Maharashtra

Nagpur

CC/50/2022

VAIBHAV DILIP RAUT - Complainant(s)

Versus

KK CAREER SOLUTIONS THROUGH ITS PROPRIETOR KAMALJEET KAUR SIDHU - Opp.Party(s)

ADV. PRAFULL A. TENI

11 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/50/2022
( Date of Filing : 17 Jan 2022 )
 
1. VAIBHAV DILIP RAUT
R/O. CHANDRAMANI NAGAR, GALLI NO.2/L, HOUSE NO.11, NAGPUR-440027
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. KK CAREER SOLUTIONS THROUGH ITS PROPRIETOR KAMALJEET KAUR SIDHU
OFF.401, 4TH FLOOR ACROPOLIS BUILDING MILITARY ROAD MAROL, SHANKARA NAGAR, BHAWANI NAGAR, MAROL, ANDHERI (E) MUMBAI-400059
MUMBAI
MAHARASHTRA
2. KK CAREER SOLUTIONS THROUGH ITS PROPRIETOR KAMALJEET KAUR SIDHU
BRANCH OFF. 103/46 NAIVEDYA APARTMENT, KORADI ROAD, NEAR ALEX HOSPITAL, FARAS, CHOWK, NAGPUR-440030
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. PRAFULL A. TENI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 11 Jul 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  विरुध्‍द पक्ष नौकरी शोधणा-या उमेदवारांना देशात तसेच विदेशात रिक्‍त पदावर नौकरी उपलब्‍ध (Job Placement )   करुन देण्‍याचा करार करतात. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट अॅन्‍ड कॅटरिंग टेक्‍नोलॉजि नागपूर येथून केले असून तो नौकरीच्‍या शोधात होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याशी संपर्क साधून त्‍याला कार्यालयात बोलाविले आणि त्‍याच्‍या गरजेनुसार त्‍याला नौकरी उपलब्‍ध करुन देण्‍याचे आश्‍वासन दिले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी चर्चा केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 21.09.2018 ला नोंदणी पोटी Reference No. 718264067071 अन्‍वये रुपये 20,000/- अदा केले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला थॉयलन्‍ड देशामध्‍ये उमेदवारी प्रक्रियेकरिता प्रोग्राम फी पोटी रुपये 37,300/- जमा करण्‍यास सांगितले असता तक्रारकर्त्‍याने Reference No. 918269434092 अन्‍वये दि. 26.09.2018 ला फी जमा केली. तसेच मालदिवा   देशामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या उमेदवारी प्रक्रिये पोटी रुपये 75,000/- जमा करण्‍यास सांगितले असता विरुध्‍द पक्षावर विश्‍वास ठेवून तक्रारकर्त्‍याने Reference No. 718344588691 अन्‍वये दि. 10.12.2018 ला आर.टी.जी.एस. द्वारे रुपये 75,000/- जमा केले. त्‍याचप्रमाणे मलेशिया येथे तक्रारकर्त्‍याच्‍या उमेदवारी प्रक्रियेपोटी प्रोग्राम फी म्‍हणून रुपये 30,000/- जमा करण्‍यास सांगितले असता तक्रारकर्त्‍याने Reference No. 91912671115 अन्‍वये दि. 06.05.2019 ला आर.टी.जी.एस. द्वारे रुपये 30,000/- जमा केले. त्‍यानंतर तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून त्‍याच्‍या आवश्‍यकतेनुसार चांगल्‍या नौकरीच्‍या प्रतिक्षेत होता, परंतु विरुध्‍द पक्षाने चांगली नौकरी उपलब्‍ध करुन दिली नाही.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या मागणीनुसार वेळोवेळी आर.टी.जी.एस. द्वारे  रक्‍कम अदा केलेली आहे, त्‍यानंतरही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची उमेदवारी प्रक्रिया पूर्ण केली नाही अथवा त्‍याच्‍या निवडीनुसार नौकरी उपलब्‍ध करुन दिली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी दूरध्‍वनी वरुन तसेच नागपूर येथील कार्यालयात प्रोग्राम फी परत करण्‍याकरिता भेट दिली असता वि.प.कडून कोणताही योग्‍य प्रतिसाद मिळाला नाही अथवा तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम ही परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दि. 21.01.2020 रोजी  नागपूर येथील पोलिस स्‍टेशन इमामवाडा मध्‍ये तक्रार नोंदविली. तसेच विरुध्‍द पक्षाला दि. 05.11.2021 ला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्त होऊनही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करून मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाकडे जमा असलेली रक्‍कम रुपये 1,62,300/- डिसेंबर 2018 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे मानसिक, शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही आयोगा समक्ष हजर झाले नाही अथवा आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्ष 1 विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 02.05.2022 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍या तर्फे दाखल केलेले दि. 22.06.2022 च्‍या अर्जाप्रमाणे विरुध्‍द पक्ष 2 चे नांव वगळण्‍यात आलेले आहे.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याने  तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद व  तोंडी युक्तिवादाबाबतची पुरसीसवरुन आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

1    तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?                  होय

 

2    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?         होय

 

3.   विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय?       होय

 

4    काय आदेश ?                             अंतिम आदेशानुसार

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष के.के.करिअर सोल्‍युशन यांचे आय.सी.आय.सी.आय. बॅंक पुनम नगर, ब्रान्‍च –अंधेरी येथील बॅंक खात्‍यात परदेशात नौकरी मिळण्‍याकरिता नोंदणी पोटी दि.21.09.2018 ला Reference No. 718264067071 अन्‍वये रुपये 20,000/-, व त्‍याच्‍या प्रक्रिये पोटी दि. 26.09.2018 ला Reference No.918269434092 अन्‍वये रुपये 37,300/-, दि.10.12.2018 रोजी Reference No. 718344588691 अन्‍वये रुपये 75,000/-, व दि. 06.05.2019 रोजी Reference No. 91912671115 अन्‍वये रुपये 30,000/- अदा केलेले आहे, अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे एकूण रक्‍कम रुपये 1,62,300/- आर.टी.जी.एस.द्वारे अदा केल्‍याचे नि.क्रं. 2( iii) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विदेशात चांगली नौकरी मिळून देण्‍याचे आश्‍वासन दिले होते व त्‍याकरिता रुपये 1,62,300/- एवढी मोठी रक्‍कम स्‍वीकारुन ही तक्रारकर्त्‍याला चांगली नौकरी मिळून दिली नाही अथवा तक्रारकर्त्‍याकडून प्राप्‍त केलेली रक्‍कम ही परत केली नाही, ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते असे आयोगाचे मत आहे. तसेच कोणतीही सेवा न दिल्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून नोंदणी फी सह नौकरी प्रक्रिये पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.    

             सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.  

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 1,62,300/-  व त्‍यावर दिनांक 06.05.2019 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.  

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.