निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 20/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 21/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 17 /08/2013
कालावधी 01वर्ष. 07 महिने. 27 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मुमताज बेगम भ्र.म.गौसोद्दीन. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा.घरकाम. अड.एस.बी.नांदखेडकर.
रा.युसूफ कॉलणी.परभणी.
विरुध्द
1 मा.कार्यकारी अभियंता,(शहर विभाग) गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि. अड.एस.एस.देशपांडे.
परभणी.
2 मा.कनिष्ठ अभियंता.
महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि.
परभणी झोन क्र.2, ए-1,मार्केट,परभणी
3 मा.मंडळ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि.परभणी .
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे बील देवुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून तो गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. त्याचा ग्राहक नंबर 530010258137 असून तो घरगुती वापरासाठीचा आहे.अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने मागील दोन वर्षांपासून मीटरचे रिडींग न घेताच बील दिली,म्हणून अर्जदाराने 05/02/2010 रोजी गैरअर्जदारास लेखी तक्रार करुन विनंती केली होती की, मिटर रिडींग प्रमाणे 580 युनिटचे बील द्यावे,परंतु गैरअर्जदाराने तसे केले नाही,नंतर गैरअर्जदाराने जून 2005 चे बील 1450 रुपये भरले त्यांत मागील रिडींग 9963 व चालू रिडींग आर.एन.ए. दाखवले अर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, त्याने गैरअर्जदाराकडे जमा केलेली विद्युत बील खाली दिलेल्या तक्त्या प्रमाणे आहेत.
अनु क्रमांक | बिल दिनांक | चालू रिडींग | मागील रिडींग | रक्कम | युनीट |
1 | 30/05/2009 | आर.एन.ए. | 9963 | 1450/- | 0 |
2 | 24/12/2009 | 9152 | -- 8400 | 12540/- | 752 |
3 | 25/01/2010 | फॉल्टी | 9152 | 14390/- | 225 |
4 | 26/02/2010 | 10470 | -- 7152 | 24220/- | 1318 |
5 | 26/05/2010 | 14046 | -- 12342 | 51040/- | 1704 |
6 | 27/12/2010 | इनॅसेस | 20123 | 137640/- कमी4000जमा | 1454 |
7 | 25/01/2011 | 2623 | -- 20123 | 151300/- | 1454 |
8 | 22/11/2011 | लॉक्ड | 33366 | 235020/- | 841 |
9 | 26/11/2011 | 35424 | -- 33360 | 249210/- | 2058 |
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, 31/10/2010 ते 30/11/2010 चे देयक दिनाक 07/12/2010 चे देयक मागील रिडींग 20123 व चालू इनएक्सेस असे दाखवले व 1454 युनीटचे बील रुपये 1,37,640/- दिले. अर्जदार परत गैरअर्जदाराकडे जावुन बील दुरुस्त करुन देण्याची विनंती केली, तेव्हा गैरअर्जदाराने सदरचे बील दुरुस्त करुन चारहजार रुपये बील दिले व अर्जदाराने ते भरले. यानंतर गैरअर्जदाराने वेगवेगळया रिडींगचे बील देवुन शेवटी 18/09/2011 ते 19/10/2011 चे 2,35,020/- रुपयांचे बील अर्जदारास दिले. ज्यामध्ये चालू रिडींग लॉक्ड व मागील रिडींग 33366 युनीट दर्शवुन 841 युनीटचे बिल दिले.सदरचे बील दुरुस्त करुन देण्याची विनंती अर्जदाराने गैरअर्जदारास केली होती, परंतु गैरर्जदाराने त्यास नकार दिला. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, 2,35,020/- चे बील दुरुस्त करुन युनीट प्रमाणे बील द्यावीत व मानसिकत्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 2,000/- रुपये अर्जदारास देण्याचे गैरअर्जदारास आदेश करावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे व नि.क्रमांक 7 वर 13 कागदपत्रांच्या यादीसह 13 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये अर्जदाराने गैरअर्जदारास बील दुरुस्तीसाठी दिलेले अर्ज, एप्रिल 2010चे बील, नोव्हेंबर 2010 चे बील, 4,000/- रुपये भरल्याची पावती, डिसेंबर 2010 चे बील, ऑक्टोबर 2011 चे बील, नोव्हेंबर 2001 चे बील, डिसेंबर 2001 चे बील, जानेवारी 2010 चे बील, नोव्हेंबर 2011 चे विवादीत बील ईत्यादींचा समावेश आहे.
मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीसा काढण्यात आल्या गैरअर्जदार वकीला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब दाखल केला.त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे व गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. अर्जदाराने वेळच्या वेळी लाईट बिले भरली नाही, त्यामुळे थकबाकीवर व्याज वाढले, त्यामुळे विज बिलाची रक्कम जास्त दिसते. वास्तविक विज बिले रिडींग प्रमाणे दिली आहेत व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, वास्तविक अर्जदाराने ऑक्टोबर 2008 पासून, 27/10/2005, 08/06/2009 व 18/01/2011 असे तिनदाच बिले भरले आहे व अर्जदाराला विनंती वरुनच 4,000/- चा हप्ता करुन दिला व तो भरला त्यानंतर अर्जदाराने हप्ते भरले नाहीत व गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही त्यामुळे सदरचे प्रकरण खर्चासह खारीज करावे, अशी मंचास विनंती केली आहे.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 15 वर दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियती वरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे बील रु.2,35,020/-
(ऑक्टोबर 2011) चे देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 7 मधील दाखल केलेल्या लाईट बिलावरुन सिध्द होते.अर्जदाराने दाखल केलेल्या सर्व बिलाचे अवलोकन करता असे दिसते की, रिडींग न घेताच गैरअर्जदाराने अर्जदारास बिले दिलेले आहेत, हे सिध्द होते.
तसेच दिनांक 31/03/2009 ते 30/4/2009 चे बील मध्ये चालू रिडींग आर.एन.ए.दाखवले आहे आणि दिनांक 31/10/2010 ते 30/11/2010 च्या बिलामध्ये चालू रिडींग इनएक्सेस दाखवून 1454 युनीटचे बिल दिले आहे व त्यामध्ये 1,24,944/.55 रु.चे थकबाकी दाखवलेली आहे व नंतर तेच बिल दुरुस्त करुन त्याला 4,000/- रु. बिल दिले तसेच 18/09/2011 ते 19/10/2011 च्या बिलात चालू रिडींग लॉक्ड दाखवुन 841 युनीटचे बिल दिले आहे व तसेच 30/11/2009 ते 31/12/2009 च्या बिलात चालू रिडींग मिटर फॉल्टी दाखवुन 335 युनीटचे बिल दिले.तसेच 19/10/2011 पासून 19/11/2011 च्या देयकात चालू रिडींग 35424 व मागील रिडींग 33366 दाखवून 2056 युनीटचे बिले दिली आहे जे की, 2,49,210/- चे आहे.यावरुन असे सिध्द होते की, एकतर सदरचे मिटर फॉल्टी असावे किंवा गैरअर्जदाराने मनाला वाटेल तसे चुकीचे रिडींग बिले देवुन अर्जदारास मानसिक त्रास दिला आहे. तसेच चुकीचे बिले देवुन सेवेत त्रुटी दिली आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, सदरचे बील योग्य आहेत, हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही,कारण त्याबाबतचा कागदोपत्री पुरावा गैरअर्जदाराने (C.P.L.) मंचासमोर दाखल केला नाही, व त्यांची बाजू सिध्द केली नाही.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने आदेश तारखे नंतर सदरचे मिटरचे पूढील तिन महिन्याचे रिडींग
घेवुन प्रतीमाह सरासरी बिल काढावे व त्यानुसार 25/01/2010 पासून ऑक्टोबर
2011 पर्यंतची बिले दुरुस्त करुन द्यावीत.व अर्जदाराने भरलेली रक्कम सदर
बिलात समायोजित करावी.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिकत्रासापोटी रु. 3,000/- फक्त अक्षरी रु.तीनहजार
फक्त ) द्यावे.
4 याखेरीज गैरअर्जदाराने अर्जदारास तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- फक्त
(अक्षरी रु.दोनहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे.
5 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.