Maharashtra

Beed

CC/12/31

kakasaheb Shriram Shinde - Complainant(s)

Versus

Kisan Irrigation Ltd. - Opp.Party(s)

Takwani

24 Dec 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/12/31
 
1. kakasaheb Shriram Shinde
at post chikli Tq.Ashti
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Kisan Irrigation Ltd.
Tax Cener, K.V.3rd floor, 26 A Chandwali, near HDFC Bank Shaki Vihal Road, Adheri West Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                        दिनांक- 24.12.2014

                   (द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्‍यक्ष)

 

           तक्रारदार क्र.1 व 2  यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले  यांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्‍हणून  नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

             तक्रारदार यांचे  तक्रारील कथन  थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार क्र.1 व 2 हे पती पत्‍नी आहेत. दोघेही तक्रारदार मौजे चिखली ता.आष्‍टी येथे राहतात. तक्रारदार यांचे कूटूंबियाचा उदरनिर्वाह शेती व्‍यवसायावर चालतो.तक्रारदार यांचे नांवे मौजे चिखली गांवी शेत जमिन नोंदलेली आहे. तक्रारदार हे एकत्रित शेती करतात.

            तक्रारदार यांनी 2010-11 मध्‍ये त्‍यांचे शेत जमिनीमध्‍ये डाळींब व लिंबूची लागवड करण्‍याचे ठरवले. सदरील पिकाना पाणी देण्‍यासाठी पाईपलाईन करण्‍याचे ठरवले. तक्रारदार यांनी पाईप खरेदीसाठी किसान इरिगेशन लि. म्‍हणजे सामनेवाले यांचे सेल्‍स मॅनेजर श्री.विलास झांबरे पाटील यांचेंशी संपर्क साधला व सामनेवाले यांचेकडून पाईप खरेदी करण्‍याचे ठरवले. तक्रारदार यांनी खालील नमूद केल्‍याप्रमाणे सामनेवाले यांचेकडून पीव्‍हीसी पाईप खरेदी केले.

अ.क्र.

पाईपचा तपशील

नग

प्रति पाईप

एकूण किंमत रु.

1

किसान पी.व्‍ही.सी.पाईप 110 मी.मी. x  4 क्रि.ग्रॅ.

800 पाईप

रु.514.29

रु.4,11,432.00

2

किसान पी.व्‍ही.सी.पाईप 75 मी.मी. x  4 क्रि.ग्रॅ.

250 पाईप

रु.252.38

रु.63,095.00

3

किसान पी.व्‍ही.सी.पाईप 63 मी.मी.  x 4 क्रि.ग्रॅ.

100 पाईप

रु.174.29

रु.17,429.00

 

 

 

एकूण

रु.4,91,956.00

व्‍हॅट 5 टकके रु.24,597.00

राऊडींग            00.20

           रु.5,16,554.00

 

              तक्रारदार यांनी वर नमूद केलेले पाईप रोख  रक्‍कम देऊन खरेदी केले आहे. दि.22.1.2.2010 पर्यत सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे शेतात पाईप पाठवले आहेत. सदरील पाईप तक्रारदारर यांना मिळाल्‍यानंतर पाईपची जोडणी करण्‍यासाठी श्री.जी.के.सिरसाट इंजिनिअर यांना ठेका दिला. त्‍यांची फि म्‍हणून रु.20,000/- तक्रारदार यांनी इंजिनिअर यांना दिले. सदरील पाईप जोडण्‍यासाठी तक्रारदार यांनी दि.24.12.2010 रोजी किसान  मशीनरी स्‍टोअर्स  मोटार रिंवायडींग आष्‍टी  यांचेकडहून रक्‍कम रु.56,625/-चा माल घेतला. तसेच दि.22.12.2010 रोजी शेतकरी कल्‍याण केंद्र मिरजगांव ता.कर्जत कडून रु.5005/- चे सामान खरेदी केले. तक्रारदार यांनी पाईपची जोडणी करण्‍यासाठी जमिनीमध्‍ये जेसीबी च्‍या सहायाने खोदकाम केले. सदरील काम  जयभोले कन्‍स्‍ट्रक्‍शन आष्‍टी यांचेकडून रु.1,33,900/- देऊन करुन घेतले. दि..22.12.2010 रोजी साई कनस्‍ट्रक्‍शन मूर्शदपूर यांचेकडून खोदकाम करुन  घेतले त्‍यांस रु.59,000/- खर्च आला.दि.24.1.2011 रोजी ठिंबक सिंचनासाठी सार्थक अॅग्रो इंजिनिअर्स यांचेकडून रु.1,04,480/-  चा माल खरेदी केला. तक्रारदार यांनी डाळींबाचे रोपे जय हनूमान  नर्सरी यांचेकडून दि.18.08.2010 रोजी रु.22,200/- चे खरेदी केले. तक्रारदार यांनी लिंबाची रोपे जय हनूमान नर्सरी यांचेकडून दि.18.08.2010 रोजी रक्‍कम रु.10,800/- ची खरेदी केले.  ठिंबक सिचनांचे काम पूर्णत्‍वास नेण्‍यासाठी तक्रारदार यांना सार्थक अॅग्रो यांनी रु.20,000/- मोबदला दिला. तक्रारदार यांनी सदर शेतामध्‍ये डाळींब व लिंबू पिक लागवडीसाठी रु.10,67,536/- खर्च केला. तक्रारदार यांनी त्‍यांचे शेतात डाळींब व लिंबूची लागवड केली.

 

            तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की, जानेवारी फेब्रूवारी 2011 मध्‍ये तक्रारदार यांचे लक्षात आले की, सामनेवाले यांचेकडून खरेदी केलेले 110 मि.मि. पीव्‍हीसी पाईप फुटत आहेत. तक्रारदार यांनी पडताळणी केली असता असे लक्षात आले की, सदरील पाईप यांना चिरा/भेंगा पडल्‍या आहेत. सदरील भेंगा हळूहळू वाढत चाललेल्‍या आहेत. इंजिनिअर सिरसाट यांचे मार्गदर्शना खाली पाईपाची पाहणी केली असता असे लक्षात आले की, पूर्ण पाईप यांना भेंगा पडल्‍या आहेत व फुटत आहेत. तक्रारदार हे सामनेवाले यांचे सेल्‍स मॅनेजर श्री. झांबरे यांनी जाऊन भेटले व सदरील बाब लक्षात आणून दिली. श्री. झांबरे हे स्‍वतः तक्रारदार यांचे शेतात आले व पाहणी केली. तक्रारदार यांनी सर्व पाईप बदलून देण्‍यात येतील असे सांगितले. सामनेवाले यांचे अधिकारी देखील घटनास्‍थळावर आले व पाहणी केली व पाईप बदलून देतील असे  आश्‍वासन दिले. सेल्‍स मॅनेजर श्री. झांबरे यांनी सामनेवाले यांचे क्‍वॉलिटी कंट्रोल इंजिनिअर श्री.बालाजी गायकवाड व श्री.बी.आर महाडीक यांना बोलावले व पाईप दाखवले. तक्रारदार यांनी पाईप बदलून दिले जातील असे सांगितले. सदरील पाईपची एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे.

            तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की, सामनेवाले यांनी पाईप बदलून दिले नाही. दि.29.5.2011 रोजी सामनेवाले यांचे  रिजनल मॅनेजर श्री.सिध्‍दार्थ महिपाल यांनी पाईपची पाहणी केली. तक्रारदार यांनी सदरील पाईप लाईनचा उपभोग करता आला नाही. त्‍यामुळे डाळींब व लिंबाची रोपे जळू लागली. तक्रारदार यांनी  सदरील पिकास पाणी देण्‍यासाठी पर्यायी व्‍यवस्‍था केली. तक्रारदार यांनी ट्रॅक्‍टरने पाणी विकत आणले. त्‍यासाठी तक्रारदार यांना रु.1,20,000/- खर्च आला.

            तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की, सामनेवाले यांचे अधिका-यांनी ऑक्‍टोंबर 2000 मध्‍ये तक्रारदारांनी 110 मि.मि.पाईपचे टेस्‍टींग सेंट्रल इन्‍स्‍टीटयूट ऑफ प्‍लास्‍टीक्‍स इंजिनियरिंग अँन्‍ड टेक्‍नॉलॉजी यांचेकडून करुन घ्‍यावी. त्‍यानुसार तक्रारदार यांनी टेस्‍टींग फि भरुन सदरील पाईप तपासून घेतले. त्‍यांचे परिक्षण रिपोर्ट  तक्रारदार यांना प्राप्‍त झाला. सामनेवाले यांनी सदोष पाईप देऊन तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांनी सदरील पाईप तपासणी कामी रु.6,342/- खर्च करावा लागला. तक्रारदार पाईपलाईनचे जागेसाठी खर्च करावा लागला त्‍यासाठी रु.32,400/-  खर्च करावा लागला. तक्रारदार यांना परिक्षण अहवाल सामनेवाले यांना दाखवला. सामनेवाले यांनी सदरील दोषयूक्‍त पाईप बदलून देण्‍यास स्‍पष्‍ट नकार दिला. सदोष पाईप पूरवल्‍यामूळे तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ सोसावा लागला. तक्रारदार यांनी स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद यांचेकडून लिंबू व डाळींग लागवडीसाठी रु.16,00,000/- कर्ज घेतले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दोषयूक्‍त पीव्‍हीसी पाईप विक्री करुन अनूचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे. सबब, तक्रारदार यांना नुकसान भरपाई रु.17,31,278/-मिळावेत व त्‍यावर द.सा.द.शे. 10 टकके व्‍याज मिळावे अशी मागणी केली आहे.

            सामनेवाले हे या मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.8 वर लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन स्‍पष्‍टपणे नाकारले आहे. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी परिशिष्‍ट 1-ए,1-डि आणि 1-सी द्वारे दाखल केलेले दस्‍त हे सामनेवाले यांचे संबंधीत नाही. तसेच पावती परिशिट 1-सी व 1-डी या अर्जदार यांचे संबंधी नाही. सामनेवाले  यांचे कथन की, तक्रारदार यांनी ज्‍या इतर वस्‍तू खरेदी केलेल्‍या आहेत. त्‍यांचा सामनेवाले यांचेशी कोण्‍ताही संबंध नाही. तक्रारदार यांनी त्‍यांचे शेतात सुधारणासाठी इतर खर्च केलेला आहे त्‍यांचा सामनेवाले यांचेशी कोणताही संबंध नाही. सामनेवाले यांचे कथन की, सेल्‍स मॅनेजर श्री. झांबरे हे तक्रारदार यांना कधीही भेटले नाही व त्‍यांनी तक्रारदार यांचे शेताची कधीही  पाहणी केली नाही. तसेच तक्रारदार यांचे शेतावर बालाजी गायकवाड व महाडीक, श्री. महिपाल यांनी कधीही भेट दिली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदरील पाईप तपासून घेण्‍या बाबत कधीही सल्‍ला दिला नाही. सदरील तपास अहवाल सामनेवाले यांनी उत्‍पादीत केलेल्‍या पाईपचे संदर्भात नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून पाईप खरेदी केलेले नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेले बिल सामनेवाले यांनी दिलेले नाहीत. सदरील बिलावर जो मोनोग्राम आहे तो सामनेवाले कंपनीचा नाही. व्‍हॅट नंबर व सीएसटी  नंबर हा सामनेवाले यांचा नाही. तक्रारदार यांनी सदरील पाईप सामनेवाले यांनी उत्‍पादीत केलेले आहे या बाबत पुरावा दिलेला नाही. सदरील तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे. तक्रारदार यांनी जो वेगवेगळया बाबीसाठी खर्च केलेला आहे त्‍यांस सामनेवाले जबाबदार नाहीत. तक्रारदार यांनी सदरील पाईप अयोग्‍यरित्‍या बसवलेले आहेत त्‍यांस श्री.सिरसाट इंजिनिअर जबाबदार आहेत. तसेच सदरील श्री. सिरसाट यांना दाव्‍यात पक्षकार म्‍हणून सामील केलेले नाही. त्‍या कारणास्‍तव तक्रारीस आवश्‍यक पार्टीचा बांध येत आहे. तक्रारदार यांनी जो पाईप सेंट्रल इन्‍स्‍टीटयूट ऑफ प्‍लास्‍टीक्‍स इंजिनियरिंग अँन्‍ड टेक्‍नॉलॉजी  यांचेकडून तपासून घेतला तो पाईप सामनेवाले यांनी उत्‍पादीत केलेला नाही. सदरील रिपोर्ट मध्‍ये कोड नंबर, बॅच नंबर व उत्‍पादनाची तारीख दिलेली नाही. सदरील रिपोर्ट मध्‍ये सामनेवाले कंपनीने उत्‍पादीत केलेल्‍या पाईपचा संदर्भ नाही. सदरील रिपोर्ट मध्‍ये 4 केजी  पाईप हा तपासणीचे वेळेस बस्‍ट झाला नाही असे नमूद केले आहे. सदरील पाईपमध्‍ये उत्‍पादकीय दोष नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.

            तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.12 वर दाखल केले आहे. तक्रारदार यांनी साक्षीदार विलास हरीशंद्र झांबरे यांचे शपथपत्र नि.15 वर हजर केले आहे. साक्षीदार गहिनीनाथ कूंडलिक शिरसाट यांचे शपथपत्र नि.20 वर हजर केले आहे. साक्षीदार प्रविण भाऊराव बच्‍छाव यांचे शपथपत्र नि.25 वर हजर केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 वर पाईप खरेदी केल्‍या बाबत पावष्‍त्‍या व इतर खर्चाच्‍या पावत्‍या हजर केल्‍या आहेत. तसेच 7/12 चे उतारे, गॅरंटी पत्र इत्‍यादी हजर केले आहेत.  तक्रारदार  यांनी नि.27 वर प्‍लॉस्‍टींग टेस्‍टींग रिपोर्ट हजर केला आहे. नि.34 वर पूरसीस देऊन पुरावा बंद केला. सामनेवाले यांनी रिजनल मॅनेजर सिध्‍दार्थ महिपाल यांचे शपथपत्र नि.52 वर दाखल केले आहे. साक्षीदार श्री.मिलिंद गुप्‍ते यांचे शपथपत्र नि.53 वर दाखल केले आहे. शपथपत्रासोबत दस्‍त हजर केले आहेत. तक्रारदार यांनी नि.41 वर लेखी यूक्‍तीवाद हजर केला आहे. सामनेवाले यांनी लेखी यूक्‍तीवाद नि.50 वर दाखल केला आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.टेकवानी यांचा यूक्‍तीवाद ऐकला व सामनेवाले यांचे वकील श्र.चिवारी यांचा यूक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व संपूर्ण कागदपत्र यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

            मुददे                                                   उत्‍तर

  1.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष किसान 110 मि.मि.  4 कि.ग्रॅ.
  2. पीव्‍हीसी पाईप विक्री करुन अनूचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे
  3. ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ?                              नाही.
  4. तक्रारदार हे तक्रारीत मागणी कलेली नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र
  5. आहेत काय ?                                                   नाही.
  6. काय आदेश ?                                         अंतिम आदेशाप्रमाणे 
  7.  

मुददा क्र.1 व 2ः-

              तक्रारदार यांचे वकील श्री. टेकवानी यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून 110 एमएम  4 के.जी. पीव्‍हीसी पाईप खरेदी केलेले आहेत. त्‍यासोबत खरेदीच्‍या पावत्‍या परिशिष्‍ट 1-अ,व ब वर दाखल केलेल्‍या आहेत. सदरील पाईप तक्रारदार यांनी त्‍यांचे शेतात पाणी देण्‍यासाठी बसवले. त्‍यासाठी तक्रारदार यांना जेसीबी च्‍या सहायाने खोदकाम करावे लागले. त्‍यासाठी तक्रारदार यांनी रु.1,,33,900/- खर्च आला. तसेच ठिंबक सिचंनासाठी मोठा खर्च करावा लागला. सदरील पाईप शेतात बसवल्‍यानंतर त्‍यांस भेंगा पडल्‍या व तो फूटू लागला. सदरील  बाब तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे निदर्शनास आणून दिली. त्‍यावर सामनेवाले यांनी कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारदार यांनी स्‍वखर्चाने सेंट्रल इन्‍स्‍टीटयूट ऑफ प्‍लॉस्‍टीक इंजिनिअरिंग अँन्‍ड टेक्‍नालॉजी औरंगाबाद  येथून पाईप तपासून घेतले. त्‍यांचा परिक्षण रिपोर्ट तक्रारदार यांना मिळाला. सदरील 110 एम.एम.  4 के.जी. पाईप स्‍टॅडर्ड नुसार नव्‍हता. पाईपमध्‍ये उत्‍पादीत दोष आढळून आला. तक्रारदार यांनी या मंचाचे लक्ष नि.30 वर व जो तपासणी अहवाल दाखल केला आहे त्‍यावर वेधले. तसेच साक्षीदार श्री. प्रवीण बच्‍छाव यांनी दिलेल्‍या नि.25 वरील साक्षीवर वेधले व सदरील पाईपमध्‍ये sunphatate ash contain – 12.52 % आढळून आले. प्रत्‍यक्षात ते जास्‍तीत जास्‍त 11 टक्‍के असावयास हवे होते. सदरील  दोष असल्‍यामुळे  पाईप पाण्‍याचा दाब सहन करु शकले नाही व ते फुटण्‍यास सूरुवात झाली. त्‍यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले. तक्रारदार यांना पिक वाचवण्‍यासाठी पाणी बाहेरुन विकत घ्‍यावे लागले. सबब, तक्रारदार यांनी तक्रारीत मागणी केलेली दार व नुकसान भरपाई देण्‍यात यावी.

 

            सामनेवाले यांचे वकील श्री. चिवारी यांनी यूक्‍तीवादाचे प्रित्यर्थ नि.50 वर लेखी यूक्‍तीवाद दाखल केला. त्‍या यूक्‍तीवादाचे कथन की, तक्रारदार यांनी जो पाईप तपासणीसाठी पाठविला त्‍या बाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांना कधीही कळविले नाही व तसा टेस्‍ट रिपोर्ट सामनेवाले यांचेकडे दिला नाही. तक्रारदार  यांनी सदरील पाईप हा सामनेवाले यांचेकडून खरेदी केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेले बिल हे सामनेवाले यांचे नाही. सदरील टेस्‍ट रिपोर्ट हा सामनेवाले यांचेवर बंधनकारक नाही. तसेच सदरील टेस्‍ट रिपोर्ट मध्‍ये पाईप कोणत्‍या कंपनीने उत्‍पादीत केला होता व तो कोणत्‍या लॉटचा होता या बाबत तपासणी अहवालामध्‍ये उल्‍लेख नाही. साक्षीदार श्री. प्रवीण बचछाव  यांनी त्‍यांचे साक्षीमध्‍ये टेस्‍ट केलेला पाईप हा कोणत्‍या कंपनीचा होता, पाईपवर उत्‍पादीत कंपनीचे नांव नव्‍हते तसेच त्‍यांनी त्‍यांचे साक्षीमध्‍ये पाईप हा फुटू शकतो एवढेच नमूद केलेले आहे. प्रत्‍यक्षात पाईप फुटला आहे या बाबत तसेच पाईप मध्‍ये उत्‍पादीत दोष आहे ही बाब स्‍पष्‍ट केली नाही. सामनेवाले यांचे कथन की, त्‍यांचे साक्षीदार हे क्‍वालिटी कंट्रोल मॅनेजर आहेत. त्‍यांचे साक्षी वरुन तक्रारदार यांनी विकत घेतलेल्‍या पाईप मध्‍ये कोणताही दोष नव्‍हता. ते सर्व पाईप आयएसआय मार्कचे होते. त्‍या बाबत सामनेवाले यांना प्रमाणपत्र मिळालेले आहे. सबब, तक्रारदार यांनी जो पाईप टेस्‍ट करुन घेतला तो पाईप सामनेवाले कंपनीने उत्‍पादीत केलेला होता व तक्रारदार यांनी विकत घेतलेल्‍या पाईपमधीलच होता ही बाब शाबीत केलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदोष पाईप विक्री करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे हे सिध्‍द होत नाही.

 

            तक्रारदार व सामनेवाले यांनी वर केलेला यूक्‍तीवाद लक्षात घेतला तसेच तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेला पूराव्‍या,शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. या मंचासमोर खालील बाबीविषयी प्रर्कषाने उपस्थित होतात

1.     तक्रारदार यांनी सेंट्रल इन्‍स्‍टीटयूट ऑफ प्‍लॉस्‍टीक इंजिनिअरिंग अँन्‍ड टेक्‍नालॉजी यांचेकडून जो पाईप तपासून घेतला आहे व ज्‍या पाईपमध्‍ये दोष आढळून आला तो पाईप सामनेवाले कंपनीने उत्‍पादीत केलेला आहे काय ?

2.    सदरील पाईप तक्रारदार यांनी सामनेवाले कंपनीकडहून विकत घेतला आहे काय ?

3.    तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून ज्‍या पाईपची खरेदी केली त्‍या पाईपमध्‍ये उत्‍पादीत दोष आहे ही बाब तक्रारदार यांनी प्रथमदर्शनी शाबीत केली आहे काय ?

 

      तक्रारदार यांनी परिशिष्‍ट 1-अ,ब,क पाईप  खरेदी केल्‍याच्‍या पावत्‍या हजर केल्‍या आहेत. तक्रारदार यांनी किसान 10 एम.एम.  4 के.जी. 800 नग किंमत प्रत्‍येकी रु.514/- याप्रमाणे एकूण रुककम रु.4,11,432/-  हे किसान इरिगेशन लि. यांचेकडून विकत घेतल्‍याचे निष्‍पन्‍न होते. सदरील पाईप हे तक्रारदार यांनी आपल्‍या शेतामध्‍ये पाणी नेण्‍यासाठी बसवले. तक्रारदार यांना पाईपलाईन करण्‍यासाठी जो काही खर्च करावा लागला आहे त्‍यांचे पावत्‍या तक्रारदार यांनी या मंचासमोर हजर केलेल्‍या आहेत. तक्रारदार यांनी सदरील पाईप ट्रकच्‍या साहायाने पूरवण्‍यात आले. त्‍या बाबतही तक्रारदार यांनी पावत्‍या हजर केल्‍या आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडहून किसान 110 एम.एम.   4 के.जी. 800 नग खरेदी केले ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली आहे.

 

            यापूढील मूददा की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून वर नमूद केलेले पाईप खरेदी केले त्‍यामध्‍ये उत्‍पादीत दोष आढळून आला काय   तक्रारदार यांनी पुराव्‍यात असे म्‍हटले आहे की, फेब्रूवारी 2011 मध्‍ये सामनेवाले यांचेकडून घेतलेले 110 एम.एम. x 4 के.जी. पीव्‍हीसी पाईप फुटत असल्‍याचे लक्षात आले. सदरील पाईपची खात्री केली असता पाईपला चिरा पडत आहेत असे आढळून आले. इंजिनिअर श्री.सिरसाट यांचे मार्गदर्शना खाली पाईपलाईनची पाहणी केली. पूर्ण पाईप हे चिरा पडून फुटूत आहेत असे लक्षात आले. सामनेवाले यांचे सेल्‍समन श्री.विलास झांबरे  यांना त्‍या बाबत कल्‍पना दिली. तसेच सेल्‍समन श्री. झांबरे यांनी श्री. बालाजी गायकवाड व श्री. महाडीक क्‍वॉलिटी कंट्रोर यांना बोलावून पाईप दाखवले असे कथन केले आहे. त्‍या बाबत तक्रारदार यांनी सामनेवाले कंपनीकडे कोणतीही लेखी तक्रार दिल्‍याचे निदर्शनास येत नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडहून एकूण 80 पाईप विकत घेतले आहेत व मोठी रक्‍कम अदा केली होती. जर अशा प्रकारे पाईप फूटू असतील तर तक्रारदार यांनी निश्चितच सामनेवाले यांना लेखी कळवून पाईपमध्‍ये दोष आहे त्‍या बाबत योग्‍य ती कार्यवाही करावी अशी विचारणा केली असती. परंतु तक्रारदार यांनी असे काही केल्‍याचे आढळून येत नाही. तसेच तक्रारदार यांनी जो पाईप प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला तो पाठविण्‍याचे अगोदर सामनेवाले यांना त्‍या बाबत माहीती व जाणीव करुन देणे गरजेचे होते. तक्रारदार यांनी तसे काही केल्‍याचे निदर्शनास येत नाही.  तक्रारदार यांनी जो पाईप तपासणीसाठी पाठविला तो तपासणीसाठी पाठविण्‍याचे अगोदर सक्षम अधिका-या कडून अगर सामनेवाले कंपनीचे अधिका-यांना बोलावून तो पाईप सामनेवाले कंपनीने उत्‍पादीत केला आहे यांची खात्री करुन नंतरच तपासणीसाठी पाठवणे आवश्‍यक होते. सदरील पाईप तपासणीसाठी पाठविण्‍याचे अगोदर तक्रारदार यांनी सामनेवाले यांना कोणतीही कल्‍पना दिली नाही. तक्रारदार यांनी सदरील पाईप दि.15.12.2010 रोजी खरेदी केला. सदरील पाईपमध्‍ये गॅरंटी ही पाईप खरेदी पावती सोबतच दिली जाते. तक्रारदार यांनी नि.4 अन्‍वये जे गॅरंटी पत्र हजर केले आहे ते गॅरंटी पत्र दि.2.11.2010 रोजी दिलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी ज्‍या खरेदीच्‍या पावत्‍या दाखल केल्‍या आहेत त्‍यावर दि.11.10.2010, 19.11.2010 अशा तारखा नमूद केलेल्‍या आहेत.  सदरील गॅरंटीपत्र हे कंपनीच्‍या अधिकृत व्‍यक्‍तीने दिलेले नाही ही बाब सामनेवाले यांनी कथन केली आहे. तसेच श्री. झांबरे यांना कंपनीने असे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत या बाबतही नमूद केलेले आहे.  तक्रारदार यांनी किसान 110 एम.एम. x 4 के.जी. पाईप हे वेगवेगळया तारखांना, वेगवेगळया संख्‍येत विकत घेतल्‍याचे निदर्शनास येते.

 

            तक्रारदार यांनी एकूण 800 पाईप 10 एम.एम.   4 के.जी. सामनेवाले यांचेकडून विकत घेतले आहेत. त्‍यांची संख्‍या पाहता जर तक्रारदार यांनी बसवलेले सर्व पाईप यांना पाण्‍याचे दाबामुळे भेंगा पडून फुटूत असतील तर तक्रारदार यांनी निश्चितच त्‍या बाबत सामनेवाले यांना नोटीस देऊन कळविले असते तसेच सदरील पाईप तपासून घेण्‍याचे अगोदर सामनेवाले यांना त्‍या बाबत स्‍पष्‍ट कल्‍पना दिली असती. तसे न करता तक्रारदार यांनी स्‍वतः परस्‍पर एक पाईपचा तुकडा की जो 110 एम.एम. x 4 के.जी./सीएम-2 क्‍लास-2 हा  सेंट्रल इन्‍स्‍टीटयूट ऑफ प्‍लॉस्‍टीक इंजिनिअरिंग अँन्‍ड टेक्‍नालॉजी औरंगाबाद यांचेकडे तपासणीसाठी दिला. त्‍या तपासणीचा अहवाल पाहिला असता सॅम्‍पलच्‍या नांवा मध्‍ये पीव्‍हीसी पाईपचा तुकडा  तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे असा उल्‍लेख केलेला आहे. सदरील पाईपचा तुकडा सिल केलेले नव्‍हता. सदरील पाईप 1 मिटर  4 पीसीएस  एवढा होता. सदरील पाईपची तपासणी अहवाल यांचे निरिक्षण करता त्‍यामध्‍ये सल्‍फेट कंन्‍टेट 12.52 आढळून आले प्रत्‍यक्षात ते जास्‍तीत जास्‍त 11 टक्‍के असावयास पाहिजे. पूढे अहवालात असे नमूद केले आहे की, पाईप shall not bust  in prescribed test duration   सदरील पाईप हा टेस्‍ट  घेत असताना बस्‍ट झाला या बाबत स्‍पष्‍ट उल्‍लेख अहवालात नाही. साक्षीदार श्री.बच्‍छाव  यांचे साक्षीचे अवलोकन केले असता त्‍यांनी स्‍पष्‍टपणे कबूल केले आहे की, पाईपच्‍या तुकडयावर कोणत्‍याही कंपनीने पाईप उत्‍पादीत केले आहे हे लिहीलेले नव्‍हते. तसेच ते तुकडे सिल केलेले नव्‍हते. सदरील शेतक-याने दिलेल्‍या तुकडयाची तपासणी त्‍यांनी केली. त्‍यांनी त्‍यांचे पूराव्‍यात असे नमूद केले आहे की, त्‍या पाईपची पाण्‍याचा दाब सहन करण्‍याची शक्‍ती कमी असल्‍यामुळे तो पाईप फुटण्‍याची शक्‍यता आहे. तसेच त्‍यांनी असेही नमूद केले आहे की, कंपनीच्‍या पाईपची गुणवत्‍ता तपासून घ्‍यावयाची असेल तर ते पाईप कंपनीत पाठवू शकते. तसेच तपासणीसाठी जो पाईप दिला होता तो 110 एम.एम. डायमिटर 4 के.जी.-सीएम-2-क्‍लास 2  असा होता. तसेच ते सॅम्‍पल कोणत्‍या कंपनीने उत्‍पादीत केलेले होते ही बाब ते सांगू  शकत नाही असे स्‍पष्‍ट केले आहे.

 

            संपूर्ण पूराव्‍याचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून किसान 110 एम.एम.   4 के.जी. पीव्‍हीसी पाईप विकत घेतलेले आहेत.  तपासणी अहवालामध्‍ये 110 एम.एम.  4 के.जी.-2 सीएम  पाईपची तपासणी  केल्‍याचे नमूद केले आहे. सदरील तपासणीसाठी पाठविलेला पाईप  हा तक्रारदार यांनी कोणतीही  शहानिशा न करता अगर कंपनीला न कळविता तसेच त्‍या बाबत कोणतीही लेखी सूचना अगर नोटीस न देता परस्‍पर पाठविल्‍याचे निदर्शनास येते. ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 (सी)  अन्‍वये  जर उत्‍पादीत वस्‍तूमध्‍ये दोष असेल व तो दोष तपासणीशिवाय ठरवता येत नसेल तर त्‍या बाबत प्रक्रिया दिलेली आहे.  तक्रारदार यांनी या मंचासमोर पाईपचे सॅम्‍पल  हजर करावयास पाहिजे होते. कारण तक्रारदार यांनी मोठया संख्‍येने सामनेवाले यांचेकडून पाईप घेतले आहेत व त्‍या पाईपमध्‍ये उत्‍पादीत दोष असता तर तक्रारदार हे सहन त्‍या पाईपचे सॅम्‍पल या मंचासमोर हजर करु शकले असते. तक्रारदार यांनी या मंचासमोर सॅम्‍पल हजर केले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून घेतलेल्‍या पाईपमध्‍ये उत्‍पादीत दोष असता तर या मंचाने सदरील पाईप तपासणीकामी सक्षम प्रयोगशाळेत पाठविले असते व त्‍यांचे अहवालानंतरच खरोखरच सामनेवाले यांनी उत्‍पादीत केलेल्‍या पाईपमध्‍ये दोष आहे हे ठरवता आले असते. तक्रारदार यांनी पाईपचे नमूने हय मंचासमोर हजर करण्‍याची संधी असतानाही त्‍यांनी ते पाईप या मंचासमोर हजर केले नाही. तक्रारदार यांनी कोणतीही प्रक्रिया न पाळता परस्‍पर पाईप प्रयोगशाळेत तपासून घेतले. जे पाईप प्रयोगशाळेत तपासून घेतले ते खरोख्‍रच सामनेवाले यांनी उत्‍पादीत केलेले होते काय हे सिध्‍द होत नाही. तक्रारदार हे मोठे शेतकरी आहेत. त्‍यांना हलक्‍या प्रतीचे पाईप सहच उपलब्‍ध होऊ शकतात व तो तपासून अहवाल मंचासमोर हजर करु शकतात. मंचासमोर जो अहवाल आहे तो सामनेवाले यांनी उत्‍पादीत केलेल्‍या पीव्‍हीसी पाईपचा नाही असे या  मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी उत्‍पादीत केलेल्‍या पाईपमध्‍ये जर दोष आढळून आला असता तर तक्रारदार यांनी तो दोष लेखी नोटीस देऊन सामनेवाले यांचे निदर्शनास आणून दिला असता अगर तो पाईप सामनेवाले यांना परत देण्‍याकामी कार्यवाही केली असती. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना कोणत्‍याही प्रकारची लेखी सूचना दिलेली नाही. तक्रारदार यांनी जो पाईप तपासणीसाठी पाठविला त्‍यावर तो कंपनीने उत्‍पादीत केलेला आहे, कोणत्‍या लॉटचा आहे यांचा कूठेही उल्‍लेख आढळून आला नाही. सबब, या मंचाचे मत की, तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून घेतलेला पाईप सदोष आहे ही बाब शाबीत करु शकले नाहीत. म्‍हणून तक्रारदाराची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.

 

              म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

 

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                   आदेश

      1) तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्‍यात येत आहे.

      2) खर्चाबददल आदेश नाही.

      3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील  कलम 20

                   (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

 

               

                                श्री.रविंद्र राठोडकर,         श्री.विनायक लोंढे,

                                   सदस्‍य                    अध्‍यक्ष

                                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.