::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा. अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार ही लातूर येथील रहिवाशी असून व्यवसायाने गृहीणी आहे. अर्जदाराने Titanums-5 हा मोबाईल गैरअर्जदार क्र. 2 कडून गैरअर्जदार क्र. च्या कंपनीचा विकत आपल्या पतीला भेट देण्यासाठी दि. 05.07.2013 रोजी खरेदी केलेला होता. अर्जदाराचे पती हे वकीली व्यवसाय करत असल्याने त्यास अशा प्रकारच्या स्मार्ट फोन्सची गरज असते. परंतु सदरचा मोबाईल हा खरेदी केल्या पासुन 1 महिन्याचे आतच समस्या निर्माण करु लागला. सप्टेंबर महिन्यात समोरच्या व्यक्तीचा आवाज फोनवर ऐकु येत नव्हता म्हणुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या सर्व्हीस सेंटरला भेट दिली असता, त्यांनी आवाज ऐकु येण्यास मोबाईलच्या ज्या भागामुळे अडथळा येत होता, तो भाग बदलुन दिला. पुन्हा तो ऑक्टोबर महिन्यात आपोआप मोबाईल चालु बंद होवु लागला म्हणुन गैरअर्जदार यांच्या सर्व्हींसींग सेंटरला भेट दयावी लागली, त्यांचा मोबाईल दुरुस्त करण्यासाठी ठेवुन घेतला व सांयकाळी मोबाईल दुरुस्त झाल्याचे सांगीतले.दि. 04.11.2013 रोजी गैरअर्जदार यांच्या सर्व्हीस सेंटरला भेट दिली असता, सर्व्हींसींग सेंटरने अर्जदारास सांगीतले सदरचा मोबाईल दुरस्त होवु शकत नाही. तो दिल्ली येथे पाठवावा लागेल, असे सांगीतले. अर्जदार यांनी सर्व्हीसींग सेंटरकडे सदरील मोबाईल सुपुर्द केल्यानंतर त्यास जॉबशीट कार्डनंबर KJ ASPMH -078113k 16419 दि. 04.11.2013 तारखेचा देण्यात आला व त्यावेळेस गैरअर्जदाराच्या सर्व्हीस सेंटरने सांगीतले की मोबाईल परत आल्यानंतर कळवले जाईल. अर्जदार यांनी 5 नोव्हेंबर 2013 ते 11.12.2013 दरम्यान गैरअर्जदार क्र. 1 यांना मोबाईल हॅन्डसेटच्या सध्यस्थिती विषयी मोबाईलमध्ये झालेल्या दोषा विषयी तसेच मोबाईल दुरुत करण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत चौकशी करणारे अनेक ईमेल पाठविले, परंतु गैरअर्जदार क्र. 1 यांच्या कर्मचा-यांनी सुरुवातीच्या दोन ईमेल चे उत्तर सोडून इतर सर्व ईमेलची उत्तरे ही दिले नाहीत, व मोबाईलमध्ये झालेल्या दोषाचे स्वरुप व मोबाईल दुरुस्त होण्यासाठी वेळ न दर्शविता नुसती आश्वासने देणारी होती. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना दि. 11.12.2013 रोजी पाठवलेल्या ईमेल द्वारे त्याच्या गैरअर्जदार यांनी दिलेल्या दोषपुर्ण सेवेबद्दल योग्य न्यायालयात जाण्यास सांगीतले तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी इमेलच्या उत्तरात सदरचा मोबाईल हा दिल्ली येथील मुख्य कार्यालयातून आधीच परत पाठविला. तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे. म्हणुन अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रु. 7500/- किंमतीचा नविन मोबाईल खरेदी करावा लागला, त्यामुळे जो अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला, त्यासाठी रु. 50,000/- दयावेत, व रु. 7500/- चा नवीन हॅण्डसेट घ्यावा लागला, त्याचे पैसे दयावेत, अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदाराच्या म्हणण्या मध्ये असे आले आहे की, अर्जदाराने मोबाईल दि. 05.07.2013 रोजी हॅण्डसेट Titanum S 5 हा कार्बन कंपनीचा विकत घेतला व दोन महिन्यानंतर त्यात दोष सुरु झाला, त्यात ऐकण्याचा दोष आढळला तो अचानक चालु बंद होत होता व त्यासाठी दिल्ली ब्रँचला सदरचा मोबाईल दुरुस्तीसाठी पाठविण्यात आला, यासर्व बाबी गैरअर्जदार क्र. 2 यास माहिती नाहीत त्या सर्वथा चुकीच्या व खोटया आहेत. तसेच सदरचा मोबाईल हा गैरअर्जदार क्र. 1 कडे दि. 04.11.2013 रोजी जॉब शीट क्र. KJ ASP MH 107811 3K 16419 पाठवला हे गैरअर्जदार क्र. 2 याबद्दल काहीही माहिती नाही. दि. 05.11.2013 ते 11.12.2013 या काळातील ईमेल द्वारे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1ची संपर्क साधला याबाबतची माहिती गैरअर्जदार क्र. 2 ला माहिती नसल्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदाराच्या सेवेत कोणतीही त्रूटी केलेली नाही. व या काळात अर्जदारास रु.7500/- चा नवीन मोबाईल घ्यावा लागला व त्या हॅण्डसेटचे पैसे गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने दयावेत हे म्हणणे चुकीचे असत्य असे आहे. तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 कडून मोबाईल घेतला ही बाब गैरअर्जदार क्र. 2 यांना मान्य आहे, मात्र वेळोवेळी तो कार्बन कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला भेट देत राहीला, याबद्दल गैरअर्जदार क्र. 2 ला काहीच माहिती नाही. यामुळे अर्जदाराने सर्व्हीस सेंटर कार्बन मोबाईल यास पार्टी करावयास पाहिले होते, म्हणुन सदरच्या केसमध्ये गैरअर्जदार क्र. 2 ची काहीही त्रूटी अर्जदारास सेवा देण्यात झाली नसल्यामुळे, अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा ग्राहक आहे, त्याने दि. 05.07.2013 रोजी कार्बन कंपनीचा मोबाईल S 5 Titanum रक्कम रु. 11,200/- ला विकत घेतले होते. अशी पावती क्र. 3571 अर्जदाराने न्यायमंचात दाखल केलेली आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केल्याचे निष्पन्न होते. अर्जदार हा वेळोवेळी गैरअर्जदार क्र. 1 च्या सर्व्हीस सेंटरला भेट देत राहिला, अर्जदाराने मोबाईल विकत घेतला त्यानंतर दोन महिन्या पासुन तो सतत बिघडत राहिला कधी त्यास मोबाईल वरील कॉल मधील दुस-या व्यक्तीचे बोलणे स्पष्ट ऐकु येत नव्हते , तर कधी तो मोबाईल आपोआप चालु बंद होत होता, यावरुन त्यात निर्मीती दोष असल्याचे सिध्द होते, अर्जदार वेळोवेळी गैरअर्जदार क्र. 1 च्या सर्व्हीस सेंटरला भेट देत राहिला, मात्र अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 च्या सर्व्हीस सेंटरला पार्टी केलेले नाही. तसेच त्या मोबाईलची मागणी देखील केलेली नाही. त्या काळात नवीन मोबाईल घ्याचा लागला त्या मोबाईची रु.7500/- मागत आहे. त्यामुळे ती मागणी अर्जदाराची मागणी योग्य वाटत नाही. म्हणुन केवळ अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व गैरअर्जदार क्र.1च्या सर्व्हीस सेंटरशी संपर्क होत राहिला याची माहिती गैरअर्जदार क्र. 2 ला नाही व त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 ला ही बाब मान्य आहे की, अर्जदाराने त्याच्या दुकानातून मोबाईल घेतला मात्र ही बाब मान्य नाही की, गैरअर्जदार क्र. 1 च्या सर्व्हीस सेंटरला तो वेळोवेळी भेट देत राहिला, व त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदाराच्या सेवेत कोणतीही त्रूटी केल्याचे निष्पन्न होत नाही; म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास त्याच्या मोबाईल मुळे जो त्रास झाला, त्या मोबदल्यात अर्जदारास नविन मोबाईल त्याच कंपनीचा नविन मॉडेलचा दिलेला असल्यामुळे, शारिरीक व मानसिक त्रासापोटी अर्जदारास रु.2000/- दयावेत,व तक्रारीच्या खर्चाबाबत आदेश नाही.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2000/-, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत
- खर्चा बाबत काही आदेश नाही.