Maharashtra

Nagpur

CC/11/233

Shri Govind Zarbade - Complainant(s)

Versus

Kamlakar Dagoji Borkar - Opp.Party(s)

Adv.WADALKAR

17 Aug 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/11/233
1. Shri Govind ZarbadeSatraswati Nagar, Udaynagar Chowk, Janki NagarNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Kamlakar Dagoji Borkar7, Madhur Milan Apartment, Raghuji NagarNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :Adv.WADALKAR, Advocate for Complainant
Adv., Advocate for Opp.Party

Dated : 17 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

श्री.विजयसिंह राणे, मा. अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 17/08/2011)
 
 
 
1.           तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. या प्रकरणातील तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार हे भुखंड विक्रीचा व्‍यवसाय करीत असून, त्‍यांनी गैरअर्जदारांकडून मौजा-हुडकेश्‍वर, प.ह.क्र.137, ख.क्र.37/अ, एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फु., भुखंड क्र.21 हा रु.75,000/- मध्‍ये विकण्‍याचा करार दि.12.12.2002 रोजी होऊन त्‍यादाखल बयानापत्र करण्‍यात आले व बयाना पत्राच्‍यावेळेस रु.20,000/- आणि दि.16.04.2003 रोजी रु.20,000/- गैरअर्जदारास दिले व याबाबतची रीतसर पावती गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यांना दिली. तक्रारकर्ते गैरअर्जदारास रु.35,000/- देणे बाकी आहे. तक्रारकर्ते सदर रक्‍कम देण्‍यास तयार होते व त्‍यांनी पुढे गैरअर्जदारांना उर्वरित रक्‍कम घेऊन सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍याची मागणी केली. परंतू गैरअर्जदारांनी सदर लेआऊट हे गैरकृषी झालेले नाही आणि नगर रचना कार्यालयातून लेआऊटचा नकाशा मंजूर व्‍हावयाचा असल्‍याने ते विक्रीपत्र करुन देण्‍यास असमर्थ असल्‍याचे सांगितले. तक्रारकर्त्‍यांना सदर कारण सांगून वारंवार गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन देण्‍याच्‍या तारखा वाढविल्‍या व गैरकृषी व टी.पी. झाल्‍यावर लेखी सुचना मिळाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत विक्रीपत्र नोंदणी करुन घ्‍यावे असे सांगितले, परंतू प्रत्‍यक्षात अशी सुचना कधीच गैरअर्जदारांकडून प्राप्‍त झाली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदारांना विक्रीपत्र नोंदणीची मागणी केली असता त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही. यावर तक्रारकर्त्‍यांनी त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीसला गैरअर्जदारांनी उत्‍तर दिले नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार दाखल करुन, रु.35,000/- उर्वरित रक्‍कम घेऊन गैरअर्जदारांनी विक्रीपत्र नोंदवून द्यावे किंवा गैरअर्जदारांनी स्विकारलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळावी, शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.25,000/- मिळावे, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागणी केल्‍या. तक्रारीसोबत बयाना पत्र, पावती, करारनामा, कायदेशीर नोटीस व पोच दाखल केले आहेत.
 
 
2.          सदर प्रकरणाची नोटीस गैरअर्जदारांना पाठविली असता, त्‍यांना नोटीस प्राप्‍त होऊनही तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर उपस्थित होऊन आपले म्‍हणणे दाखल केले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश 01.07.2011 रोजी पारित केला.
 
3.          सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आले असता मंचाने तक्रारकर्त्‍यांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. तक्रारकर्त्‍यांनी सदर प्रकरणात दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
 
-निष्‍कर्ष-
 
 
4.          दाखल दस्‍तऐवज क्र. 1 व 2 चे अवलोकन केले असता निर्विवादपणे तक्रारकर्ते हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत. तसेच दस्‍तऐवज क्र. 3 वरील करारनाम्‍याच्‍या प्रतीचे अवलोकन केले असता असे स्‍पष्‍ट होते की, तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदारासोबत मौजा-हुडकेश्‍वर, प.ह.क्र.137, ख.क्र.37/अ, एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फु., भुखंड क्र.21 हा रु.75,000/- मध्‍ये विकण्‍याचा करार दि.12.12.2002 रोजी झाला होता व त्‍यादाखल तक्रारकर्त्‍यांनी रु.40,000/- गैरअर्जदारांना अदा केलेले आहेत हे दाखल पावत्‍यांच्‍या प्रतीवरुन स्‍पष्‍ट होते. रसिद पावती व करार रसिद पावती यांचे अवलोकन केले असता सदर बाब प्रामुख्‍याने समोर येते की, गैरअर्जदारांनी वारंवार विक्रीपत्र नोंदवून देण्‍याच्‍या तारखा या गैरकृषीकरण न झाल्‍याने व ले आऊट प्‍लॅन मंजूर न झाल्‍याचे कारणावरुन समोर ढकललेल्‍या आहेत. विक्रीपत्र नोंदवून मिळावे म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी वारंवार गैरअर्जदारांना मागणी केलेली आहे व शेवटी कायदेशीर नोटीसही पाठविली आहे. तक्रारकर्ता उर्वरित रक्‍कम देण्‍यास तयार असतांनाही गैरअर्जदार विक्रीपत्र नोंदवून देण्‍याबाबत तयारी दर्शवित नाहीत. बयानादाखल रक्‍कम स्विकारणे, भुखंड विक्रीचा करार करणे व त्‍याबाबत काही रक्‍कम स्विकारणे व दिलेल्‍या मुदतीत विक्रीपत्र करुन न देणे ही गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तसेच गैरकृषीकरण न करता व लेआऊटचा नकाशा मंजूर न करता भुखंडाची विक्री करणे ही गैरअर्जदाराची कृती अनुचित व्‍यापार प्रथेचा उपयोग केल्‍याचे दर्शविते. म्‍हणून तक्रारकर्ता सदर प्रकरणी दाद मिळण्‍यास पात्र आहे. तसेच गैरअर्जदारांनी सदर तक्रारीची नोटीस प्राप्‍त होऊनही तक्रार व दाखल दस्‍तऐवज नाकारण्‍याचे समर्थनार्थ काहीही दस्‍तऐवज दाखल केले नाही किंवा मंचासमोर येऊन त्‍याबाबत त्‍यांचे म्‍हणणे काय आहे हे स्‍पष्‍ट न केल्‍याने तक्रारकर्त्‍यांची प्रतिज्ञापत्रावर असलेली तक्रार व दाखल दस्‍तऐवज सत्‍य समजण्‍यास मंचाला हरकत वाटत नाही. करिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
-आदेश-
 
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला मौजा-हुडकेश्‍वर, प.ह.क्र.137, ख.क्र.37/अ, एकूण  क्षेत्रफळ 1500 चौ.फु.चे भुखंड क्र.21 याचे विक्रीपत्र उर्वरित रक्‍कम रु.35,000/-  घेऊन आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करुन द्यावे व प्रत्‍यक्ष  भुखंडाचे मोजमाप करुन त्‍याचा ताबा द्यावा. विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्‍याने       सोसावा.
 
 
-किंवा-
 
      गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला रु.40,000/- ही रक्‍कम परत करावी व या रकमेवर      दि.16.04.2003 पासून रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे.18 टक्‍केप्रमाणे व्‍याज द्यावे.
3)    मानसिक व शारिरीक त्रासाच्‍या भरपाईदाखल रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चादाखल     रु.2,000/- गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला द्यावे.  
4)    उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून      30 दिवसाचे आत करावी.