जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1447/2008
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-06/11/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 10/09/2012.
सुमन भागवत ब-हाटे,
उ.व.सज्ञान,धंदा- घरकाम,
रा.प्लॉट नं.3, अयोध्या कॉर्नर,
पोल फॅक्टरीच्या मागे, अयोध्यानगर,
जळगांव. ....... तक्रारदार
विरुध्द
कल्याणी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
महेश नगर, भुसावळ, जि.जळगांव.
तर्फे मॅनेजर. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.डी.डी. मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.महेंद्र सोमा चौधरी वकील हजर.
विरुध्द पक्ष तर्फे श्री.निलेश सुरेश भंडारी वकील हजर(नो-से)
निकालपत्र
सौ.एस.एस.जैन, सदस्याः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव
पावती अन्वये गुंतविलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणुन त्यांनी
प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष कल्याणी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतवणूक केल्याचा तपशिल खालीलप्रमाणेः
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख | देय रक्कम |
1 | 0629 | 13/01/2003 | 1,00,000/- | 13/07/2007 | 2,00,000/- |
3. तक्रारदार यांनी गुंतविलेल्या रक्कमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडे गुंतवणुक केलेली रक्कम व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
4. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष हे या मंचाची नोटीस प्राप्त होऊन याकामी वकीलामार्फत हजर झाले तथापी मुदतीत लेखी म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द नो-से आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता तसेच तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र.1 - प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावत्यामध्ये रक्कम गुंतविलेली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आलेली नाही. वास्तविक तक्रारदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ विरुध्द पक्ष यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र.2 – तक्रारदार यांनी तक्रारदार यांनी त्यांची संपुर्ण रक्कम देण्याची जबाबदारी पतसंस्थेच्या मॅनेजर ची असल्याचे प्रतिपादन तक्रारदाराचे वकीलांनी केलेले असुन त्याबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. सबब तक्रारदार यांची रक्कम देण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्ष क्र. 1 पतसंस्थेची आहे या मतास आम्ही आलो आहोत. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष क्रं.1 संस्था यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्राच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये नमुद केलेली मुदत ठेव पावती मॅच्युअर्ड झालेली असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेली रक्कम त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( क ) विरुध्द पक्ष क्रं.1 संस्था यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( ड ) वर नमुद आदेश अनुक्रमांक (ब) मधील मुदत ठेवीच्या रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रक्कम अदा करावी.
ज ळ गा व
दिनांकः- 10/09/2012. ( सौ.एस.एस.जैन ) ( श्री.डी.डी.मडके )
सदस्य अध्यक्ष