ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –167/2010 तक्रार दाखल तारीख –06/12/2010
निकाल तारीख – 07/07/2011
-------------------------------------------------------------
बाबासाहेब पि. भानुदास बांगर
वय- 44 वर्षे, धंदा-नौकरी व शेती,
रा.मातकुळी ता.आष्टी जि.बीड ... तक्रारदार
विरुध्द
कार्यकारी अभिंयता,
महाराष्ट्र राज्य विघुत वितरण कंपनी लि ...सामनेवाला
बीड, ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड. एन.एम.कुलकर्णी
सामनेवालेतर्फे :- अँड.एस.आर.कांबळे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे मौजे मातकुळी ता. आष्टी जि. बीड येथील रहिवासी असून ते शेतीचा व्यवसाय करतात. सदर गावात त्यांचे आजोबाच्या मालकीची गट नंबर 124 शेत जमिन असून तक्रारदार हेच सदर जमिनीची वहिती करत असून त्यामध्ये त्यांनी ऊसाचे पिक घेतलेले आहे व घेत आलेले आहेत. त्यांला सदर गट नंबर मध्ये सामनेवाला विज कंपनीची एलटी लाईन गेलेली आहे. दि.14.03.2010 रोजी एलटी लाईनची तार तुटलेमुळे स्पार्कीग होऊन तक्रारदाराच्या मालकीचे शेतातील संपूर्ण ऊस जळून गेला. त्या बाबत तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दि.16.03.2010 रोजी प्रत्यक्ष गळीत ऊसाचा पंचनामा केलेला आहे. सदर पंचनाम्यानुसार रु.70,000/- चे नुकसान झालेले आहे. प्रत्यक्षात तक्रारदाराचे सुमारे रु.1,50,000/-चे नुकसान झालेले आहे.
दि.19.03.2010 रोजी तक्रारदाराने विद्यूत निरिक्षक विभाग बीड कडे अर्ज दि.14.03.2010 रोजी अर्ज करुन जळालेल्या ऊसा बाबत निष्कर्ष कळवणे बाबत विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व निष्कर्ष दिलेला होता. सदर अपघातात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कडून भा.वि.नि.1956 चे नियम 29 व 50 चा भंग झाल्यानेसदर आगीस विज कंपनी जबाबदार आहे.
तक्रारदारांनी या संदर्भात सामनेवाला यांचेकडे तोंडी व लेखी अर्ज देऊन नुकसान भरपाई देण्या बाबत विनंती केली परंतु नुकसान भरपाई न मिळाल्याने तक्रारदारांनी दि.17.07.2010 रोजी रजिस्ट्रर पोस्टाद्वारे सामनेवाला यांनी कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीस त्यांना दि.20.0;7.2010 रोजी मिळून देखील त्यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही, कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मागणी प्रमाणे रक्कम अदा केलेली नाही. सामनेवालाच्या सदोष सेवेमुळे तक्रारदारांना विनाकारण मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झालेला आहे. सेवेत कसुरीमुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, तक्रार खर्च रु.5,000/-ची मागणी,प्रवास खर्च रु.2,000/-ची मागणी केली आहे.
विनंती की, तक्रारदाराला ऊस जळाल्याची नुकसान भरपाई रु.,1,50,000/-, मानसिक,शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.15,000/-, प्रवास खर्च रु.2,000/-देण्या बाबत आदेश व्हावेत. सदर रक्कमेवर 18 टक्के व्याज देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला त्यांचा जवाब दि.05.03.2011 रोजी दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाहीत.त्या बाबतचा कोणताही तपशिल तक्रारदाराने तक्रारीत दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदारास कोणतीही सेवा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.त्यामुळे तक्रार न्यायमंचात चालू शकत नाही. तसेच ऊस जळीता संबंधी तलाठी व इतराचे पंचनामे देखील तक्रारी सोबत दाखल आहे. ते सामनेवाला यांना मान्य नाहीत. तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाल्याचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचा सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अड.एन.एम.कुलकर्णी, सामनेवालाचे विद्वान अड.एस.आर.कांबळे यांचे युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता सामनेवाल्यांनी त्यांचे खुलासात तक्रारदार हे ग्राहक नाहीत असा आक्षेप घेतलेला आहे. या संदर्भात तक्रारदाराची तक्रार,शपथपत्र यात तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक असल्याबददल कोणताही उल्लेख नाही. यूक्तीवादात देखील त्या बाबत कूठलाही उल्लेख तक्रारदाराकडून करण्यात आलेला नाही.
तक्रारदाराच्या संदर्भात जमिनीवरुन एलटी लाईन गेली असल्याचे सामनेवाला यांना मान्य आहे परंतु स्पार्कीग होऊन ऊस जळाला ही बाब सामनेवाला यांना मान्य नाही.
तक्रारदार ग्राहक असल्याबददल तक्रारदाराचे कोणतेही प्रवेदन तक्रारीत नसल्याने तक्रारदार ग्राहक आहेत हा मूददा निर्णायक होऊ शकत नाही. सद्य परिस्थितीत तक्रारदार ग्राहक नाहीत असे न्यायमंचाचे मत आहे. तक्रारदार ग्राहक नसल्याने सेवेत कसूरीचा प्रश्नच निर्माण होत नाही.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
1.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड