Maharashtra

Nagpur

CC/46/2021

SHRI. JAIRAJ S/O T. VIJAYAN MENON, THROUGH HIS POWER OF ATTORNEY SHRI. AAROUNI VERMA - Complainant(s)

Versus

KARHANDLA FARM AND RESORT, THROUGH MANAGER SHRI. PIYUSH MAHAKALKAR - Opp.Party(s)

ADV. J.H. KOTHARI

05 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/46/2021
( Date of Filing : 19 Jan 2021 )
 
1. SHRI. JAIRAJ S/O T. VIJAYAN MENON, THROUGH HIS POWER OF ATTORNEY SHRI. AAROUNI VERMA
R/O. RIVERSIDE, CALIFORNIA, UNITED STATES OF AMERICA AND R/O. FRIENDS COLONY, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. KARHANDLA FARM AND RESORT, THROUGH MANAGER SHRI. PIYUSH MAHAKALKAR
R/O. BHIVAPUR, NAVEGAON DESHMUKH, KARHANDLA, UMRER, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. TARIQUE HAFEEZ OWNER OF KARHANDLA FARM AND RESORT
R/O. BHIVAPUR, NAVEGAON DESHMUKH, KARHANDLA, UMRER, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. J.H. KOTHARI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 05 Aug 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्ता हा कॅलिफोर्निया, अ‍मेरिका येथे राहत असल्‍यामुळे सदरची तक्रार दाखल करण्‍याकरिता त्‍याने आरोनी वर्मा यांच्‍या नांवे आममुख्‍यत्‍यार पत्र दिलेले आहे. करिता तक्रारकर्ता तर्फे आममुख्‍यत्‍यारधारक यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 पियुष महाकाळकर हे करांडला फर्म अॅन्‍ड रिसोर्टचे मॅनेजर  असून वि.प. क्रं. 2 तारीक हाफीज हे करांडला फर्म अॅन्‍ड रिसोर्टचे मालक आहेत. सदरचे रिसोर्ट हे तह.भिवापूर, नवेगाव देशमुख, करांडला, ता. उमरेड, जि. नागपूर येथे आहे. त.क.ने वि.प.च्‍या फर्म हाऊसमध्‍ये वास्‍तव्‍य करण्‍याकरिता दि. 15.02.2020 ला ई-मेल द्वारे   24 वयस्‍क व्‍यक्‍ती व 6 मुलांचे राहणे, नास्‍ता व जेवणाच्‍या सोयीसह दि. 27.12.2020 ते 30.12.2020 या कालावधीकरिता रुपये 3,50,000/- चे पॅकेज घेऊन आरक्षण केले होते व त्‍याकरिता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 च्‍या खात्‍यात दि. 03.04.2020 रोजी रुपये 1,05,000/- इतकी रक्‍कम जमा केली होती. परंतु डिसेंबर 2020 मध्‍ये कोविड-19 च्‍या महामारीमुळे संपूर्ण देशात संचारबंदी करण्‍यात आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला आपल्‍या पर्यटनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे त्‍याची जमा असलेली  रक्‍कम दि. 24.09.2020 रोजी परत करण्‍याची विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची जमा पूर्ण रक्‍कम न देता त्‍यामधून रुपये 35,000/- वजा करुन  तक्रारकर्त्‍याला केवळ रुपये 70,000/- परत केले. विरुध्‍द पक्षाने वजा केलेली रक्‍कम परत मिळण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला अनेक वेळा विनंती केली, परंतु त्‍याचा उपयोग न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 06.10.2020 रोजी विरुध्‍द पक्षाला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. त्‍यावर ही विरुध्‍द पक्षाने कुठलीही  कार्यवाही न केल्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन मागणी केली की, वि.प. 1 व 2 यांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केल्‍याचे घोषित करावे. तसेच तक्रारकर्त्‍याची विरुध्‍द पक्षाकडे जमा असलेली रक्‍कम रुपये 35,000/-,  द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
  2.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 ला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन त्‍यांनी सदरची नोटीस घेण्‍यास नकार दिल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 19.07.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  3.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले. त्‍यांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविला.  

                अ.क्रं.                मुद्दे                                                                               उत्‍तर

                 1          तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                   होय

                 2.        विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी

                           प्रथेचा अवलंब केला काय     ?                                                              होय

                 3.       काय आदेश    ?                                                                        निष्‍कर्षानुसार

  • निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे  दि. 27.12.2020 ते 30.12.2020 या 3 दिवसाच्‍या पर्यटनाकरिता  24 वयस्‍क व्‍यक्‍ती व 6 मुले यांच्‍या  राहणे, नास्‍ता व जेवणाच्‍या सोयीसह रुपये 3,50,000/- चे पॅकेजचे आरक्षण केले होते व ठरल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 च्‍या खात्‍यात दि. 03.04.2020 रोजी रुपये1,05,000/- जमा केले असल्‍याचे नि.क्रं. 2(1 व 2) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. कोविड -19 महामारीमुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागल्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याला पर्यटनाचा कार्यक्रम रद्द करावा लागल्‍याने त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे केलेले आरक्षण रद्द केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा असलेली रक्‍कम रुपये 1,05,000/- परत करण्‍याची विनंती केली असता विरुध्‍द पक्षाने सदरच्‍या रक्‍कमेतून रुपये 35,000/- वजा करुन निव्‍वळ रुपये 70,000/- परत केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून कुठल्‍याही प्रकारची सेवा घेतलेली नसतांना ही विरुध्‍द पक्षाने त्‍याच्‍या जमा रक्‍कमेतून रुपये 35,000/- वजा करणे ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे दिसून येते.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याची रक्‍कम रुपये 35,000/- व त्‍यावर दि. 03.04.2020 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह परत करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1.  उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.