मा.अध्यक्षपद रिक्त.
तक्रारदार स्वत: हजर.
त्यांचा तक्रार दाखल करणेकामी रोजी युक्तीवाद ऐकण्यात आला.
तक्रार व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता दिसून येते की, प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून विकत घेतलेल्या शॉपमध्ये बोगस विद्युत मीटर बसविल्यामुळे, सामनेवाले यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियमांतर्गत दाखल केली आहे.
तक्रारदारांने त्यांच्या तक्रारीतील पृष्ठ क्र.49 व 50 वरील पत्रात नमुद केल्याप्रमाणे, त्यांनी सदरचा शॉप हा व्यावसायिक कारणासाठी विकत घेतलेला असून, तो त्यांनी भाडेतत्वावर दिलेला आहे.
ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 च्या कलम 2 (7) (i) मधील तरतुदीनुसार “ग्राहक” ही संज्ञा खालीलप्रमाणे आहे.
“2 (7) - ‘consumer’ means any person who-
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or any commercial purpose”.
सबब, ग्राहक संरक्षण अधिनियमातील वर नमुद स्वयंस्पष्ट संज्ञेनुसार तक्रारदार हे ‘ग्राहक’ होत नसल्याने, प्रस्तुतची ग्राहक तक्रार क्र.116/2021 दाखल न करता, तक्रारदारांना याच कारणास्तव योग्य त्या न्यायासनासमोर दाद मागण्याची मुभा देऊन, दाखल टप्प्यावर खारीज करण्यात येते.
खर्चाबद्दल आदेश नाहित.
प्रकरणांत हाच अंतिम आदेश समजण्यात यावा.
आदेशाची साक्षांकित प्रत तक्रारदारांना विनाविलंब व विनामुल्य पाठविण्यात यावी. प्रकरण समाप्त.