जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 95/2006 तक्रार दाखल तारीख- 04/01/2010
निकाल तारीख - 03/09/2011
------------------------------------------------------------------------------------
रामराव श्रीधरराव शिनगारे,
वय -60 वर्षे, व्यवसाय – शेती,
रा.मु.पो.धारुर(कुसबाविभाग), शिवाजीनगर धारुर,
ता.धारुर, जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
कनिष्ठ अभियंता, धारुर
म.रा.वि.मं. सब स्टेशन धारुर,
ता.धारुर, जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – ए.डी.काळे,
सामनेवालेतर्फे – वकील – एस.एन.तांदळे,
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार धारुर गांवचा विद्युपंपधारक आहे. तक्रारदाराचे शेतीत 3 एच.पी.चा पंप आहे. तक्रारदाराचा ग्राहक क्रं.1126 आहे. सदर पंपाचे तक्रारदारांने दि.21.12.2001 पर्यन्त रु.1,700/- भरले. नंतर 2000 पासुन तक्रारदारांना विज देयक दिले नाही. तक्रारदारांने दि.19.06.2002 ला स्वत: विज देयक मागुन घेतले होते. ता.20.9.2001 ला तक्रारदाराचा पंपाचे तार चोरीस गेले. तसेच रितसर माहिती सामनेवाले यांना दिली आहे.
तक्रारदाराने धारुर कार्यालयाना दि.20.6.2002 रोजी अर्ज दिला की, दि.20.8.2001 ते 20.4.2002 पर्यन्त मिटर बंद होते त्यामुळे त्याचे विज देयक कमीकरुन द्यावे परंतु सामनेवालेंनी सदर अर्जाची दखल घेतली नाही.
सामनेवालेंनी तक्रारदारांना बंदचे देयक दिले ते तक्रारदारांनी भरलेले नाही. कारण त्या काळात मिटर बंद होते, बील कमी केलेले नव्हते.
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचे बील कृषीसंजीवनी योजनेअंतर्गत तक्रारदाराना बील आले प्रमाणे दि.30.1.2004 ला बील भरले. तक्रारदाराना रक्कम रु.2,765/- चे बील दिले. सदर बीलावर बेरीज करुन दिले प्रमाणे बील भरले. परंतु बीलाची रक्कम रु.3,261/- होती. म्हणजेच रु.3,761/- वजा रु.2,765/- बरोबर रु.996/- बीलींगवालेनी चुकुन बेरीज केली. तक्रारदारांने कृषि संजीवनी योजनेप्रमाणे बील भरले प्रमाणे सदर योजनेचा लाभ मिळाला. परंतु बीलाची बेरीज चुक झाली त्याची बेरीज चुकली कारण रु.996/- ची कृषी संजीवनीचा हप्ता असता तर तक्रारदारांने तो हप्ता तक्रारदाराने ठरलेल्या तारखेला भरला असता. पंरतु तसा हप्ता नव्हता. बीलकरतानाची चुक झाली त्यात तक्रारदारांची कांही दोष नाही. नंतर नोव्हेंबर,2005 ला बील आले तक्रारदारानी अर्ज नोव्हेंबर मध्ये केला म्हणुन सहाय्यक अभियंता, धारुर यांनी दि.9.12.2005 चे तक्राराराचे अर्जावार कार्यकारी अभियंता, विभागीय कार्यालय, अंबाजोगाई कार्यवाही केले तरी परंतु तक्रारदाराचे बील कमी करण्यात आले नाही.
तक्रारदाराची खालील मागणी आहे. तार चोरी गेल्याच्या कालावधीतील बील कमी करण्यात यावे. तसेच कृषी संजीवनी प्रमाणे दिलेल्या तारखेपासुन बील भरलेले आहे. चुकीचे बील करतानाची असलेने सदरचे बील तक्रारदारावर लावू नये. तक्रारदाराना कृषि संजीवनी योजनेचा लाभ द्यावा. तसेच एप्रिल,04 पासुन नियमीत शेतक-यांचे पंपाचे बील देण्याची कार्यवाही झाली त्याप्रमाणे बील देण्याची कृपा करावी. तक्रारदार बील भरण्यास तयार आहे. तक्रारीची कार्यवाही होईपर्यन्त विज कनेक्शन खंडीत करु नये. तसेच पंपाचे वीज बंद होते तसेच योग्य काळजी घेतली नाही म्हणुन वारंवार तार चोरी गेली होती त्या काळात तक्रारदाराचे झालेले नुकसान रक्कम रु.25,000/- भरुन द्यावे. तक्रारीचा खर्च रक्कम रु.1,000/- द्यावा. बीलावरील व्याज आकारणी करु नये.
सामनेवाले नं.1 ते 2 यांनी खुलासा ता.10.3.2011 रोजी दाखल केला. तक्रारदार हा सामनेवालेंचा ग्राहक आहे. त्यांना विज पंपासाठी विज जोडणी दिली आहे त्यांचा ग्राहक क्रमांक बरोबर आहे.
तक्रारदाराचे विज पंपाची तार चोरी गेलेल्या कालावधीतील बील चार्ज केले नाही, चार्ज वजा करुन बील दिले आहे. तसेच तक्रारदारांनी कृषि संजीवनी योजनेअंतर्गत बीलाचा भरणा दि.30.1.2004 ला केला तो बरोबर आहे. परंतु त्यानंतर तक्रारदारांनी कुठलीही तक्रार बीला संबंधी केलेली नाही. एकदम दि.29.6.2007 रोजी तक्रार न्यायमंचात दाखल केली ती मुदतबाहय आहे. ती रद्द करणे योग्य आहे. तसेच उशिर माफ करण्या बाबत अर्ज केलेला नाही.
तक्रारदारांनी ता.30.1.2000 नंतर हप्तेकरुन बीलाचा भरणा केलेला आहे. त्यानंतर दि.22.12.2006 ला रक्कम रु.2,000/- भरणा केला आहे. नंतर दि.1.12.2007 ला रक्कम रु.3,000/-, त्यानंतर दि.14.1.2010 ला रक्कम रु.2,500/- चा भरणा केला आहे. तसेच तक्रारदाराचे जुन,2009 मध्ये रक्कम रु.642/- चे बील अँडजेस्टमेंट करुन दिले आहे. त्यामुळे तक्रारदाराचे कोणतेही नुकसान झाले नाही. तक्रारदार नुकसान भरपाई अगर खर्च मागण्यास हक्कदार नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसूरी केली नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र सामनेवाले यांचा खुलासा, दाखल कागदपत्र, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकिल ए.डी काळे, सामनेवाले यांचे विद्वान वकिल एस.एन.तांदळे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांनी सदरची तक्रार दि.5.7.2006 रोजी दाखल केली होती. त्याचा निर्णय दि.26.2.2007 ला तक्रारदाराचे बाजुने लागला. सदर निकालावर नाराज होवून सामनेवाले यांनी मा.राज्य आयोग,मुंबई परिक्रमा खंडपीठ,औरंगाबाद यांचेकडे प्रथम अपिल क्रं.442/2007 चे दाखल केले. त्याचा निकाला दि.5.8.2010 रोजी लागला. सदर निकालानुसार सदरची तक्रार फेर चौकशीसाठी न्यायमंचामध्ये चालवण्याचे आदेश झाले. त्यानुसार ता.4.11.2010 रोजी सदरचे प्रकरण बोर्डावर घेण्यात आले.
तक्रारदारांनी शेती पंपासाठी विज जोडणी घेतली आहे, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे. तक्रारदाराना देयक क्रं.4167 चे रक्कम रु.7,279/- चे देण्यात आले आहे. सदर देयक कृषि संजीवनी योजने प्रमाणे हप्ते भरण्यासंबंधीची सूचना छापील आहे.
सदर देयकावर त्या योजनेअंतर्गत 4 हप्त्यात रक्कम भरावयाची आहे. त्याप्रमाणे तक्रारदारांनी योजनेचा लाभ देण्याचे ठरले. सदर देयकावर चारही हप्त्याची रक्कमेची बेरीज रक्कम रु.2,060/- दिसत आहे व सदरची बेरीज ही बीलींग क्लर्कने केली आहे. सदरची बेरीज चुकीची आहे. सदर चारही हप्त्याची एकुण रक्कम रु.3,761/- होते. परंतु वरील रक्कमेनुसार दोन्ही रक्कमेमध्ये एकुण रक्कम रु.996/- ची तफावत आहे.
सदर योजने प्रमाणे तक्रारदारांनी नेमुन दिलेली त्या-त्या कालावधीतील विज देयके भरल्याचे दिसत नाही. तसेच सदरची तुट जरी बील करतानाची असली तरी देयकावर कृषि संजीवनी योजना मराठी भाषेमध्ये ठळक अक्षरात छापली आहे. त्यानुसार चार हप्ते तक्रारदारांना भरावयाचे होते, परंतु तक्रारदाराने चुकीच्या बेरजेच्या आधार रक्कम दि.30.4.2004 ला भरलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांना सदर योजनेचा फायदा मिळाला नाही. तक्रारदाराना योजनेनुसार दिलेल्या हप्त्यामध्ये रक्कम भरली असली तरी निश्चितच तक्रारदाराना फायदा मिळाला असता परंतु तशी परिस्थिती सदर प्रकरणात दिसत नाही. तसेच सदर बेरजेची चुक ही बील करतानाची आहे असे ग्राहय धरले तरी चारही हप्त्याची रक्कम लिहून नंतर बेरीज करण्यात आली आहे. यांची बेरीज तपासुन खात्री केली असता त्यानुसार तक्रारदाराचे नुकसान झाले नसते परंतु सदर बेरीज ही रक्कम रु.2060/- दिसते आणि तक्रारदारांनी रक्कम रु.2,765/- भरलेले आहे. त्यामुळे बीलींग करतानाची चुक झाल्यामुळे तक्रारदारांनी रक्कम कमी भरली. तक्रारदाराचे विधान ग्राहय धरण उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांची तार चोरीची केली होती परंतु त्या कालावधीचे देयक कमी करुन बील दिल्याचे म्हटले आहे. यासंबधीत सामनेवाले यांचा खुलासा स्वंयस्पष्ट आहे. तक्रारदारांनी त्यानंतर बीलाचा भरणा नियमित केलेला नाही असे खुलाशात दिलेले तारखावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारदारांना जून,2009 मध्ये रक्कम रु.642/- चे बील अँडजेस्टमेंट करुन दिले आहे. या पार्शभुमीवर तक्रारदाराचे नुकसान झाल्याचे कोठेही स्पष्ट होत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
तसेच तक्रारदारांनी 2004 साली घडल कारणावरुन 2006 सालीची 2 वर्षानंतर तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात तक्रार सामनेवाले यांचेकडे दरम्यानच्या काळात केलेली नाही. विलंबा बाबत तक्रारदाराचे कोणतेही स्पष्टीकरण नाही अथवा कारण नाही. त्यामुळे तक्रार रद्द करण्या बाबत सामनेवाले यांनी जोरदार हरकत घेतली आहे. या संदर्भात तक्रारदाराकडून कोणताही समर्थनिय खुलासा नाही. त्यामुळे सामनेवालेची हरकत ग्राहय धरणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावेत.
( अजय भोसरेकर) ( पी.बी.भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड