::: निकालपत्र :::
( निकाल तारीख :19/03/2015 )
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार यांनी घरगुती वापरासाठी गैरअर्जदार यांचेकडून शुल्क भरुन विदयुत जोडणी घेतली आहे. घरगुती वापरासाठी विदयुत जोडणी अर्जदाराचे नावे घेण्यात आलेली आहे. तसेच अर्जदाराने सदर विदयुत जोडणी गैरअर्जदार कंपनीच्या लामजाना ता. औसा जि. लातूर या कार्यालयातून घरगुती वापरासाठी जोडणी घेतली आहे व ज्याचा ग्राहक क्र. 626030094936 असा असून जुने मिटर क्र. 7698722547 आहे. अर्जदार हा लामजाना ता. औसा जि. लातूर येथील रहिवाशी असून त्याच्या कुटूंबासह तीन रुम मध्ये राहतात तसेच त्यांच्या घरामध्ये तीन बल्ब्, एक पंखा व टि.व्ही. असे घरगुती विदयुत वापराची साधने आहेत. अर्जदाराने घरगुती वापरासाठी घेतलेल्या जोडणीच्या विदयुत मिटर मधुन विदयुत पुरवठा व्यवस्थीत होत नसल्याने अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या लामजाना येथील कार्यालयात वेळोवेळी तक्रार अर्ज अर्जदाराने दिले. त्यानंतर गैरअर्जदार यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांनी अर्जदार यांच्या घरातील विदयुत तपासणी करुन अतिरिक्त वापर आढळुन न आल्याने अर्जदारास माहे 2012 मध्ये दुसरे नविन मिटर गैरअर्जदाराच्या लामजाना कार्यालयातील कर्मचा-यांनी बसवुन दिले ज्याचा नविन मिटर क्र. 760153483 व पुढे काही आडवणी अर्जदारास येणार नाहीत याची हामी देवुन निघुन गेले.
त्यानंतर गैरअर्जदार कार्यालयाने अर्जदारास अचानकपणे दि. 30.04.2012 ते 31.05.2012 या कालावधीतील थकीत बिल आकारुन सदरील बिल दिले. सदरील बिलामध्ये गैरअर्जदाराने कसलाही विचार न करता, शहानिशा न करता, अंदाजे मागील थकीत बिल म्हणुन सदरील बिला मध्ये रु. 38,132.71 पैसे अशी रक्कम दाखवुन बील थकीत रक्कम रु. 38,384.39 पैसे असे मिटर रिडींग्ची तपासणी न करता बील अर्जदारास दिले जे की, पुर्णपणे चुकीचे , खोटे व अंदाजे आहे. अर्जदार चालु मिटर रिडींग प्रमाणे बिल भरण्यास तयार आहे. सदर रु. 38,384.39 बील कपात करुन मिटर रिडींग प्रमाणेच बील अर्जदारस दयावे. अर्जदाराचे मागील महिन्यातील म्हणजे डिसेंबर 2011 मध्ये 30 युनिट, जानेवारी 2012 मध्ये 30 युनिट, फेब्रूवारी 2012 मध्ये 30 युनिट, मार्च 2012 मध्ये 200 युनिट, एप्रिल 2012 मध्ये 50 युनिट, मे 2012 मध्ये 59 युनिट, जुन 2012 30 युनिट, जुलै 2012 मध्ये 86 युनिट , ऑगष्ट 2012मध्ये 71 युनिट, सप्टेंबर 2012 मध्ये 08 युनिट, ऑक्टोबर2012 मध्ये 36 युनिट, नोव्हेंबर 2012 मध्ये 37 युनिट, डिसेंबर 2012 मध्ये ... युनिट जानेवारी 2013 मध्ये 44 युनिट अर्जदार यांचे सरासर युनिटचा वापर आहे, परंतु गैरअर्जदाराने मे 2012 मध्ये रक्कम रु. 38,384.39 पैसे बिल दिले असून ते चुकीचे खोटे आहे.
गैरअर्जदार कार्यालयाने दि. 13.12.2012 रोजी अर्जदार यांच्या घराचे विदयुत जोडणी बिल थकीत असल्याचे कारण दाखवुन विज तोडली व रु. 5000/- चा भरणा अर्जदाराने दि. 13.12.2012 रोजी केल्यानंतर रु. 50/- परत जोडणीचे घेवुन गैरअर्जदार कार्यालयाने पुर्ववत केली थकीत बिलाची रक्कम / बील हे पुर्णपणे चुकीचे खोटे व अंदाजे असल्यामुळे अर्जदारास त्याचा त्रास सोसावा लागला. अर्जदार हे गैरअर्जदार कार्यालयाचे नियमित विज भरणा करणारे ग्राहक आहेत. तसेच तक्रार बिल भरनेस तक्रार अर्जदार तयार आहे, सदरील अर्ज निकाल काढेपर्यंत तक्रारी बील थांबवावे व चालु असलेल्या बिलाचा भरण्यास तयार आहे. वर नमुद सर्व बाबीचा विचार करुन अर्जदार यांना त्यांना बसवलेल्या मिटर रिडींग प्रमाणे बिल आकारणी करावी. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5000/- व सदरील तक्रार अर्ज दाखल करण्याचा खर्च रक्कम रु. 5000/- मंजुर करावा, व सदरची रक्कम रु. 10,000/- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी संयुक्त अथवा वैयक्तीक अर्जदारास दयावी, अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र; 1 ते 3 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले, त्यात अर्जदाराचे घरी दामीनी स्कॉड फॉल्टी मिटर आहे म्हणुन येऊन गेला होता, व स्कॉडने घराच्या बाहेरील रिसरात डिजीटल मिटर बसवले होते. हे अर्जदाराच्या म्हणण्यानुसार बदल केला होता. अर्जदाराच्या घरात तीन बल्ब एक फॅन व एक टि.व्ही. संच आहे हे म्हणणे बरोबर नाही. तसेच अर्जदाराच्या म्हणण्या नुसार डिजीटल इलेक्ट्रॉनिक मिटर वीजेची चोरी होवु नये म्हणुन गैरअर्जदाराने बसवले, त्याचा नं. 760153483 असा आहे, एप्रिल , मे 2012 मध्ये गैरअर्जदाराच्या वतीने दामीनी स्कॉड ने अर्जदाराच्या घराचे मिटरची तपासणी केली असता ते मिटर बंद अवस्थेत आढळुन आले. म्हणुन त्याच्यावर वीज भारतीय कायदा 2003 कलम 135 भा.द.वि. नुसार गून्हा केलेला आहे, म्हणुन त्यास असेसमेंट बिल रु. 38,132.71/- असे देण्यात आले. त्यामुळे सदरचे बिल हे योग्य व कायदेशीर आहे. यातील अर्धे बील कलम 127 भारतीय वीज कायदा अंतर्गत भरुन अपील करावयाचे होते, व महावितरण न्यायालयात प्रकरण दाखल करावयास हवे होते. सदरचे प्रकरण हे या न्यायमंचास चालवता येणार नाही म्हणुन अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे व त्याने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांच्याकडून मीटर क्र. 626030094936 असा दिलेला आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदाराने दाखल केलेल्या बिलाचे अवलोकन केले असता, 2012 या वर्षीचे जानेवारी – 30 युनीट, फेब्रूवारी - 30 युनिट, माच्र – 200 युनिट, एप्रिल – 50 युनिट, जुन -36 युनिट,जुलै – 86 युनिट, ऑगष्ट – 71 युनिट, सप्टेंबर - 08, ऑक्टोबर – 36 , नोव्हेंबर - व दि. 13.12.2012 ला रिकनेक्शन घेण्यात आले. दामिनी स्कॉडने सदर मिटरचे अवलोकन केले व सदरचे मिटर दि. 30.04.2012 ते 31.05.2012 या कालावधीत बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. व घराच्या बाहेर लावलेले मीटर असून त्याची रिडींग ही त्यादिवशी 59 अशी आहे. सदर केसमध्ये पुर्ण 10 महिन्याचे युनिटचे अवलोकन केले असता मार्च 2012 मध्ये सर्वात जास्त युनिट म्हणजेच 200 युनिटचे बिल आलेले दिसून येते. सरासरी अर्जदारास दहा महिन्याचे अवलोकन केले असता 60 युनिट ह प्रत्येक महिन्याला पडावयास हवे कारण हे युनिट पुर्ण दिलेले आहेत त्याचे पुर्ण गणित करता 10 महिन्यात वीजेचा वापर हा 600 युनिट इतका होतो. म्हणुन 200 युनिट चे जे मार्च महिन्यात बिल आले त्यावेळी अर्जदाराने कोणताही उजर नोंदवलेला दिसत नाही. तसेच दामिनी स्कॉड ने दि. 27.06.2012 रोजी सदर दिवशी गेलेलेा आहे व अर्जदाराचा वीज पुरवठा डिसेंबर 2012 या तारेखस बंद केला असल्यामुळे तो पुर्ववत दि. 13.12.2012 रोजी रिकनेक्शन चार्जेस घेवुन केलेला आहे. अर्जदाराचे दि.30.04.2012 ते 31.05.2012 या कालावधीत दिलेले थकीत बिल रु. 38,132.55 पैसे रद्द करण्यात येते; गैरअर्जदाराने अज्रदाराच्या मागील युनिटचे सीपीएल न्यायमंचात दाखल केलेले नाही, तसेच अर्जदाराची कमीत कमी सरासरी वीज वापर 60 युनिटचे येत असावे, हे गणित मागील 11 महिन्याचे बिलांवरुन दिसून येते. तसेच दामिनी स्कॉड आला होता तेंव्हा मीटर जुन महिन्यात बंद अवस्थेत दाखवलेले आहे. म्हणजेच अर्जदाराने मे मध्येच रु. 38,138.55 एवढे थकीत बिल कशाच्या आधारावर दिले त्याचा पुरावा गैरअर्जदार देवु शकला नाही.म्हणुन हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज अंशत: मंजुर करत आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने दिलेले बिल रु. 38132.71 पैसे रद्द करण्यात येत आहे, त्यास आदेशा प्रमाणे बिल दयावे व ते जमा केलेल्या रक्कमेतुन वळती करुन घ्यावे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदाराने अर्जदारास बिल रक्कम रु्. 38132.71 पैसे रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदाराने दि.30.04.2012 ते 31.05.2012 या कालावधी मधील सुधारीत सरासरीचे बिल देण्यात यावे.
- अर्जदाराने सुधारीत बिलाची रक्कम गैरअर्जदाराकडे भरावे व तसा अहवाल मंचास दयावा.
- गैरअर्जदाराने मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3000/- व दाव्याचा खर्च रु. 2000/- दयावा.
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदाराने अंतरीम आदेशास अधीन राहुन भरलेली रक्कम रु. 10,000/- त्याच्या वापराप्रमाणे येणा-या वीज देयकात समायोजित करावी.