नि. १८
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १६५०/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १३/०३/२००९
तक्रार दाखल तारीख : ३०/०३/२००९
निकाल तारीख : ०८/०२/२०१२
----------------------------------------------------------------
श्री बजरंग सखाराम पवार
व.व. ५७, धंदा – शेती व मजुरी,
रा.शेखरवाडी, ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. चिफ ऑफिसर
खुशबू +ìटो फायनान्स कंपनी लि.
जिम्मी टॉवर गोंदल रोड, राजकोट (गुजरात)
२. शाखाधिकारी
खुशबु +ìटो फायनान्स कंपनी लि.
शाखा सांगली
C/o चैतन्य सेल्स, कॉर्पोरेशन,
प्लॉट नं.५५८/३बी/३ सावर्डे तालीम,
कोल्हापूर रोड, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एस.व्ही.माळी, ए.बी.जवळे
जाबदार क्र.१ व २ तर्फे : +ìb÷. श्री एम.डी.पाटील
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वाहनाच्या कर्जप्रकरणाबाबत मिळालेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
जाबदार क्र.१ ही फायनान्स कंपनी असून जाबदार क्र.२ ही त्यांची सांगली येथील शाखा आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांच्याकडे कर्जप्रकरण करुन तीनचाकी रिक्षा खरेदी केली होती. सदरची रिक्षा तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांचे कार्यालयातच असणा-या चैतन्य सेल्स कॉर्पोरेशन यांचेकडून खरेदी केली होती. सदर रिक्षाची किंमत रु.१,१२,०००/- इतकी होती. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे रक्कम रु.२२,७००/- जमा केले व रु.९०,०००/- कर्जाऊ घेतले. सदर कर्जाची मुदत ३ वर्षे होती व कर्जाचा हप्ता प्रतिमहिना रु.३,६५०/- इतका होता. सदर रिक्षा घेतल्यानंतर तक्रारदार यांनी रु.१३,५००/- इतका खर्च आर.टी.ओ., टॅक्स व इन्शुरन्ससाठी केला होता. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या रिक्षामध्ये मुख्य इंजिनदोष व अन्य काही दोष होते त्यामुळे सदर रिक्षाचा पूर्ण क्षमतेने वापर करुन तक्रारदार यांना व्यवसाय करता आला नाही त्यामुळे तक्रारदार यांनी अनेकवेळा जाबदार क्र.२ कंपनीकडे रिक्षा दुरुस्तीसाठी दिली. तक्रारदार यांनी डिसेंबर २००५ पर्यंतचे कर्जाचे हप्ते नियमित अदा केले आहेत. रिक्षा सतत बंद पडू लागल्याने तक्रारदार यांना डिसेंबर २००५ नंतर कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. जाबदार कंपनीने हप्ते भरता येत नसतील तर गाडी कंपनीकडे द्या, तुम्हाला निलचा दाखला देतो असे सांगितले त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांचेकडे दि.२५/६/२००६ रोजी रिक्षा जमा केली व निलचा दाखला व सुरक्षेपोटी दिलेले सात धनादेश परत मागितले. जाबदार यांनी वरिष्ठ कार्यालयातून पूर्तता झाल्यानंतर तुम्हांला निलचा दाखला व चेक परत मिळेल असे सांगूनही त्यानंतर त्यांच्याकडे वारंवार मागणी करुनही त्याप्रमाणे पूर्तता केली नाही. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज जाबदार कंपनीकडून निलचा दाखला व सुरक्षेपोटी घेतलेले चेक परत मिळावेत या मागणीसाठी व इतर तदानुषंगिक मागण्यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ७ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार खूशबू +ìटो फायनान्स कंपनीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांचे अधिकारपत्र नि.८/१ वर दाखल करण्यात आले आहे. जाबदार यांनी नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांना तक्रारदार यांनी येणे हप्त्याचे पोटी धनादेश दिले आहेत. सदरचे धनादेश न वटल्याने जाबदार यांनी अर्जदार यांचेविरुध्द चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा कलम १३८ अन्वये केसेस दाखल केल्यामुळे तक्रारदार यांनी खोडसाळपणाने प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांचे गाडीमध्ये कधीही बिघाड झालेला नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. प्रस्तुत तक्रारअर्जास Non joinder of necessary party या तत्वाची बाधा येते. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांचे म्हणण्यावर जाबदार यांनी म्हणण्याचे पृष्ठयर्थ शपथपत्र सादर करावे असा आदेश करण्यात आला होता. परंतु जाबदार यांनी कोणतेही शपथपत्र दाखल केले नाही तसेच नि.१० वरील व नि.१२ वरील आदेशाप्रमाणे तक्रारदार यांना कॉस्ट अदा केली नाही त्यामुळे जाबदार यांचे म्हणणे याकामी विचारात घेणे संयुक्तिक ठरणार नाही असे या मंचाचे मत आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१३ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.१७ चे यादीने २ कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी पुन्हा नि.१४ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांचे विधिज्ञ श्री एस.व्ही.माळी यांनी विधिज्ञ ए.बी.जवळे यांना युक्तिवाद करणेसाठी अधिकार दिल्याची पुरशिस नि.१६ वर दाखल आहे. तक्रारदार यांनी सदर विधिज्ञ ए.बी.जवळे यांनी युक्तिवाद करण्यास हरकत नाही अशी पुरशिस नि.१७ वर दाखल केली आहे. विधिज्ञ एस.व्ही.माळी व तक्रारदार यांनी दिलेल्या पुरशिसच्या अनुषंगाने विधिज्ञ ए.बी.जवळे यांचा युक्तिवाद ऐकला. जाबदार अथवा त्यांचे विधिज्ञ युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, दाखल युक्तिवाद व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता व तक्रारदार यांचे विधिज्ञ यांचा युक्तिवाद ऐकला असता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे तक्रारदार यांनी चैतन्य सेल्स कॉर्पोरेशन यांचेकडून वाहन खरेदी केले होते व सदर वाहन खरेदीसाठी खुशबू +ìटो फायनान्स यांचे सांगली शाखेकडून कर्ज घेतले होते. तक्रारअर्जामध्ये तक्रारदार यांनी जाबदार यांचे नावे नमूद करताना योग्यरितीने नमूद केलेली नाहीत. जाबदार क्र.२ खुशबू +ìटो फायनान्स शाखा सांगली असे नमूद करुन त्याच्या खाली C/o चैतन्य सेल्स कॉर्पोरेशन असे नमूद केले आहे. यावरुन चैतन्य सेल्स कॉर्पोरेशन यांना स्वतंत्ररित्या पक्षकार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रारअर्जातील सरनाम्यामध्ये दोष दिसून येतो. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या लेखी युक्तिवादामध्ये जाबदार क्र.१ यांचेविरुध्द नो से चा आदेश नि.१ वर करण्यात आला तसेच जाबदार क्र.२ विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी व त्यांचे विधिज्ञांनी नि.१ चे व संपूर्ण प्रकरणाचे अवलोकन न करताच प्रस्तुतचा युक्तिवाद दाखल केलेला दिसून येतो. वास्तविक नि.१ वर असा कोणताही आदेश दिसून येत नाही.
६. जाबदार यांनी याकामी म्हणणे दाखल केले आहे. परंतु जाबदार यांनी कॉस्टबाबत पूर्तता केलेली नाही त्यामुळे जाबदार यांचे म्हणणे विचारात न घेताही तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारअर्जातील कथन शाबीत करण्यासाठी व आपल्या मागणीच्या पुष्ठयर्थ योग्य तो पुरावा मंचासमोर आणला आहे का ? हे याठिकाणी पाहणे आवश्यक ठरते. तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरणी कर्ज नीलचा दाखला व सुरक्षिततेपोटी घेतलेले चेक परत मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचे संपूर्ण कर्ज निल केले असे दर्शविणारा कोणताही पुरावा मंचासमोर आलेला नाही. तक्रारदार यांनी केवळ हप्ते भरता येत नसतील तर गाडी कंपनीकडे द्या, तुम्हाला निलचा दाखला देतो असे कंपनीने सांगितले असे कथन केले आहे. परंतु निलचा दाखला देणेसाठी आदेश करावा अशी मागणी करताना तक्रारदार यांचे कर्ज प्रकरण निल झाले असे दर्शविणारा पुरावा तक्रारदारतर्फे दाखल करणे आवश्यक होते परंतु तसा कोणताही पुरावा मंचासमोर आलेला नाही. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जातच हप्ते भरता आले नाहीत या कारणास्तव त्यांनी स्वत:हून दि.२५/६/२००६ रोजी गाडी जाबदार यांचेकडे जमा केली असे नमूद केले आहे. यावरुन तक्रारदार हे थकीत कर्जदार आहेत ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये गाडीमध्ये मुख्य इंजिन दोष व अन्य काही दोष होते असे मोघम नमूद केले आहे. परंतु गाडीमध्ये असे दोष निर्माण झाले होते व तसे वेळोवेळी जाबदार यांना कळविले होते असे दर्शविणाराही कोणताही पुरावा सादर केलेला नाही त्यामुळे सदरच्या कथनामध्ये तथ्य दिसून येत नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे दिलेले धनादेश परत मिळावेत अशीही मागणी केली आहे. प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी तक्रारदार यांनी जाबदार यांना धनादेश दिले होते असे दर्शविणारा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी सादर केलेला नाही. मुळात तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये कर्जप्रकरणाबाबत झालेला कोणताही पुरावा मंचासमोर आलेला नाही. त्यामुळे सदरची मागणी तक्रारदार कशाच्या आधारे करतात हे स्पष्ट होत नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली हे तक्रारदार शाबीत करु शकले नाहीत. तक्रारदार यांनी त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने कोणताही योग्य तो कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. तसेच तक्रारअर्जातील सरनाम्यामध्येही दोष आढळून येत असल्याने तक्रारदार हे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: ०८/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.