जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 112/2013 तक्रार दाखल तारीख – 29/07/2013
निकाल तारीख - 08/04/2015
कालावधी - 01 वर्ष , 08 म. 09 दिवस.
इनायतखॉ रहिमखान पठाण,
वय – 58 वर्षे, धंदा – शेती,
रा. पठाण नगर, अंबाजोगाई रोड,
चॉंद तारा मस्जीदजवळ, लातुर. ....अर्जदार
विरुध्द
कनिष्ठ अभियंता,
म.रा.इ.डि.कंपनी लि.
पडिले कॉम्प्लेक्स, अंबाजोगाई रोड,
लातुर जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. शेख इकबाल अहेमद.
गैरअर्जदारातर्फे :- एकतर्फा.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदारास लातुर येथे गट क्र. 270/बी/2 शेतजमीन असुन, 5 एच.पी. मोटर, विदयुत पुरवठा घेतला आहे. अर्जदाराचे पत्नीचे दि. 16/04/2013 रोजी मयत झाली आहे. सदरचा विदयुत पुरवठा हा अर्जदाराचे मयत पत्नीच्या नांवावर आहे, अर्जदार हा वारस/ उत्तर अधिकारी या नात्याने सदरचा विदयुत वापर करीत आहे.
गैरअर्जदाराने दि. 20/07/2013 रोजी अर्जदारास विदयुत वापरांचे विदयुत बिल रक्कम रु. 7470/- दि. 10/08/2013 पर्यंत सदरचे बिल भरण्याची मुदत होती.
अर्जदारास गैरअर्जदाराचे लाईनमन यांनी पुर्व सुचना न देता दि. 25/07/2013 रोजी, अर्जदाराचा विदयुत पुरवठा खंडीत केला. अर्जदाराने गैरअर्जदार यांचे उप कार्यकारी अभियंता महावितरण यांना विदयुत पुरवठा चालू करावा यासाठी अर्ज दि. 25/07/2013 रोजी दिला.
अर्जदाराने विदयुत पुरवठा बंद केल्यामुळे जनावरास व शेतीच्या पिकास पाणी मिळाले नाही. अर्जदाराने तक्रारी अर्जात मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/-, तक्रारी अर्जाचा खर्च देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणुन शपथपत्र दिले आहे व त्यासोबत विदयुत देयक, अर्ज, मृत्यू प्रमाणपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदाराविरुध्द दि. 02/01/2015 रोजी एकतर्फा झाले आहे.
अर्जदाराने दाखल केलेला तक्रारी अर्ज व त्या सोबत पुरावा म्हणुन दिलेले शपथपत्र, तसेच त्या सोबत दाखल केलेली कागदपत्रे याचे अवलोकन केले असता.
अर्जदाराचा ग्राहक क्र. 610550408280 आहे. अर्जदारास दि. 20/07/2013 रोजी विदयुत देयक रक्कम रु. 7470/- इतके दिले असून, दि. 10/08/2013 पर्यंत सदरचे विदयुत देयक देण्याचा कालावधी असल्याचे दिसुन येते. सदरचे विदयुत बिल जाकेराबे रहिमखा पठाण यांचे नावे आहे. सदर बिलावरुन दिसुन येते. अर्जदार हा मयत जाकेराबे पठाण यांचा कायदेशीर वारस पती असून, वारस या नात्याने ग्राहक होतो. अर्जदाराने दि. 25/07/2013 रोजी विदयुत पुरवठा खंडीत केला आहे. सदर विदयुत पुरवठा त्वरीत चालू करण्यासाठी उप कार्यकारी अभियंता यास दि. 25/07/13 रोजी अर्ज दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराचा विदयुत पुरवठा नोटीस न देता कोणतेही कारण नसताना गैरअर्जदाराने खंडीत केल्याचे दाखल केलेल्या पुराव्या वरुन दिसुन येते. अर्जदाराचा अंतरिम अर्ज दि. 21/08/2013 रोजी मंजुर करण्यात आला आहे. सदर आदेशामध्ये अर्जदारास रक्कम रु. 7470/- चे विदयुत देयक 3 समान हप्त्यात दयावे. अर्जदाराने पहिला हप्ता भरल्यानंतर त्वरीत विदयुत पुरवठा चालू करुन दयावा व उर्वरित हप्ते प्रति महिन्याचा चालू बिलासह घ्यावेत. अर्जदाराने अंतरिम अर्जाचा आदेशाप्रमाणे गैरअर्जदाराकडे विदयुत बिल भरल्याचा व विदयुत पुरवठा गैरअर्जदाराने चालू केल्याचा पुरावा दिला नाही. अर्जदाराचा विदयुत पुरवठा खंडीत करुन गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते. गैरअर्जदाराविरुध्द सदरचे प्रकरण एकतर्फा करण्यात आले आहे यावरुन गैरअर्जदाराचा सदर प्रकरणाबद्दल उजर असल्याचे दिसुन येत नाही. अर्जदाराने सदरच्या प्रकरणात स्टेप्स घेतल्या नाहीत अंतरिम अर्जाच्या आदेशाची अमलबजावणी झाली अथवा नाही याचा पुरावा दिलेला नाही. सदरील प्रकरणाची सत्यता पडताळता येत नाही. अर्जदार हा कोर्टासमोर येत नाही, पुरावा देत नाही. अर्जदारांचे प्रकरण नामंजुर करण्यात येत आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.