जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
तक्रार अर्ज क्रमांक – १४/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०६/०१/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २४/०७/२०१४
श्री. संजय वॉच कंपनी तर्फे
प्रोपा. सोनी उर्फ ओमप्रकाश
रामचंद्रे जेठाणी उ.व.३६,
धंदा – व्यवसाय रा. झुलेलाल
सोसायटी साक्री रोड, धुळे
ता.जि. धुळे - तक्रारदार
विरुध्द
- १] श्री. कलपतरू डिस्ट्रीबुटर्स द्वारा
श्री. साई ट्रान्सपोर्ट अॅण्ड कुरियर प्रा.लि.
धुळे शाखा, धुळे,
पार्सल ऑफिस महाराष्ट्र राज्य परिवहन
महामंडळ धुळे ता.जि. धुळे
- २] श्री. साई ट्रान्सपोर्ट अॅण्ड कुरियर प्रा.लि.
कुशाल नगर, पहिला मजला जालना रोड,
औरंगाबाद जि. औरंगाबाद - सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एम.बी. पवार)
(सामनेवालातर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
-
तक्रारदार यांचा माल सामनेवाले यांनी पुर्णपणे सुरक्षितरित्या ठरलेल्या ठिकाणी न पोहचविल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. सदर नुकसान भरपाई सामनेवाला यांच्याकडून मिळावी म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
सामनेवाले यांना मंचाची नोटीस न मिळाल्यामुळे तक्रारदार यांच्या विनंती वरून तीन वेळेस फेरनोटीस काढण्यात आली. सदर फेरनोटीसीचा अहवाल अद्यापर्यंत मंचास प्राप्त झालेला नाही. तक्रारदार हे तारीख १७/०५/२०१३ पासून सतत गैरहजर आहे. तसेच तक्रार अर्ज सुरू ठेवणेकामी कोणताही पाठपुरावा (Steps) केलेला नाही. यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार अंतिमरित्या निकाली काढण्यात येत आहे.
आ दे श
- तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.