Maharashtra

Nagpur

CC/113/2021

PRAKASH DATTATRAY KULKARNI - Complainant(s)

Versus

KESARI TOURS PVT. LTD. - Opp.Party(s)

ADV. P.A. MISHRIKOTKAR

21 Oct 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/113/2021
( Date of Filing : 09 Feb 2021 )
 
1. PRAKASH DATTATRAY KULKARNI
PLOT NO.10, AMALTAS APARTMENT, FLAT NO.302, SANGHARSH NAGAR, NEAR PIONEER TULIP, JAYTALA, NAGPUR-440036
NAGPUR
MAHARASHTRA
2. SAU. SUPRIYA PRAKASH KULKARNI
PLOT NO.10, AMALTAS APARTMENT, FLAT NO.302, SANGHARSH NAGAR, NEAR PIONEER TULIP, JAYTALA, NAGPUR-440036
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. KESARI TOURS PVT. LTD.
MILSTONE, 2ND FLOOR, 12, RAMDASPETH, NAGPUR-440012
NAGPUR
MAHARASHTRA
2. KESARI TOURS PVT. LTD.
314, L.J. ROAD, MAHIM, MUMBAI-440016
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. P.A. MISHRIKOTKAR, Advocate for the Complainant 1
 ADV. SATISH PRABHU, Advocate for the Opp. Party 1
Dated : 21 Oct 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी दि. 18.06.2020 ते 30.06.2020 या कालावधीकरिता परदेशात अमेरिका येथील पर्यटनाकरिता सहल (टूर) आयोजित केली होती व त्‍याकरिता प्रति व्‍यक्‍ती रुपये 2,92,404/- प्रमाणे तक्रारकर्त्‍याने 2 व्‍यक्‍तीकरिता एकूण रुपये 5,84,808/- धनादेश अन्‍वये जमा केले होते व त्‍याबाबतची विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला पावती दिली होती. त्‍यानंतर दि.24.03.2020 पासून संपूर्ण जगात/ देशात कोविड-19 या संसर्गजन्‍य रोगाची सुरुवात झाल्‍यामुळे अमेरिका तसेच अन्‍य जगामध्‍ये कमी-जास्‍त प्रमाणात फैलाव झाल्‍याच्‍या कारणाने सदर आयोजित करण्‍यात आलेल्‍या अमेरिका येथील टूरचा फेरविचार करण्‍याबाबत विरुध्‍द पक्षाला दि.28.03.2020 रोजी ई-मेल पाठविला होता. त्‍यावर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ई-मेल द्वारे कळविले की, सरकारने दिलेल्‍या निर्देशानुसार त्‍यांचे कार्यालय बंद केले असून सदर कार्यालय सुरु केल्‍यानंतर आपणास कळविण्‍यात येईल. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा दि.04.05.2020 रोजी ई-मेल द्वारे स्‍मरणपत्र पाठविले होते व विरुध्‍द पक्षाने पूर्वी प्रमाणेच तक्रारकर्त्‍याला ई-मेल पाठविला होता. दि.10.06.2020 ला विरुध्‍द पक्षाचे  पुणे येथील कॉल सेंटर मधून फोन आला व 7-8 दिवसात सदरच्‍या अमेरिका येथील टूर संबंधात विरुध्‍द पक्ष फोन करतील असे सांगितले. परंतु विरुध्‍द पक्षाकडून कोणताही दूरध्‍वनी प्राप्‍त न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 03.08.2020 ला ई-मेल द्वारे प्रतिक्षा करीत असल्‍याचे कळविले. तसेच तक्रारकर्त्‍याने दि. 27.08.2020 रोजी विरुध्‍द पक्षाला स्‍पीड पोस्‍टने  पत्र पाठवून कळविले की, भारत सरकारने दिलेल्‍या निर्देशानुसार  ज्‍येष्‍ठ नागरिकांनी प्रवास करु नये  व तक्रारकर्ते हे दोघे ही ज्‍येष्‍ठ नागरिक  असल्‍यामुळे सध्‍या स्थितीत 2 वर्षा पर्यंत त्‍यांची प्रवास करण्‍याची मनस्थिती व आर्थिक स्थिती नाही. तसेच विरुध्‍द पक्षाने दि. 18.06.2020 ते 30.06.2020 या कालावधीकरिता आयोजित केलेला टूर हा कोविड -19 या महामारीमुळे आपोआपच रद्द झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली रक्‍कम रुपये 5,84,808/- परत करावी. सदरचे पत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर देखील विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने आयोगा समक्ष तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी प्रत्‍येकी तक्रारकर्त्‍याला रुपये 2,92,404/- ही रक्‍कम दि. 04.01.2020 पासून द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह  परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून त्‍यात नमूद केले की,  तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍यात झालेला करार हा Corona Virus pandemic  परिस्थितीमुळे frustrated (विलंबित) झाला आणि त्‍यामुळे केंद्र सरकारने दि. 20 मार्च 2020 पासून व जगातील संपूर्ण शासन यांनी दि. 24.03.2020 पासून लॉक डाऊन घोषित केल्‍यामुळे तक्रारकर्ते व विरुध्‍द पक्ष यांच्‍यातील करार Force majeure clause अंतर्गत येतो. तक्रारकर्त्‍याने करारातील सर्व शर्ती व अटी वाचून बुकिंग फॉर्मवर सहया केल्‍या होत्‍या व त्‍या स्‍वीकारल्‍या होत्‍या. Corona Virus परिस्थिती Force majeure clause अंतर्गत मोडते. Clause 1 (iv) of terms and condition ) त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे टूर पोटी जमा केलेली रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पात्र नाही. वि.प. 1 चे प्रचलित सरावाप्रमाणे (पध्‍दतीनुसार) आंतरराष्‍ट्रीय गृप टूर आणि डोमॅस्‍टीक गृप टूर अंतर्गत ज्‍यामध्‍ये विमान / रेल्‍वे बुकिंग, एका जागेवरुन दुस-या ठिकाणी जाण्‍याची व्‍यवस्‍था, हॉटेल जेवण व्‍यवस्‍था, बाहेरील साईड सीन, इत्‍यादीचे नियोजन व बुकिंगचे नियोजन हे 9 महिने आधी करावे लागते व त्‍यापोटी अदा केलेली रक्‍कम परत मिळत नाही. टूर मध्‍ये भाग घेणा-यांना जास्‍त फायदा मिळण्‍याकरिता  Foreign Operators शी करार आगाऊ करण्‍यात येतो. विरुध्‍द पक्ष 1 यांनी विमान प्रवास, हॉटेल मध्‍ये राहण्‍याची व्‍यवस्‍था, आगाऊ रक्‍कम संबंधित सेवा पुरविणा-याकडे जमा करुन केली होती.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 यांनी मार्च 2020 पासून Pandemic स्थितीबाबत monthly travel note निर्गमित केली व त्‍यामध्‍ये जो पर्यंत देशभर असलेल्‍या महामारीच्‍या (Pandemic) स्थितीत सुधारणा होत नाही, तो पर्यंत टूर अरेंज करण्‍याबाबत असमर्थता दर्शविली व याबाबत संबंधित टूर मध्‍ये येणा-या सर्व टूर धारकांना टेक्‍स मॅसेज द्वारे अवगत करण्‍यात आले होते. विरुध्‍द पक्ष 1 यांनी credit shell facility सर्व टूर धारकांसमोर ठेवली विरुध्‍द पक्ष 1 यांनी विदेशी वेन्‍डरला विमान प्रवास, हॉटेल, स्‍थानिक प्रवास, व्‍यवसाय करणारे यांना काही रक्‍कम आगाऊ दिली व ती त्‍यांनी परत करण्‍यास असमर्थता दर्शविल्‍यामुळे credit shell ची ऑफर देण्‍यात आली व सदर ऑफर दि. 31.12.2024 पर्यंत वाढविण्‍यात आली. credit shell  पॉलिसीनुसार सदर टूर पोटी जमा केलेली रक्‍कम पुढील रिशेडयुल कार्यक्रमामध्‍ये अॅडजस्‍ट करणार होते. सदर credit shell पॉलिसीला काही गृप टूर भागधारकांनी सहमती दर्शविली. टूर भागधारकांचा इन्‍टरेस्‍ट बघता पॅन्‍डमिक बघता विरुध्‍द पक्ष 1 यांनी गृप टूर धारकांना खालीलप्रमाणे सुजाव / ऑफर दिली आहे.

F (i) Initially, the tenure of the credit shell certificate was upto January 2021. Whereas, keeping in mind the continuance of pandemic situation, The O.P. No. 1 extended the credit shell facility to its participants up to December 2024.

F (ii) The second option is given to the participants to transfer the credit shell facility to person/s of his/her their choice.

F (iii) Third option given is to utilize the proceeds of the credit shell certificates of the international tours for domestic users with permissions to transfer the benefits of said the credit shell facility to person/s of his/her their choice.

F (iv) The Fourth option is to en-cash 40% amount of the credit shell certificate and to uti9lize 60% amount for any international or domestic tours in future unto December 2024.

F(v) The last option offered to the tour participants was to accept the 65% cash refund thereby allowing the op no. 1 to appropriate 35% of the total Tour Cost deposited with them by the participants towards administrative expenses and other expenses incurred towards making arrangement for the tour etc. Viz. Advances paid to the various airlines, and overseas and domestic suppliers. I state and submit that the Opp. Party No. 1 is constrained to deduct 35% in case of demand for refund on the strength of the actual expenses incurred by the Opp. Party No. 1

      

  1.      देशभर असलेली महामारी (pandemic) परिस्थिती ही विरुध्‍द पक्षाचे प्रत्‍यक्ष अथवा अप्रत्‍यक्षपणे नियंत्रणात नाही. शासनाचे निर्बंधामुळे विरुध्‍द पक्ष टूर काढू शकला नाही. करोना व्‍हायरस पॅन्‍डमिक फॉर मेजर अंतर्गत येत असल्‍यामुळे  कलम 1 (i) (iv)  प्रमाणे अट क्रं. 8 ( i) ( ii) अन्‍वये विरुध्‍द पक्षाने सर्व टूर रिशेडयुल करुन तक्रारकर्त्‍याला क्रेडिट शेल सर्टिफिकेट दिले आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला  त्‍याच्‍या मागणीनुसार रक्‍कम परत करण्‍यास जबाबदार नाही. याकरिता विरुध्‍द पक्षाने  मा. राष्‍ट्रीय आयोगाने सतीशचंद्र वसंतराव अग्रवाल वि. मे. केसरी टूर्स प्रा.लि.  यांनी रिव्‍हीजन पिटीशन दि. 04.07.2018 ला दिलेल्‍या न्‍यायनिवाडयाचा आधार घेतलेला आहे.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले आणि त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविली.
  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा  दिली काय ? होय
  3. काय आदेश ?                                    अंतिम आदेशानुसार 

 

  • निष्‍कर्ष 

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 18.06.2020 ते 30.06.2020 या कालावधीकरिता आयोजित केलेल्‍या अमेरिका येथील पर्यटनाकरिता रुपये 5,84,808/- अदा केले होते हे नि.क्रं. 2 (5, 6, 7 ) वर दाखल पावत्‍यावरुन दिसून येते, यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. केंद्र सरकार यांनी दि. 24 मार्च 2020 च्‍या आदेशानुसार कोविड-19 epidemic साथीचा प्रादुर्भाव रोखण्‍याकरिता संपूर्ण भारतात लॉक डाऊन घोषित केले होते. तसेच संपूर्ण जगात संबंधित देशाने लॉकडाऊन जाहीर केल्‍यामुळे तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍यामधील दि. 18.06.2020 ते 30.06.2020 या कालावधीत अमेरिका टूर बाबतचा करार अंमलात येऊ शकला नाही.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने परदेशात पर्यटकांना पुरविण्‍यात येणा-या सेवांकरिता उदा. रेल्‍वे /विमान,  हॉटेल, स्‍थानिक प्रवास व्‍यवस्‍थाच्‍या बुकिंग पोटी आगाऊ रक्‍कम अदा केली असल्‍याबाबतचा कोणताही पुरावा आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ दाखल केलेला नाही.

 

  1.      तक्रारकर्ता क्रं. 1 व 2 हे ज्‍येष्‍ठ नागरिक असल्‍यामुळे त्‍यांनी भविष्‍यात सदरच्‍या टूरला जाण्‍यास असमर्थता असल्‍याबाबतचा दि.28.03.2020 रोजी ई-मेल पाठविला होता. तसेच दिनांक 27.08.2020 ला पत्र पाठवून विरुध्‍द पक्षाकडे टूर पोटी जमा केलेली रक्‍कम रुपये 5,84,808/- परत मिळण्‍याची विनंती केली होती, हे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे टूर पोटी जमा केलेली रक्‍कमेची मागणी करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची रक्‍कम  परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी दर्शविते असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून टूर पोटी जमा केलेली रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र आहे.

 

     सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी  वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याने टूर पोटी जमा केलेली रक्‍कम रुपये 5,84,808/- व त्‍यावर दिनांक 04.01.2020 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.  

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000 व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.   

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.

 

  1. तक्रारकर्त्याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.                   
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.