Maharashtra

Osmanabad

CC/15/27

Ankush Ramrao Tambare - Complainant(s)

Versus

Kirtiman Agro Ganetic Ltd. - Opp.Party(s)

P.D. Shinde

27 Nov 2015

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/15/27
 
1. Ankush Ramrao Tambare
R/o Andora Tq. Kallmb Dist.Osmanabad
Osmanabad
MAHARAHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Kirtiman Agro Ganetic Ltd.
Kirtiman Bhavan Plot No. 19, Near RTo OfficeStation Road Aurangabad
Aurangabad
Maharashtra
2. Baliraj Krushi Seva Kendra
Market Yard Tq. Kallmb Dist.Osmanabae
Osmanabad
MAHARAHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

ग्राहक तक्रार  क्र.  : 27/2015

                                                                                    दाखल तारीख    : 07/01/2014

                                                                                    निकाल तारीख   : 27/11/2015

                                                                                    कालावधी: 01 वर्षे 10 महिने 20 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, स्‍मानाबाद

1.   अंकुश रामराव तांबारे,

     वय - सज्ञान, धंदा – शेती,

     रा.अंदोरा, ता. कळंब व जि.उस्‍मानाबाद.                 ....तक्रारदार                     

                            वि  रु  ध्‍द

1.    किर्तीमान अॅग्रो जेनेटिक्‍स लि.

किर्तीमान भवन, प्‍लॉट क्र.19,

आरटीओ ऑफिस जवळ, स्‍टेशन रोड, औरंगाबाद.

2.    बळीराजा कृषी सेवा केंद्र,

मार्केट यार्ड, कळंब, ता. कळंब, जि. उस्‍मानाबाद.         ..विरुध्‍द  पक्षकार

 

  कोरम :               1)  मा.श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, अध्यक्ष.

                                         2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्‍या.

                        3)  मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍य.

.

                                          तक्रारदारांतर्फे विधीज्ञ      :  श्री.पी.डी. शिंदे.

                       विरुध्‍द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे    : श्री.बी.आर.पवार.

                            न्‍यायनिर्णय

मा. सदस्‍य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्‍दारा.

1)   तक्रारदार (तक) मौजे अंदोरा ता. कळंब जि.उस्‍मानाबाद येथीर रहिवाशी असुन त्‍यांचे नावाने मौजे संजीतपुर शिवारात जमीन गट क्र.203 क्षेत्र 41 आर व गट क्र.191 क्षेत्र 55 आर. जमीनीचे मालक व वहिवाटदार आहेत. अर्जदार यांनी 2014 च्‍या खरीप हंगामीतील पेरणीकरीता विप क्र. 2 यांचेकडून दि.07/06/2014 रोजी किर्तीमान कंपनीचे उज्‍वला वाणाचे लॉट क्र.1227 नुसार 25 किलो वजनाची एक बँग व किर्तीमान कंपनीची प्रगती वाणाची लॉट क्र.7008 नुसार 25 किलो वजनाची एक बॅग अशा एकुण दोन बँग बियाणे प्रत्येकी रु.2,300/- प्रमाणे एकूण रु.4,600/- मध्‍ये खरेदी केले. विप यांनी जाहीरातीमध्‍ये प्रति बॅग 13-14 क्विंटल उत्‍पादन निघत असल्‍याचे नमुद केलेले आहे व विप क्र. 2 यांनी सांगितलेमुळे सदर बियाणे खरेदी केले. दि.11/07/2014 रोजी विप यांचे सुचनेप्रमाणे पेरणी केली. पेरणी केल्‍यानंतर 5 -6 दिवसांनी सदरचे बियाणे नाश पावत असल्‍याचे आढळून आले म्‍हणून विप यांना कळविले. तसेच दि.19/07/2014 रोजी पंचायत समिती कृषी विभाग, कळंब यांना कळवले. त्‍यावर कृषी अधिकारी यांनी प्रत्‍यक्ष पाहणी करुन बियाण्‍याची उगवण्‍याचे प्रमाणे 17 टक्‍के असून सदरील बियाण्‍यामध्‍ये दोष असल्‍यामुळे सदरील बियाणे उगवले नसल्‍याबाबत अहवाल दिला. त्‍यामुळे तक यांचे एकूण रु.1,59,400/- चे नुकसान झाले. सदर बाबत विप यांना नोटीस पाठवली असता त्‍यांनी कोणत्‍याही प्रकारचे उत्‍तर दिले नाही. म्‍हणून सदरची तक्रार दाखल करण्‍यास भाग पडले.

तक यांनी झालेला खर्च व नुकसान खाली दिलेल्‍या तक्‍यात दिलेला आहे.

अ.क्र.

अर्जदाराने केलेली मशागत

अर्जदाराचे झालेल नुकसान

1.

नांगरणी

2400/-

2.

मोडगणी

2,000/-

3.

कुळवणी

1600/-

4.

सोयाबीन बियाणे (एक बॅग)

4600/-

5.

खत (एक बॅग)

2400/-

6.

पेरणी

2,000/-

7.

अपेक्षित उत्‍पन्‍न (65क्विंटल) X 4,000/-

1,12,000/-

 

एकूण

1,59,400/-

 

     विप क्र. 1 व 2 यांनी तक यांना झालेल्‍या मानसिक, आर्थीक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रु.5,000/- असे एकूण रु.1,71,400/- 15 टक्‍के व्‍याजासह नुकसान भरपाईपोटी मिळावी अशी विनंती केली आहे.

 

2)  विप क्र.1 व 2 यांनी त्‍यांचे म्‍हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे. त्‍यांचे म्‍हणण्‍यानुसार अर्जदारचा अर्ज निखालस खोटया कथनावर आधारीत असल्‍याने नामंजूर करावा.

3)   विप क्र. 2 यांनी लॉट क्र.1227 चे बियाणे दिलेले नाही त्यामुळे नामंजूर करणे योग्‍य आहे. अर्जासोबत साल सन 2013 -14 चा सातबारा उतारा न जोडल्‍यामुळे सदरचा मजकूर मान्‍य नाही. सक्षम पुरावा दिलेला नाही. अर्जदाराने त्‍यांची जमीन मौजे संजीतपुर शिवारात असल्‍याचे नमुद केले आहे, पण 7/12 हा मौजे अंदोरा कळंब येथील जमीनीला जोडलेला आहे हे अमान्‍य आहे. विप क्र.2 यांनी दि.07/06/2014 रोजी किर्तीमान प्रगती वाणाचे लॉट क्र.70008 व किर्तीमान उज्‍वला वाणाचे लॉट क्र.12027 अशा प्रकारे 1-1 बँग दिली होती. अर्जदारास विप ने क्र.7008 व 1227 च्‍या बँग दिलेल्‍या नाहीत त्‍यामुळे अर्जदार हा विप चा ग्राहक होत नाही. जाहिरातीप्रमाणे प्रतिबँग 13-14 प्रति क्विंटल उत्‍पादन निघते व त्‍यामुळे अर्जदाराने बियाणे घेतले हा मजकूर अमान्‍य आहे. अर्जदाराने बियाणे दि.07/06/2014 ला खरेदी केले व जवळपास 1 महिन्‍यानंतर पेरणी केली. सदर बियाणे 1 महिना कोठे ठेवले? कसे ठेवले? हे नमूद केलेले नाही. बियाणे हेच पेरले हेही सिध्‍द होत नाही. अर्जदाराने ब-याच गोष्‍टी लपविण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे.

 

4)     दि.19/07/2014 च्‍या अर्जात गट क्र.203 मध्‍ये पंचनामा करण्‍याबाबत अर्ज केला. परंतु पंचनामा गट क्र.191 चा पण केला. परंतु गट क्र.191 चालू सातबारा अर्जाच्‍या कॉपीसोबत नाही. अर्जदाराने बँग 2 खरेदी केल्या पण नंबर 203 मध्‍ये अर्जदाराचे नावे क्षेत्र केवळ  41 आर. आहे त्‍यावरुन तक्रारदाराने कोर्टाची दिशाभुल करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे.

5)    परिच्‍छेद क्र.4 विप स सर्वस्‍वी अमान्‍य आहे तज्ञ शेतकरी व परंपरागत शेती करणारे शेतकरी हे मार्च एप्रिल मध्‍ये आगातापुर्व मशागती करतात व मे मध्‍ये जमीन तापण्‍यासाठी ठेवतात कारण पेरणी ही नेहमी मृग नक्षत्रात केली जाते व मृग नक्षत्र हे नेहमी जून महिन्‍यात 7 किंवा 8 तारखेस चालू होते. कोणताही तज्ञ शेतकरी, पंरपरागत शेती करणारा शेतकरी मे- जून मध्‍ये आगातापुर्वी मशागत करत नाही म्‍हणून तक चे तकारीतील म्हणणे काल्‍पनीक असून विप ला मान्‍य नाही.

 

6)     दि.19/07/2014 रोजी तोंडी तक्रार केलेली नाही लेखी आहे व ती पुर्णत: बोगस आहे. विप क्र. 2 ची दुकानी येऊन सही घेतलेली आहे. विप क्र. 2 चे नाव विप क्र. 2 चे दुकानाचे नाव असून सही आहे. शासन परिपत्रकानुसार पंचनामा व अहवाल पुर्णत: बोगस आहे. सदर अहवाल कधी केला? कसा केला? हे नमूद नाही. अर्जदाराने दि.19/07/2014 रोजी कृषी अधिकारी पंचायत समिती कळंब यांचेकडे गट क्रमांक 203 चा पंचनामा करावा म्‍हणून अर्ज दिला, परंतु पंचनामा बोगस आहे. कृषी अधिकारी यांनी शेतक-यांना पंचनामा करणेबाबत नोटीस पाठवलेली पत्र अभिलेखावर दिसत नाही.

 

7)    शासन परिपत्रकानुसार असे अर्ज आले नंतर तालूका कृषी अधिकारी यांना कळवले पाहिजे व 7 दिवसाच्‍या आता जायमोक्‍यावर जाऊन पंचनामा केला पाहिजे व विक्रेत्याची साक्ष घेणे आवश्‍यक आहे. सदर बियाणाची पावती, टॅगची खात्री करुन घेणे आवश्‍यक आहे. बियाणे अर्जदार शेतक-याकडे नसेल तर कंपनी अथवा विक्रेत्‍याकडून उपलब्‍ध करुन घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवणे आवश्‍यक आहे. सदर नियमांची कुठेही पुर्तता झालेली दिसत नाही. त्‍यामुळे विप ने कसलीही सेवेत त्रुटी केलेली नाही.

 

8)   अर्जदाराने लॉट क्र.7008 व 1227 चे बियाणे खरेदी केलेले आहे. त्‍यामुळे कसलीही नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार नाहीत व नव्‍हते.

बियाणे न उगवण्‍याची अनेक कारणे आहेत पैकी काही खालीप्रमाणे दिलेली आहेत.

1) पेरणीपुर्व मशागत व तननियंत्रक कशा पध्‍दतीने केले.

2) पेरणी करतेवेळी दिलेली खत मात्रा.

3) रोग व किडनियंत्रण.

4) वातावरणातील परिस्थिती.

5) पाणी व्‍यवस्‍थापन.

 

9)    विप ने कसलेही सदोष बियाणे दिलेले नाही. सदरचा कृषी अधिका-याचा अहवाल हा  चुकीचा आहे व ग्रा.सं. कायदा 13(1) (सी) प्रमाणे नाही. तक्रार बोगस आहे.

 

10)    सदर तक्रार सक्षम पुराव्‍याअभावी दाखल केलेली आहे. कोणतीही त्रुटी केलेली नाही. त्‍यामुळे अर्जदाराचा अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी विनंती विप ने केलेली आहे.

 

11)     अर्जदाराने तक्रारीसोबत बियाणे खरेदी पावती सातबारा, पंचायत समितीला अर्ज, अहवाल, नोटीस तसेच विप ने शासन परिपत्रक, अपिलचा न्‍यायनिर्णय, भारत सरकार यांचे किर्तीमान अॅग्रो जेनेटीक्‍स यांना दिलेले पत्र, Seed analysis report  आणि कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती कळंबचे बाजार भावाचे पत्रक या सर्व दाखल कागदपत्रांचे सुक्ष्‍म अवलोकन केले, युकितवाद वाचला, ऐकला असता सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.

     मुद्दे                                  उत्तरे

1) अर्जदाराला देण्‍यात येणा- या सेवेत विप ने त्रुटी केली का?           नाही.

 

2) अर्जदाराने मागणी केल्‍याप्रमाणे व सदर बियाणेमुळे झालेले

   नुकसान मिळण्‍यास पात्र आहे का?                                                  नाही.

 

3) काय आदेश?                                                                       अंतिम आदेशाप्रमाणे

 

                                                        कारणमिमांसा

1) मुद्दा क्र. 1 ते 3

12)    वास्‍तविक पाहता अर्जदाराने विप कडून बियाणे विकत घेतले आहे याबाबत वाद नाही. तक यांनी जे बियाणे विकत घेतले त्‍यांची पावती अभिलेखावर दाखल केली आहे. त्‍यातील बियाणाचा लॉट क्रमांक व तक्रारीतील बियाणांचा लॉट क्रमांक हा वेगवेगळा आहे. त्‍यात फरक आहे कारण त्‍यांनी जे बियाणे घेतले आहे ते त्‍या लॉट चा नंबर तक्रारीत वेगळा दिला आहे आणि त्‍या नंबरचा पंचनामा सुध्‍दा समितीने केलेला नाही. शिवाय शासन परिपत्रकाप्रमाणे कृषी अधिकारी यांनी पंचनाम्‍यात केला त्‍या ठिकाणच्‍या बियाणांचे सॅम्‍पल घेऊन ठेवलेले नाही. बियाणाची सॅम्‍पल घेऊन ती प्रयोगशाळेत पाठवणे गरजेचे होते. परंतु तसे काही कृषी अधिकारी यांनी केले असे निदर्शनास येत नाही.

 

13)    तसेच अर्जदाराने कृषी अधिकारी यांना जो अर्ज दिलेला आहे त्यामध्‍ये गट क्र.203 मौजे मोहा ता. कळंब येथील पंचनामा करण्‍यात यावा अशी अर्जाव्‍दारे विनंती केलेली आहे. त्‍यामुळे मोहा येथील गट क्र.203 चा पंचनामा केलेला नाही. समिती अहवाल व पंचनामा यांचे जर सुक्ष्‍म अवलोकन केले तर लॉट क्र.70008, व 12027 असा नमूद केलेला दिसतो. गट क्र.191, 203 असा नमूद दिसतो. कुठला आहे ? याची नोंद नाही कॉलम 13 चे सुक्ष्‍म अवलोकन केले तर अंकुश रामराव तांबारे रा. अंदोरा ता. कळंब गट क्र.191, 203 क्षेत्र 1.60 पैकी 80 आर. पेरणी क्षेत्र, विक्रेत्‍याचे नाव -बळीराजा कृषी सेवा क्रेंद, कळंब, काय खरेदी केले? -  स्‍वत: दि.11/07/2014 रोजी खरेदी केले असून यापैकी 50 किलो बियाणे म्‍हणून नेमके केणते बियाणे पेरले यावर नमुद निशान नाही. शेतक-याची सही आहे. विक्रेत्‍याची साक्ष या रकान्‍यात त्‍याचे नाव आहे. खाली विक्रेत्‍याची सही व त्‍याच्‍या दुकानाचा शिक्‍का आहे. याचे सुक्ष्‍म अवलोकन केले तर असे निदर्शनास येते की विक्रेता हा त्‍याच्‍या दुकानाचा शिक्‍का नक्‍कीच अर्जदाराच्‍या शेतात घेऊन गेलेला नसेल कारण पंचनामा करण्‍याची नोटीस त्‍याला पाठवलेली नाही. सदर अहवालावरचा शिक्‍का हा विक्रेत्‍याच्‍या दुकानावर जाऊन घेतलेला आहे यात शंका नाही. अर्जदाराच्‍या तक्रारीत मौजे संजीतपुर जमीन गट क्र.203 क्षेत्र 191 हे. 41 आर व गट क्र. 0 हे 55 आर. असे आहे पण समितीच्‍या क्षेत्रीय अहवालात किंवा पंचनाम्‍यात वरील मौजे संजीतपुर चा उल्‍लेख ही नाही. सातबारावर पण संजीतपुर हे नावाचे उल्‍लेख नाही. अर्जदाराने 7/12 अंदोरा येथील दाखल केलेला आहे आणि अर्जदारास मौजे संजीतपूर येथे जमीन आहे.

 

14)   पंचनामा करण्‍यासाठी दिलेल्‍या अर्जात गावाचे नाव मौजे मोहा, तक्रारीत मौजे संजीतपुर आणि तपासणीसाठी पंचायत समितीकडे अर्ज दिलेला आहे त्‍यामध्‍ये मौजे मोहा अशी नोद आहे त्‍यामुळे तपासणी अहवाल हा कृषी अधिकारी यांनी कार्यालयात बसुन लिहिलेला आहे हे स्‍पष्‍ट होते. कारण तपासणी अहवालात तर गावाचे नावाची नोंद घेतलेली नाही त्‍यामुळे कुठल्‍या क्षेत्राची तपासणी केली हे कळून येत नाही.

 

15)   तसेच विप ने seed anylysis report  दाखल केलेला आहे सदर अहवालात नमूद  लॉट क्रमांक व पावतीवरचा लॉट क्रमांक बरोबर आहे.  Normal Germination 12027 ची टक्केवारी 70 आणि 70008 ची 79, Result Pass pure seed12027 चे  98.11  आणि 70008  चा  pure seed 98.42 ही  Germination test  दाखल केलेली आहे. सदर अहवालावर अर्जदाराने काहीही म्हणणे दिलेले नाही. याचाच अर्थ अर्जदारास सदरचा Germenation report मान्‍य असावा व तो ग्राहय धरावाच लागेल.

 

16)    विप चे विधिज्ञांनी mahyco vegetable seeds Ltd. Vs.  Mahusing Harising हरियाणा राज्‍य आयोगाचा अपिलाचा निवाडा सदर प्रकरणात दाखल  केलेला आहे. त्‍या निवाडयात असे तत्‍व विषद केलेले आहे की तज्ञांचा अहवाल दाखल केल्या शिवाय बियाणे सदोष आहे हे सिध्‍द होत नाही त्‍यामुळे अपिल कर्त्‍यांचे अपिल मंजूर करुन तक्रार रद्द करणेत आलेली आहे. पण उलटपक्षी सदर प्रकरणात तज्ञांचा अहवाल दाखल करुन बियाणे सदोष नाही हे सिध्‍द केलेले आहे. सदर अपिलाचा निवाडा या प्रकरणात लागू पडतो त्‍यामुळे कृषी अधिकारी यांनी कसलीही प्रक्रिया शासन प्रत्रिकेप्रमाणे केलेली नाही आणि अहवालात पुष्‍कळशी माहिती हि नमूद केलेली नाही त्‍यामुळे समितीचा अहवाल हा बोगस आहे. हे निश्चित, याशिवाय विप ने बियाणे सदोष नाही याचा प्रयोगशाळेचा अहवाल दाखल केलेला आहे. त्‍यामुळे बियाणे हे सदोष नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

17)   विप क्र. 1 यांनी विक्री उत्‍पादित केलेले व विप क्र. 2 यांनी उत्‍पादित केलेले बियाणे हे सदोष नव्‍हते हे दाखवणारा Germination report अभिलेखावर दखल आहे तो मान्‍य करावाच लागेल व ग्राहय धरावाच लागेल आणि असे असतांना अर्जदाराचे हे म्‍हणणे आहे की विप ने सेवेत त्रुटी केली हे संयुक्तिक वाटत नाही. त्‍यामुळे  Germinatiojn Report  वरुन विप क्र. 1 उत्‍पादीत कंपनीने उत्‍पादित केलेले व अर्जदाराने खरेदी केलेले बियाणे हे सदोष नाही हे स्‍पष्‍ट होते या मतास आम्‍ही आलो आहेत त्‍यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देऊन खालीलप्रामणे आदेश पारीत करीत आहोत.

                               आदेश

 

1)  अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

 

2)  उभय पक्षकारांनी आपआपला खर्च स्‍वत: सोसावा.

 

3)  उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 

    (श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी) 

                                 अध्‍यक्ष

 

 

    (श्री.मुकुंद.बी.सस्‍ते)                               (सौ.विद्युलता जे.दलभंजन)                       

         सदस्‍य                                            सदस्‍य

                 जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद.

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.