जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 1166/2009
तक्रार दाखल तारीखः- 28/07/2009
तक्रार निकाल तारीखः- 06/12/2012
श्री.ताहेर सैफुद्यीन लहेरी, ..........तक्रारदार
उ व 42 धंदा व्यवसाय,
रा.लहेरी पेंट हाऊस बोहरी,गल्ली,जळगांव.
विरुध्द
व्यवस्थापक/चेअरमन, .....विरुध्दपक्ष.
खान्देश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
जळगांव.
कोरम –
श्री. डी.डी.मडके. अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.एम.एस.शिंपी
विरुध्दपक्ष एकतर्फा
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत दैनंदिन सुलभ संचय ठेव मध्ये गुंतवलेली रक्कम मागणी करुन ही परत दिली नाही म्हणुन त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष खान्देश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,(यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत दैनंदिन सुलभ संचय ठेव मध्ये गुंतविली होती श्री.अनिल शर्मा हे पीग्मी एजंट होते त्यांनी खाते क्रमांक दिले नाहीत परंतु खालील प्रमाणे रक्कम जमा करण्यात आलेली आहे त्याचा तपशिल खालील प्रमाणे.
खातेदाराचे नांव | रक्कम | देय दिनांक |
ताहेर सैफुद्यीन लहेरी | 41,000 | फेबु्वारी 2008 |
बतुल ताहेर लहेरी | 610 | एप्रिल 2008 |
शरिफखॉन | 1,560 | मार्च 2008 |
सैफुद्यीन लहेरी | 15,600 | एप्रिल 2008 |
3. तक्रारदार यांनी दैनंदिन सुलभ संचय ठेव मध्ये ठेवलेल्या रक्कमेची विरुध्द पक्ष पतसंस्थेत मागणी केली असता त्यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडुन स्वतः व कुंटंबियाचे नांवे असलेल्या दैनंदिन सुलभ संचय ठेव मधील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
4. विरुध्द पक्ष हे हजर झाले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदार यांची तक्रार पाहता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी आमच्या समोर खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये. उत्तर.
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली
आहे काय? होय.
2 आदेश काय? खालीलप्रमाणे.
विवेचन
6. मुद्या क्र.1 – प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेमध्ये दैनंदिन सुलभ संचय ठेव मध्ये रक्कम गुंतवली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वास्तविक तक्रारदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ विरुध्द पक्ष यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. तक्रारदार यांनी मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 –– तक्रारदार यांनी त्यांच्या दैनंदिन सुलभ संचय ठेव मध्ये व्याजासह होणारी रक्कम दैनंदिन सुलभ संचय ठेव मधील रक्कम मिळावी अशी मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी पतसंस्थेत जमा केलेली रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तसेच पतसंस्थेच्या कृतीमुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे व मंचात तक्रारही दाखल करावी लागली आहे. तसेच त्यांना मानसिक त्रास होणे साहजिक आहे. त्यामुळे तक्रारदार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते.
9. वरिल विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) विरुध्द पक्ष खान्देश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि यांनी तक्रारदार यांना वरील आदेश कलम 2 मध्ये नमुद केलेल्या दैनंदिन सुलभ संचय ठेव मधील रक्कमेवर देय तारखेनंतर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत तसेच दावा खर्चापोटी रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.1,000/- अदा करावेत.
(3) वर नमुद आदेश क्र.2 मधील रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस.जैन ) ( श्री.डी.डी.मडके )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव