निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 05/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 17/04/2013
कालावधी 01 वर्ष 04 महिने 12 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
शमशोद्दीन पि.मोईनोद्दीन. अर्जदार
वय 52 वर्षे. धंदा.नौकरी. अड.रवी.गायकवाड.
रा.पोस्टमन कॉलणी.परभणी.
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या. गैरअर्जदार.
तर्फे कार्यकारी अभियंता. अड.एस.एस.देशपांडे.
कार्यालय जिंतूर रोड, परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदार शमशोद्दीन पि.मोईनोद्दीन रा.पोस्टमन कॉलणी यांची विद्युत वितरण कंपनी विरुध्द सेवेत त्रुटी दिल्या बद्दल तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यांत तक्रार अशी की,
अर्जदाराचे वडील नामे मोईनोद्दीन शमशोद्दीन यांनी मिटर ग्राहक क्रमांक 530010441462 त्यांच्या नांवावर घेतले होते. व त्यांचे निधन झाले आहे त्यांचा कायदेशिर वारस मुलगा या नात्यांने तक्रारदाराने तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराचे म्हणणे थोडक्यांत असे आहे की,
अर्जदार शमशोद्दीन पि.मोईनोद्दीन रा.पोस्टमन कॉलणी परभणी यांच्या वडीलांच्या नांवे मिटर ग्राहक क्रमांक 530010441462 हे घेतलेले होते व अर्जदाराच्या वडीलंचा मृत्यू झालेला आहे व सदरील मिटरचा वापर अर्जदार हा त्याचा मुलगा / वारस या नात्याने वापरत आहे.
अर्जदार यांस माहे आक्टोबर 2011 चे कोणत्याही प्रकार रिडींग न घेता बेकायदेशिररित्या रुपये. 33,250/- चे विद्युत बिल दिले आहे, जे की, चुक व बेकायदेशिर आहे.
अर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, अर्जदार हा विद्युतचा वापर फार वर्षां पुर्वी पासून म्हणजेच त्याच्या वडीलाच्या काळापासून करतो व नियमितपणे बिल भरतो अर्जदाराचे पुढे म्हणणे असे आहे की, अर्जदार घर क्रमांक 351 वार्ड क्रमांक 4 नविन 7 पोस्टमन कॉलणी,परभणी येथे राहतो व नियमितपणे बिल भरतो म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे.अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार यांनी माहे ऑक्टोबर 2011 या महिन्यांत 33,250/- रुपयांचे बील दिल्यानंतर अर्जदाराने ते बील कमी करुन मिळावे यांसाठी तोंडी व लेखी विनंती करुनही गैरअर्जदाराने रु. 15,000/- दिनांक 17/10/2011 रोजी भरुन घेवुनच विद्युत पुरवठा चालू केला व बाकीची रक्कम रु.5,000/- दर महा भरावे असे तोंडी सांगीतले.
त्यानंतर दिनांक 30/10/2011 रोजी गैरर्जदारांने अर्जदारास कसलीही सुचना न देता व कोठल्याही कागदपत्रांची पाहणी न करता अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत केला व नंतर 26/11/2011 रोजी रु.18770/- चे बिल देण्यांत आले वरील सर्व घडामोडीमुळे अर्जदारांस शारिरीक मानसिकत्रास झाला आहे व मुलाच्या अभ्यासांवर परिणाम होत आहे. अर्जदाराने या मंचास अशी विनंती केली आहे की, तक्रारदाराचा विद्युत पुरवठा चालु करुन मिळावा अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- नुकसान भरपाई मिळावी व माहे ऑक्टोबर 2010 चे बिल कमी करुन मिळावे व नंतरचे 16/12/2011 रोजीचे रुपये 18,770/- चे बिल रद्द करावे.अर्जदाराने त्याच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रं.6 वर कागदपत्राच्या यादी नुसार बिल व इतर कागदपत्रे जोडली आहेत.
अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रं.2 वर जोडले आहे.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यांत आल्या व गैरअर्जदाराने आपले म्हणणे नि.क्र. 14 व दाखल केलेले आहे त्यांचे थोडक्यांत म्हणणे असे की,
अर्जदार हा त्यांच्या नांवाने विद्युत जोडणी नसल्या कारणाने व जोपर्यंत तो
स्वतःच्या नावाने मिटर हस्तांतर करुन घेत नाही तो पर्यंत तो गैरअर्जदारांचा ग्राहक होवु शकत नाही, गैरअर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदारांने तक्रार दिल्यावर गैरअर्जदाराने अर्जदारास माहे ऑक्टोबर 2011 चे बील कसे बरोबर आहे हे समजावुन सांगीतले व त्यांने ते कबुल केले, पण बिल एक रक्कमी भरण्यास असमर्थता दाखवली म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास 4 हप्ते करुन दिले व पहिला हप्ता 15,000/- चा अर्जदाराने भरलेला आहे.
गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने कोठल्यांही प्रकारची त्रुटीची सेवा दिली नाही व व योग्य बिल दिले व तसेच अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक नाही म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावे गैरअर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 15 वर दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकला तसेच संबंधीत कागदपत्रांची पाहणी केली यावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? नाही.
2 अर्जदार हा अनुतोष मिळणेस पात्र आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे दिसते की, सदरचे मिटर ग्राहक क्रमांक 530010441462 हे अर्जदाराच्या मयत वडीलाच्या नावे आहे त्यामुळे हे सिध्द होते की, अर्जदार ग्राहक नाही,तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास थकीत बिला पोटी हप्ते पाडुन दिले, त्यानुसार अर्जदाराने रुपये 15,000/- भरलेले आहेत व पुढील रक्कम भरलेली नाही अर्जदाराने आपल्या वडीलाचे मृत्यू कधी झाले हे दाखल केलेले नाही किंवा त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र दाखल केलेले नाही.त्या बद्दलचा कसलाही पुरावा दाखल केलेला नाही तसेच मिटर आपल्या नांवे का करुन घेतलेले नाही या बद्दलचा कोठलाही उल्लेख केला नाही तसेच अर्जदाराचा विद्युत पुरवठा सध्या चालू असल्यामुळे अर्जदार इतर कोठलाही अनुतोष मिळण्यास पात्र आहे असे या मंचास वाटत नाही, तसेच अर्जदारांच्या नांवे विद्युत जोडणी नाही व त्याने स्वतःच्या नावे ते करुन घेण्याचे प्रयत्न देखील केलेला नाही मयत वडीलाच्या नांवे विज जोडणी तसेच ठेवुन त्याचा दिर्घकाळासाठी वापर करणे हे मंचास योग्य वाटत नाही, व तसेच अंतरिम आदेशाच्या वेळी मंचाने अर्जदारास थकीत बिला पोटी 5,000/- भरण्याचे आदेश केला होता यावरुन हे सिध्द होते की,गैरअर्जदाराने विवादीत बिल देवुन त्रुटीची सेवा दिली नाही व तसेच अर्जदाराने सदरचे विवादीत बील हे चुकीचे आहे हे सिध्द केले नाही, म्हणून वरील मुद्यांचे नाही असे उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 अर्जदारांचा अर्ज नामंजूर करण्यांत येत आहे.
2 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष