Maharashtra

Nagpur

CC/177/2017

Shri Prashant Shankarrao Jadhav - Complainant(s)

Versus

Kaya Land Developers (Buddha Nagar) Through Shri Mohan Tulsiramji Motghare - Opp.Party(s)

Adv. A.D.Bagade

19 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/177/2017
( Date of Filing : 30 Mar 2017 )
 
1. Shri Prashant Shankarrao Jadhav
R/o. c/o. Ganpatrao Thakare, Plot No. 76, Ulhas Nagar, Manewada Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Kaya Land Developers (Buddha Nagar) Through Shri Mohan Tulsiramji Motghare
Office- Mayur Palace, Teka Naka, Nari Road, Nagpur 440026
Nagpur
Maharashtra
2. Shri Mohan Tulsiramji Motghare, Prop. Kaya Land Developers (Buddha Nagari)
R/o. Plot No. 441, Kapil Nagar, Nari Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 19 Dec 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- एस. आर. आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन मौजा सावली, पटवारी हलका नंबर ०१, खसरा नंबर १५७/१, प्‍लॉट नंबर २८, २९, एकूण क्षेञफळ १५३२ चौ. फुट, एकूण रुपये ९१,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षासी १०० रुपयाचे स्‍टॅम्‍प पेपरवर  दिनांक १६/०७/२०१४ रोजी केला. करारानूसार तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट चे खरेदी पोटी बयाणा रक्‍कम रुपये १०,०००/- विरुध्‍द पक्षाला दिनांक १४/७/२०१४ रोजी अदा केली व उर्वरीत रक्‍कम ८१,९२०/- हप्‍त्‍याने दिनांक १६/७/२०१४ ते दिनांक १५/७/२०१६ या कालावधीत विरुध्‍द पक्षाला अदा करावयाची होती. कराराणूसार तक्रारकर्त्‍याने संपूर्ण रक्‍कम ९१,४००/- विरुध्‍द पक्षाकडे जमा केली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट चे विक्रीबाबत विचारणा केली असता विरुध्‍द पक्षाने प्‍लॉट चे‍ विक्री नोंदणीपोटी रुपये २५,०००/- ची मागणी केली. विरुध्‍द पक्षाचे मागणीप्रमाणे तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट चे विक्री नोंदणीपोटी विरुध्‍द पक्षाला रुपये २५,०००/- अदा केले, परंतू विरुध्‍द पक्षाने रुपये २५,०००/- मिळाल्‍याची पावती तक्रारकर्त्‍याला दिली नाही.
  3. तक्रारकर्त्‍याने वादातील प्‍लॉट नंबर २८ व २९ चे संदर्भात विरुध्‍द पक्षाला सातबारा, पटवारी नकाशा, लेआऊट नकाशा व इतर दस्‍तावेज मागीतले असता विरुध्‍द पक्षाने दस्‍तावेज देण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक १/२/२०१७ ला वकीलामार्फत विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली व ती नोटीस विरुध्‍द पक्षाने स्विकारली नाही. सदरची नोटीस लेफ्ट शे-यासह दिनांक २/२/२०१७ ला परत आली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, त्‍याने प्‍लॉट विक्रीपोटी मासीक  किस्‍तीद्वारे स्विकारलेली रक्‍कम रुपये ९१,४००/- तसेच प्‍लॉट विक्री नोंदणीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये २५,०००/- दिनांक १३/६/२०१६ पासुन द.सा.द.शे. २४ टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेशीत करावे.
  2. मानसिक व शारीरीक ञासाकरीता २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- देण्‍यात यावा.
  1. तक्रारकर्त्‍याला मा. मंचामार्फत नोटीस पाठवूनही तक्रारकर्ता मंचात हजर झाला नाही तसेच स्‍थानीक दैनिक भास्‍कर वर्तमान पञातुन जाहीर नोटीस काढुनही ते मंचात हजर झाले नाही. करीता मा. मंचाने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द दिनांक ९/१०/२०१९ ला एकतर्फी आदेश पारीत केला.
  2. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवज तसेच तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहे.

         अ.क्र.                             मुद्दे                                                            उत्‍तर

I.      तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                होय

II.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

                   दिली काय ?                                                                          होय

III.   काय आदेश ?                                                           अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन मौजा सावली, पटवारी हलका नंबर ०१, खसरा नंबर १५७/१, प्‍लॉट नंबर २८, २९, एकूण क्षेञफळ १५३२ चौ. फुट, एकूण रुपये ९१,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी १०० रुपयाचे स्‍टॅम्‍प पेपवर वर दिनांक १६/०७/२०१४ रोजी केला. करारानूसार तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट चे खरेदी पोटी बयाणा रक्‍कम रुपये १०,०००/- विरुध्‍द पक्षाला दिनांक १४/७/२०१४ रोजी अदा केली व उर्वरीत रक्‍कम ८१,९२०/- हप्‍त्‍याने दिनांक १६/७/२०१४ ते दिनांक १५/७/२०१६ या कालावधीत विरुध्‍द पक्षाला अदा करावयाची होती. करारानुसार तक्रारकर्त्‍याने संपूर्ण रक्‍कम ९१,४००/- विरुध्‍द पक्षाकडे जमा केली. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.
  2. विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याकडुन वादातील प्‍लॉट नंबर २८ व २९  विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम रुपये ९१,४००/- स्विकारुनही तसेच प्‍लॉट चे विक्रीनोंदणी पोटी रुपये २५,०००/- तक्रारकर्त्‍याकडुन स्विकारुनही तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट चे विक्री नोंदणी करुन दिली नाही. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍यापोटी दोषपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे. मंचामार्फत विरुध्‍द पक्षाला स्‍थानिक वर्तमान पञातुन जाहीर नोटीस पाठवुनही तक्रारकर्ता मंचात हजर झाले नाही व आपल्‍या बचावार्थ जबाब सादर केला नाही. करीता तक्रारकर्त्‍याची प्‍लॉट खरेदीपोटी दिलेली रक्‍कम तसेच प्‍लॉट विक्रीनोंदणी पोटी दिलेली रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍याची मागणी मंजूर करण्‍यात येत आहे. व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला आदेशीत करण्‍यात येते की, त्‍याने तक्रारकर्त्‍याकडुन वादातील प्‍लॉट विक्रीपोटी  स्विकारलेली रक्‍कम रुपये ९१,४००/- तसेच प्‍लॉट चे विक्रीनोंदणी पोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये २५,०००/- असे एकूण रुपये १,१६,४००/- या रकमेवर यावर दिनांक १३/०६/२०१६ पासुन द.सा.द.शे. १४ टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.
  3. तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/-  अदा करावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.