Maharashtra

Akola

CC/14/217

Madhav Vishwanath Chinchole - Complainant(s)

Versus

Khandelwal Jwellers(Akola)Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Manish Kharat

09 Oct 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/14/217
 
1. Madhav Vishwanath Chinchole
Byepass Rd.mangrulpir , Tq. Mangrulpir
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Khandelwal Jwellers(Akola)Pvt. Ltd.
room No.718,Jwell Word,Coton Exchange Bldg.Kalbadevi Rd.Mumbai
Mumbai
Maharashtra
2. Khandelwal Jwellers(Akola)Pvt. Ltd.
I St floor, Mahatma Gandhi Rd. Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

                            तक्रारकर्ता यांचेतर्फे वकील          :-  ॲड. एम. एस. खरात 

             विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचे  तर्फे  वकील  :-  ॲड. डी.आर. गोयनका

                                              ॲड. ए.व्‍ही. मोहता

           

::: आ दे श प त्र  :::

 

मा. सदस्‍या, श्रीमती भारती केतकर यांनी निकाल कथन केला :-

 

     ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्‍वये तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-

      विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 हे प्रतिष्‍ठीत प्रसिध्‍द सोने विक्रीचे व्‍यवसायिक आहेत.  तक्रारकर्ते हे सेवानिवृत्‍त असून त्‍यांना निवृत्‍त झाल्‍यानंतर कार्यालयाकडून मिळणारी रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे गुंतवणूक करुन मोबदल्‍यात सोने घेण्‍याची इच्‍छा विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे प्रगट केली.  त्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे तक्रारकर्ता दिनांक 13 ऑगस्‍ट 2011 रोजी सोने विकत घेण्‍याकरिता गेले.  त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी निर्देशित केल्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने 218.500 मि.लि. सोने विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे वेगवेगळया तारखेमध्‍ये 75 टक्‍के रक्‍कम जमा करुन निश्चित केले.  त्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्‍याला पावत्‍या सुध्‍दा निर्गमित केलेल्‍या आहेत.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने उर्वरित 25 टक्‍के रक्‍कम जमा करुन विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडून दिनांक 02-11-2012 ला 200 ग्रॅम सोन्‍याचे बिस्‍कीट घेऊन गेले.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 याने तक्रारकर्त्‍याला निर्देशित व आश्‍वासित केले की, उर्वरित 18.500 मि.ली. नंतर पुरवू.  परंतु, विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्‍याला सदर उर्वरित सोने 18.500 मि.ली. ग्रॅम दिलेच नाही.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांना तक्रारकर्त्‍याकडून संपूर्ण 218.500 मिलीग्रॅम सोन्‍याची 100 टक्‍के रक्‍कम मिळाल्‍यावर ही सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍यांचे उर्वरित राहिलेले 18.500 मिलीग्रॅम सोने दिलेच नाही.   विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्‍याला पुन्‍हा त्‍यांच्‍या दुकानामध्‍ये बोलावून खोटे आमिष देवून तक्रारकर्त्‍याकडील असलेल्‍या विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी निर्गमित केलेल्‍या पावत्‍या हिशोब चुकलेला आहे असे सांगून विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी त्‍याच्‍या ताब्‍यात घेतलेल्‍या आहेत.  तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या संपूर्ण पावत्‍या विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे वारंवार परत मागितल्‍या.  परंतु, विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी पावत्‍या देण्‍यास टाळाटाळ केली आहे.

     तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांना सदर पावत्‍या व त्‍या पावत्‍याच्‍या हिशोबाबाबत दिनांक 15-02-2014 रोजी प्रत्‍यक्ष विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे येवून हिशोब समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्‍याची एकही गोष्‍ट ऐकली नाही.  तक्रारकर्त्‍याला विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी उर्वरित 18.500 मिलीग्रॅम सोन्‍याची निश्चित केलेली पावती दिनांक 02-11-2012 रोजी निर्गमित केलेली आहे.  इतके असतांना सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्‍याला सदर उर्वरित 18.500 मिलीग्रॅम सोने देण्‍यास टाळाटाळ केली.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे संपूर्ण सोने निश्चित करुन रक्‍कम ₹ 6,11,950/- दिलेले आहेत.

      दिनांक 01-03-2014 रोजी सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांना पुन्‍हा विनंती अर्ज दिल्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.  त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी दिनांक 30-09-2014 रोजी भ्रमणध्‍वनीद्वारे तक्रारकर्त्‍याला त्‍यांच्‍या दुकानामध्‍ये बोलावून तक्रारकर्त्‍याच्‍या संपूर्ण पावत्‍या परत देतो असे खोटे आमिष देवून तक्रारकर्त्‍याकडून ₹ 38,147/- नगदी घेऊन 18.500 मिलीग्रॅम सोने विकत दिले.  वास्‍तविक तक्रारकर्त्‍याचे या आधीच्‍या पावती दिनांक 02-11-2012 नुसार विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडे तक्रारकर्त्‍याचे पैसे शिल्‍लक आहेतच, असे असतांनाही विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करुन गैरकायदेशीररित्‍या तक्रारकर्त्‍याची फसवणूक केलेली आहे.       

       सबब, तक्रारकर्त्‍याची प्रार्थना की, तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करावी व 1) विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांचेकडून 18.500 मिलीग्रॅम सोने देण्‍याचे आदेश न्‍यायाचे दृष्‍टीने पारित व्‍हावेत.  तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 कडून आर्थिक त्रासापोटी ₹ 1,00,000/- तसेच मानसिक त्रासापोटी ₹ 50,000/- देण्‍याचे आदेश देण्‍यात यावे.

          सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 07 दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत.

विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 चा लेखी जवाब :-

    विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ने दिनांक 07-08-2015 रोजी पुरसीस देऊन विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ने दाखल केलेला लेखी जवाब व पुरावा हाच विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 चा जवाब व पुरावा समजण्‍यात यावा, असे मंचास कळवले.   

      विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी प्रस्तुत प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे.  त्यानुसार, त्यांनी तक्रारकर्त्‍याच्या तक्रारीतील बहूतांश विधाने अमान्य करुन अधिकचे कथनात असे नमूद केले की,  तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक नाही.  तसेच ग्राहक संरक्षण अधिनियमामध्‍ये दिलेल्‍या ग्राहक या संज्ञेत तक्रारकर्ता बसत नाही. त्‍यामुळे, तक्रारकर्त्‍याला विदयमान न्‍यायमंचासमोर तक्रार प्रकरण दाखल करण्‍याचे कायदेशीर हक्‍क व अधिकार नाहीत.  तसेच तक्रार अर्जामध्‍ये नमूद संपूर्ण मजकूर व बाबी वाचल्‍यावर हे स्‍पष्‍टपणे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने फार मोठया प्रमाणावर आणि फार जास्‍त रकमेचे सोने विरुध्‍दपक्षाकडून विकत घेण्‍याचा करार केलेला आहे व विकत घेतले आहे.  सोने खरेदी विक्रीचा व्‍यवहार हा पूर्णपणे व्‍यावसायिक स्‍वरुपाचा व्‍यवहार असून त्‍याबाबत कोणतेही तक्रार प्रकरण ग्राहक संरक्षण अधिनियम अंतर्गत विदयमान न्‍यायमंचासमक्ष चालू शकत नाही.  तसेच कमी भावामध्‍ये व कमी दरामध्‍ये जास्‍त प्रमाणावर सोने विकत घेऊन तक्रारकर्त्‍याने त्‍यावर मोठी रक्‍कम नफा व कमाई मिळवली आहे.

     विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 चा पत्‍ता तक्रारकर्त्‍याने मुंबई येथील दिलेला आहे व म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 विरुध्‍द अकोला येथे तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही व म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 विरुध्‍द अकोला येथे सदर प्रकरण चालविण्‍याचा विदयमान न्‍यायमंचास अधिकार नाही. अशा परिस्थितीत संपूर्ण तक्रार फेटाळण्‍यात यावी.

     संपूर्ण प्रकरण फार जास्‍त गुंतागुंतीचे व क्लिष्‍ट स्‍वरुपाचे आहे आणि प्रकरणाचे योग्‍यरित्‍या निकाल देण्‍याकरिता कागदोपत्री व तोंडी पुरावा घेणे व उलट तपासणी घेण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला दिवाणी न्‍यायालयात जावून दाद मागण्‍याचे निर्देश देणे आवश्‍यक आहे.  

     तक्रारकर्त्‍याने सर्व खरी बाब व खरी परिस्थिती व खरा व्‍यवहार जाणूनबुजून लपवून हेतुपुरस्‍सरपणे खोटी बाब व खोटी माहिती नमूद करुन वाईट हेतुने तक्रार प्रकरण दाखल केले आहे.  दिनांक 19-07-2011 ते दिनांक 27-10-2012 या कालावधीमध्‍ये तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी काही अंशत: रक्‍कम देवून विरुध्‍दपक्षाकडून सोने विकत घेण्‍याचा करार केलेला आहे.  प्रत्‍येक वेळी विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला रितसर पावती दिलेली आहे.  दिनांक 19-07-2011 ते दिनांक 27-10-2012 पर्यंत तक्रारकर्त्‍याने एकूण रक्‍कम ₹ 5,44,000/- विरुध्‍दपक्षाला दिलेले होते.  दिनांक 02-11-2012 रोजी तक्रारकर्त्‍याने सर्व हिशोब समजून करुन घेऊन 200 ग्रॅम सोने विरुध्‍दपक्षाकडून नेलेले आहे.  दिनांक 02-11-2012 रोजी केलेल्‍या हिशोबाप्रमाणे तक्रारकर्त्‍याने अग्रीम म्‍हणून दिलेली संपूर्ण रक्‍कम विचारात घेऊन एकूण 200 ग्रॅम सोने देण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याकडून आणखी रक्‍कम ₹ 2,925/- घेणे बाकी निघत होते आणि तक्रारकर्त्‍याने दिनांक 02-11-2012 रोजी ती रक्‍कम ₹ 2,925/- विरुध्‍दपक्षाला देवून 200 ग्रॅम सोने त्‍याच दिवशी नेलेले आहे.  संपूर्ण अग्रीम रक्‍कम व सोन्‍याचा सर्व हिशोब करुन दिनांक 02-11-2012 रोजी एकूण 6 अंतिम बिले तयार करुन विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेली आहेत.  येणेप्रमाणे दिनांक 02-11-2012 रोजी पर्यंतचे सर्व हिशोब अंतिम करुन आणि तक्रारकर्त्‍याने सर्व समजून घेवून सोने नेलेले आहे.  त्‍याबद्दल तक्रारकर्त्‍याने तेव्‍हा काही एक तक्रार केलेली नाही.  जेव्‍हा अंतिम बिले तयार करुन सोने दिले जाते, त्‍या दिवशी संपूर्ण हिशोब करुन अंतिम बिले तयार करण्‍यात येतात.  अंतिम बिले तयार करतेवेळी व सोने देतेवेळी त्‍या पूर्वी व त्‍या अगोदर अग्रीम म्‍हणून दिलेली संपूर्ण रक्‍कम त्‍यामध्‍ये समाविष्‍ट केल्‍या जाते व कोणतीही अग्रीम रक्‍कम जमा ठेवल्‍या जात नाही.

      दिनांक 02-11-2012 रोजी तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा आणखीन सोने विकत घेण्‍याची इच्‍छा दर्शविली व त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक 02-11-2012 रोजी विरुध्‍दपक्षाकडून 29,850/- प्रति 10 ग्रॅम या दराने 18.500 ग्रॅम सोने विकत घेण्‍याकरिता बुकिंग केली व त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने त्‍या दिवशी अग्रीम म्‍हणून विरुध्‍दपक्षाला ₹ 17,075/- दिलेत.  त्‍याबाबत विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला रितसर पावती दिलेली आहे आणि त्‍या पावतीमध्‍ये सर्व बाबी नमूद आहेत.        

::  का णे      नि ष्‍क र्ष  ::

      सदर प्रकरणात उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकून व उभयपक्षांनी दाखल केलेले दस्‍त व लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन व सखोल अभ्‍यासाअंती काढलेल्‍या मुद्दयांचा अंतिम आदेशाचे वेळी विचार करण्‍यात आला.

1)     विरुध्‍दपक्षाच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेले सोने हे नफा कमवून विकण्‍यासाठी खरेदी केल्‍याने तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदयानुसार विरुध्‍दपक्षाचा ग्राहक होऊ शकत नाही.  परंतु, विरुध्‍दपक्षाने सदरचा आक्षेप पुराव्‍यासह सिध्‍द् केला नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार व प्रकरणातील दाखल दस्‍तांवरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा गाहक असल्‍याचे सिध्‍द् होत असल्‍याने तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक असल्‍याचे ग्राहय धरण्‍यात येत आहे. 

2)    . तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीनुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 कडे 13 ऑगस्‍ट 2011 पासून वेळोवेळी पैसे भरुन 218.500 मिलीग्रॅम सोने खरेदीसाठी 75 टक्‍के रक्‍कम जमा करुन निश्चित केले.  त्‍याच्‍या पावत्‍या सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ने तक्रारकर्त्‍याला दिल्‍यात.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने उर्वरित 25 टक्‍के रक्‍कम जमा करुन विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडून दिनांक 02-11-2012 ला 200 ग्रॅम सोन्‍याचे बिस्‍कीट घेऊन गेले.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वारंवार मागणी करुनही विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ने 18.500 मिलीग्रॅम सोने दिले नाही.  उलट खोटे आमीष देऊन तक्रारकर्त्‍याकडील सोने खरेदीच्‍या संपूर्ण पावत्‍या ताब्‍यात घेतल्‍या.  त्‍यानंतर दिनांक 30-09-2014 रोजी भ्रमणध्‍वनीद्वारे तक्रारकर्त्‍याला दुकानामध्‍ये बोलावून तक्रारकर्त्‍याच्‍या संपूर्ण पावत्‍या परत देतो, असे खोटे आमीष देऊन तक्रारकर्त्‍याकडून ₹ 38,147/- नगदी घेऊन 18.500 मिलीग्रॅम सोने विकत दिले.  परंतु, दिनांक 02-11-2012 च्‍या व्‍यवहारानुसार विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांचेकडे तक्रारकर्त्‍याचे पैसे शिल्‍लक आहेत.

3)      तक्रारकर्त्‍याचा सदर आक्षेप विरुध्‍दपक्षाने दाखल दस्‍तांद्वारे व युक्‍तीवादातून तसेच जवाबाद्वारे खोडून काढला.  विरुध्‍दपक्षाने सर्वप्रथम तक्रारकर्त्‍याने पाठवलेली नोटीस व सदर तक्रार यातील विसंगती मंचाच्‍या निदर्शनास आणून दिली.

     तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या तक्रारीत विरुध्‍दपक्षाने त्‍याच्‍याकडील संपूर्ण पावत्‍या आमिष देऊन ताब्‍यात घेतल्‍याचे म्‍हटले आहे.  तर दिनांक 19-10-2014 च्‍या नोटीस मधील पृष्‍ठ क्रमांक 14 वर तक्रारकर्त्‍याकडे सोने खरेदी संदर्भातल्‍या पावत्‍या सुध्‍दा उपलब्‍ध असल्‍याचे  नमूद केले आहे.  

           त्‍याचप्रमाणे,  नोटीस मध्‍ये तक्रारकर्त्‍याचे थकित असलेले 18.500 मिलीग्रॅम सोन्‍याचे पैसे परत मागितले तर तक्रारीत तक्रारकर्त्‍याने 18.500 मिलीग्रॅम सोने परत मागितले आहे.

4)    मंचाने दिनांक 02-11-2012 रोजी निर्गमित केलेल्‍या व विरुध्‍दपक्षाने दाखल केलेल्‍या पावत्‍यांसह तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या पावतीचेही अवलोकन केले.  विरुध्‍दपक्षाने दाखल केलेल्‍या दिनांक 13-08-2011 व दिनांक 26-09-2011 च्‍या पावत्‍या या एकूण ₹ 95,000/- अग्रीम भरल्‍याच्‍या दिसून येतात, तर तिस-या क्रमांकाच्‍या पावती पासून आठव्‍या क्रमांकाच्‍या पावतीपर्यंत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने रक्‍कम अग्रीम देऊन 200 ग्रॅम ( 20 तोळे ) सोने खरेदी केल्‍याचा संपूर्ण हिशोब व तपशील दिसून येतो.  शेवटच्‍या आठव्‍या क्रमांकाची पावती ₹ 1,65,000/- ची दिसून येते.  सदर पावतीवर पावती क्रमांक 21112001 च्‍या द्वारे ₹ 55,225/- पावती क्रमांक 271012001 च्‍या द्वारे ₹ 6,850/- व पावती क्रमांक 161011003 च्‍या द्वारे ₹ 1,00,000/- असे ₹ 1,62,075/- अग्रीम भरल्‍याचे दिसून येतात.  त्‍यामुळे, तक्रारकर्त्‍याने ₹ 2,925/- त्‍या दिवशी रोख देऊन ₹ 1,65,000/- चा हिशोब पूर्ण केलेला दिसून येतो.  आधीची अग्रिम रक्‍कम व सदर ₹ 1,65,000/-  यातून 200 ग्रॅम सोने तक्रारकर्त्‍याने खरेदी केल्‍याचे दिसून येते.  सदर बिलानुसार विरुध्‍दपक्षाकडे तक्रारकर्त्‍याची कुठलीही थकबाकी असल्‍याचे दिसून येत नाही.  त्‍याचप्रमाणे, दिनांक 02-11-2012 रोजी तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा आणखी सोने विकत घेण्‍याची ईच्‍छा दर्शवली  व त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक 02-11-2012 रोजी विरुध्‍दपक्षाकडून ₹ 29,850/- प्रति 10 ग्रॅम या दराने 18.500 ग्रॅम सोने विकत घेण्‍याकरिता बुकिंग केले व त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने त्‍यादिवशी अग्रीम म्‍हणून विरुध्‍दपक्षाला ₹ 17,075/- दिलेत.  हे विरुध्‍दपक्षाचे म्‍हणणे तपासून बघण्‍यासाठी मंचाने तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या पृष्‍ठ क्रमांक 10 वरील पावतीचे अवलोकन केले.  सदर पावतीवर Description  या सदराखाली Advance   असे नमूद केलेले दिसून येते.  सदर बुकिंग नुसार सोन्‍याचा भाव प्रति तोळा  ( 1 तोळा = 10 ग्रॅम ) ₹ 29,850/- असा दिसून येतो.  त्‍यामुळे ₹  17,075/- रुपयात 18.5 ग्रॅम सोने देण्‍याचे तक्रारकर्त्‍याला विरुध्‍दपक्षाने कबूल केल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे अविश्‍वसनीय असल्‍याचे मंचाचे मत आहे.  या सर्व घटनाक्रमावरुन दिनांक 02-11-2012 रोजी तक्रारकर्त्‍याने 200 ग्रॅम सोने घेतले व पुन्‍हा 18.500 मिली ग्रॅम सोन्‍याचे बुकिंग ₹ 17,075/- देऊन केले हे विरुध्‍दपक्षाचे म्‍हणणे मंच ग्राहय धरत आहे.  तसेच विरुध्‍दपक्षाने दाखल केलेल्‍या दिनांक 30-09-2014 च्‍या पावतीचेही मंचाने अवलोकन केले.  सदर पावतीनुसार प्रति ग्रॅम ₹ 29,850/- दराने 18.500 ग्रॅम सोन्‍याचे ₹ 55,222/- झाल्‍याचे दिसून येतात.  त्‍यात जमा ₹ 17,075/-, पावती क्रमांक 21112002 या नुसार विरुध्‍दपक्षाकडे आधीच जमा केल्‍याचे दिसून येतात.  सदर पावती क्रमांक व तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍त क्रमांक 10 वरील, दिनांक 02-11-2012 रोजीच्‍या ₹ 17,075/- च्‍या पावतीवरील क्रमांक सारखाच म्‍हणजे 21112002 असा दिसून येतो.  त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाने दिनांक 30-09-2014 रोजी ₹ 38,147/- घेऊन मग तक्रारकर्त्‍याला 18.500 ग्रॅम सोने दिले, ही विरुध्‍दपक्षाची कृती व्‍यवहारिक व योग्‍यच असल्‍याचे मंचाचे मत आहे.  त्‍यामुळे सदर 18.500 ग्रॅम सोन्‍याचे पैसे विरुध्‍दपक्षाला दिल्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याला खोटे आमिष दाखवून पुन्‍हा ₹ 38,147/- रुपये घेऊन 18.500 ग्रॅम सोने तक्रारकर्त्‍याला दिले हा तक्रारकर्त्‍याचा आक्षेप ग्राहय धरता येत नाही. 

     उभयपक्षांनी दाखल केलेल्‍या सोने खरेदीच्‍या पावत्‍या यांची बारकाईने पाहणी करुन व उभयपक्षांचा युक्‍तीवाद ऐकुन, सदर सोने खरेदी व्‍यवहारात विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याची कुठलीही फसवणूक केली नसल्‍याच्‍या निष्‍कर्षाप्रत सदर मंच आले आहे. त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाने त्‍यांच्‍या सेवेत कुठलीही न्‍युनता व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला नसल्‍याचे ग्राहय धरुन तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे. सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे.      

अं ति म   आ दे श

  1.   तक्रारकर्त्‍याची तक्रार पुराव्‍याअभावी खारीज करण्यात येत आहे.

  2. न्‍यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.

     

  3. उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

    

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.