जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 136/2008. प्रकरण दाखल तारीख - 04/04/2008 प्रकरण निकाल तारीख - 22/07/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मोहम्मद जिलानी पि. मोहम्मद जमील अर्जदार. वय वर्षे 35, धंदा व्यापार, रा. गोकूंदा ता.किनवट, जि. नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कं.लि. मार्फत कार्यकारी अभिंयता, भोकर, उपवीभागीय कार्यालय,भोकर जि.नांदेड गैरअर्जदार 2. सहायक अभिंयता 2.महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कं.लि, किनवट, ता.किनवट जि. नांदेड अर्जदारा तर्फे वकील - श्री.जे.डी.आटकोरे. गैरअर्जदारा तर्फे वकील - श्री.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर,सदस्या) गैरअर्जदार विद्यूत कंपनी यांच्या सेवेच्या ञुटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे. ती थोडक्यात खालील प्रमाणे, अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार ग्राहक क्र.505010380217 असून त्यांचा डिजायनिंग जाहीरात, डि.टी.पी. टंकलेखन हा व्यवसाय असून तो व्यवसाय ‘’प्लाझा रेडियम’’ या नांवाने गोकूंदा ता. किनवट जि. नांदेड येथे करतो. त्यांचा व्यवसाय दोन कॉम्प्यूटर आणि दोन प्रिंटर यांच्या सहायाने बँकेकडे कडून कर्ज घेउन करतात. या व्यवसायावर त्यांच्या कूटूंबांची उपजिविका चालते. अर्जदार हा रिंडीग प्रमाणे विज बिलाचा नियमित भरणा करतो. दि.10.1..2006 रोजी सकाळी 11.55 ते 12.20 चे दरम्यान संगणकारवर काम करीत असताना काही जळाल्याचा उग्र वास आला म्हणून मेन स्विच बंद केले आणि पाहणी केली असता त्यांचे दोन्ही संगणक, त्यांचे मॉनिटर, सी.पी. यू. , यू.पी. एस., स्टॅबलायजर आणि स्पिकर हे जास्त विज प्रवाहामूळे जळाल्याचे लक्षात आले. घटनेची माहीती ताबडतोब गैरअर्जदारांस कळविण्यात आली असता त्यांच्या कर्मचा-यांनी दूकानात येऊन पाहणी केली व जास्त विज प्रवाहामूळेच सदर घटना घडली असल्याचे सांगितले. त्यामुळे अर्जदाराने पोलिसात तक्रार केली व पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असून त्यांची कूटूंबाची पूर्ण उपजिवीका त्यावर अवलंबून आहे व वरील घटनेमूळे त्यांचे दूकान बंद पडले आहे. त्यामुळे त्याने गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराच्या मालमत्तेचे नूकसान झाले म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी अशी वारंवार विनंती केली. परंतु गैरअर्जदाराने नूकसान भरपाई देण्यास नकार दिला. त्यामुळे अर्जदाराने दि.07.07.2007 व दि.02.02.2008 रोजी गैरअर्जदारास वकिलामार्फत रजिस्ट्रर नोटीस पाठविली पण गैरअर्जदाराने त्यांची दखल घेतली नाही. तसेच अर्जदाराची तक्रार मूदतीत आहे, व मंचाच्या कार्यक्षेञात येत असल्यामुळे या मंचास ही तक्रार चालविण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारे गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराचे नुकसान होऊन देखील तसेच वारंवार मागणी करुनही त्यांस नूकसान भरपाई दिली नाही म्हणून अर्जदाराने त्यांचे दोन संगणक, दोन्ही संगणकाचे मॉनिटर, यू.पी.एस., सी.पी.यु., स्टॅबलायझर आणि स्पिकर यांच्या नूकसानीबददल रु.75,000/- व दाव्याचा खर्च व्याजासह मिळावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार ही कायदयाच्या चौकटीत बसत नसल्यामुळे फेटाळावी अशी विनंती केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 2 (1) (ड) II नुसार ग्राहक होऊ शकत नाही म्हणून ही तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.अर्जदाराने दि.10.04.2004 रोजी विज पूरवठा घेतलेला आहे पण त्यांस 240 वॅट इतक्या क्षमतेचा पूरवठा केलेला आहे. ज्यामध्ये केवळ 2 टयूब, 2 बल्ब व 1 थ्री पीनचे सॉकेट इतक्यासाठी विज पूरवठा दिलेला असताना अनाधिकृतरित्या जास्त विज खेचली आहे व विज वितरण कंपनीची फसवणूक केली आहे म्हणून तक्रार अर्ज खारीज करण्यात यावा. तसेच अर्जदाराने ज्या खांबावरुन विज जोडणी घेतली आहे त्यावरुन तर 3 ते 4 ग्राहकांना विज पुरवठा दिलेला आहे, त्या लोकांनी नूकसानी बाबत कोणतीही तक्रार केली नाही. त्यामुळे अर्जदाराच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. तसेच अर्जदाराच्या व्यवसायाबददल गैरअर्जदारास काहीही माहीती नाही. अर्जदाराने सांगितलेली घटना ही काल्पनिक असून ती गैरअर्जदाराना मान्य नाही. गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराचे नूकसान झाले हे त्यांना मान्य नाही. तसेच इंडीयन इलेक्ट्रीसिटी रुल्स 1956 चे जोडपञ 6 चा कलम नंबर 12 अन्वये विज वितरण कंपनीवर विज पूरवठया बाबत अथवा त्यामध्ये झालेल्या कोणत्याही दोषा बाबत ते दोषी ठरत नाहीत असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. अर्जदाराने केलेली तक्रार खोटी आहे, तसेच अर्जदार हा त्यांचा ग्राहक नाही, वरील सर्व कारणामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली आहे. अर्जदाराने पूरावा म्हणून स्वतःचे शपथपञ, तसेच गैरअर्जदाराना वकिलामार्फत दिलेल्या नोटीसची प्रत, पोस्टाची पावती, पोस्टाची पोहच पावती, दूकान नोंदणी प्रमाणपञ, विज बिल, संगणक खरेदी पावती, कोटेशन पावती, डिलेव्हरी चालन, घटनास्थळ पंचनामा, इत्यादी कागदपञ पुरावा म्हणून दाखल केली आहेत. गैरअर्जदारांनी पूरावा म्हणून श्री. बालाजी नारायणराव कोटलवार, सहायक अभियंता, म.रा. वि.वि. कं. यांचे शपथपञ दाखल केले आहे. अर्जदारातर्फे अड.आटकोरे यांनी यूक्तीवाद केला, गैरअर्जदारातर्फे अड.नांदेडकर यांनी यूक्तीवाद केला, या प्रकरणात खालील प्रमाणे मूददे नीघतात ते म्हणजे, मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये होय. ञूटी केली आहे काय ? 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र. 1ः- अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विज वापराचे दिलेले बिल दाखल केले आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्याप्रमाणे शपथपञामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र. 2 ः- अर्जदार यांचे दोन्ही संगणकाचे मानीटर, यू.पी.एस., सी.पी.यू., स्टॅबीलायझर व स्पीकर यांचे नूकसान गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामुळे झालेले आहे असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यामध्ये अर्जदार यांनी दि.10.4.2004 रोजी विज पूरवठा घेतला त्यावेळेस तो 240 वॅट इतका क्षमतेचा मर्यादीत आहे परंतु त्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार कंपनीला कोणतीही माहीती न देता जास्त विज खेचली आहे असे म्हटले आहे. परंतु अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून विज पूरवठा घेतला त्यावेळेला तो 240 वॅट इतक्या क्षमतेचा होता व त्यानंतर अर्जदार यांच्या दूकानात दि.10.12.2006 रोजी घटना घडली त्यावेळी अर्जदार यांच्या दूकानामध्ये किती क्षमतेचा विज पूरवठा जास्त प्रमाणात वापरला या बाबतचा कोणतेही कागदपञ पूरावा अगर त्यासोबत कोणाचेही तज्ञ व्यक्तीचे शपथपञ असे कोणतेही कागदपञ पूरावा गैरअर्जदार यांनी या मंचामध्ये दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी अर्जासोबत कनिष्ठ अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित किनवट यांचे दि.11.12.2006 रोजीचे पञ दाखल केले आहे. सदर पञाचे अवलोकन केले असता अर्जदार यांच्या दूकानातील साहित्य विज प्रवाहामूळे जळाल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे लेखी तक्रार दिल्यानंतर अर्जदार यांच्या दूकानाला गैरअर्जदार यांचे कनिष्ठ अभिंयता व एक लाईनमन यांनी भेट दिली होती ही बाब स्पष्ट होत आहे. अर्जदार यांच्या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांच्या दूकानात जास्त दाबाचे विज प्रवाहामूळे त्यांचे दूकानातील साहित्य जळाल्याचे नमूद केले आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत दि.11.12.2006 रोजीचे पञाचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांचे एक अभियंता व लाईनमन यांनी पाहणी करुन त्या बाबतचा पाहणी अहवाल गैरअर्जदार यांचे सहायक अभियंता उपविभाग किनवट यांना सादर केलेला आहे. सदरच्या पाहणी अहवालामध्ये गैरअर्जदार यांचे अभियंता यांनी विज दाबावीषयी पाहणी केली असता सदरचा विज दाब हा प्रत्येक फेजचा वेगवेगळा म्हणजे (1. 370 ते 380 वॅट) (2. 120 ते 150 वॅट) (3. 180 ते 200 वॅट ) असे वेगवेगळे असल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर गैरअर्जदार यांच्या अभियंत्याने वेगळया वेळेला पून्हा विज दाबावीषयी पाहणी केली असता तो विज दाब अनियंञित आणि कमी असल्याचे म्हणजेच (1. 250 ते 260 वॅट ) (2. 180 ते 200 वॅट) (3. 200 ते 220 वॅट) आढळले बाबत त्यांचे पाहणी अहवालामध्ये नमूद केलेले आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेले दि.11.12.2006 चे पाहणी अहवालानुसार अर्जदार यांच्या दूकानातील साहित्य हे दि.10.12.2006 रोजी गैरअर्जदार यांचे अनियंञित दाबाच्या विज प्रवाहामूळे जळाल्याचे सिध्द होत आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी सदरची घटना घडल्यानंतर गैरअर्जदार यांच्याकडे त्यांची झालेली नूकसानीची मागणी वारंवार केलेली आहे परंतु गैरअर्जदार यांनी त्या बाबत कोणतीही पूर्तता केली नाही. यांचा विचार करता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र.2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. अर्जदार यांनी अर्जासोबत दोन कॉम्प्यूटर, स्टॅबिलायझर, मॉनिटर, यूपीएस, सीपीयू, स्पीकर या वस्तू खरेद केल्या बाबत मूळ पावत्या या मंचात दाखल केल्या आहेत. सदरच्या पावतीचे अवलोकन केले असता, त्या वस्तू सन 2005, सन 2006 मध्ये खरेदी केल्या असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच सदरच्या वस्तू या जून्या झाल्याचे दिसून येत आहे. अर्जदार यांनी अर्जामध्ये सदरच्या वस्तूच्या पूर्ण किंमतीच्या रक्कमेची मागणी केलेली आहे. अर्जदार यांच्या सदरच्या वस्तू जून्या असल्याने घसा-याची रक्कम वजा जाता अर्जदार हे त्यांनी घेतलेल्या साहित्यांच्या निम्मी रक्कम गैरअर्जदार यांच्याकडून वसूल करण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी त्यांचे दूकानातील साहित्य गैरअर्जदार यांच्या अनियंञित दाबाचे प्रवाहामूळे जळाले आहे. त्यांचे नूकसानीची मागणी अनेकदा करुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नूकसानीची रक्कम दिलेली नाही अगर त्या बाबत पाठपूरावा केलेला नाही. त्यामुळे अर्जदार यांनी सदर मंचामध्ये दाद मागावी लागली आहे. त्या अनुषंगाने निश्चितपणे खर्चही करावा लागला आहे. यांचा विचार करता अर्जदार हे मानसिक ञासापोटी व अर्जदाराच्या खर्चापोटी रक्कम मिळण्यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी केलेली तक्रार, प्रतिज्ञापञ, कागदपञे वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपञ, प्रतिज्ञापञ, गैरअर्जदार यांनी वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद यांचा विचार करता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना रु.11,073/- दयावेत, सदर रक्कमेवर 9% दराने दि.14.02.2008 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत व्याज दयावे. मानसिक ञासापोटी रु.5,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रु.1000/- दयावेत. 3. पक्षकाराना निकाल कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते श्री.विजयसिंह राणे सदस्या सदस्य अध्यक्ष जे. यु. पारवेकर लघूलेखक. |