Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक १९/०४/२०२२) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ सह १४ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्त्याची मुलगी नामे कु. करुणा विजय चंद्रकापूरे हिने जेईई या अभ्यासक्रमाकरिता सन २०१७-२०१८ ते २०१८-२०१९ या २ वर्षाच्या कालावधीकरिता विरुध्द पक्षांच्या कर्मानेया टिचींग इंन्स्टीट्यूट मध्ये प्रवेश घेतला आणि त्याकरिता लागणारे शुल्क तक्रारकर्त्याने अनुक्रमे धनादेश क्रमांक २५७८०, २५७७८ आणि २५७८३, रुपये १०,५००/-, ४५,०००/- आणि १८,५००/- असे एकूण रक्कम रुपये ७४,०००/- विरुध्द पक्षांना धनादेशाव्दारे दिले. सदर धनादेश वटविल्याचे तारीख अनुक्रमे २२/०६/२०१७, २२/०६/२०१७ आणि १५/७/२०१७ आहे. यामध्ये प्रवेश शुल्काची रक्कम रुपये ६३,५००/-, मेस व वसतीगृहाची रक्कम रुपये १०,५००/- असे एकूण रक्कम रुपये ७४,०००/- शुल्क विरुध्दपक्षांना दिले. प्रवेश घेतल्यानंतर एका महिण्याचे आंत कौटुंबीक आणि आर्थिक समस्या निर्माण झाल्यामुळे तक्रारकर्त्याने त्याच्या मुलीचा विरुध्द पक्षांकडे घेतलेला प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांनी विरुध्द पक्षांच्या पदाधिका-यांची भेट घेतली आणि मुलीचा प्रवेश रद्द करुन घेतला. प्रवेश रद्द केल्यानंतर तक्रारकर्त्याने प्रवेशाकरिता भरलेली शुल्काची रक्कम परत मागितली तेव्हा विरुध्द पक्षांच्या पदाधिका-यांनी तुम्हाला रक्कम परत मिळेल असे आश्वासन दिले. तक्रारकर्त्याने त्यानंतर विरुध्द पक्षांकडे वारंवार भेट देवून रक्कम परत देण्याची विनंती केली परंतु आजतागायत तक्रारकर्त्यास सदर रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक ५/८/२०१९ रोजी विरुध्द पक्षांना अधिवक्ता श्री मेश्राम मार्फत नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होऊनसुध्दा विरुध्द पक्षांनी त्याचे उत्तर वा पुर्तता केली नाही. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास प्रवेशाची रक्कम परत न केल्यामुळे शारीरिक व मानसिक ञास झाला. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की, विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास प्रवेशाकरिता भरलेली रक्कम रुपये ७४,०००/- तसेच त्यावर १८ टक्के व्याजासह परत करावी याशिवाय शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये १,००,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रुपये १५,०००/- द्यावे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्यात आले. नोटीस प्राप्त होऊसुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ हे आयोगासमक्ष उपस्थित झाले नाही करिता विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक १३/०१/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपञ, तक्रार अर्ज व शपथपञातील मजकुरालाच त्यांचे लेखी युक्तिवाद समजण्यात यावे अशी पुरसिस दाखल तसेच तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष १. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांचा होय ग्राहक आहे कायॽ २. विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांनी तक्रारकर्त्याप्रति होय न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ ३. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे मुद्दा क्रमांक १ व २ बाबतः- - तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याची मुलगी नामे करुणा विजय चंद्रकापूरे हिने विरुध्द पक्षांच्या कर्मानेया टिचींग इंन्स्टीट्यूट मध्ये जेईई या अभयासक्रमाकरिता सन २०१७-२०१८ करिता प्रवेश घेतला होता व त्याकरिता तक्रारकर्तीने प्रवेश शुल्क, मेस व वसतीगृहाचे शुल्क असे एकूण रक्कम रुपये ७४,०००/- चा भरणा विरुध्द पक्षांकडे धनादेशाव्दारे केलेला आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते.
- विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास दिनांक १९/०६/२०१७ रोजी रुपये ४५,०००/- व रुपये १०,५००/- रक्कम प्राप्त झाल्याबाबत पावत्या दिल्या. सदर पावत्या तक्रारकर्त्याने प्रकरणात दस्त क्रमांक १० व ११ वर दाखल केलेल्या आहेत याशिवाय तक्रारकर्त्याने धनादेश दिलेल्या त्याच्या बॅंक ऑफ इंडिया मध्ये असलेला क्रमांक ९६३५१०१००००३२२६ च्या बचत खाते पुस्तकाची नक्कल दाखल केली असून त्यामध्ये तक्रारकर्त्याने अनुक्रमे दिलेल्या धनादेश क्रमांक २५७८०, रुपये १०,५००/-, २५७७८ रुपये ४५,०००/- व २५७८३ रुपये १८,५००/- विरुध्द पक्षांना धनादेशाव्दारे रक्कम जमा झाल्याची नोंद आहे. तसेच तक्रारकर्त्याने आपल्या कथनापृष्ठर्थ शपथपञ सुध्दा दाखल केले आहे. यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांना रुपये ७४,०००/- दिल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याचा आक्षेप विरुध्द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्या समर्थनार्थ कोणतेही म्हणणे प्रकरणात दाखल केले नाही. तक्रारकर्ता हा त्याच्या आर्थिक व कौटुंबिक समस्यामुळे मुलीला जेईई चे शिक्षण देवू शकत नसल्यामुळे त्याने विरुध्द पक्षांच्या पदाधिका-यांसोबत भेट घेवून मुलीचा जेईई अभ्यासक्रमाकरिता प्रवेश रद्द केला व त्यानंतर विरुध्द पक्षांकडे अभ्यासक्रमाकरिता भरणा केलेल्या शुल्काची वारंवार मागणी केली परंतु विरुध्द पक्षांनी शुल्काची रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊनही परत केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांना दिनांक ५/८/२०१९ रोजी अधिवक्ता श्री मेश्राम यांचे मार्फत नोटीस पाठवून शुल्काची मागणी केली. विरुध्द पक्षांना नोटीस प्राप्त होऊन सुध्दा त्यांनी नोटीसची पूर्तता केली नाही व उत्तर सुध्दा दिले नाही. सदर नोटीस पोस्टाची पावती, ट्रॅक रिपोर्ट प्रकरणात दाखल केलेला आहे. तक्रारकर्त्याच्या मुलीने विरुध्द पक्षांकडे जेईई चे शिक्षणच घेतले नाही त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांकडून शुल्काची पूर्ण रक्कम मिळण्यास पाञ असल्यावरही व त्याने शुल्काची रक्कम परत मागितल्यावरही विरुध्द पक्षांनी शुल्काची रक्कम परत न करुन तक्रारकर्त्याप्रति न्युनतम सेवा दिल्याचे सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांकडून JEE च्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश, मेस व वसतीगृहाकरिता भरणा केलेल्या शुल्काची संपूर्ण रक्कम रुपये ७४,०००/- तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १४६/२०१९ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्याला शुल्कापोटी भरणा केलेली संपूर्ण रक्कम रुपये ७४,०००/- परत द्यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावेत.
(किर्ती वैद्य (गाडगीळ)) (कल्पना जांगडे (कुटे)) (अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष | |