जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 623/2009. तक्रार दाखल दिनांक : 19/11/2009. तक्रार आदेश दिनांक : 26/04/2011. ल्युथर हरिभाऊ गायकवाड, वय 75 वर्षे, व्यवसाय : काही नाही, रा. 446, बेगमपेठ, सोलापूर. तक्रारदार विरुध्द कर्मचारी भविष्य निधी कार्यालय, उपक्षेत्रीय भविष्य निधी कार्यालय, द्वारा : आयुक्त, भविष्यनिधी, 165, अ, रेल्वे लाईन, सुरवसे टॉवर, सोलापूर – 413 001. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.एल. देशमुख विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : एस.एस. कालेकर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, ते लक्ष्मी-विष्णू टेक्स्टाईल मीलमध्ये नोकरीत होते आणि सन 2006 मध्ये ते व्यवस्थापन बंद झाल्यामुळे त्यांची सेवा समाप्त झाली. ते विरुध्द पक्ष यांचे सदस्य असून त्यांचा खाते क्र.एम.एच./एस.एल.पी./348/7223 आहे. त्यांचे नियत वयोमान सेवानिवृत्त वय पूर्ण झालेले आहे. तसेच लक्ष्मी-विष्णू टेक्स्टाईल मील व्यवस्थापन अवसायनात गेलेले आहे. त्यामुळे त्यांना प्रॉव्हींडट फंडाची रक्कम मिळणे आवश्यक आहे. त्यांनी जरुर कागदपत्रांसह विरुध्द पक्ष यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. दि.30/8/1995 रोजी त्यांचे विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.18,996.46 पैसे जमा होते. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे सदर रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्च रु.2,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांना चेक नं.8466207, दि.24/7/2009 अन्वये रु.26,136/- व्याजासह अदा करण्यात आले आहेत. तक्रारदार हे दि.21/3/2002 पर्यंत त्यांचे सदस्य होते. तक्रारदार यांनी जमा रकमेविषयी केलेली आकडेमोड चूक आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? नाही. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांचे विरुध्द पक्ष यांच्याकडे प्रॉव्हीडंट फंड खाते क्र.एम.एच./एस.एल.पी./348/7223 असल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार कार्यरत असलेली मील लिक्वीडेशनमध्ये निघाल्यामुळे तक्रारदार हे कार्यमुक्त झाल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, तक्रारदार यांना भविष्य निर्वाह निधीची संपूर्ण रक्कम मिळालेली नाही, अशी त्यांची तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांना देय रक्कम व्याजासह अदा केलेली आहे. 5. निर्विवादपणे, तक्रारदार यांना चेक नं.8466207, दि.24/7/2009 अन्वये रु.26,136/- व्याजासह अदा करण्यात आले आहेत. विरुध्द पक्ष यांना मे. लक्ष्मी-विष्णू टेक्स्टाईल मील, सोलापूर यांनी दिलेल्या लेखा विवरणपत्रानुसार तक्रारदार यांना रक्कम अदा केल्याचे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्यानंतर व्याजासह रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/21411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |