(घोषित दि. 19.09.2011 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या) अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण वीज कंपनीचे ग्राहक असून त्यांना आकारण्यात आलेल्या वीज बिला विरुध्द मंचात तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारी नुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 510030384766 असा आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार यांनी या मीटरला जोडणी देताना गैरअर्जदार यांनी टाकलेली वायर ही त्यांच्या घराच्या छतावरुन टाकलेली होती. जुने मीटर बदलताना गैरअर्जदार यांनी ही वायर तशीच ठेवून घराच्या दुस-या बाजूने मीटरला जोडणी दिली. दिनांक 26.03.2011 रोजी गैरअर्जदार यांनी स्थळ पंचनामा करुन छतावर असलेल्या वायरमधून बेकायदेशीररित्या वीज पुरवठा घेतला असा आरोप करुन 18,514/- रुपयाचे वीज चोरीचे बिल आकारले. हे बिल चुकीचे असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. याबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून सदरील बिल रद्द करण्याची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे पुनर्रजोडणी करुन देण्यासाठी अंतरिम आदेश पारित करण्याची विनंती केली. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे म्हणणे ऐकूण न घेता वीज पुरवठा खंडीत केला असल्यामुळे मंचाने दिनांक 29.04.2011 रोजी एकूण रकमेच्या 35 % रक्कम (6,480) स्विकारुन वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याचा अंतरीम आदेश पारित केला. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार ते जेव्हा मीटर तपासणीसाठी अर्जदाराच्या घरी गेले तेव्हा मीटरमध्ये फेरफार करुन मीटरचे सील तोडून अर्जदार वीज चोरी करीत असल्याचे दिसून आले. वीज कायद्यानुसार अर्जदारास वीज चोरीचे 12,034/- रुपये व कम्पाऊंडींगचे 8,000/- रुपये आकारण्यात आले. अर्जदाराने दिनांक 05.07.2011 रोजी मंचाच्या अंतरीम आदेशानुसार 6,480/- रुपयाचा भरणा केला व उर्वरीत बिल भरण्यास तयार असल्याचे गैरअर्जदार यांना पत्राद्वारे कळविले. वीज चोरी केली असल्याची कबूली अर्जदाराने स्वत: दिलेली असल्यामुळे तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे मीटर तपासणी केली असता मीटरमध्ये फेरफार करीत असल्याचे आढळून आल्यामुळे वीज कायद्यातील तरतुदी नुसार असेसमेंट व कम्पाऊंडींगचे बिल आकारले. अर्जदाराने केलेल्या विनंती वरुन व वीज पुरवठा खंडीत केलेला असल्यामुळे अर्जदाराने 35 % रक्कम भरलेली दिसून येते. दिनांक 05.07.2011 रोजी अर्जदाराने असेसमेंट तसेच कम्पाऊंडींगचे अनुक्रमे 12,034/- व 8,000/- रुपये भरलेले दिसून येते. वरील सर्व बाबीवरुन गैरअर्जदार यांनी आकारलेले वीज चोरीचे बिल अर्जदारास मान्य असल्याचे स्पष्ट होते. यावरुन अर्जदाराने केलेली तक्रार चुकीची असल्यामुळे मंच सदरील तक्रार खारीज करीत आहे. आदेश - अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |