निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 21/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 17/04/2013
कालावधी 01वर्ष.03 महिने.13 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पांडुरंग पिता.बाजीराव खरवडे. अर्जदार
वय 61 वर्षे. धंदा.शेती. अड.एम.ई.भोसले.
रा.किन्होळा ता.व जि.परभणी.
विरुध्द
कार्यकारी अधिकारी, गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ,शाखा परभणी. अड.डी.यु.दराडे.
आय.टी.आय.जवळ,परभणी ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य)
अर्जदार पांडुरंग पिता बाजीराव खरवडे याची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या विरुध्द निकृष्ट दर्जाचे बियाणे विकत दिल्यामुळे व ते पेरल्यावर उगवण न झाल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की,
अर्जदार हा किन्होळा ता.जि.परभणी येथील रहिवासी असून तो शेतकरी आहे त्याच्या नावे 10 Acre जमीन किन्होळा ता.जि.परभणी येथे आहे अर्जदार हा 25 वर्षांपासून म.रा.बियाणे महामंडळ म.अकोला शाखा परभणीचा सदस्य आहे.तो बियाणे महामंडाळाचे बियाणे बनवण्याचा कार्यक्रम त्याच्या शेतात राबवतो.तो महामंडळाकडून देण्यांत आलेल्या Foundation Seed स्वतःच्या शेतात पेरतो.ते बियाणे उगवल्यानंतर योग्यवेळी त्याची काढणी करुन तयार झालेले बियाणे परत महामंडळाला विकतो.
त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, त्याने जुन 2011 या वर्षासाठी महामंडळा कडून सोयाबीन चे Foundation Seed विकत घेतले त्याची किमत रुपये 3240/- हे महामंडळाच्या नावाने चलनाव्दारे बँकेत भरले,नंतर त्याने त्याची पेरणी 3 एकर जमिनीत शास्त्राशुध्द पध्दतीने आवश्यक तेव्हढया खतासह केली.नंतर मुबलक पाऊसही झाला नंतर हे पाहून त्याला धक्का बसला की, संपूर्ण 3 एकर शेतात 10 ते 15 सोयाबीनची रोपे उगवली त्याच्या लक्षांत आले की, मंहामंडळाने त्याला उगवण क्षमता नसलेले निकृष्ट दर्जाचे foundation Seed विकलेले आहे ज्याच्यामुळे त्याच्या शेतात सोयाबीन उगवलेच नाही.अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, त्याने गट विकास अधीकारी पंयाचत समिती यांच्याकडे तक्रार अर्ज दिला व पंचनामा करुन अहवाल देण्याची विनंती केली.
त्यावर कृषी अधिकारी व इतर अधिकारी यांनी त्याच्या शेतीस भेट देवुन पंचनामा केला आहे की, बियाण्यांची उगवण शक्ती 0.01 टक्के आहे.
तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, त्याचा पेरणीचा खर्च ( बियाणे धरुन ) रुपये 6040/- झाला आहे व तीन एकरात 30 ते 32 Quintal सोयाबीन झाले असते व मागील वर्षी दिलेल्या भावाने त्याचे 76500/- ते 80,000/- रुपये होतात एकंदरीत त्याचे 80,000/- रुपयांचे नुकसान झाले आहे म्हणून त्यांनी मंचास विनंती केली आहे की, त्याला झालेल्या नुकसानी बद्दल गैरअर्जदारानी त्यास भरपाई म्हणून 80,000/- द्यावेत असे आदेशीत करावे.
अर्जदाराने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे व तसेच नि.क्रमांक 5 वर दिलेल्या यादी प्रमाणे कागदपत्रे दाखल केलेले आहे.
गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी आपले म्हणणे मंचासमोर सादर केले जे नि.क्र. 12 वर आहे गैरअर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले जे नि.क्रमांक 13 वर आहे.
गैरअर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदार हा स्वतः उत्पादक आहे व खरेदीदार या नात्याने आहे व त्यामुळे तो सी.पी.अक्ट खाली ग्राहक होत नाही व तो महामंडळाचा सदस्य आहे त्यास भरपाई मागण्याचा अधिकार नाही अर्जदार व सामनेवाला यांच्यात Buy Back Policy आहे व हया पॉलिसीमुळे अर्जदार हा सी.पी.अक्ट च्या कलम 2 नुसार ग्राहक या संज्ञेत येत नाही.
सामनेवाला हा बियाणे उत्पादन करण्याचा उपक्रम शेतक-याच्या सहका-याने राबवतो व त्यासाठी तो या शेतक-यांची निवड केली होती व हया दोघांत असा करार आहे की, महामंडळाकडून शेतक-या मध्ये बियाणे उगवले जातील व ज्यांची नोंदणी सामनेवाल्यांकडे शुल्क भरल्यानंतर करतील, सदर शेतकरी बियाणे पेरेल सामनेवाला वेळोवेळी शेतीस भेट देवुन मार्गदर्शन करतील व उत्पान झाल्यावर तयार होणारे बियाणे महामंडळाकडे Processing करुन पॅक केले जातील व बियाणे प्रमाणित झाल्यावर शेतक-यास बाजार भावा पेक्षा 20 टक्के अधिक रक्कम दिली जाईल.
गैरअर्जदारांचे असे ही म्हणणे आहे की, उगवण ही अनेक घटकांवर अवलंबुन असते तसेच बियाणे नेल्यावर 20 दिवसांनी पेरले त्यामुळे ते कसे ठेवले होते व कशा
त-हेने हाताळले होते हे गैरअर्जदारांस माहित नाही म्हणून गैरअर्जदार त्याला जबाबदार नाही.
गैरअर्जदाराने मंचास अशी विनंती केली की, अर्जदाराचा दावा फेटाळण्यांत यावा व नुकसान भरपाई म्हणून त्यास 10,000/-रुपये अर्जदाराने द्यावे असा आदेश करावा. गैरअर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्र. 13 वर दाखल केले आहे.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने निकृष्ट दर्जाचे बियाणे अर्जदारास विकुन
अर्जदाराचे नुकसान केले हे सिध्द होते काय ? नाही.
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र
आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून बियाणे विकत घेतले होते हे त्याने दाखल केलेल्या बँक चलनावरुन सिध्द होते, म्हणून तो सी.पी.अक्ट च्या कलम 2 (1) (डी) नुसार गैरअर्जदाराचा ग्राहक होतो.
गैरअर्जदाराने असा बचाव घेतला आहे की, Buy Back Policy अंतर्गत बियाणे शेतक-यांने विकत घेतले आहे व म्हणून तो गैरअर्जदाराचा ग्राहक होत नाही, हा बचाव मंचास योग्य वाटत नाही कारण Buy Back Policy चे दोन पार्ट होतांत एक शेतक-यांने पैसे देवुन महामंडळा कडून बियाणे विकत घेणे व दोन उत्पादीत बियाणे महामंडळास Processing साठी परत विकणे वरील Buy Back Policy च्या Part 1 मध्ये शेतकरी हा महामंडळाचा ग्राहक आहे. व त्या Part साठीच त्याची तक्रार आहे दुस-या पार्ट मध्ये तो विक्रेता आहे व त्या पार्ट बद्दल त्याची तक्रार नाही.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार हा महामंडळाचा सदस्य असल्यामुळे तो खरेदीदार ही आहे व त्या नात्याने तो ग्राहक होत नाही हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. त्याचे कारण असे की, महामंडळ हि एक Statutory Co आहे आणि कंपनी Act प्रमाणे Company ही एक वेगळी Legal Entity आहे व ती तीच्या सदस्य पासून वेगळी आहे व तीला सदस्य किंवा इतर कोणाही विरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याचा अधिकार आहे व तसेच सदस्यासह ईतर कोणलाही कंपनीच्या विरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याचा अधिकार आहे म्हणून अर्जदाराने तिच्या विरुध्द तक्रार करणे ह्यात काहीही बेकायदेशिर नाही.
मा.सर्वोच्च न्यायालयाने M Madhusudhan Reddy & Others V/s National Seed Corp. Ltd. ह्या अपील मध्ये असे म्हंटले आहे की, “ Seed purchased by the farmers / growers by paying price to the national seed Corporation would fall within the ambit of section 2(1)(d) (i) of the consumer protection Act – Can avail The remedies available to the consumer of goods ”
प्रस्तुत अपील मध्ये देखील शेतक-याने Buy Back Scheme अन्वये बियाणे खरेदी केलेले होते प्रस्तुत अपील मधील Para 32 व 33 मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने Buy Back Scheme मधील शेतकरी हा ग्राहक कसा होते यांचे विस्तृत विवेचन व खुलासा केलेला आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे “जे काही पैसे दिले त्यात 300 रुपये Fee आहे ” व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा करार आहे मंचाचे असे म्हणणे आहे की, एकतर महामंडळाने ( गैरअर्जदाराने ) अर्जदारास कोठलेही मार्गदर्शन केलेले नाही किंवा चुकीचे मार्गदर्शन केलेले आहे नसता उगवण 0.01 टक्के झाले नसते.
गैरअर्जदाराचे असे म्हणणे की,बियाणे डिफेक्टीव्ह आहे किंवा नाही या बद्दल समितीने दिलेला अहवाल ग्राहय धरता येणार नाही व ते सक्षम लॅबोरेटरीकडून Analysis करुन घ्यावयास पाहिजे.
हे गैरअर्जदाराचे म्हणणे मंचास अशंतः योग्य वाटते कारण अर्जदाराने जो अहवाल सादर केला आहे तो नि.क्रमांक 5/5 वर आहे. तो कोठल्या संमितीने दिला आहे याचा उल्लेख नाही अहवालावर सदर समितीचा कार्यालयीन शिक्का नाही.
तसेच गट नं.99 किन्होळा ता.परभणी जिल्हा लातूर असा उल्लेख आहे ह्यावरुन तो अहवाल योग्य आहे असे मंचास वाटत नाही.म्हणून मंचास असे वाटते की, गैरअर्जदाराने अर्जदारास निकृष्ट बियाणे विकले होते हे म्हणणे अर्जदाराने सिध्द केले नाही, म्हणून वरील उपस्थित मुद्याचे उत्तर नाही असे देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1 अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष