::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हे सेवानिवृत्त झालेले असून मौजे रोजे शिवाजीनगर पाखरसांगवी येथील रहिवाशी आहे. तक्रारदाराच्या अर्जावरुन गैरअर्जदाराने विदयुत जोडणी केली. त्या संदर्भात एण्ड पोल पासुन विदयुत जोडणीसाठीचे ठिकाण जास्त असल्यामुळे अतिरिक्त एण्ड पोल घेवुन विदयुत जोडणी करावी लागेल व अतिरिक्त सर्व्हीस वायर 100 फुट घ्यावे लागेल, त्यामुळे रक्कम अतिरिक्त एण्डपोल व अतिरिक्त 100 फुट सर्व्हीस वायर याचे मिळुन रु्. 4400/- ही रक्कम दि. 10.04.2011 रोजी तक्रारदाराने म.रा.वि.वि.कंपनी लातूर यांच्याकडे भरली होती. परंतु सदरील विदयुत जोडणी करतेवेळी विदयुत खांब व सर्व्हीस वायर उपलब्ध नसल्यामुळे शाखा अभियंता गंगापुर यांनी सांगीतले की, सध्या एण्डपोल व सर्व्हीस वायर उपलब्ध नाही. उपलब्ध झाल्यावर देवु असे सांगुन तात्पुरते दुस-याच्या प्लॉटमधुन बेकायदेशिररित्या जोडणी करुन दिली. सामनेवाला यांनी सन 2001 साली तक्रारदाराच्या घरी विदयुत जोडणी केली परंतु आजपर्यंत संबंधीत विभागाकडून एण्ड पोल अतिरिक्त सर्व्हीस वायर उपलब्ध करुन दिलेले नाही. सदरची विदयुत जोडणी ही बेकायदेशिररित्या दुस-याच्या प्लॉटमधुन दिलेले असल्यामुळे संबंधीत प्लॉट मालकास बांधकाम करावयाचे असल्याने त्याने विदयुत जोडणी काढुन घेण्यासाठी तगादा लावला आहे, त्यामुळे अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदाराला सांगुनही गैरअर्जदाराने एण्ड पोल लावुन दिलेला नाही, म्हणुन गैरअर्जदार क्र. 1व 2 यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केलेली आहे. सामनेवाला यांनी अर्जदारास अतिरिक्त एण्डपोल व अतिरिक्त सर्व्हीस वायर तात्काळ पुरवण्याचे आदेश व्हावा, तसेच अर्जदारास 12 वर्षात झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3,00,000/- व तक्रारीच्या अर्जाच्या खर्चापोटी रु. 6000/- देण्याचा आदेश व्हावा.
गैरअर्जदार हा दि. 25.07.2009 रोजी हजर झालेला आहे असे त्याचे वकीलपत्रावर तारीख टाकलेली आहे, त्याच्या विरुध्द नो से दि. 27.05.2013 ला झालेला आहे.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदार हा खेाटे बोलत असूनत्याचे तक्रारीतील म्हणणे काही अंशीसत्य व काही अंशी असत्य असे आहे. तसेच अर्जदाराने रु. 4400/- भरले होते. परंतु म.रा. वि.वि.कंपनीच्या नियम व अधिकारानुसार सदर केसमध्ये 100 फुट वायर देता आलेे नाही. या उलट अर्जदार हा त्याच्या घरापासुन असलेल्या 50 फुट अंतरावरील नवीन पोलला वीज जोडणी करु देत नाही त्यांच्या अधिका-यांच्या कामात व्यत्यय आणत आहे. तसेच त्याचा एण्ड पोलचे जोडणी ही खाजगी प्लॉट मध्ये करावयास म्हणत आहे. जे बेकायदेशिर आहे. तसेच अर्जदाराच्या शेजा-याने कधीही वीज जोडणी तोडण्या संदर्भात अर्जदारास बोललेला नाही. तशीच अशी लेखी तक्रारही दाखल नाही. तसेच सदर केसमध्ये केवह दि. 23.01.2012 व 13.04.2012 रोजी कारण घडवुन आणण्यासाठी अर्ज दिलेला आहे व तसेच एण्डपोल जुना व नवा हे दोन्ही अर्जदाराचे सर्व्हीस वायर जोडलेले ते सरकारी रस्त्यालगत असल्यामुळे तो काणाच्याही खाजगी प्लॉटमध्ये नाहीत, म्हणुन सदर केस मध्ये अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब गैरअर्जदारास देखील मान्य आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वारंवार सदर पोल बसवण्यासाठी तगादा लावला होता, व त्यासाठी रु. 4400/- तसेच 100 फुट सर्व्हीस वायरसाठी भरलेले होते. अर्जदाराने लाईटची डिमांड 2001 मध्ये C.R.A. 500/- SA III 600/- तसेच SLC 190/- 1 Phase meter cost 1000/- असे भरले होते. तसेच जास्तीच्या वायरसाठी रु. 50/- प्रति मिटर व एण्डपोलसाठी रु. 1000/- भरलेले होते. तसेच फोटो 6 कॉपीज काढलेल्या आहेत. त्यांनी घराच्या भागातील फोटो दाखल केलेले आहेत, त्यावरुन स्पष्ट दिसते आहे की, अर्जदाराचे एकमेव घर त्यावेळी होते, आजुबाजुला साधी घरं दिसत आहेत. तसेच एकच पोल दिसत असून तो रोडवर व बिल्डींगच्या जवळ असे दोन पोल दिसून येत आहेत. सदरचा पोल हा सरकारी रस्त्यावरुन गेलेला दिसून येतो. अर्जदाराचे घर व बाजुचे घरात साधारणत: 20 ते 30 फुटाचे अंतर दिसत आहे. त्यामुळे अर्जदाराच्या आजुबाजुला घर नवीन बांधुन होत असल्यामुळे अर्जदारास वीज जोडणी तोडण्यासाठी कुणी ही म्हणणार नाही, त्यावेळी याची गरज असावी सध्या एका घरामागुन एक घराचे बांधकाम होताना दिसत आहे, म्हणुन अर्जदारास तयावेळी त्रास झाला असावा, आता तसा त्रास दिसून येत नाही. तरीही सुध्दा अर्जदाराचा अर्ज अंशत: मंजुर करण्यात येत आहे. अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अतिरिक्त एण्डपोल व अतिरिक्त सर्व्हीस वायर तात्काळ पुरवण्यात यावे. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 2000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- देण्यात येतो.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास अतिरिक्त एण्डपोल व अतिरिक्त सर्व्हीस वायर तात्काळ पुरविण्यात यावे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 2000/-, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.