सदर प्रकरण मंचासमक्ष युक्तिवादाकरिता आले असता त.क. यांनी केलेले कथन, युक्तिवाद व दाखल केलेले दस्ताऐवज इत्यांदीचे अवलोकन केले असतामंच खालील निष्कर्षा प्रत पोहचले.
-: कारणे व निष्कर्ष :-
07 तक्रारकर्ता हा शेतकरी असून वि.प. यांना ऊस विकत होता व त्याबाबत त.क. यांना मोबदला मिळत होता. त्या मोबदल्यातील जमा रक्कम रुपये 2584/-हे वि.प. यांच्याकडे मुदत ठेव म्हणून जमा होते, ही बाब त.क. यांनी दाखल केलेल्या निशाणी क्रं. 4 दस्ताऐवज क्रं. 1 (मुदत ठेव पासबुक) वरुन स्पष्ट होते. यावरुन त.क.ची मुदत ठेव ही वि.प.यांच्याकडे जमा असल्याची बाब स्पष्ट होते. त्यामुळे त.क. हा विरुध्द पक्षाचा ग्राहक ठरतो. कारण त.क.चा शेती हा व्यवसाय असून तो त्याच्या उदरनिर्वाहाकरिता शेती करतो व त्यातून तो आपल्या कुटुंबाचे निर्वाह करतो. तसेच मुदत ठेव म्हणून रक्कम स्विकारुन त्यावर व्याज देण्याचे वि.प. यांनी मान्य केले ही सेवा आहे. त्यामुळे त.क. हा वि.प. यांचा ग्राहक ठरतो.
08 सदर प्रकरणामध्ये त.क. यांनी तक्रार दाखल केल्यानंतर वि.प. यांना मंचाने दोन वेळा नोटीस पाठविली असता वि.प. यांनी ती घेण्यास नकार दिल्याचे प्रकरणातील दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. त्यामुळे मंचाने दि. 23.01.2014 रोजी वि.प. यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला.
09 त.क. यांनी सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली आहे. त्याची विरुध्द पक्ष यांच्याकडे जमा असलेली रक्कम रुपये 2,584/- व त्यावर 16% दराने व्याज देण्यात येईल ही बाब सुध्दा त.क. यांनी दाखल केलेल्या नि.क्रं. 4 वरुन स्पष्ट होते. तसेच सदर प्रकरणातील नोटीस मिळून ही वि.प. हे मंचासमक्ष उपस्थित राहण्याबाबत कोणतीही तसदी घेतली नाही. त्यामुळे प्रकरणातील त.क. चे कथन ग्राहय धरण्यात येते.
मुदती ठेवीचे पासबुक नि.क्रं. 4 दस्ताऐवज क्रं. 1 वरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ते यांना वि.प.यांनी जमा रक्कम व त्यावरील व्याज असे एकूण रु.9,299/- देणे लागते व त्याकरिता त.क. पात्र आहे.
10 प्रकरणातील कथन व दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ता हा रुपये 9,299/- मिळण्यास पात्र ठरतो. सदर रक्कम विरुध्द पक्ष यांनी आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसात त.क. यांना द्यावी. अन्यथा सदर रक्कमेवर 16% दराने व्याज प्रत्यक्ष रक्कम त.क.यांना प्राप्त होईपर्यंत व्याजसह रक्कम देण्यास वि.प. जबाबदार राहील.
11 तक्रारकर्ता यांनी शारीरिक, मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 7000/- ची मागणी केली आहे. सदर मागणी ही अवाजवी वाटत असल्यामुळे व तक्रारीतील मुळ मुद्याचा विचार करता त.क. हा रुपये 2,000/- मिळविण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रुपये 9,299/- आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावी. अन्यथा त्यानंतर सदर रक्कमेवर 16% दराने व्याज प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत व्याजसह देय राहील.
3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक, मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आंत द्यावे.
4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून
जाव्यात.
5) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.