जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 161/2012 तक्रार दाखल तारीख – 08/11/2012
निकाल तारीख - 17/03/2015
कालावधी - 02 वर्ष , 04 म. 09 दिवस.
महादेव पिता सदाशिवराव इडेकर,
वय – 50 वर्षे, धंदा – शेती,
रा. बोरवटी, ता. जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी. लि.,
कार्यालय, साळे गल्ली,
लातुर.
2) कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी. लि.,
विभागीय कार्यालय, कोळपा,
ता. जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. बी.पी.माने.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. के.जी.साखरे.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा मौजे बोरवटी ता. जि. लातुर येथील रहिवाशी आहे. त्याला त्याच्या मालकी व कब्जेची बोरवटी येथे जमीन गट नं. 141 मध्ये 6 एकर एवढी शेतजमीन आहे. सदरच्या शेत जमीनी मध्ये विदयुत कनेक्शन घेतलेले आहे. ज्याचा ग्राहक क्र. 610650028182 आहे, मीटर क्र. 65018766867 हा आहे. अर्जदार हा शेती करुन स्वत:ची उपजिवीका करतो. अर्जदाराचे शेतात मौजे बोरवटी येथे गट क्र. 141 मध्ये तीन एकर शेतात ऊसाचे पीक आहे. अर्जदाराचे शेतात गट क्र. 141 मध्ये डी.पी आहे. दि. 06/11/2011 रोजी त्याच्या शेत जमीनी मध्ये दुपारी 12 च्या सुमारास गेला असता शेतातील डि. पी मध्ये शॉटसर्कीट होऊन ऊसाच्या पिकावर सदरच्या आगीच्या ठिणग्या पडून आग लागली. सदरच्या आगीमध्ये अर्जदाराच्या शेतातील ऊसाला आग लागून अर्जदाराच्या शेतातील तीन एकर ऊसाचे पीक जळून गेले आहे. त्यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. अर्जदाराच्या शेतात दि. 06/11/2011 रोजी झालेल्या घटनेमुळे रु. 4,00,000/- नुकसान झाले आहे. त्याचा ग्रामीण पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा नोंद झाला असून, पंचनामाही करण्यात आलेला आहे. सदरच्या घटनेची माहिती गैरअर्जदार क्र. 2 यांना दिली आहे. त्याचा मोबाईल नं 9960679042 असा आहे. ज्यावरुन माहिती त्यांना व संबंधित कर्मचा-याला देण्यात आलेली आहे. सदरच्या घटनेची माहिती तहसीलदार लातुर यांना दिली. तहसीलदारानी तलाठयामार्फत पाहणी करुन पंचनामा केला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी संबंधीत घटनेची माहिती घेतली नाही. व पंचनामाही केला नाही. व त्याबाबत कोणास कार्यालयातील कर्मचा-याला पाठवले नाही. दि. 14/11/2011 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे अर्जदार स्वत: जावून ऊस जळाल्याचे स्वत: गैरअर्जदार क्र. 2 यांना सांगितलेले आहे. सदरचा डि. पी हा नांदगाव रस्त्यावर घेण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी त्रुटी केलेली आहे. म्हणून गैरअर्जदाराने रु. 1,47,000/- द.सा.द.शे 12 टक्के व्याज दयावे. तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 20,000/- व दाव्याचा खर्च रु. 5,000/- देण्यात यावा.
सदरचा जळालेला ऊस हा विकास सहकारी साखर कारखाना लि., वैशाली नगर निवळी येथे घातला आहे. तो 200 टन उतारा आलेला आहे. त्याचा प्रति टन भाव रु. 2100/- हा आहे. गेल्या वर्षी सदरच्या शेतातुन रु. 4,20,000/- उत्पन्न मिळाले होते. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 1,47,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या म्हणण्यानुसार अर्जदार हा त्याचा ग्राहक नाही. त्याचे वडील सदाशिव संतराम इडेकर असे आहे. त्याचे निधन दि. 28/09/2003 रोजी झालेले आहे. त्यामुळे तेव्हापासुन आजपर्यंत अर्जदाराने आपले नाव सदरच्या मीटरवर लावलेले नाही. तसेच सदर केसची तक्रार गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मिळालेली नाही. गट क्र. 141 मध्ये 6 एकर ऊसास मौजे बोरवटी येथे शॉटसर्कीटमुळे ऊस जळाला याची कल्पनाही नाही. त्यामुळे तहसीलदाराने पंचनामा केला याची सदर अर्जदारास माहिती मिळालेली नाही. दि. 14/11/11 रोजी अर्जदाराने अर्ज दिला होता हे म्हणणे त्याचे खोटे आहे. तसेच नांदगाव येथे डि. पी हलवावा असा अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना म्हटलेले नाही. सदरचा पंचनामा पोलीसाच्या हाताशी मिळवून केलेला आहे. तसेच 200 टन ऊस विकास कारखान्याला गेलेला आहे. त्यामुळे त्याच्या बिलात जळीत ऊस म्हणून कपात केलेली दिसुन येत नाही. अर्जदार सरळ हाताने आलेला दिसुन येत नाही. तसेच सदरची घटना ही नैसर्गिक असून ती ग्राहक मंचात येण्याच्या ऐवजी दिवाणी दावा करावयास हवा. तसेच रु. 1,47,000/- जेव्हा घेतले हे पण चुकीचे आहे. म्हणून सदरची तक्रार फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? नाही
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर नाही असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होत नाही. त्याचे वडील सदाशिव संतराम इडेकर हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे ग्राहक होते. व त्यांचे निधन दि. 28/09/2003 रोजी झालेले आहे तेव्हा पासुन मीटरवरचे नाव बदलेले नाही. वारसा प्रमाणपत्र दाखल केले आहे. 1) कस्तुराबाई सदाशिव इडेकर (मयत पत्नी) वय – 65 वर्षे, 2) भगवान सदाशिव इडेकर (मुलगा), वय – 54 वर्षे, 3) महादेव सदाशिव इडेकर (मुलगा) वय – 52 वर्षे, 4) पार्वती भगवान मोरे वय – 48 वर्षे, सदरचे वारसा प्रमाणपत्र अर्जदाराने दि. 13/11/2014 रोजी दाखल केलेले आहे. यावरुन अर्जदार हा स्वत:च्या हक्कासाठी जागृत दिसत नाही. कारण वडीलांचा मृत्यू सन - 2003 ला झाल्यानंतर अर्जदाराचा ऊस हा दि. 06/11/2011 रोजी जळालेला आहे. त्यामुळे अर्जदाराने 8 वर्षामध्ये आपले नाव लावून वारस म्हणून घेतलेले दिसत नाही. व सदरची वारसा प्रमाणपत्र देखील दि. 13/11/2014 रोजी आई मयत असताना काढलेले दिसत आहे. यावरुन या वारसा प्रमाणपत्रास किती महत्व दयावे ते स्पष्ट होते.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असून दि. 06/11/2011 रेाजी अर्जदाराचा ऊस शॉटसर्कीटमुळे जळाला तर त्याची खबर प्रथमत: गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना दयायला पाहिजे होती. ती दि. 14/11/2011 रोजी दिलेली दिसुन येते. तसेच तहसीलदार यांचा पंचनामा मात्र दि. 08/11/2011 व दि. 10/11/2011 या दोन्ही तारखांचा दिसुन येतो. यावर देखील कोणत्याही अधिका-यांची सही दिसुन येत नाही. पाच पंचामध्ये त्याचा एक भाऊ दिसुन येतो. तसेच पंचनाम्यात पंचनामा लिहीताना दिनांकच्या बाजुला जागा रिकामी दिसुन येते. त्यामुळे अशा पंचनाम्याला किती महत्व दयावयाचे ? तसेच पोलीसांना मात्र अर्जदारानी दि. 06/11/2011 रोजी कळवलेले आहे. त्यांच्या पंचनाम्यात अडीच एकर शेतात ऊस जळाल्याचे सांगत आहे. व पिकाचे नुकसान र. 4,00,000/- झालेले पोलीस पंचनामा सांगतो. तर तहसील पंचनाम्यात रु. 3,00,000/- नुकसान झालेले सांगतो. परंतु सदरच्या पंचनाम्यावर दि. 08/11/2011 व दि. 10/11/2011 अशा दोन तारखा दिसत असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येत नाही. तसेच अर्जदाराने 7/12 दाखल केलेला आहे. सन - 2010-2011 चा 7/12 असून त्यावर 1 हेक्टर 40 मध्ये लावलेला आहे. त्यामुळे साडेतीन एकर ऊस होतो, सदरचा 7/12 देखील सन - 2010-2011 म्हणून सदरचा 7/12 हा देखील 2011-2012 चा पाहिजे. व सदरचा ऊस हा दि. 06/11/2011 पुर्ण झालेला 24 कांडयाचा आहे. व विकास सहकारी कारखान्याला दि. 11/11/2011 रोजी पाठवलेला आहे. यावरुन अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना दि. 14/11/2011 रोजी कळवले. तेव्हा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रिकामी जागा जळालेली पाहायची होती का ? हा पण प्रशन उपस्थित होतो त्यांनी विज कंपनीला ऊशीरा का कळविले ? विदयुत निरीक्षकाचा अहवाल का मागितला नाही. त्याला पार्टी करण्यात आली नाही. म्हणून हे न्यायमंच सर्व कागदोपत्री पुरावा पाहून व जळीत ऊसाची पावतीवर कोणतीही कपात बिलात केलेली दिसुन येत नसल्यामुळे वारसा हक्काने अर्जदार हा ग्राहक होत नसल्यामुळे अर्जदाराचा सदरचा अर्ज हा फेटाळण्यात येतो.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.