40,000/- विरुध्द पक्ष क्रं.1 कडे जमा केले आहेत.
परिशिष्ठ -1
अ.क्रं. |
पावती क्रमांक |
रक्कम जमा केल्याचा दिनांक |
रक्कम |
1) |
542 |
17/12/2009 |
25,000/- |
2) |
67 |
18/01/2010 |
30,000 |
3) |
566 |
23/01/2010 |
30,000/- |
4) |
588 |
21/02/2010 |
5,000/- |
5) |
702 |
12/03/2010 |
5,000/- |
6) |
721 |
21/04/2010 |
5,000/- |
7) |
695 |
24/04/2011 |
20,000/- |
8) |
732 |
21/06/2010 |
10,000/- |
9) |
775 |
17/07/2011 |
20,000/- |
10) |
789 |
21/09/2011 |
20,000/- |
|
|
एकुण जमा रक्कम रुपये |
|
उर्वरित रक्कम रुपये 2,33,125/-देणे बाकी आहे. बयाणापत्रानुसार विक्रीपत्राकरिता लागणारा सर्व खर्च, ले-आऊट मधील रोड व जमीन गैरकृषी करिता लागणारा खर्च, ना हरकत प्रमाणपत्र, करपावती इत्यादीची सर्व जबाबदारी खरेदी करणा-यावर राहील असे नमुद आहे. विरुध्द पक्षाने ठरल्याप्रमाणे रक्कम देऊन विक्रीपत्र करुन दिले नाही म्हणुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षास प्रत्यक्ष जाऊन भेटला व विक्रीपत्र करुन नोदवुन देण्याची विनंती व उर्वरित रक्कम विक्रीपत्राचे वेळी देण्यास तयार असल्याचे व विक्रीपत्राचा संपुर्ण खर्च करण्यास तयार असल्याचे सांगीतले परंतु विरुध्द पक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही व नंतर पाहु असे म्हणाले म्हणुन तक्रारकर्त्याने दिनांक 14/11/2011 रोजी विरुध्द पक्षास वकीलामार्फत कायदेशीर नोटीस बजावली. सदर नोटीसला विरुध्द पक्षाने कोणताही प्रतीसाद दिला नाही. म्हणुन तक्रारकर्त्याने दिनांक 21/02/2012 रोजी मंचासमक्ष तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केली आहे.
तक्रारकर्त्याची प्रार्थना-
1. विरुध्द पक्षाने त्यांचे मौजा चिंचकोटा, प.ह.नं.84, खसरा नं. 1, मधील भुखंड क्रं. 97,98 एकुण आराजी 29.85 स्के. मिटर, तह. जि. नागपुर सर्व प्रमाणपत्र व कराचा भरणा केल्याची रसीद घेऊन सदर भुखंडाचे विक्रीपत्र नोंदवुन द्यावे.
2. तक्रारकर्त्यास रुपये 1500/- तक्रारीच्या खर्चापोटी मिळावे. अशी मागणी केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार शपथपत्रावर असुन तक्रारीसोबत एकुण 18 दस्तऐवज दाखल केले आहे. त्यात विक्रीचा करारनामा, पैसे भरल्याच्या पावत्या, नोटीस, पोहचपावती व रसिद व प्रतिज्ञालेख इत्यादींचा समावेश आहे.
4. सदर तक्रारीचे अनुषंगाने, मंचाद्वारे सदर प्रकरणात विरुध्द पक्षाला नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होवुन विरुध्द पक्ष मंचासमक्ष उपस्थीत झाले व आपला लेखी जवाब प्रकरणात दाखल केला.
5. विरुध्द पक्ष आपले जवाबात उभयपक्षात भुखंड खरेदीच्या कराराची बाब मान्य करतात. परंतु तक्रारकर्त्याने दिनांक 21/9/2011 पर्यत 1,40,000/- रक्कम जमा केली व पुढे रक्कम जमा केली नाही व कराराचा भंग केला. दिनांक 17/12/2009 चे (दस्तऐवज क्रं.31)नियमावली नुसार दिनांक 21/9/2012 पर्यत रुपये 2,40,640/- एवढया रक्कमेचा भरणा करावयाचा होता तो न केल्याने तक्रारकर्ता रुपये 100/- प्रतीमाह दंड देऊ लागतात. विरुध्द पक्ष मान्य करतात की तक्रारकर्त्याने विक्रीपत्र करुन देण्याबाबत विनंती केली व पुढे त्यांचे वकीलामार्फत नोटीस दिली परंतु हे तक्रारकर्त्याने केवळ रक्कम थकीत असल्यामुळे व किस्त भरण्यापासुन व दंडापासुन मुक्ती मिळविण्याकरिता केले व खोटी नोटीस दिली. करारानुसार तक्रारकर्त्याने 36 महिन्यात म्हणजेच दिनांक 31 जानेवारी 2013 पर्यत संपुर्ण रक्कम अदा करावयाची होती परंतु तक्रारकर्त्याने सप्टेबर 2011 नंतर रक्कम देणे बंद केले व कराराचा भंग केला व करार पुर्ण होण्याचे आधीच ही तक्रार दाखल केली यात विरुध्द पक्षावर याची कुठलीही जबाबदारी येत नाही.
6. विरुध्द पक्ष नमुद करतात की, उभयपक्षात झालेल्या करारानुसार तक्रारकर्ता सलग 3 महिने किस्त रक्कम भरु शकला नाही तर तक्रारकर्त्यास थकीत घोषित करुन, भुखंडांची नोंदणी रद्द समजुन सदर भुखंड तिस-या व्यक्तिस विकण्यास विरुध्द पक्ष मोकळे असतील व अशी परिस्थीती उद्भभवल्यास जमा आगाऊ रक्कमेतुन 30 टक्के रक्कम कपात करुन उर्वरित रक्कम कराराप्रमाणे वेळेनंतरच विरुध्द पक्ष परत करतील. सदर कराराचा तक्रारकर्त्याने भंग केला व ही खोटी तक्रार दाखल केली म्हणुन सदरची खोटी तक्रार खारीज करावी अशी विनंती केली.
//*// कारण मिमांसा //*//
तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, प्रतिज्ञालेख,विरुध्द पक्षाचा लेखी जवाब, दाखल कागदपत्रे, उभयपक्षकारांचा लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्म अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडुन भुखंड विकत घेण्यासंबंधी दिनांक 25/1/2010 रोजी करारनामा केला होता. करारनाम्यानुसार तक्रारकर्त्याने रुपये 55,000/-विरुध्द पक्षास बयाणा म्हणुन दिलेले आहेत. पुढे तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम 36 महिन्यात विरुध्द पक्षाकडे जमा करावयाची होती परंतु तक्रारकर्त्याने दिनांक 21/9/2011 रोजी शेवटची रक्कम जमा केली व त्यानंतर पुढे हप्ता जमा करणे बंद केले व विरुध्द पक्षास उर्वरित रक्कम एकमुस्त भरुन विक्रीपत्र करुन देण्याबबात विनंती केली. परंतु उभयपक्षात झालेल्या बयाणापत्रानुसार तक्रारकर्ता दिनांक 31 जानेवारी 2013 पर्यत संपुर्ण रक्कम भरण्यास बांधील होता. परंतु तक्रारकर्त्याने भुखंडाची संपुर्ण रक्कम जमा केली नाही हे दाखल पावत्यांवरुन दिसुन येते व कालावधी पुर्ण होण्याआधी ही तक्रार दाखल करुन दिनांक 17/12/2009 चे जाहिरात पत्रकांतील अटी व शर्तीचा स्वतःच भंग केला आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे उभयपक्षांतील करारास पुर्णत्व न आल्याने विरुध्द पक्षाचे सेवेत कुठलीही कमतरता असल्याचे दिसुन येते नाही करिता हे मंच पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
3) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना नि:शुल्क देण्यात याव्या.
| Nitin Manikrao Gharde, MEMBER | Amogh Shyamkant Kaloti, PRESIDENT | , | |