जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2008/101 प्रकरण दाखल तारीख - 30/04/2010 प्रकरण निकाल तारीख – 05/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. 1. छाया भ्र. भुजंगराव भालके वय 48 वर्षे, धंदा शेती 2. शशीकांत भुजंगराव भालके वय 29 वर्षे, धंदा शेती 3. लक्ष्मीकांत भुजंगराव भालके वय 25 वर्षे, धंदा शेती 4. गोविंद गंगाधर घोरबांड वय 30 वर्षे, धंदा शेती सर्व राहणार धनेगांव ता.जि.नांदेड अर्जदार. विरुध्द. 1. कार्यकारी अभिंयता, महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लि. नवा मोंढा, विद्यूत भवन, नांदेड. 2. अधिक्षक अभिंयता, महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लि. नांदेड. गैरअर्जदार 3. कनिष्ठ अभिंयता, महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लि. एम.आय.डी.सी.गट, सिडको नविन, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.एल.बी. भालके गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदर हे शेतीचा व्यवसाय करतात व ते एकञित कूटूंब पध्दतीनुसार राहतात. सर्व्हे नंबर 4/1 व 4/7 यामध्ये सन 2006-07 मध्ये ऊस लावला होता. अर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सर्व्हे नंबर 4/1 हे खरेदीखता नुसा कोंडीबा बुचडे यांचेकडून खरेदी केले होते. सदर शेतीसाठी ग्राहक क्र.55001201038 द्वारे विज पूरवठा घेतलेला आहे. अर्जदार क्र.4 यांचे शेत हे अर्जदार क्र. 1 ते 3 च्या शेतालगत असल्यामूळे अर्जदार क्र.4 यांनी ते शेत लागवडीसाठी अर्जदार क्र.1 ते 3 यांना दिले होते. त्या शेतात ग्राहक क्र.55001201038 चा वापर करतात. विज मिटर हे नाममाञ पूर्वीचे शेत मालक कोंडीबा बूचडे यांचे नांवाने राहीले. सदरील विज ग्राहक क्रमांक अर्जदाराचे नांवावर होण्यासाठी दि.18.09.2008 रोजी अर्ज दिला तो आजही गैरअर्जदार यांचेकडे प्रलंबित आहे. लाभार्थि असल्याकारणाने अर्जदार हे ग्राहक ठरतात.दि.14.3.2007 रोजी दूपारी 1.45 वाजता विद्यूत वाहीनीची आल्यूमिनीयमची एक तार चटपट आवाज होऊन तुटली व झालेल्या स्पार्कमूळे शेतातील सर्व ऊस जळून खाक झाला त्यामूळे अंदाजे रु.5,00,000/- चे नूकसान झाले.दि.14.3.2007 रोजी गैरअर्जदार यांचा 11 के.व्ही.कंडक्टर हा अंदाजे 40 वर्षे जूना असल्यामूळे तूटला. विद्यूत निरिक्षक यांनी घटनास्थळाला भेट देऊन अभिप्राय दिला त्यात 11 के.व्ही. कंडक्टर हा अंदाजे 40 वर्षे जूना होता तसेच फिडर ओव्हर लोडेड होते त्यामूळे फेज तूटून उसावर व उसाच्या वाळलेल्या पाचोळयावर पडल्याने ऊसास आग लागली व त्यामूळे ऊस जळाला.सदरील घटनेची फिर्याद नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशन सिडको यांना दिली त्यामूळे जळीत गून्हा नंबर 6/07 असा नोंदविला. पोलिसांनी पंचनामा केला तसेच तलाठी सज्जा वसरणी यांनी सूध्दा पंचनामा केला तो तक्रारी सोबत दाखल केला आहे.दि.16.3.2007 रोजी गैरअर्जदार यांचे कार्यालयात जाऊन नूकसान भरपाईची मागणी केली.दि.25.2.2008 रोजी वकिलामार्फत नूकसान भरपाईची मागणी केली परंतु गैरअर्जदार यांनी दि.28.2.2008 रोजी नूकसान भरपाई देण्यास नकार दिला.त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदारास एकरी 80 टन ऊस झाला असता, आठ एकरामध्ये 640 टन ऊस झाला असता, त्यावेळेच्या किंमतीनुसार अर्जदारास रु.5,12,000/- ऊस झाला असता. येळेगांव येथे ऊस जळाल्यानतर ते 15 दिवसामध्ये नेण्यात आला. त्यामूळे ऊसाचे वजन हे शेतात 50 टक्के घटले व उर्वरित जळीत ऊस भाउराव सहकारी साखर कारखाना यांनी 30 टक्के वजन कपात केले. गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामूळे अर्जदाराचे नूकसान झाले म्हणून त्यांची मागणी आहे की, नूकसान भरपाई म्हणून रु,5,00,000/- दावा खर्च रु.1,000/- व मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.10,000/- देण्याचे आदेश व्हावेत. गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराचा अर्ज हा कायदयाच्या चौकटीत बसत नाही.अर्जदाराच्या इतर सर्व बाबी गैरअर्जदार यांना मान्य नाहीत.अर्जदाराने नमूद केलेली बाब ही मूळ प्रकरणाशी विसंगत आहे व ती अत्यंत नवीन आहे. हे म्हणणे खोटे आहे की, मिटर क्र.5500120138 चा वापर शेतीसाठी करतात. शेती बददल गैरअर्जदाराच्या अभिंलेखात अशी कोणतीही नोंद नाही. ज्या व्यक्तीने अर्जदार यांना शेत विकले ती व्यक्ती गैरअर्जदाराची ग्राहक नाही.अर्जदाराने नवीन परिच्छेद क्र.1-ड अंतर्भूत करण्याची विंनती केली आहे परंतु अर्जदार वारंवार ज्या विज ग्राहक क्रमांकाचा उल्लेख करीत आहे त्या विज ग्राहकांचे नांव सदर अर्जदाराचे नाही किंवा ज्या शेता बाबत हे प्रकरण दाखल केलेले आहे त्यासाठी विजेची जोडणी सूध्दा देण्यात आलेली नाही.हे म्हणणे खोटे आहे की, त्यांनी नांव परीवर्तन करण्यासाठी अर्ज दिला.अर्जदाराने उसाचे उत्पादन 460 टना ऐवजी 640 टन एवढे दूरुस्ती करण्याची विनंती केली आहे परंतु अशी विनंती आता मान्य करता येत नाही.अर्जदाराने या अर्जाद्वारे ज्या दूरुस्त्या मागीतल्या आहेत त्यानुसार अर्जदाराची मूळे तक्रार संपूर्णतः बदलण्यात येऊन गैरअर्जदाराला मूळ तक्रारीची विसंगत असे सर्वस्वी नवीन केसचे उत्तर दयावे लागेल. त्यामूळे गैरअर्जदारावर अन्याय होणार आहे.अर्जदाराने हा दूरुस्ती अर्ज त्यांच्या मूळ अर्जातील दोष दूर करण्यासाठी दाखल केला आहे. म्हणून अर्जदाराची तक्रार ही खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? ग्राहय धरण्यात आले. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी यापूर्वी या मंचामध्ये ही तक्रार दाखल केलेली होती. ज्यामध्ये दि.21.08.2008 रोजी यापूर्वीच्या मा. अध्यक्ष व मा. सदस्य यांनी निकाल जाहीर केलेला आहे व अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात आलेला आहे. हे प्रकरण घेऊन अर्जदार यांनी मा. राज्य आयोग, खंडपीठ औरगाबाद येथे अपील केले व त्या अपीलावर आदेश म्हणून मा. राज्य आयोग यांनी सदरील प्रकरणामध्ये दूरुस्ती अर्ज दाखल करुन प्रकरण पूढे चालविण्यात यावे असे आदेश दि.12.03.2010 रोजी केले. त्यानुसार अर्जदाराने नवीन दूरुस्ती अर्ज मंचासमोर त्यांचे तक्रारीमध्ये दाखल केला व दि.16.09.2010 रोजी सदर अर्जावर दूरुस्ती करण्यात आली. वास्तविक पाहता मा. राज्य आयोग यांचे आदेशानुसार सदरील दूरुस्ती ही दि.30.4.2010 रोजी पर्यत होणे आवश्यक होते. तरी देखील अर्जदाराचा अर्ज ग्राहय धरुन तक्रार पूढे चालविण्यात आली. सदरील दूरुस्तीमध्ये अर्जदार असे लिहीतात की अर्जदार क्र.1 ही अर्जदार क्र. 2 व 3 यांची आई आहे व अर्जदार क्र.4 हे अर्जदार क्र.1 यांचे नात्याने जावाई आहेत व अर्जदार क्र.2 व 3 यांचे भावजी आहेत. तसेच अर्जदार क्र.1 ते 3 यांनी सर्व्हे क्र.4/1 हे खरेदी खत दि.6.7.2006 रोजी कोंडीबा बूचडे व त्यांचे भाऊ यांचेकडून शेतातील सर्व साधनासह खरेदी केले. त्यामूळे ते कायदेशीर मालक आहेत व शेतामध्ये असलेले विज मिटर त्यांचा ग्राहक क्र.55001201038 पी.सी.7 असा आहे. सदरील मिटर हे अर्जदार हे वापरत असल्यामूळे मिटर उपभोक्ता म्हणून त्यांना गृहीत धरुन तेवढया हददीपूरते ग्राहक समजण्यात आले व त्यांची तक्रार पूढे चालविण्यात आली म्हणून अर्जदारास ग्राहक म्हणून गृहीत धरण्यात आले. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे दि.14.3.2007 रोजी एक चटपट आवाज होऊन तार तूटली व त्यामूळे ऊसाला आग लागली व त्यामध्ये त्यांचा रु.5,00,000/- चे नूकसान झाले. सदरील शेतामध्ये अर्जदार यांनी प्रति एकर 80 टन ऊसाचे पिक झाले असते. त्यानुसार त्यांचे रु.5,00,000/- चे नूकसान झाले असे म्हणणे मांडले आहे. शेताचे ऊस जळीताचे झालेले नूकसान हे गैरअर्जदार यांचे मूळे झाले म्हणून सदरीची नूकसान भरपाई ही गैरअर्जदार यांनी दयावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांचे दूरुस्ती अर्जातील पॅरा नंबर 8 मध्हये ते असे लिहीले की, एकूण आठ एकर ऊस लागवड सन 2006-07 मध्ये केलेली आहे व त्यांचे वजन 80 टन एवढे होते व त्यांचेकडून रु.5,12,000/- एवढी होती. अर्जदार यांनी काही कागदपञ दाखल केलेले आहेत. त्यामध्ये शेतीचे 7/12, त्यात 4/1 मूजामपेठ ता. नांदेड येथील 3 हेक्टर जमिन हे शंशीकांत भूजंगराव भालके व लक्ष्मीकांत भूंजगराव भालके यांचे नांवावर आहे. तसेच 4/7 मूजामपेठ ता. नांदेड येथील जमीन गोंविद गंगाधर घोरबांड यांचे नांवे 36 आर एवढी आहे. अर्जदाराने दाखल केलेली रजिस्टर खत पाहता त्यांचेवर देखील एकूण क्षेञफळ 3 एकर 36 आर एवढे आहे. त्यामूळे अर्जदाराने आपल्या अर्जात लिहीलेले आठ एकर शेती कशाचे आधारावर लिहीली आहे हे माञ स्पष्ट झालेली नाही. अर्जदाराने कागदपञात त्यांने घातलेल्या ऊसाच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. त्यात दि.15.03.2007, 16.03.2007, 17.03.2007, 18.03.2007, 19.03.2007, 20.03.2007, 22.03.2007, 23,03,2007, 24.03.2007, 25.03.2007, 26.03.2007, याप्रमाणे आहेत. ज्यामध्ये दि.15.3.2007 रोजी ऊस भाऊराव सहकारी साखर कारखाना लि. देगाव-येळेगांव ता. अर्धापूर येथे घातलेला आहे. सारासार विचार केला तर दि.15.3.2007 रोजी ऊस घालायचा असेल तर त्या आधी दोन दिवस ऊसाची कापणी करायची असते व कापणी झालेला ऊस दि.15.3.2007 रोजी जर कारखान्याला घातला आहे असे पावतीनुसार गृहीत धरले तर सदरचा ऊस हा दि.13.03.2007 रोजीला काढलेला आहे हे स्पष्ट होते. दि.15.03.2007 ते दि.26.03.2007 या कालावधीत अर्जदाराने संपूर्ण कारखान्यालाघातलेला आहे हे स्पष्ट होते. अज्रदाराने दोन फोटो कॉपीज मंचासमोर दाखल केलेल्या कआहेत. फोटोचया मूळ व्यतिरिक्त फोटो पाहणे हे कायदयात बसत नसले तरी फोटो पाहिले असता उघडया डोळयाने ते असे दिसतात की, एक फोटो ऊस जळण्यापूर्वीचा व दूसरा ऊस जळाल्यानंतरचार आहे. त्यांचे अवलोकन केले असता ज्याठिकाणी ळफक्त गवताचा भाग आहे त्याठिकाणी ऊसाचे पाचट जळाल्या सारखे वाटते. अर्जदार क्र.1 ही नात्यांने अर्जदार क्र.2 व 3 यांची आई आहे. पण त्यांचे नांवाने कोणताही 7/12 अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेली शेत विक्री बददलचे विक्री खत यामध्ये देखील अर्जदार यांचे आईचे नांव कूठेही नाही. तिन एकर 36 आर शेत घेतलेले असताना अर्जदार हे आठ एकर शेतावर ऊस लागवड केली व त्याबददलची नूकसान भरपाई मागत आहेत, तसेच कोणताही पूरावा नसल्यामूळे अर्जदाराच्या सर्वच गोष्टी बददल संदिग्धता निर्माण झालेली आहे. अर्जदार यांचे म्हणण्यानुसार आजही सदरील शेतीसाठी ते वापरत असलेले मिटर त्यांचे नांवाने झालेले नाही तरी देखील उपभोक्ता म्हणून अर्जदारास ग्राहक म्हणून संबोधण्यात आलेले आहे. साखर कारखान्याला ऊस घातलेल्या पावत्यावरुन अर्जदाराचा ऊस कूठेही वाया गेलेला आहे असे वाटत नाही. तक्रार अर्जातील संदिग्धता व कोणतेही पूरावे नसल्यामूळे अर्जदाराची नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार जबाबदार नाहीत या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |