तक्रारदारातर्फे
:एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः-श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1.
2.
3.
4. मुद्दे कायम करण्यात येतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवास आरक्षणासंदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतातकाय? | होय |
2 | तक्रारदार सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत? | होय |
3 | अंतीम आदेश? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
5.
6. तथापि तक्रारदारांनी दिनांक 21/3/2012 रोजी सामनेवाले यांचेकडे संपर्क साधला असता त्यांनी दिनांक 15/4/2012 रोजीची विमान सेवा श्रीनगर रद्द करण्यात आलेली आहे असे कळविण्यात आलेले आहे. त्यानंतर तक्रारदारांना अन्य विमान कंपनीचे तिकिट आरक्षित करावे लागले. तक्रारदारांनी उशिरा स्पाईस जेट विमानाच्या कंपनीच्या तिकिटांचे आरक्षण केल्याने सहाजिकच त्यांना जादा दराने प्रवास भाडे अदा करावे लागले. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये, तसेच पुराव्याच्या शपथपत्रामध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांना त्याबद्दल रुपये 29,705/- जादा रक्कम स्पाईस जेट कंपनीस अदा करावे लागले ही बाब तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिलेल्या नोटीशीमध्ये देखील नमूद आहे. सहाजिकच सामनेवाले यांनी अचानकपणे व उशिराने त्यांचे दिनांक 15/4/2012 रोजीची विमानसेवा दिल्ली ते श्रीनगर रद्द केल्याने तक्रारदारांना जादा दराने विमान तिकिट आरक्षित करावे लागले. याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमान तिकिटाच्या आरक्षणाच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली आहे. सहाजिकच सामनेवाले यांनी तक्रारदारांना ती रक्कम नुकसानभरपाई म्हणून परत करावी लागेल. तक्रारदारांनी स्पाईस जेट विमानाचे तिकिट दिनांक 15/4/2012 रोजी आरक्षित केल्याने, व जादा दराने रक्कम अदा केल्याने फरकाची रक्कम तक्रारदारांना 9 टक्के व्याजासह परत करावी लागेल. तक्रारदारांना नुकसानभरपाईची रक्कम 9 टक्के व्याजासह मिळणार असल्याने वेगळा नुकसानभरपाईचा आदेश करण्याची आवश्यकता नाही असे मंचाचे मत आहे.
7. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक254/2012 अंशतः मंजूर
2. सामनेवाले विमान कंपनी यांनी तक्रारदारांना विमान तिकिटाच्या आरक्षणा संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 5,000/- अदा करावेत असाही आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
5. न्याय निर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 31/10/2013
सदस्य
एम.एम.टी./-