Maharashtra

Nanded

CC/09/63

Amit Ramchandra Patil - Complainant(s)

Versus

Karuna Mayndu Borewells - Opp.Party(s)

09 Jun 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/63
1. Amit Ramchandra Patil At.Post.Admpur Tq.Biloli.Dist NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Karuna Mayndu Borewells Tq.Bodhan Dist.NizamabadNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 09 Jun 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.2009/63
                                                     प्रकरण दाखल दिनांक  18/03/2009
                                                     प्रकरण निकाल दिनांक 09/06/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील        अध्‍यक्ष.
                       श्रीमती सुजाता पाटणकर             सदस्‍या.
                       मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
 
अमितेंद्र रामचंद्र पाटील,
मार्फत आममुक्‍तार श्री. रामचंद्र माणिकराव पाटील               अर्जदार रा.मे.पो.अदमपुर ता.बिलोली जि.नांदेड.
 
विरुध्‍द
 
करुणामयुधु बोअरवेल्‍स
एच.नंबर 154-319,शरबी कॉनोल रोड,                    गैरअर्जदार बोधन ता.जि.निजामबाद.
अर्जदारा तर्फे            - स्‍वतः.
गैरअर्जदारा तर्फे          - कोणीही हजर नाही.
                            निकालपत्र
         (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या)
    
गैरअर्जदाराच्‍या सेवेच्‍या ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे.
 
अर्जदार यांनी मूलाच्‍या नांवे असलेल्‍या गट क्र.75 क्षेञ 1 हेक्‍टर 14 आर मध्‍ये दि.6.2.2007 रोजी तीन साक्षीदारासमक्ष गैरअर्जदार यांचे ट्रक क्रमांक एम.पी.25-जे-9411 या बोअरवेलने बोअर मारले, पाणी सूध्‍दा दोन इंच लागले. मी तिन्‍ही साक्षीदाराचे समक्ष रक्‍कम रु.27,105/- पैकी रु.6500/- जमा केले, लगेच दोन तासानी रु.5000/- जमा केले. दूस- या दिवशी रु.8000/- व नंतर दि.16.2.2007 रोजी रु.2500/- जमा केले. पण उर्वरित रु.5105/- पक्‍की पावती दिल्‍यानंतरच घेऊन जाण्‍यास सांगितले. वारंवार मागणी करुनही पक्‍की पावती दिली नाही. दि.5.6.2007 रोजी मोटार जळाल्‍यामूळे मोटार काढण्‍याचा प्रयत्‍न केला पण मोटर न निघाल्‍यामूळे  बोधन येथील तज्ञास बोलावून दि.9.7.2007 रोजी जॅक लाऊन मोटार काढली. त्‍यावेळेस असे लक्षात आले की, केसिंग पाईपचा दर्जा हा कमी दर्जाचा असल्‍यामूळे पाईप दबले जाऊन मोटार वर येण्‍यास जास्‍तीचे जोर लावावे लागले. बोअर दूरुस्‍त केल्‍याशिवाय चालणार नाही. त्‍यामूळे गैरअर्जदारास दि.19.6.2007 रोजी रजिस्‍ट्रर पोस्‍टाने बोअर दूरुस्‍ती करणे बाबत पञ दिले. त्‍यांनी त्‍यासं काही प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली व त्‍यांची मागणी आहे की, गैरअर्जदाराकडून त्‍यांना बोअरचा खर्च रु.22,000/-, मॅकेनिक खर्च रु.5000/- ऊसाचे नूकसान रु.8000/- अपेक्षीत खर्च रु.30,000/-,मानसिक ञासापोटी रु.2000/- व दावा खर्च रु.1,000/- असे एकूण रु.68,000/-मिळावेत अशी मागणी केली आहे.
             गैरअर्जदार यांना मंचाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा करुन पूढे चालविण्‍यात आले.
 
             अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपञावरुन त्‍यांनी तक्रार चालविण्‍याचा अधिकार रामचंद्र माणिकराव पाटील यांना दिलेले आहेत, ते अधिकारपञ तक्रारीमध्‍ये दाखल केलेले आहे.
 
अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच अर्जदार यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
मूददे                                    उत्‍तर
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?             होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय ?                          नाही.
3.   काय आदेश   ?                        अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                           कारणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून त्‍यांचे नांवे असलेलया गट नंबर 75 क्षेञामधील 1 हेक्‍टर 14 आर या क्षेञामध्‍ये दि.6.2.2007 रोजी करुनामयुधू बोअरवेल, बोधन जि. निजामाबाद (आंध्र प्रदेश)  यांचेकडून बोअरवेल मारलेल्‍या सदरच्‍या घटनेच्‍या वेळी श्री.संभाजी गंगाराम लमले, श्री. संजय संभाजी शिनगारे व गोविंद महादू देवारे  हे प्रत्‍यक्ष त्‍याठिकाणी हजर असल्‍या बाबत अर्जदार यांनी वरील नमूद तिन्‍ही व्‍यक्‍तीचे शपथपञ या कामी या मंचामध्‍ये दाखल केलेले आहेत. अर्जदार यांनी अर्जासोबत दि.6.2.2007 रोजीची बोअरवेल मारल्‍या बाबत व गैरअर्जदार यांना पैसे दिल्‍या बाबतची  पावती वजा एक कागद दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी सदरच्‍या अर्जाची नोटीस मिळूनही गैरअर्जदार या मंचामध्‍ये हजर झाले नाहीत अगर अर्जदार यांचे तक्रारीतील कोणतेही कथन गैरअर्जदार यांनी म्‍हणणे, शपथपञ देऊन नाकारलेले नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले साक्षीदाराचे शपथपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात येते.
मूददा क्र. 2 ः-
          अर्जदार यांचे अर्जातील कथनाप्रमाणे अर्जदार यांनी दि.6..2.2007 रोजी गैरअर्जदार यांचेकडून बोअरवेल त्‍यांचे शेतामध्‍ये मारलेले आहेत. सदर बोअरवेल मारलेनंतर अर्जदार यांना पाणी सूध्‍दा लागलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना  रक्‍कम रु.22,000/- एवढी दिलेली आहे. उर्वरित रक्‍कम रु.5105/- ही पक्‍की पावती दिल्‍यानतर देण्‍यास  अर्जदार तयार असल्‍याचे अर्जदार यांनी त्‍यांचे अर्जामध्‍ये नमूद केलेले आहे. अर्जदार यांची मोटार दि.5.6.2007 रोजी जळाल्‍यामूळे  अर्जदार यांनी सदरची मोटार काढण्‍याचे काम मॅकेनिक असलेले श्री.शेख बशीर रा. बोधन जि. निजामाबाद  यांना बोलावून दि.9.7.2007 रोजी जॅक लाऊन मोटार कौशल्‍याने काढलेले आहे. सदरची मोटार काढण्‍यास अर्जदार यांना रक्‍कम रु.5,000/- इतका खर्च झालेला आहे. या बाबतचा कागद अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार केसिंग पाईपचा दर्जा हा कमी दर्जाचा असल्‍यामूळे पाईप दबले जाऊन मोटार वर येण्‍यास जास्‍तीचे जोर लावावे लागले.केसिंग पाईप बदलल्‍याशिवाय पून्‍हा मोटार टाकणे शक्‍य नाही असे मॅकेनिकचे म्‍हणणे आहे असे नमूद केलेले आहे. त्‍या बाबत अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दि.24.6.2007 रोजी रजिस्‍ट्रर पोस्‍टाद्वारे बोअर दूरुस्‍त करण्‍यासंबंधी सूचना केलेली आहे.
              अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून दि.6.2.2007 रोजी बोअरवेल मारुन घेतलेला आहे. दि..5.6.2007 रोजी मोटार जळाल्‍यामूळे सदरची मोटार मॅकेनिक यांचेमार्फत काढून घेतलेली आहे. दि.19.6.2007 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना बोअर दूरुस्‍त करण्‍यासंबंधी सूचना केलेली आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथनाचा विचार केला असता अर्जदार गैरअर्जदार यांचेकडून बोअरवेल संदर्भात नेमका कोणता दोष आहे अशी तक्रार या मंचासमोर घेऊन आलेले नाहीत. अर्जदार यांची मोटार दि.5.6.2007 रोजी जळालेली आहे. दि.19.6.2007 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना बोअर दूरुस्‍ती बाबत कळवलेले आहे परंतु अर्जदार हे सदरची केस घेऊन या मंचामध्‍ये दि.17.3.2009 रोजी आलेले आहेत. अर्जदार यांची मोटार दि.9.7.2007 रोजी जळालेली असेल तर अर्जदार हे दि.9.7.2007 पासून प्रत्‍यक्ष अर्ज मंचात दाखल करेपर्यत म्‍हणजे दि.17.3.2009 पर्यत  या मंचामध्‍ये आलेले नाहीत ही बाब स्‍पष्‍ट होत आहे. अर्जदार यांनी अर्जामध्‍ये दिड एकर ऊस लागवड एकूण खर्च रु.8,000/- इतका मागितलेला आहे परंतु त्‍या बाबतचा कोणताही कागदोपञी पूरावा म्‍हणजे  अर्जदार यांचे शेतीमध्‍ये ऊस लावला असेल तर त्‍या बाबतचा 7/12 व इतर खर्चा बाबत कोणताही कागदोपञी पूरावा या मंचामध्‍ये दाखल केलेले नाही. अर्जदार यांची मोटार दि.5.6.2007 रोजी जळालेली आहे परंतु सदरची मोटार कोणत्‍या कारणामूळे जळाली या बाबत अर्जदार यांचे अर्जामध्‍ये कोणतेही नेमकेपणा दिसून येत नाही.
 
              अर्जदार हे केसिंग पाईपचा दर्जा कमी असल्‍यामूळे पाईप दबले जाऊन मोटार वर येण्‍यास जोर लावावे लागलेले आहे व पून्‍हा मोटार मध्‍ये टाकण्‍यास केसिंग पाईप बदलल्‍याशिवाय शक्‍य नाही अशी तक्रार या मंचामध्‍ये घेऊन आलेले आहेत. केसिंग पाईपच्‍या दर्जा कोणत्‍या प्रकारचा आहे किंवा कोणत्‍या कंपनीचे केसिंग पाईप गैरअर्जदार यांनी लावलेले आहेत या बाबत अर्जदार यांनी कोणताही मजकूर अर्जामध्‍ये नमूद केलेला नाही. कोणत्‍याही वस्‍तूच्‍या दर्जा बाबत जर आपण तक्रार घेऊन येत असाल तर सदरच्‍या वस्‍तूच्‍या दर्जा बाबत तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल सादर करणे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक अशी बाब आहे. परंतु अर्जदार यांनी त्‍यांचे बोअरवेलमध्‍ये गैरअर्जदार यांनी केसिंग पाईप चांगल्‍या दर्जाचे बसवले नाही या बाबतचा कोणताही कागदोपञी पूरावा, मॅकेनिकचे शपथपञ अगर दर्जा बाबत तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल या मंचामध्‍ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये करतरता केली आहे ही बाब अर्जदार सिध्‍द करु शकलेले नाहीत यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
              अर्जदार यांचा अर्ज,शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ, साक्षीदाराचे शपथपञ व अर्जदार यांनी स्‍वतः केलेला यूक्‍तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेत.
 
 
 
                         आदेश
1.                 अर्जदार यांचा अर्ज नामंजूर करण्‍यात येतो.
 
2.                 पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                 पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)     (श्रीमती.सुजाता पाटणकर)     (श्री.सतीश सामते)    
           अध्यक्ष.                                सदस्‍या                        सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.