Maharashtra

Bhandara

CC/19/13

DINDYAL B TEMBHARE - Complainant(s)

Versus

KESHAV KHANAK SEEDS PVT.LTD - Opp.Party(s)

ADV B.S WANJARI

27 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/13
( Date of Filing : 16 Jan 2019 )
 
1. DINDYAL B TEMBHARE
MORGAON PO SALEBHATA TAH LAKHANI DIST BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. KESHAV KHANAK SEEDS PVT.LTD
AMGAON ROAD FULCHURE PETH GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
2. SANDIP AGRO HUB
C/O SHUBHAM R BHIWGADE,BUS STOP NEAR BESIDE SANDIP HERO LAKHANI
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Aug 2021
Final Order / Judgement

                           (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

                                                                                           (पारीत दिनांक– 27 ऑगस्‍ट, 2021)

   

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1  व क्रं-2  अनुक्रमे बियाणे निर्माता कंपनी व बियाणे विक्रेता यांचे विरुध्‍द धानाचे भेसळयुक्‍त बियाण्‍या मुळे त्‍याचे झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍याची शेती मौजा राजेगाव, तहसिल-लाखनी, जिल्‍हा भंडारा येथे असून सदर शेतजमीनीचा गट क्रं-151, 152/1 आणि 571 क्षेत्रफळ-आराजी 1.76 हेक्‍टर आर आहे. तक्रारकर्त्‍यास सन-2018-2019 च्‍या खरीप हंगामात भाताचे पिकाची लागवड करावयाची असल्‍याने त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्‍याशी संपर्क साधून उत्‍तम प्रतीचे धानाचे बियाणे देण्‍याची विनंती केली. विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 निर्मित बियाणे उत्‍तम प्रतीचे असल्‍या बाबत आश्‍वासन दिले. त्‍या अनुषंगाने तक्रारकर्त्‍याने बिल क्रं-18, दिनांक-17.06.2018 अनुसार ईशान बियाणे लॉट क्रं-712/719 एकूण वजन-100 किलोग्रॅम, दर प्रती 10 किलोग्रॅम रुपये-640/- प्रमाणे रुपये-6400/- एवढया किमतीत खरेदी केले व बिल प्राप्‍त केले. बियाणे खरेदी नंतर त्‍याने  शेतात योग्‍य ती मशागत मजूरांचे सहाय्याने करुन व आवश्‍यक ते खत घालून प-हयाची लागवड दिनांक-17.06.2018 व दिनांक-19.06.2018 रोजी केली. विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्‍याने बियाण्‍याची विक्री करते वेळी असे सांगितले होते की, सदर पिकाचा उत्‍पादन कालावधी हा 120 ते 125 दिवस इतका आहे. तक्रारकर्त्‍याने 1.76 हेक्‍टर आर क्षेत्रात धानाची लागवड केली होती. प-हया करीता ट्रॅक्‍टर व मजूरीचा खर्च प्रती एकर रुपये-2000/- प्रमाणे एकूण रुपये-9000/- त्‍याच बरोबर रोवणी करीता ट्रॅक्‍टर व मजूराचा खर्च एकरी रुपये-3000/- प्रमाणे एकूण रुपये-13,500/-  तसेच रोवणी केल्‍या नंतर पिकाचे वाढी करीता निंदनाचा खर्च प्रती एकर रुपये-2000/- प्रमाणे एकूण रुपये-9000/- आणि औषधे व खतां करीता एकरी रुपये-2000/- प्रमाणे एकूण रुपये-9000/- असा खर्च केला.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीचे शिफारसी प्रमाणे धान पिकाचा कालावधी हा 120 ते 125 दिवसांचा आहे. वर नमुद केल्‍या प्रमाणे त्‍याने पिकाची  देखभाल व खर्च केला असता माहे सप्‍टेंबरचे शेवटी 90 ते 100 दिवस झाले असता धानाचे पिक 45 ते 50% कापणी करता लागले, त्‍याच वेळी 35 ते 40% प्रमाणामध्‍ये धानाची उगवण (निसवा) झालेला दिसून आला व त्‍यावेळी 20 ते 25% गर्भावस्‍थेत असल्‍याचे दिसून आले. तसेच निसवा झालेला धान व गर्भावस्‍थेत असलेला धान कापणीवर येण्‍यास बराच कालावधी आहे व त्‍यामुळे धानाची कापणी कशी करावी हा प्रश्‍न निर्माण झाला होता, शेवटचे धान कापणीवर येई पर्यंत सुरुवातीचे परिपक्‍व झालेले व निसवा झालेले धान खाली गळून पडतील म्‍हणजेच 65 ते 70% उत्‍पन्‍न कोणत्‍याही कामात येणार नाही.यावरुन बियाण्‍या मध्‍ये एकाच प्रकारचे जातीचे वाण नसून वेगवेगळया प्रकारचे वाणाची भेसळ करुन  त्‍याची फसवणूक केलेली आहे हे लक्षात आल्‍याने त्‍याने  खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, लाखनी यांचे कडे तक्रार केली असता त्‍यांनी सदर तक्रार तालुका निवारण समितीकडे पाठविली. दिनांक-10.10.2018 रोजी  तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे सदस्‍यांनी प्रत्‍यक्ष मोक्‍यावर भेट देऊन पिकाची पाहणी केली. सदर तालुका निवारण समिती मध्‍ये तालुका कृषी अधिकारी पी.पी.गिदमारे, कृषी विद्दापिठाचे प्रतिनिधी शास्‍त्रज्ञ डॉ.एन.एस.वझीरे,  तालुका कृषी अधिकारी श्री ए.के. शहारे, कृषी अधिकारी श्री एम.के.जांभूळकर अशा कृषी क्षेत्रतील उच्‍चशिक्षीत व तज्ञ लोकांचा समावेश होता. तालुका निवारण समितीचे प्रत्‍यक्ष मोका पाहणीचे वेळी तक्रारकर्ता स्‍वतः तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्‍याचा प्रतिनिधी उपस्थित होता परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी तर्फे कोणीही उपस्थित नव्‍हते. सदर समितीने प्रत्‍यक्ष मोका पाहणी करुन मोका तपासणी अहवालावर उपस्थितांनी स्‍वाक्ष-या केल्‍यात.

 

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, तालुका तक्रार निवारण समितीने त्‍यांचा दिनांक-12.10.2018 रोजी तपासणी अहवाल त्‍याला पाठविला. सदर अहवाला मध्‍ये तालुका स्‍तरीय तक्रार निवारण समितीने खालील प्रमाणे निष्‍कर्ष नोंदविला-

     तालुका स्‍तरीय तक्रार निवारण समितीने केलेल्‍या प्रत्‍यक्ष पाहणी नुसार मे. केशव खनक सीडस प्रायव्‍हेट लिमिटेड या कंपनीचे मुख्‍य वाण भात बियाणे ईशान हे 120 ते 125 दिवस म्‍हणजेच मध्‍यम कालावधीचे असून सदर वाणामध्‍ये 90 ते 100 दिवस कालावधीचे वाण 45 ते 50% व 140 ते 145 दिवस कालावधीचे भारी वाण 20 ते 25% असल्‍याचे निदर्शनास आले. यावरुन सदर मुख्‍य वाण फक्‍त 35 ते 40% नुकताच निसवा झालेल्‍या अवस्‍थेत असून ईतर भेसळ वाण 45 ते 50% परिपक्‍व अवस्‍थेत व 20 ते 25% गर्भावस्‍थेत असल्‍याचे आढळून आले. यावरुन सदर मुख्‍य वाणात 65 ते 70% ईतर वाणाची भेसळ आढळून आली. मुख्‍य वाण व ईतर भेसळ वाण यांचा परिपक्‍व कालावधी व कापणी कंपनीने शिफारस केलेल्‍या कालावधी नुसार नसून वेगवेगळा आहे, यावरुन शेतक-याचे 65 ते 70% आर्थिक नुकसान होणार आहे.

अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी बियाणे भेसळयुक्‍त असूनही ते उच्‍च प्रतीचे अस्‍सल आहेत असे दर्शवून त्‍याला बियाण्‍याची विक्री करुन त्‍याची
फसवणूक केली व अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केला त्‍यामुळे त्‍याचे आर्थिक नुकसान होऊन शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाला मध्‍ये  तक्रारकर्त्‍यास हेक्‍टरी 25 क्विंटल प्रमाणे धानाचे कमी उत्‍पादन येणार असल्‍याने त्‍याने लागवड केलेल्‍या  क्षेत्रानूसार सरासरी अंदाजे 44.00 क्विंटल धानाचे नुकसान झाल्‍याचे नमुद आहे म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षां विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे खालील मागण्‍या केल्‍यात-

 

  1. तक्रारकर्त्‍याचे धान पिकाचे 44 क्विंटल नुकसान झालेले असून धानाचा सरासरी भाव प्रतीक्विंटल रुपये-3000/- प्रमाणे एकूण धानाची नुकसानी रुपये-1,32,000/- या शिवाय त्‍याचे धान पिकाचे जवळपास 70 टक्‍के नुकसान झालेले असल्‍याने प-हया करीता ट्रॅक्‍टर व मजूरीचा आलेला खर्च 9000/- पैकी 70% रुपये-6300/-, रोवणी करीता ट्रॅक्‍टर व मजूरीचा खर्च रुपये-13500/- पैकी 70% रुपये-9450/-,निंदना करीता मजूरांचा खर्च रुपये-9000/- पैकी 70% रुपये-6300/-, औषध व खता करीता खर्च रुपये-9000/- पैकी 70% रुपये-6300/- त्‍याच बरोबर बियाण्‍याचे खरेदीपोटी अदा केलेली रक्‍कम रुपये-6400/- पैकी 70% रुपये-4480/- असे मिळून एकूण रुपये-1,64,830/- अपेक्षीत पिकाचे नुकसानी बद्दल विरुध्‍दपक्षांकडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. या शिवाय तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-25,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्षांकडून मिळावा आणि सदर संपूर्ण रकमांवर आदेशाचे तारखे पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो  द.सा.द.शे.-18 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचे आदेशित व्‍हावे. 

 

03.  जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं-1 बियाणे निर्माता कंपनीला रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली असता पोस्‍टाचे लिफाफयावर सदर नोटीस “पार्टी घेण्‍यास इन्‍कार” या पोस्‍टाचे  शे-यासह जिल्‍हा आयोगाचे कार्यालयास परत आली असता जिल्‍हा ग्राहक आयोगाने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात दिनांक-03.05.2019 रोजी पारीत केला.

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता याने  जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर उपस्थित होऊन आपले लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍याचे लेखी उत्‍तरा नुसार त्‍याने तक्रारकर्त्‍यास ईशान जातीचे बियाण्‍या विकत घेण्‍या बाबत शिफारस केली नव्‍हती तसेच सदर धानाच्‍या वाणा बद्दल कोणतेही आश्‍वासन दिेलेले नव्‍हते. तक्रारकर्ता हा त्‍याचे कृषी केंद्रात आल्‍या नंतर त्‍याने मागणी केल्‍या नुसार त्‍याला ईशान जातीचे धानाच्‍या बियाण्‍याची विक्री केली. तसेच सदर धानाचा पिकाचा कालावधी हा 120 ते 125 दिवस इतका असल्‍याचे तक्रारकतर्यास सांगितल्‍याची बाब नाकबुल केली. तसेच सप्‍टेंबरचे शेवटी 90 ते 100 दिवसात धानाचे पिक 45 ते 50 टक्‍के कापणी करता लागले, त्‍याच वेळी 35 ते 40 टक्‍के प्रमाणा मध्‍ये धानाची निसवण झाली व 20 ते 25 टक्‍के गर्भावस्‍थेत आढळून आले ही बाब माहिती अभावी नाकबुल केली. आपले विशेष कथनात नमुद केले की, त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी दिलेल्‍या सुचने प्रमाणे लागवडी बाबत तक्रारकर्त्‍याला माहिती दिली होती. वि.प.क्रं 1 निर्मित सिल पॅक बियाण्‍याची त्‍याने तक्रारकर्त्‍यास विक्री केली. त्‍याचे विरुध्‍द चुकीची तक्रार केलेली असल्‍याने ती खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्‍याने केली.

 

05.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रं-2 बियाणे विक्रेत्‍याचे उत्‍तर तसेच उभय पक्षां तर्फे दाखल केलेले साक्षी पुरावे ईत्‍यादीचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री वंजारी यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला तसेच त्‍यांनी आपले युक्‍तीवादाचे समर्थनार्थ मा.सर्वोच्‍च न्‍यायालय आणि मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांचे तर्फे पारीत न्‍यायनिवाडयांवर आपली भिस्‍त ठेऊन सदरची तक्रार नुकसान भरपाईसह मंजूर करावी असा युक्‍तीवाद केला. प्रकरणातील अभिलेखांवर तसेच युक्‍तीवादा वरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रारीचे न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

  

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 2 विक्रेत्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 कंपनी निर्मित भेसळयुक्‍त धान बियाण्‍याची विक्री केली आहे काय ?

-होय-

 

 

2

भेसळयुक्‍त धान बियाण्‍यामुळे झालेल्‍या पिकाची नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे काय?

-होय-

3

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

 

                                                                                 :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

 

06.    तक्रारकर्त्‍याचे इशान जातीच्‍या धान पिकाचे भेसळीयुक्‍त बियाण्‍या संबधात केलेल्‍या तक्रारीचे अनुषंगाने तालुका स्‍तरीय तक्रार निवारण समितीच्‍या वतीने प्रत्‍यक्ष मोका पाहणीचे वेळी विरुध्‍दपक्ष क्रं-1 केशव खनक सिडस प्रायव्‍हेट लिमिटेड या धान बियाण्‍याचे निर्माता कंपनी तर्फे कोणीही प्रत्‍यक्ष मोका पाहणीचे वेळी उपस्थित झाले नाही. तसेच प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल झाल्‍या नंतर जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांना  रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस स्विकारण्‍यास नकार दिला व त्‍यांचा कोणताही लेखी जबाब जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केलेला नाही. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी विरुध्‍द केलेल्‍या आरोपांचे खंडन केलेले नाही त्‍यामुळे प्रथमदर्शनी तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील म्‍हणणे निर्विवाद ठरते. तसेच तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्‍या अहवाला नुसार तक्रारकर्त्‍यास विक्री केलेल्‍या ईशान जातीच्‍या वाणात ईतर हलक्‍या व भारी वाणाची 65 ते 70% भेसळ असून अंदाजे सरासरी 25 क्विंटल प्रती हेक्‍टरी धानाचे उत्‍पादन कमी येणार आहे, यावरुन सदर शेतक-याचे लागवड केलेल्‍या क्षेत्रा नुसार अंदाजे 10.25 क्विंटल धानाचे उत्‍पादन कमी होऊन आर्थिक नुकसान झाल्‍याचे  नमुद  केलेले आहे. सदर शासना मार्फत गठीत केलेल्‍या स‍मीती मध्‍ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍तींचा समावेश असून त्‍यांनी दिलेल्‍या अहवालावर अविश्‍वास दाखविण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही त्‍यामुळे समितीचे अहवाला वरुन तक्रारकर्त्‍यास इशान जातीचे धानाचे भेसळयुक्‍त बियाणे विक्री केल्‍याची बाब सिध्‍द होते करीता मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर आम्‍ही “होकारार्थी” नोंदवित आहोत.

 

07.  तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी तक्रारीतील युक्‍तीवादाचे समर्थनार्थ खालील नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवर आपली भिस्‍त ठेवली-

 

  1.             Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Kanta Kantha Rao- Verus-Y.Surya Narayana” (2017) CJ 619 (N.C.)- Revision Petition Nos.1008,1009 and 1010 of 2017 Decided on 03-05-2017

        Petitioner had never filed any objections to report of Scientist nor did not file any application under Section 13 (1) (c) requesting for sample seeds to be sent to appropriate laboratory for testing. Petitioner could have sent sample for testing to laboratory which it had failed to do so. Revision Petitions dismissed.

                                                                 *****      

II        Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Dharam Pal & Sons- Verus-Som Prakash” (2014) CJ 666 (N.C.)- Revision Petition No.-4672 of 2012 Decided on 08-05-2014

            We have perused the evidence on record, the report submitted by the Committee constituted by the Deputy Director, Agriculture, Sirsa. Thus, as per the report, it is clear that the Complainant had sufferd his paddy crop, to the extent of 50%, on account of substandard quality of seeds sold to him by the Ops. Revision Petition dismissed.

                                                              *****

III             Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ National Seeds Corporation Ltd.- Verus-Abdul Azia Fakir Mohd. Inamdar & Another” (2009) CJ 518 (N.C.)- Revision Petition No.-1227 of 2004 Decided on 19-01-2009

       In view of report of District Seeds Complaint Enquiry Committee seeds supplied to complainant were defective and a wrong representation had been made to complainant that seeds were certified and were having 85% germination capacity. Revision Petition dismissed.

                                                              *****

  1.  Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Maharashtra State Seeds Corporation Ltd.- Verus-Arvind Bajirao Borkar &Others” (2014) CJ 35 (N.C.)- Revision Petition No.-1412 of 2013 Decided on 06-09-2013

         There is nothing on record to show that at the time of preparation of Panchanama made  by  District Seeds Complaint Enquiry Committee, representative of petitioners ever objected to same. As per Panchanama 50% of seeds were infected.

         

V      Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Western Agri Seeds Pvt.Ltd. & Others -Verus-K. Murlidhar Reddy & Others” (2015)CJ 920(NC)

    

     या व्‍यतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील नमुद मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे  व मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे-

 

  1.      Hon’ble Supreme Court of India-  H.N.S.Shastry- Verus-“Asstt. Director Agriculture” (2004 (4) Mh.L.J.- (Page No.-838 to 841) Civil Appeal No. 2253 of 1999 decided on 06-05-2004

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने असे नमुद केलेले आहे की, Under Section 14(1) of the Consumer Protection Act, 1986, if the District Forum is satisfied that the goods complained against suffer from any defect, it could grant reliefs which include return of the price of the paddy and also compensation to the consumer for any loss suffered. Granting of relief to the consumer does not depend upon whether he should have made alternative arrangement. In the present case, it was enough for the appellant to establish that the paddy seeds supplied by the respondent were defective.  

     आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेले ईशान जातीचे धान बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा निष्‍कर्ष तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्‍ये नोंदविलेला असल्‍याने सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.

                                                                     ******

  1.      Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Indian Farmers Fertilizers Co-operative Ltd. -Verus-Vijay Kumar And Another” (2018)CJ 861 (N.C.)

 

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “If despite all efforts made by the farmer, there is no flower and foliage in as many as 60-70% of the plants, it is obvious that there was some adulteration in the seeds.  The team of the Agriculture Department also noted in this regard that there was a mixture of Gwar seeds shown to it. Therefore, there is no reason to discard the report prepared by the officers of the Agriculture Department”.

 

   सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद आहे की, शेतक-याने पिक लागवडीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्‍न केल्‍या नंतरही 60 ते 70 टक्‍के झाडांना फुले व बोंडे आलेले नाहीत आणि बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा अहवाल कृषी अधिकारी यांचे समीतीने दिलेला असून सदर अहवाल अमान्‍य करण्‍याचे कोणतेही प्रयोजन नाही.

      आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा वादातील ईशान जातीचे धान बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा निष्‍कर्ष तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्‍ये नोंदविलेला असल्‍याने सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.

                                                                 ******

 

  1.        Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Avon Beej Company- -Verus-Anoop Singh And Others” (2020)CJ 954 (N.C.)

 

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “Report of the Agriculture Experts Committee wherein it has been found that 31% plants were of off-type due to which the Complainant suffered 29% loss of paddy crop and Off-type means any seed or plant not a part of the same variety and make include, seeds or plants of  other varieties. Further, it is established that the seeds were not pure. The report submitted by the team of Agriculture Experts was not discarded”.

       आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा वादातील ईशान जातीचे धान बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा निष्‍कर्ष तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्‍ये नोंदविलेला असल्‍याने सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.

                                                                      ******

 

08.   हातातील प्रकरणात  तक्रारकर्त्‍यास  विरुध्‍दपक्ष क्रं 1 निर्मित विक्री केलेल्‍या ईशान जातीचे धानाचे वाणाच्‍या पिकाचा कालावधी हा 120 ते 125 दिवस मध्‍यम कालावधीचे असून सदर वाणाचे प्रमाण फक्‍त 35 ते 40 टक्‍के आढळून आले. सदर वाणात ईतर हलक्‍या व भारी वाणाची 65 ते 70 टक्‍के भेसळ असून अंदाजे सरासरी 25 क्विंटल प्रतीहेक्‍टरी धानाचे उत्‍पादन कमी होणार आहे, यावरुन सदर शेतक-याचे लागवड केलेल्‍या क्षेत्रा नुसार सरासरी अंदाजे 44.00 क्विंटल धानाचे उत्‍पादन कमी होऊन आर्थिक नुकसान झालेले आहे असा  असा तालुका स्‍तरीय तक्रार निवारण समितीचा निष्‍कर्ष आहे. तालुकास्‍तरीय बियाणे  तक्रार  निवारण समितीचा अहवाल पाहता विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीव्‍दारे निर्मित बियाण्‍या मध्‍ये भेसळ होती कारण जर एकाच वाणाचे  बियाणे राहिले असते तर पिक परिपक्‍वतेचा कालावधी हा संपूर्ण पिकाचा एक सारखा एकाच वेळी राहिला असता परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या शेतातील काही धानाच्‍या लोंब्‍या परिपक्‍व झाल्‍यात तर काही परिपक्‍व होण्‍यासाठी काही कालावधी लागत होता. त्‍यामुळे तक्रारदार शेतकरी हा त्‍याचे शेतात परिपक्‍व झालेल्‍या काही धानाची कापणी करु शकत नव्‍हता कारण उर्वरीत धानाचे पिक परिपक्‍व होण्‍यासाठी काही कालावधी लागणार होता अशा परिस्थितीत परिपक्‍व झालेल्‍या धानाचा निसवा होणे क्रमप्राप्‍त आहे त्‍यामुळे संबधित तक्रारदार शेतक-याचे नुकसान झालेले आहे

मुद्दा क्रं 2 बाबत

09.    तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालाचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीचे बियाण्‍या मध्‍ये भेसळ असल्‍याचे निष्‍पन्‍न झालेले आहे. तसेच संबधित    शेतक-याने पेरणीपूर्वी योग्‍य मशागत, सिंचनाची योग्‍य सुविधा, योग्‍य मात्रा मध्‍ये औषधी व खते दिल्‍याचा निष्‍कर्ष तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीने काढलेला आहे  

10.  तक्रारकर्त्‍याने तक्रारीचे मागणी मध्‍ये अपेक्षीत उत्‍पादनापेक्षा कमी आलेल्‍या पिकाची नुकसान भरपाई तर मागितली परंतु त्‍या सोबत धान पिकाचे लागवडीसाठी ट्रॅक्‍टर व मजूरांचा खर्च, पिकाचे रोवणीचा खर्च, निंदनासाठी मजूरांचा खर्च, औषधी व खता करीता खर्च, बियाणे खरेदीसाठी आलेला खर्च इत्‍यादी खर्चाची मागणी केलेली आहे.  अपेक्षीत उत्‍पादना पेक्षा कमी आलेल्‍या धानाच्‍या पिकाची  संपूर्ण नुकसान भरपाईची रक्‍कम मंजूर केल्‍या नंतर वेगळयाने धानाचे पिकाचे लागवडीसाठी आलेला अन्‍य खर्च मंजूर करण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक आयोगास वाटत नाही कारण धान पिकाच्‍या अपेक्षीत उत्‍पादना पेक्षा कमी आलेल्‍या पिकाची प्रचलित कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे बाजारभावाचे दरा प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे.  तक्रारकर्त्‍यास अपेक्षीत उत्‍पादना पेक्षा कमी आलेल्‍या धानाचे पिकाचे नुकसानीची भरपाई देण्‍यासाठी जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, नागपूर येथील प्रचीत दराचा आधार घेण्‍यात येते. कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, नागपूर मधील  तांदुळाचे दर सन-2018-2019 मध्‍ये सरासरी जास्‍तीत जास्‍त रुपये-4725/- आणि कमीतकमी रुपये-2750/- संगणकावर दर्शविलेले आहेत, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍यास  धान पिकाचा भाव प्रतीक्विंटल रुपये-3000/- एवढा दर मंजूर करण्‍यास कोणतीही अडचण नाही.

11.     तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाला मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीव्‍दारे निर्मित ईशान या धानाचे बियाणे 65 ते 70 टक्‍के भेसळयुक्‍त असल्‍यामुळे तक्रारदार शेतक-याचे प्रतीहेक्‍टरी 25 क्विंटल प्रमाणे उत्‍पादन कमी होणार आहे. त्‍याने वादातील ईशान बियाणे 1.76 हेक्‍टर आर  क्षेत्रात (1 हेक्‍टर म्‍हणजे अडीच एकर तसेच 40 आर म्‍हणजे एक एकर असे मोजमाप असल्‍याने तक्रारकर्त्‍याने  एकूण 04 एकर 16 आर एवढया क्षेत्रात बियाण्‍याची पेरणी केल्‍याचे दिसून येते)  पेरलेले असल्‍याने सरासरी अंदाजे 44.00 क्विंटल धानाचे उत्‍पादन कमी होऊन आर्थिक नुकसान झाल्‍याचे  नमुद आहे. धानाचा दर प्रतीक्विंटल 3000/- रुपये हिशोबात घेतल्‍यास तक्रारकर्त्‍याचे 1,32,000/- एवढे अपेक्षीत उत्‍पनाचे नुकसान झालेले आहे त्‍यामुळे तेवढी रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी कडून त्‍याला  मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्‍यास वेळेवर त्‍याचे पिकाचे झालेल्‍या नुकसानीची भरपाई न मिळाल्‍याने शेवटी प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावी लागली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे ईशान जातीचे धानाचे बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याची बाब तालुका तक्रार निवारण समितीचे अहवाला वरुन सिध्‍द झालेली असल्‍याने  त्‍याला  नाहक या प्रकरणात त्रास सहन करावा लागला त्‍यामुळे त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी कडून देण्‍याचे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत. विरुध्‍दपक्ष क्रं 2 हा बियाणे विक्रेता असून भेसळयुक्‍त बियाण्‍या संबधाने त्‍याची कोणतीही जबाबदारी येत नसल्‍याने त्‍याचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. अशाप्रकारे मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदविण्‍यात आल्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारी मध्‍ये  खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.

                                                                        :: अंतिम आदेश ::

 

  1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं-1 बियाणे निर्माता कंपनी आणि तिचे कार्यकारी संचालक यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1.  विरुध्‍दपक्ष क्रं-1 बियाणे निर्माता कंपनी व तिचे कार्यकारी संचालकांना आदेशित करण्‍यात येते की,  त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला पुरविलेल्‍या भेसळयुक्‍त धान पिकाचे बियाण्‍यामुळे झालेल्‍या नुकसान भरपाई दाखल रक्‍कम रुपये-1,32,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष बत्‍तीस हजार फक्‍त) आणि सदर रकमेवर  तक्रार दाखल दिनांक-16.01.2019 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्‍याज प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्‍याला दयावे.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं-1 बियाणे निर्माता कंपनी व तिचे कार्यकारी संचालकांना आदेशित करण्‍यात येते की त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-20,000/- (अक्षरी रुपये विस हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) अशा रकमा तक्रारकर्त्‍याला दयाव्‍यात.

 

(04)  विरुध्‍दपक्ष क्रं-2 बियाणे विक्रेत्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात    येते.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 बियाणे निर्माता कंपनी आणि तिचे कार्यकारी संचालक यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत कराव

 

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध     करुन देण्‍यात याव्‍यात.

 

(07)  उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्‍यात.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.