जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 89/2008. प्रकरण दाखल तारीख - 28/02/2008 प्रकरण निकाल तारीख - 22/08/2008 समक्ष - मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. अन्सारी महंमद एकबाल पि. अब्दूल मन्नान अर्जदार. वय 44 वर्षे, धंदा व्यापार रा. घर क्र.3382, देशमुख नगर, बिलोली ता.बिलोली जि. नांदेड विरुध्द. 1. कनिष्ठ अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित बिलोली ता. बिलोली जि. नांदेड 2. सहायक अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित नायगांव ता. नायगांव जि. नांदेड 3. कार्यकारी अभिंयता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित देगलूर ता. देगलूर जि. नांदेड 4. अधिक्षक अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित विद्यूत भवन, नवीन मोंढा नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.वसीम एच. पठाण गैरअर्जदार क्र.1 2, व 3तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार विज वितरण कंपनीच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदार यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांनी त्यांच्या घरासाठी गैरअर्जदार यांचे सदरील नवीन मिटर वरील वापराप्रमाणे ऑगस्ट 2006 पासून ते दि.8.2.2008 पर्यत विज वापर केला. नोव्हेंबर 2006 ते डिसेंबर 2006 मध्ये तक्रारदाराला विज बिल न आल्या कारणाने त्याने डिसेंबर 2006 मध्ये बिजेच्या बिलाची मागणी केली परंतु आमच्याकडे रेकार्ड उपलब्ध नाही, नंतर बिल मिळेल असे सांगितले.यानंतर वारंवार विज बिलाची मागणी करुनही गैरअर्जदार यांनी बिल दिले नाही. दि.08.02.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणतेही कारण नसताना तक्रारदाराला कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचा विज पूरवठा खंडीत केला. गैरअर्जदार यांनी कारण विचारले असता आपण घेतलेल्या मिटरचे रेकार्ड नाही त्यामुळे विज पूरवठा खंडीत केला आहे असे सांगितले. तक्रारदार हा ऑगस्ट 2006 पासून आजपर्यत जेवढे विज देयक आहे तो भरण्यास तयार असताना गैरअर्जदार यांनी त्यांचा विज पूरवठा खंडीत केला. अर्जदार हे किडनीस्टोनचे रुग्ण आहेत. विज पूरवठा खंडीत केल्यामुळे त्यांना झालेलया नूकसानीबददल रु.25,000/- मिळावेत अशी त्यांची मागणी आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार खोटी असून कायदयात बसणारी नाही. प्रस्तूत प्रकरणात अर्जदाराने विज चोरी केल्याचे आढळून आले आहे. गैरअर्जदार यांच्या अधिका-यानी विज कायदा 2003 प्रमाणे केलेली कारवाई आणि त्यांच्या कायदयाचे कलम 145 नुसार केलेली कारवाई कोणत्याही कोर्टासमोर तपासली जाऊ शकत नाही म्हणून अर्जदार यांचा तक्रार अर्ज रदद करावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जातील परिच्छेद क्र.3 बाबत गैरअर्जदारांनी आजपर्यत त्यांचा विज पूरवठा खंडीत केलेला नाही. त्यामुळे तोपर्यत त्यांने मिटरचा वापर केला हे त्यांचे म्हणणे चूकीचे आहे. नोव्हेंबर डिसेंबर 2006 मध्ये बिल न आल्याने अर्जदार यांनी वापरलेल्या बिलाची मागणी केली हे त्यांचे म्हणणे चूकीचे आहे. आमच्याकडे त्यांच्या मिटरसंबंधी कोणतेही रेकार्ड उपलब्ध नाही हे ही म्हणणे चूकीचे आहे. तसेच त्यांना टेस्टींग रिपोर्ट दाखल करण्यासंबंधी सांगिते हे ही ते खोटे सांगतात. अर्जदार यांनी ऑगस्ट 2006 पासून आजपर्यत विज बिल भरण्याची तयारी दर्शविली असताना गैरअर्जदारांनी बिलाची रक्कम घेतली नाही हे त्यांचे म्हणणे चूक आहे. त्यामुळे नूकसान भरपाईपोटी रु.25,000/- ची मागणी ही देखील योग्य नाही. दि.12..2.2008 रोजी अर्जदाराच्या घरी गैरअर्जदाराच्या सक्षम अधिका-याने भेट दिली व सद्य परिस्थितीची पाहणी केली असता सहा बल्ब, तिन फॅन, एक मोटार असे 1166 वॅटस चा वापर चालू आहे, सदर मिटरच्या बॉक्सला लावलेले सिल तूटलेले होते, इतकेच नव्हे तर मिटरच्या आऊटगोईग साईडचे वायर इनकमिंगला जोडलेले होते म्हणून विजेची चोरी होत होती, परिस्थीतीचा पंचनामा जायमोक्यावर करण्यात आला. व तयावर गैरअर्जदाराच्या सक्षम अधिका-याच्या सहया आहेत. तक्रारदाराच्या घरी स्ञीया उपस्थित होत्या व त्यांनी सही करण्यासाठी नकार दिला. दि.6.8.2006 रोजी तक्रारदारास विजेचा पूरवठा केल्यानंतर विजेचे बिल देण्यात आले नव्हते त्यांचा फायदा घेऊन त्यांना मिटरमध्ये फेर फार केला म्हणून 19 महिन्याच्या कालावधीमध्ये सरासरी 200 यूनिट या दराने प्रत्यक्षपणे झालेला वापर यांचे बिल एकूण रु.17,898.60 इतके झालेले आहे हे बिल तक्रारदारास देण्यात आलेले आहे पण त्यांने ते अद्यापही भरले नाही. उलटपक्षी आजतागत सतत विजेचा वापर करुनही तक्रारदाराने कोणतीही रक्कम गैरअर्जदाराकडे भरणा केलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचे नूकसान झालेले आहे व तक्रारदारास विनामूल्य विज मिळाली आहे. यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करावा. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे म्हणणे गैरअर्जदार क्र.1 यांनी जे दिलेले आहे तेच आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ श्री. शेख इब्राहीम शेख पाशा यांची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून आणि वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात सूरुवातीस असे म्हटले आहे की, त्यांनी बसवलेल्या नवीन मिटरवरील रिंडीगप्रमाणे ऑगस्ट,2006 पासून दि.8.2.2008 पर्यत विजेच्या वापर केलेला आहे परंतु या कालावधीचे बिल गैरअर्जदार यांनी त्यांना दिले नाही म्हणून त्यांनी विज देयक भरले नाही.यांचा अर्थ वरील कालावधीसाठी अर्जदार यांनी कोणतीही विज वापराची रक्कम न भरता विज वापरलेली आहे हे त्यांनी स्वतःच कबूल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांना बिल दिले नाही असा त्यांच्याकडे कोणताही पूरावा नाही. समजा विजेचे बिल दिले जरी नसले तरी नंतर ज्यावेळेस गैरअर्जदाराने जेव्हा दि.12.2.2008 रोजी अर्जदार यांचे घरास भेट देऊन त्यांच्या मिटरची पाहणी केली असताना त्यांना मंजूर भारापेक्षा म्हणजे जवळपास 18 वॅटस जास्त विज वापर आढळून आला. म्हणजेच सिल तूटलेले व मिटरच्या आऊटगोईग साईडचे वायर इनकमिंगला जोडलेले व विज चोरी होत होती असे आढळून आले. यावर त्यांनी दि.6.8.2006 रोजी सरासरी 200 यूनिट महिना वापर गृहीत धरुन रु.17,898.60 चे बिले दिले हे बिल देखील अर्जदाराने भरले नाही. शिवाय हे बिल चूक आहे असाही आक्षेप घेतलेला नाही. अर्जदार यांनी मंचासमोर अंतरिम अर्ज दाखल केला होता व त्यामध्ये दि.1.3.2008 रोजी आदेश होऊन त्यात तूर्त अर्जदार यांना रु.2,000/- जमा करण्यात सांगितले होते. तेवढी देखील रक्कम अर्जदारानी भरली नाही. म्हणजे अर्जदार यांनी मोफत विज वापरण्याची सवय झालेली दिसते. अर्जदार यांनी जे दस्ताऐवज दाखल केलेले आहेत ते दि.7.7.2003 रोजी कोटेशनची रक्कम भरलेली दिसून येते. म्हणजे आजपर्यत अर्जदार यांनी विज वापरा बददलची काहीच रक्कम भरलेली नाही व भरली असेल तर तो पूरावा समोर आणला नाही. गैरअर्जदार यांचे दि.12.2.2008 रोजी जायमोक्यावर तपासणी केल्याचा अहवाल दाखल केलेला आहे. तसेच यांचा खूलासा म्हणून गैरअर्जदार यांनी बिल कशा प्रकारे तयार झाले त्यांची प्रत दाखल केलेली आहे. याप्रमाणे 19 महिन्याचे बिल अर्जदार यांना देण्यात आलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्यावर जो चोरीचा आरोप केलेलो आहे त्याबददल ठोस असा कोणताही पूरावा, तपासणी अहवाल दाखल केलेला नाही. कंपाऊडींगचे बिल देखील गैरअर्जदारांनी यात दिलेले नाही. गैरअर्जदार यांनी दिलेले दि.26.2.2008 रोजीचे विज देयक हे अर्जदारांनी तेवढयाच कालावधीचा विज वापर केला असल्या कारणाने गैरअर्जदार यांनी दिलेले बिल योग्य आहे व ते अर्जदाराने भरणे बंधनकारक आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विज पूरवठा अजूनही खंडीत केलेला नाही. त्यामुळे अर्जदार यांनी हे विज देयक ताबडतोब भरावे. अर्जदार हे गैरअर्जदार यांची सेवेतील ञूटी सिध्द करु शकत नसल्यामुळे त्यांचा तक्रार अर्ज खारीज करण्यास योग्य आहे. अर्जदार यांनी आपल्या मूलाचे शैक्षणीक नूकसान झाल्याबददलचे काही कागदपञ दाखल केलेले आहेत व त्यांचे नूकसान जर झाले असेल तर त्यांस अर्जदार हे स्वतःचे जबाबदार आहेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदारांचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येत आहे. 2. दोन्ही पक्षकारांनी खर्च आपआपला सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक. |