नि.21 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 43/2010 नोंदणी तारीख – 10/2/2010 निकाल तारीख – 2/11/2010 निकाल कालावधी – 262 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री बजरंग राजाराम भिलारे रा.ल्हासुर्णे, ता.कोरेगाव जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री अमरसिंह भोसले) विरुध्द 1. कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कोरेगाव करिता प्रशासकीय अधिकारी श्री दिलीप पवार रा. सहायक निबंधक सह.संस्था, कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा 2. श्री श्रीकांत रामनारायण मर्दा, (चेअरमन) कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कोरेगाव रा. कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री पुरुषोत्तम बारसावडे) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत बचत खाते असून सदरचे खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहे. अर्जदार यांनी सदर रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम रु.20,000/- पैकी रु.10,000/- परत केले परंत उर्वरीत रक्कम परत दिली नाही. सबब बचत खात्यातील रक्कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतकामी नि.19 कडे म्हणणे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. प्रस्तुतच्या तक्रारअर्जापूर्वी अर्जदार यांनी सहकारी संस्थेस नोटीस देणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी रक्कम मागणेपूर्वी विथड्रॉवल स्लीप भरुन देणे आवश्यक असते तशी स्लीप अर्जदार यांनी भरुन दिली नाही. तशी स्लीप भरुन दिल्यास जाबदार रक्कम देणेस तयार आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांचे कथन आहे. 3. अर्जदार व जाबदार यांचे विधित्यांचा युक्तिवाद ऐकला तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. जाबदार यांनी नि.19 कडे म्हणणे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. तसेच अर्जदार संस्थेचे सभासद असलेने सदर तक्रार मे.मंचात कायद्याने चालू शकत नाही असे कथन केले आहे. निर्विवादीतपणे अर्जदार जाबदार संस्थेचे सभासद असले तरी ठेवीदार या नात्याने संस्थेचे ग्राहक आहेत. सबब अर्जदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक-मालक नाते असलेने सदर तक्रार मंचात चालणेस पात्र आहे. तसेच अर्जदार यांनी जाबदार संस्थेकडे कधीही withdrawal slip भरुन त्यावरती सही करुन दिली नाही व खात्यावरती संबंधीत स्लीपमध्ये नमूद केलेली रक्कम शिल्लक असल्यास ती देणे संस्थेवर बंधनकारक आहे. सबब अर्जदार कधीच withdrawal slip भरुन रकमेची मागणी करणेस आले नव्हते असे जाबदार कथन करतात. परंतु सदर जाबदारचे कथन विश्वासार्ह वाटत नाही कारण नि.5/1 कडे अर्जदारने तडजोडपत्र दाखल केले आहे त्यावरुन अर्जदारचे ठेवपावतीची रक्कम रु.20,000/- जाबदारने संपूर्ण न देता रु.10,000/- दिली व रु.10,000/- सेव्हिंग्ज मध्ये ठेवली व सप्टेंबर अखेर पर्यंत देण्याचे मान्य केले आहे व सदर रक्कम मिळणेसाठी मे.सहायक निबंधक कोरेगाव यांचेकडे अर्जदार यास तक्रार अर्ज करावा लागलेला दिसत आहे. तडजोड पत्रानुसार सप्टेंबर 2008 अखेर वादातील रक्कम रु.10,000/- अर्जदारास देणे जाबदारवरती बंधनकारक होते परंतु आजअखेर जाबदारने रक्कम दिली नाही व अर्जदारच आले नाहीत असे दाखवणेचा जाबदारने प्रयत्न केला आहे हे पटण्यासारखे नाही. सबब जाबदारचे म्हणणेमध्ये तथ्य दिसून येत नाही. 5. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.5 सोबत नि.6 कडे बचत खात्याचे पासबुक दाखल केले आहे. सदरचे बचत खात्याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्या खात्यामध्येही रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि.5/1 कडील अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेले पत्र पाहिले असता अर्जदार यांनी बचत खात्यातील रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी मागणी करुनही जाबदार यांनी सदरची रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 5 सोबतच्या नि.6 कडील बचत खात्यातील शिल्लक रक्कम व्याजासहित द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 6. जाबदार क्र. 1 हे प्रशासकीय अधिकारी असून संस्थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र. 1 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्थेसाठी त्यांना रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र. 2 यांना स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 1 यांना अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 2 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र.1 यांनी अर्जदार यांना त्यांचे बचत खाते क्र. 1348 कडील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.1/11/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |