Maharashtra

Kolhapur

CC/11/179

Pratibha Constructions Engineers and Contractors (I)Pvt Ltd - Complainant(s)

Versus

Kingfisher Airlines Ltd. - Opp.Party(s)

Ravi Shiralkar.

21 Apr 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/179
1. Pratibha Constructions Engineers and Contractors (I)Pvt Ltd223/5, Jadhav House, Tarabai Park,Kolhapur.Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Kingfisher Airlines Ltd.Kingfisher House, Western Express Highway, Vile Parle(E)Mumbai-400057. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Ravi Shiralkar., Advocate for Complainant

Dated : 21 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

आदेश :- (दि.21/04/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 
(1)        प्रस्‍तुतचे प्रकरणे स्विकृत करणेकरिता आहे. तक्रारदारांच्‍या वकिलांचे युक्तिवाद ऐकणेत आले. तक्रारदारांच्‍या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदार कंपनीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे निगडी-पुणे जवाहरलाल नेहरु राष्‍ट्रीय पुनरुत्‍थानचे काम टेंडरने मंजूर झाले आहे. या ठिकाणी तक्रारदार कंपनीचे वतीने इमारत बांधण्‍याचे काम चालू आहे, त्‍यासाठी कॉंक्रीट प्‍लॉंटमध्‍ये इलेक्‍ट्रीकल लोड सेल असेम्‍ब्‍ली या पार्टची आवश्‍यक होती. सदर पार्ट स्‍टेट वे इंडिया प्रा.लि., बेंगलोर यांचेकडे खरेदी केला व तक्रारदारांच्‍या विनंतीवरुन सदर कंपनीने दि.30.11.2010 रोजी सामनेवाला यांचे बेंगलोर यांचे ऑफिसमध्‍ये कुरिअरसाठी पुणे येथे पाठविण्‍यासाठी दिला. सदरचा पार्ट सामनेवाला यांचे कुरिअर सेवेनुसार दि.30.11.2010 रोजीच सायंकाळी 7.30 वाजता पुणे या ठिकाणी पोहचावयास हवा होता. परंतु, सदर पार्ट त्‍या दिवशी आला नाही; त्‍यानंतरही दि.01.12.2010 रोजी पार्सलची चौकशी केली असता सामनेवाला यांचेकडून योग्‍य उत्‍तरे मिळाली नाहीत. दि.03.12.2010, दि.13.12.2010 व दि.14.12.2010 रोजी पत्रान्‍वये पार्सलविषयी कळविले व दररोज फोनवरुन पार्सलविषयी चौकशी केली. परंतु, पार्सल आले नाही, त्‍यामुळे तक्रारदारांना वर नमूद पार्ट दुसरीकडून घेवून काम पुढे चालू करावे लागले. सबब, सामनेवाला यांच्‍या सेवेत त्रुटी झालेली आहे. सामनेवाला यांचेकडून रक्‍कम रुपये 1,19,720/- इतकी रक्‍कम देणेबाबत आदेश व्‍हावेत याबाबतची तक्रारदारांची तक्रार आहे.
 
(2)        तक्रारदारांच्‍या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदार व सामनेवाला कंपनी यांचेमधील व्‍यवहार हा बेंगलोर व पुणे या ठिकाणी झालेला आहे. सामनेवाला कंपनीचे कार्यालय मुंबई येथे आहे. सदरचा वाद या मंचाचे क्षेत्रिय अधिकारितेत झालेचा दिसून येत नाही. तसेच, सदर तक्रारीचे कारण अंशत: अगर पूर्णत: या मंचाचे कार्यक्षेत्रात घडलेले नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार चालविणेची क्षेत्रिय अधिकारिता (Territorial Jurisdiction) या मंचास येत नाही. सबब, प्रस्‍तुतची तक्रार अस्विकृत करणेत यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   हे मंच यापुढे असेही स्‍पष्‍ट करते की, तक्रारदारांनी त्‍यांची तक्रार त्‍यांच्‍या इच्‍छेनुसार योग्‍य त्‍या मंचात दाखल करावी. सबब आदेश.
 
आदेश
 
1.    तक्रारदारांची तक्रार अस्विकृत करणेत येते.  

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT