(आदेश पारित व्दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्य)
- तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष यांचेकडुन मौजा चिखली (डे), प.ह.नं. १७, सिटी सर्व्हे नंबर १९/२०/२, खसरा वार्ड नंबर ४, तह. जिल्हा नागपूर मधील प्लॉट क्रमांक १ ते ८१ वेगवेगळ्या दिनांकाला वेगवेगळ्या करारनाम्याव्दारे विकत घेतले व त्यापोटी विरुध्द पक्षाला प्लॉट खरेदीपोटी रक्कम खालिलप्रमाणे अदा केली आहे.
तक्रारकर्ता क्रमांक १ भानुदास दत्ताञय धमगाये यांनी विरुध्द पक्षाशी मौजा चिखली (डे), प.ह.नं. १७, सिटी सर्व्हे नंबर १९/२०/२, के वार्ड नंबर ४, तह. जिल्हा नागपूर येथील प्लॉट क्रमांक ७६ एकुण क्षेञफळ १६०० चौ. फुट, एकुण किंमत ५,२०,०००/- एवढ्या किंमतीमध्ये विकत घेण्याचा करार १०० रुपये चे स्टॅम्प पेपरवर विरुध्द पक्षाशी दिनांक ९/४/२०१० रोजी केला व कराराचे दिवशी विरुध्द पक्षाला रुपये १,००,०००/- बयाणा रक्कम दिली व उर्वरीत रक्कम रुपये ७६,६६७/- प्रतिमहा प्रमाणे अदा करावयाची होती. तक्रारकर्त्याने प्लॉट खरेदीपोटी संपूर्ण रक्कम रुपये ५,२०,०००/- विरुध्दपक्षाला अदा केली व त्याबाबतची पावती विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला दिली व त्या अभिलेखावर दाखल आहेत. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला प्लॉट चा ताबा दिला व त्यावर तक्रारकर्त्याने बांधकाम केले.
तक्रारकर्ती स्वर्गीय कमलाबाई डोमाजी काळे, तक्रारकर्ता क्रमांक २ व ३ (वारसदार हर्षद रविंद्र काळे, अक्षय रविंद्र काळे) यांनी विरुध्द पक्षाशी मौजा चिखली (डे), प.ह.नं. १७, सिटी सर्व्हे नंबर १९/२०/२, के वार्ड नंबर ४, तह. जिल्हा नागपूर येथील प्लॉट क्रमांक ६२ एकुण क्षेञफळ १००० चौ. फुट, एकुण किंमत ३,२५,०००/- एवढ्या किंमतीमध्ये विकत घेण्याचा करार १०० रुपये चे स्टॅम्प पेपरवर विरुध्द पक्षाशी दिनांक ३०/०७/२०१० रोजी केला व कराराचे दिवशी विरुध्द पक्षाला रुपये २,५०,०००/- बयाणा रक्कम दिली व कराराप्रमाणे उर्वरीत रक्कम रुपये ७५,०००/- विक्रीपञाचे वेळेस अदा करावयाचे होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला प्लॉट चा ताबा दिला व त्यावर तक्रारकर्त्याने घर बांधले. तक्रारकर्ता क्रमांक २ व ३ यांनी विरुध्द पक्षाला दिनांक २६/१२/२०१३ रोजी पञ पाठवुन विक्रीपञ वारसदार यांचे नावे करण्याबाबत कळविले.
तक्रारकर्ता क्रमांक ४ विनोद भय्याजी ठाकरे यांनी विरुध्द पक्षाशी मौजा चिखली (डे), प.ह.नं. १७, सिटी सर्व्हे नंबर १९/२०/२, के वार्ड नंबर ४, तह. जिल्हा नागपूर येथील प्लॉट क्रमांक ७७ एकुण क्षेञफळ १६०० चौ. फुट, एकुण किंमत ५,२०,०००/- एवढ्या किंमतीमध्ये विकत घेण्याचा करार १०० रुपये चे स्टॅम्प पेपरवर विरुध्द पक्षाशी दिनांक ९/४/२०१० रोजी केला व कराराचे दिवशी विरुध्द पक्षाला रुपये ५,००,०००/- बयाणा रक्कम दिली व कराराप्रमाणे उर्वरीत रक्कम रुपये २०,०००/- विक्रीपञाचे वेळेस अदा करावयाचे होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला प्लॉट चा ताबा दिला व त्यावर तक्रारकर्त्याने घर बांधले.
तक्रारकर्ता क्रमांक ५ व ६ श्री परमेश्वर मिखन साव व श्री विरेंद्र पियारी साव यांनी विरुध्द पक्षाशी मौजा चिखली (डे), प.ह.नं. १७, सिटी सर्व्हे नंबर १९/२०/२, के वार्ड नंबर ४, तह. जिल्हा नागपूर येथील प्लॉट क्रमांक ६४ एकुण क्षेञफळ १५०० चौ. फुट, एकुण किंमत ४,८७,५००/- एवढ्या किंमतीमध्ये विकत घेण्याचा करार १०० रुपये चे स्टॅम्प पेपरवर विरुध्द पक्षाशी दिनांक ३०/०७/२०१० रोजी केला व कराराचे दिवशी विरुध्द पक्षाला रुपये २,००,०००/- बयाणा रक्कम दिली व कराराप्रमाणे उर्वरीत रक्कम रुपये २,८७,०००/- विक्रीपञा पर्यंत अदा करावयाचे होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला प्लॉट चा ताबा दिला व त्यावर तक्रारकर्त्याने घर बांधले.
तक्रारकर्ता क्रमांक ७ व ८ श्री नामदेवराव जागोजी हेडाऊ व परदेशी सुखीया बाहे, यांनी विरुध्द पक्षाशी मौजा चिखली (डे), प.ह.नं. १७, सिटी सर्व्हे नंबर १९/२०/२, के वार्ड नंबर ४, तह. जिल्हा नागपूर येथील प्लॉट क्रमांक ८० एकुण क्षेञफळ १२००/-चौ. फुट, एकुण किंमत ३,९०,०००/- एवढ्या किंमतीमध्ये विकत घेण्याचा करार १०० रुपये चे स्टॅम्प पेपरवर विरुध्द पक्षाशी दिनांक १३/०७/२०१० रोजी केला व कराराचे दिवशी विरुध्द पक्षाला रुपये ३,८०,०००/- बयाणा रक्कम दिली व कराराप्रमाणे उर्वरीत रक्कम रुपये १०,०००/- विक्रीपञाचे वेळेस अदा करावयाचे होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला प्लॉट चा ताबा दिला व त्यावर तक्रारकर्त्याने घर बांधले.
तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षाला करारनाम्यानुसार रक्कम अदा करुनही तक्रारकर्त्यांना प्लॉट चे विक्रीपञ करुन दिले नाही. तक्रारकर्ते करारनाम्यानुसार उर्वरीत रक्कम, स्टॅम्प ड्युटी, विकसन खर्च, टॅक्स (मार्केट किंमतीनुसार) देण्यास तयार असतांना सुद्धा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांना विक्रीपञ करुन दिले नाही. त्यामुळे सर्व तक्रारकर्त्यांनी कळमना पोलिस स्टेशन नागपूर यांचेकडे पोलिस तक्रार केली परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. करीता तक्रारकर्त्यांनी मा. मंचासमोर विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे. विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात यावे की त्याने तक्रारकर्त्यांकडुन उर्वरीत रक्कम घेऊन संबंधीत प्लॉट चे विक्रीपञ करुन द्यावे व प्रत्येक तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
- विरुध्दपक्षाला नोटीस पाठविण्यात आली व ती प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष मंचासमोर हजर झाले नाही करीता मा. मंचाने दिनांक २८/८/२०१९ ला विरुध्द पक्षाविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला.
- तक्रारकर्त्यांनी निशानी क्रमांक २ वर दाखल केलेले दस्ताऐवज व तोंडी युक्तीवाद ऐकल्यावर खालिल मुद्दे उपस्थित केले व त्यावरीत निष्कर्षे खालिलप्रमाणे नमुद केले आहे.
अ.क्र. मुद्दे उत्तर
I. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
II. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय
III. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
- तक्रारकर्ता क्रमांक १, २,३,४,५,६,७,८ यांनी विरुध्द पक्ष यांचे मौजा चिखली (डे), पटवारी हलका नंबर १७, सिटी सर्व्हे नंबर १९/२०/२, खसरा वार्ड नंबर ४, तह व जिल्हा नागपूर मधील वादातील प्लॉटचे खरेदीपोटी विरुध्द पक्षाला रक्कम अदा करुनही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांना त्यांचे वादातील प्लॉटचे विक्रीपञ करुन दिले नाही. तक्रारकर्त्यांनी निशानी क्रमांक २ वर दाखल दस्ताऐवजांचे अवलोकन केल्यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत. तसेच विरुध्द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्तुत प्रकरण चालविण्याचे अधिकार आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यांकडुन प्लॉटचे विक्रीपोटी रक्कम स्विकारुनही तक्रारकर्त्यांना वादातील प्लॉटचा ताबा दिला परंतु कायदेशीर विक्रीपञ करुन दिले नाही ही विरुध्द पक्षाची तक्रारकर्त्यांप्रती सेवेतील ञुटी असुन अनुचित व्यापार पद्धतीचा वापर करणारी कृती आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात येते की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता क्रमांक १ ला मौजा चिखली, पटवारी हलका नंबर १७, भुमापन क्रमांक १९/२०/२, तहसिल जिल्हा नागपूर मधील भुखंड क्रमांक ७६ चे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे व तक्रारकर्त्याने विक्रीपञाचा खर्च सोसावा.
किंवा
विरुध्द पक्षाला तांञिक व कायदेशीर अडचणीमुळे तक्रारकर्ता क्रमांक १ ला भुखंड क्रमांक ७६ चे विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन प्लॉट विक्रीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये ५,२०,०००/- तक्रारकर्त्याला अदा करावी व सदर रकमेवर द.सा.द.शे. १४ टक्के दराने व्याज दिनांक ०१/०६/२०१० पासुन तक्रारकर्त्याला संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
- तक्रारकर्ता क्रमांक २ व ३ यांनी मौजा चिखली, भुमापन क्रमांक १९/२०/२ तहसिल जिल्हा नागपूर येथील वादातील भुखंड क्रमांक ६२ चे विक्रीपञ नोंदणीपूर्वी विरुध्दपक्षाला करारानुसार अदा करावयाची उर्वरीत रक्कम रुपये ७५,०००/- अदा करावी.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात येते की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता क्रमांक २ व ३ यांना मौजा चिखली, पटवारी हलका नंबर १७, भुमापन क्रमांक १९/२०/२, तहसिल जिल्हा नागपूर मधील भुखंड क्रमांक ६२ चे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे व तक्रारकर्त्याने विक्रीपञाचा खर्च स्वतः सोसावा.
किंवा
विरुध्द पक्षाला तांञिक व कायदेशीर अडचणीमुळे तक्रारकर्त्याला भुखंड क्रमांक ६२ चे विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन प्लॉट विक्रीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये २,५०,०००/- तक्रारकर्त्याला अदा करावी व सदर रकमेवर द.सा.द.शे. १२ टक्के दराने व्याज करारनामा दिनांक ३०/०७/२०१० पासुन तक्रारकर्त्याला संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
- तक्रारकर्ता क्रमांक ४ यांनी मौजा चिखली, भुमापन क्रमांक १९/२०/२ तहसिल जिल्हा नागपूर येथील वादातील भुखंड क्रमांक ७७ चे विक्रीपञ नोंदणीपूर्वी विरुध्दपक्षाला करारानुसार अदा करावयाची उर्वरीत रक्कम रुपये २०,०००/- अदा करावी.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात येते की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता क्रमांक ४ यांना मौजा चिखली, पटवारी हलका नंबर १७, भुमापन क्रमांक १९/२०/२, तहसिल जिल्हा नागपूर मधील भुखंड क्रमांक ७७ चे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे व तक्रारकर्त्याने विक्रीपञाचा खर्च स्वतः सोसावा.
किंवा
विरुध्द पक्षाला तांञिक व कायदेशीर अडचणीमुळे तक्रारकर्त्याला भुखंड क्रमांक ७७ चे विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन प्लॉट विक्रीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये ५,००,०००/- तक्रारकर्त्याला अदा करावी व सदर रकमेवर द.सा.द.शे. १४ टक्के दराने व्याज करारनामा दिनांक ०९/०४/२०१० पासुन तक्रारकर्त्याला संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष अदायगी पर्यंत अदा करावे.
- तक्रारकर्ता क्रमांक ५ व ६ यांनी मौजा चिखली, भुमापन क्रमांक १९/२०/२ तहसिल जिल्हा नागपूर येथील वादातील भुखंड क्रमांक ६४ चे विक्रीपञ नोंदणीपूर्वी विरुध्दपक्षाला करारानुसार अदा करावयाची उर्वरीत रक्कम रुपये २,८७,०००/- अदा करावी.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात येते की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता क्रमांक २ व ३ यांना मौजा चिखली, पटवारी हलका नंबर १७, भुमापन क्रमांक १९/२०/२, तहसिल जिल्हा नागपूर मधील भुखंड क्रमांक ६४ चे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे व तक्रारकर्त्याने विक्रीपञाचा खर्च स्वतः सोसावा.
किंवा
विरुध्द पक्षाला तांञिक व कायदेशीर अडचणीमुळे तक्रारकर्त्याला भुखंड क्रमांक ६४ चे विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन प्लॉट विक्रीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये २,००,०००/- तक्रारकर्त्याला अदा करावी व सदर रकमेवर द.सा.द.शे. १२ टक्के दराने व्याज दिनांक ३०/०७/२०१० पासुन तक्रारकर्त्याला संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
- तक्रारकर्ता क्रमांक ७ व ८ यांनी मौजा चिखली, भुमापन क्रमांक १९/२०/२ तहसिल जिल्हा नागपूर येथील वादातील भुखंड क्रमांक ८० चे विक्रीपञ नोंदणीपूर्वी विरुध्दपक्षाला करारानुसार अदा करावयाची उर्वरीत रक्कम रुपये १०,०००/- अदा करावी.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात येते की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता क्रमांक ७ व ८ यांना मौजा चिखली, पटवारी हलका नंबर १७, भुमापन क्रमांक १९/२०/२, तहसिल जिल्हा नागपूर मधील भुखंड क्रमांक ८० चे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे व तक्रारकर्त्याने विक्रीपञाचा खर्च स्वतः सोसावा.
किंवा
विरुध्द पक्षाला तांञिक व कायदेशीर अडचणीमुळे तक्रारकर्त्याला भुखंड क्रमांक ८० चे विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन प्लॉट विक्रीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये ३,८०,०००/- तक्रारकर्त्याला अदा करावी व सदर रकमेवर द.सा.द.शे. १४ टक्के दराने व्याज दिनांक १३/०७/२०१० पासुन तक्रारकर्त्याला संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात येते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता क्रमांक १, तक्रारकर्ता क्रमांक ४ यांना मानसिक व शारिरीक ञासापोटी प्रत्येकी रुपये २०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च प्रत्येकी रुपये १०,०००/- अदा करावा.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात येते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता क्रमांक २ व ३ यांना मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा तसेच तक्रारकर्ता क्रमांक ५ व ६ यांना मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा आणि तक्रारकर्ता क्रमांक ७ व ८ यांना मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.