Maharashtra

Bhandara

CC/19/58

DIPAK RAMDASH THAWARE - Complainant(s)

Versus

KESHAV KHANAK SEED PVT.LTD - Opp.Party(s)

MR. B.S WANJARI

29 Jan 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/58
( Date of Filing : 02 May 2019 )
 
1. DIPAK RAMDASH THAWARE
WAHI TAH PAUNI
BHANDARA
MAHARSHTRA
...........Complainant(s)
Versus
1. KESHAV KHANAK SEED PVT.LTD
CORPORATE OFFICE AMGAON FULCHURE PETH
GONDIA
MAHARASHTRA
2. NARENDRA KRUSHI KENDRA
DR.AMBEDKAR CHOWK BAZAR ROAD PAUNI
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 Jan 2021
Final Order / Judgement

         (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी. योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                 (पारीत दिनांक–29  जानेवारी, 2021)

   

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1  व क्रं-2  अनुक्रमे बियाणे निर्माता कंपनी व बियाणे विक्रेता यांचे विरुध्‍द धानाचे भेसळयुक्‍त बियाण्‍या मुळे त्‍याचे झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍याची शेती मौजा लोहारा, तहसिल-पवनी, जिल्‍हा भंडारा येथे असून सदर शेतजमीनीचा गट क्रं-74, क्षेत्रफळ-आराजी 1.63 हेक्‍टर आर आहे. तक्रारकर्त्‍यास सन-2018-2019 च्‍या खरीप हंगामात भाताचे पिकाची लागवड करावयाची असल्‍याने त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्‍याशी संपर्क साधून उत्‍तम प्रतीचे धानाचे बियाणे देण्‍याची विनंती केली. विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 निर्मित बियाणे उत्‍तम प्रतीचे असल्‍या बाबत आश्‍वासन दिले. त्‍या अनुषंगाने तक्रारकर्त्‍याने बिल क्रं-241, दिनांक-21.06.2018 अनुसार ईशान बियाणे लॉट क्रं-721 एकूण वजन-20 किलोग्रॅम, दर प्रती 10 किलोग्रॅम रुपये-630/- प्रमाणे एकूण रुपये-1260/- एवढया किमतीत खरेदी केले व बिल प्राप्‍त केले. तसेच या व्‍यतिरिक्‍त त्‍याने बिल क्रं-316, दिनांक-30.06.2018 अनुसार ईशान बियाणे लॉट क्रं-721 एकूण वजन-20 किलोग्रॅम, दर प्रती 10 किलोग्रॅम रुपये-630/- प्रमाणे एकूण रुपये-1260/- एवढया किमतीत खरेदी केले व बिल प्राप्‍त केले बियाणे खरेदी नंतर त्‍याने वरील बियाण्‍याची लागवड त्‍याचे शेतात 0.80 हेक्‍टर आर एवढया क्षेत्रामध्‍ये दिनांक-26.06.2018 रोजी व दिनांक-30.06.2018 रोजी केली. विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्‍याने बियाण्‍याची विक्री करते वेळी असे सांगितले होते की, सदर पिकाचा उत्‍पादन कालावधी हा 120 ते 125 दिवस इतका आहे व त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या बियाण्‍याची लागवड केलेली असून शेतीची मशागत ट्रॅक्‍टर व मजूरांच्‍या सहाय्याने केली. तक्रारकर्त्‍याने जवळपास 2.00 एकर क्षेत्रात धानाची लागवड केली होती. प-हया करीता ट्रॅक्‍टर व मजूरीचा खर्च प्रतीएकर रुपये-2000/- प्रमाणे एकूण रुपये-4000/- त्‍याच बरोबर रोवणी करीता ट्रॅक्‍टर व मजूराचा खर्च एकरी रुपये-3000/- प्रमाणे एकूण रुपये-6000/- तसेच खत व औषधीचा खर्च एकरी रुपये-2000/- प्रमाणे एकूण रुपये-4000/- खर्च आला. रोवणी केल्‍या नंतर पिकाचे वाढी करीता निंदनाचा खर्च प्रतीएकर रुपये-2000/- प्रमाणे एकूण रुपये-4000/- आणि औषधे व खतां करीता एकरी रुपये-2000/- प्रमाणे एकूण रुपये-4000/- असा खर्च आला.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीचे शिफारसी प्रमाणे धान पिकाचा कालावधी हा 120 ते 125 दिवसांचा आहे. वर नमुद केल्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने देखभाल व खर्च केला असता ऑक्‍टोंबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात 90 ते 100 दिवस झाले असता धानाचे पिक 45 ते 50% कापणी करता लागले, त्‍याच वेळी 35 ते 40% प्रमाणामध्‍ये धानाची उगवण (निसवा) झालेला दिसून आला व त्‍यावेळी 20 ते 25% गर्भावस्‍थेत असल्‍याचे दिसून आले. तसेच निसवा झालेला धान व गर्भावस्‍थेत असलेला धान कापणीवर येण्‍यास बराच कालावधी आहे व त्‍यामुळे धानाची कापणी कशी करावी हा प्रश्‍न निर्माण झाला होता, म्‍हणजेच शेवटचे धान कापणीवर येई पर्यंत सुरुवातीचे परिपक्‍व झालेले व निसवा झालेले धान खाली गळून पडतील म्‍हणजेच 70 ते 80% उत्‍पन्‍न कोणत्‍याही कामात येणार नाही. यावरुन बियाण्‍या मध्‍ये एकाच प्रकारचे जातीचे वाण नसून वेगवेगळया प्रकारचे वाणाची भेसळ करुन  त्‍याची फसवणूक केलेली आहे हे लक्षात आल्‍याने त्‍याने  तालुका तक्रार निवारण समितीकडे दिनांक-29.10.2018 रोजी लेखी तक्रार सादर केली असता तालुका निवारण समितीचे सदस्‍यांनी दिनांक-02.11.2018 रोजी प्रत्‍यक्ष मोक्‍यावर भेट देऊन पिकाची पाहणी केली. सदर तालुका निवारण समितीमध्‍ये उपविभागीय अधिकारी श्री मिलींद आर.लाड, कृषी विद्दापिठाचे प्रतिनिधी शास्‍त्रज्ञ डॉ.यु.आर.डोंगरवार, महाबीज अकोला येथील प्रतिनिधी श्री एस.एस.पिल्‍लेवार, तालुका कृषी अधिकारी श्री ए.डी.गजभिये, कृषी अधिकारी पंचायत समिती पवनी येथील कार्यरत श्री संजय टी.लांजेवार अशा कृषी क्षेत्रतील उच्‍चशिक्षीत व तज्ञ लोकांचा समावेश होता. तालुका निवारण समितीचे प्रत्‍यक्ष मोका पाहणीचे वेळी तक्रारकर्ता स्‍वतः तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता उपस्थित होता परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी तर्फे कोणीही उपस्थित नव्‍हते. सदर समितीने प्रत्‍यक्ष मोका पाहणी करुन मोका तपासणी अहवालावर उपस्थितांनी स्‍वाक्ष-या केल्‍यात.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, तालुका तक्रार निवारण समितीने त्‍यांचा दिनांक-05.11.2018 रोजीचा तपासणी अहवाल त्‍याला पाठविला. सदर अहवालातील परिच्‍छेद क्रं-18 मध्‍ये तालुका स्‍तरीय तक्रार निवारण समितीने खालील प्रमाणे निष्‍कर्ष नोंदविला-

       तालुका स्‍तरीय तक्रार निवारण समितीने केलेल्‍या प्रत्‍यक्ष पाहणी नुसार 297 पैकी 111 फुटवे भेसळ आढळली. त्‍याची भेसळीची टक्‍केवारी ही 37.37% इतकी आढळली त्‍यामुळे भेसळीचे प्रमाण 37.37% इतके आढळले त्‍यामुळे सदर नुकसानीत विक्री दरात प्रस्‍तावित कमी दर मिळाल्‍यास संभावित नुकसान गृहीत धरण्‍यात येते.शेतक-याचे सरासरी 30 ते 40% नुकसान संभवू शकते असे नमुद केलेले आहे. त्‍याच बरोबर कृषी विभाग, पंचायत समिती पवनी यांनी तक्रारकर्त्‍यास पाठविलेल्‍या दिनांक-10.12.2018 रोजीचे पत्रात असे नमुद केलेले आहे की, या कार्यालया कडून कोणत्‍याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नसल्‍यामुळे आपण तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालाचे आधारे जिल्‍हा ग्राहक मंचाकडे दाद मागावी.  तक्रारकर्त्‍यास एकरी 25 क्विंटल प्रमाणे दोन एकरासाठी 50 क्विंटल अपेक्षीत उत्‍पादन होते त्‍यापैकी त्‍याचे सरासरी 70 टक्‍के धानाचे नुकसान झाल्‍याचे गृहीत धरल्‍यास  दोन  एकरासाठी एकूण 35 क्विंटल धानाचे नुकसान झालेले आहे म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षां विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे खालील मागण्‍या केल्‍यात-

  1. तक्रारकर्त्‍याचे प्रतीएकर 17.5 क्विंटल या प्रमाणे एकूण दोन एकर करीता 35 क्विंटल नुकसान झालेल्‍या धानाचे धान पिकास प्रतीक्विंटल सरासरी भाव रुपये-3000/- प्रमाणे एकूण धानाची नुकसानी एकूण रुपये-1,05,000/- या शिवाय त्‍याचे धान पिकाचे जवळपास 70 टक्‍के नुकसान झालेले असल्‍याने प-हया करीता ट्रॅक्‍टर व मजूरीचा आलेला खर्च एकूण रुपये-4000/- पैकी 70% रुपये-2800/-, खत व औषधीचा खर्च एकूण रुपये-4000/- पैकी 70% रुपये-2800/-, तसेच रोवणी करीता ट्रॅक्‍टर व मजूरीचा खर्च एकूण रुपये-6000/- पैकी 70% रुपये-4200/-, निंदना करीता मजूरांचा खर्च एकूण रुपये-4000/- पैकी 70% रुपये-2800/-, औषध व खता करीता खर्च एकूण रुपये-4000/- पैकी 70% रुपये-2800/- त्‍याच बरोबर बियाण्‍याचे खरेदीपोटी अदा केलेली रक्‍कम रुपये-1260/- व रुपये-1260/- एकूण रुपये-2520/- पैकी 70% रुपये-1764/- असे मिळून एकूण रुपये-1,22,164/- अपेक्षीत पिकाचे नुकसानी बद्दल विरुध्‍दपक्षांकडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  1. या शिवाय तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-25,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्षांकडून मिळावा आणि सदर संपूर्ण रकमांवर आदेशाचे तारखे पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो  द.सा.द.शे.-18 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचे आदेशित व्‍हावे. 

 

03.  जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे समोर प्रस्‍तुत तक्रार दिनांक-04.06.2019 रोजी दाखल झाल्‍या नंतर जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं-1 बियाणे निर्माता कंपनीला रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली असता पोस्‍टाचे लिफाफयावर सदर नोटीस “पार्टी घेण्‍यास इन्‍कार” या पोस्‍टाचे        शे-यासह जिल्‍हा आयोगाचे कार्यालयास परत आली असता जिल्‍हा ग्राहक आयोगाने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात दिनांक-04.07.2019 रोजी पारीत केला.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता हा जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर उपस्थित झाला व त्‍याने आपले लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍याने तक्रारकर्त्‍याला दिनांक-30.06.2018 रोजी इशान जातीचे धानाचे बियाणे विकत दिल्‍याचे  मान्‍य केलेले आहे. तसेच हे सुध्‍दा मान्‍य केले की, इशान जातीचे बियाणे 120 ते 125 दिवस एवढया कालावधीचे आहे. आपले विशेष कथना मध्‍ये असे नमुद केले की, त्‍याने सदर इशान धानाचे बियाण्‍याची विक्री अन्‍य शेतक-यांना सुध्‍दा केलेली आहे परंतु त्‍यांचे कडून एकही तक्रार सदर बियाण्‍या बद्दल आलेली नाही. त्‍याने तक्रारकर्त्‍यास त्‍याचे मागणी नुसार सिलबंद पॅकींग असलेल्‍या केशव खनक सिडस प्रायव्‍हेट लिमिटेड निर्मित इशान जातीच्‍या बियाण्‍याच्‍या बॅग विकलेल्‍या असून सदर बियाण्‍यां मध्‍ये भेसळ असल्‍याची बाब त्‍यांना कबुल नाही. तयाच बरोबर इशान जातीचे धानाचे बियाणे हे केशव खनक सिडस प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनीने निर्मित केलेले आहे. तो सब डिलर असून धानाचे बियाणे भेसळयुक्‍त निघाल्‍यास त्‍यासाठी त्‍याची जबाबदारी येत नाही. यामध्‍ये सर्वस्‍वी जबाबदारी ही विरुध्‍दपक्ष क्रं-1 बियाणे निर्माता कंपनीची असल्‍याने त्‍याला प्रस्‍तुत तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात यावे अशी विनंती केली. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या नुकसानीची भरपाई करुन देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीची असून त्‍याने तक्रारकर्त्‍याची कोणतीही फसवणूक केलेली नाही असे नमुद केले.

05.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रं-2 बियाणे विक्रेत्‍याचे उत्‍तर तसेच उभय पक्षां तर्फे दाखल केलेले साक्षी पुरावे ईत्‍यादीचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री एन.पी.मेश्राम यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला तसेच त्‍यांनी आपले युक्‍तीवादाचे समर्थनार्थ मा.सर्वोच्‍च न्‍यायालय आणि मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांचे तर्फे पारीत न्‍यायनिवाडयांवर आपली भिस्‍त ठेऊन सदरची तक्रार नुकसान भरपाईसह मंजूर करावी असा युक्‍तीवाद केला. प्रकरणातील अभिलेखांवर तसेच युक्‍तीवादा वरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रारीचे न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

  

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 2 विक्रेत्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 कंपनी निर्मित भेसळयुक्‍त धान बियाण्‍याची विक्री केली आहे काय ?

-होय-

 

 

2

भेसळयुक्‍त धान बियाण्‍यामुळे झालेल्‍या पिकाची नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे काय

-होय-

3

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

 

                                                                       :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

06.    तक्रारकर्त्‍याचे इशान जातीच्‍या धान पिकाचे भेसळीयुक्‍त बियाण्‍या संबधात केलेल्‍या तक्रारीचे अनुषंगाने तालुका स्‍तरीय तक्रार निवारण समितीच्‍या वतीने प्रत्‍यक्ष मोका पाहणीचे वेळी विरुध्‍दपक्ष क्रं-1 केशव खनक सिडस प्रायव्‍हेट लिमिटेड या धान बियाण्‍याचे निर्माता कंपनीस नोटीस देऊन उपस्थित राहण्‍यास सुचित केले होते परंतु  अशी नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं 1 प्रतयक्ष मोका पाहणीचे वेळी उपस्थित झाले नाही. तसेच प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल झाल्‍या नंतर जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस स्विकारण्‍यास नकार दिला व त्‍यांचा कोणताही लेखी जबाब जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केलेला नाही. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी विरुध्‍द केलेल्‍या आरोपांचे खंडन केलेले नाही त्‍यामुळे प्रथमदर्शनी तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील म्‍हणणे निर्विवाद ठरते. तसेच तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्‍या अहवाला नुसार तक्रारकर्त्‍यास 37.37% भेसळयुक्‍त इशान जातीच्‍या धानाचे बियाणे पुरविल्‍याचे नमुद आहे. सदर शासना मार्फत गठीत केलेल्‍या स‍मीती मध्‍ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍तींचा समावेश असून त्‍यांनी दिलेल्‍या अहवालावर अविश्‍वास दाखविण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही त्‍यामुळे समितीचे अहवाला वरुन तक्रारकर्त्‍यास इशान जातीचे धानाचे भेसळयुक्‍त बियाणे विक्री केल्‍याची बाब सिध्‍द होते करीता मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर आम्‍ही “होकारार्थी” नोंदवित आहोत.

07.  तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी तक्रारीतील युक्‍तीवादाचे समर्थनार्थ खालील नमुद मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे  व मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांवर आपली भिस्‍त ठेवली आहे-

 

  1.      Hon’ble Supreme Court of India-  H.N.S.Shastry- Verus-“Asstt. Director Agriculture” (2004 (4) Mh.L.J.- (Page No.-838 to 841) Civil Appeal No. 2253 of 1999 decided on 06-05-2004

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने असे नमुद केलेले आहे की, Under Section 14(1) of the Consumer Protection Act, 1986, if the District Forum is satisfied that the goods complained against suffer from any defect, it could grant reliefs which include return of the price of the paddy and also compensation to the consumer for any loss suffered. Granting of relief to the consumer does not depend upon whether he should have made alternative arrangement. In the present case, it was enough for the appellant to establish that the paddy seeds supplied by the respondent were defective.  

     आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेले इशान जातीचे धान बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा निष्‍कर्ष तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्‍ये नोंदविलेला असल्‍याने सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.

******

  1.     Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Indian Farmers Fertilizers Co-operative Ltd. -Verus-Vijay Kumar And Another” (2018)CJ 861 (N.C.)

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “If despite all efforts made by the farmer, there is no flower and foliage in as many as 60-70% of the plants, it is obvious that there was some adulteration in the seeds.  The team of the Agriculture Department also noted in this regard that there was a mixture of Gwar seeds shown to it. Therefore, there is no reason to discard the report prepared by the officers of the Agriculture Department”.

   सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद आहे की, शेतक-याने पिक लागवडीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्‍न केल्‍या नंतरही 60 ते 70 टक्‍के झाडांना फुले व बोंडे आलेले नाहीत आणि बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा अहवाल कृषी अधिकारी यांचे समीतीने दिलेला असून सदर अहवाल अमान्‍य करण्‍याचे कोणतेही प्रयोजन नाही.

         आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा वादातील इशान जातीचे धान बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा निष्‍कर्ष तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्‍ये नोंदविलेला असल्‍याने सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.

******

  1.      Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Avon Beej Company- -Verus-Anoop Singh And Others” (2020)CJ 954 (N.C.)

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “Report of the Agriculture Experts Committee wherein it has been found that 31% plants were of off-type due to which the Complainant suffered 29% loss of paddy crop and Off-type means any seed or plant not a part of the same variety and make include, seeds or plants of  other varieties. Further, it is established that the seeds were not pure. The report submitted by the team of Agriculture Experts was not discarded”.

आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा वादातील इशान जातीचे धान बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा निष्‍कर्ष तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्‍ये नोंदविलेला असल्‍याने सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.

******

मुद्दा क्रं 2 बाबत

08.  उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडयां वरुन तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्त्‍याने भेसळयुक्‍त इशान जातीचे धानाचे बियाण्‍यामुळे झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळण्‍या करीता तक्रार दाखल केलेली आहे परंतु सदर धान पिकाचे बाजार भावाचे दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत तसेच पिकाचे लागवडीसाठी आलेला खर्च जसे ट्रॅक्‍टर, मजूरी, निंदणी, पेरणी, रासायनिक औषधी व खते इत्‍यादीची बिले पुराव्‍या दाखल सादर केलेली नाहीत. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे तक्रारी मधून अपेक्षीत पिकाचे नुकसानी बाबत मागणी केलेली एकूण रक्‍कम रुपये- 1,22,164/- पैकी 50% एवढी नुकसान भरपाईची रक्‍कम त्‍याला मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्त्‍यास वेळेवर त्‍याचे पिकाचे झालेल्‍या नुकसानीची भरपाई न मिळाल्‍याने शेवटी प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावी लागली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे इशान जातीचे धानाचे बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याची बाब तालुका तक्रार निवारण समितीचे अहवाला वरुन सिध्‍द झालेली असल्‍याने  त्‍याला  नाहक या प्रकरणात त्रास सहन करावा लागला त्‍यामुळे त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी कडून देण्‍याचे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर “होकारर्थी” नोंदवित आहोत. विरुध्‍दपक्ष क्रं 2 हा बियाणे विक्रेता असून भेसळयुक्‍त बियाण्‍या संबधाने त्‍याची कोणतीही जबाबदारी येत नसल्‍याने त्‍याचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. अशाप्रकारे मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदविण्‍यात आल्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारी मध्‍ये  खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.

                                                               :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार  विरुध्‍दपक्ष क्रं-1 बियाणे निर्माता कंपनी आणि तिचा कार्यकारी संचालक यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2.  
  3. विरुध्‍दपक्ष क्रं-1 बियाणे निर्माता कंपनी व तिचे कार्यकारी संचालकास आदेशित करण्‍यात येते की,त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला पुरविलेल्‍या भेसळयुक्‍त धान पिकाचे बियाण्‍यामुळे झालेल्‍या नुकसान भरपाई दाखल रक्‍कम रुपये-61,082/- (अक्षरी रुपये एकसष्‍ठ हजार ब्‍याऐंशी फक्‍त) तसेच त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्‍हणून रुपये-20,000/- (अक्षरी रुपये विस हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) अशा रकमा आणि सदर आदेशित रकमांवर तक्रार दाखल दिनांक-02.05.2019 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्‍याला अदा कराव्‍यात. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी व तिचा कार्यकारी संचालक यांनी न केल्‍यास वर नमुद आदेशित रकमा तक्रार दाखल दिनांक-02.05.2019 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने दंडनीय व्‍याज यासह येणारी रक्‍कम तक्रारकर्त्‍याला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1  बियाणे निर्माता कंपनी व तिचा कार्यकारी संचालक जबाबदार राहिल.

(03)  विरुध्‍दपक्ष क्रं-2 बियाणे विक्रेत्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(04)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 बियाणे निर्माता कंपनी आणि तिचा संचालक यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

(05) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध       करुन देण्‍यात याव्‍यात.

(06)  उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांना-त्‍यांना परत करण्‍यात याव्‍यात.              

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.