नि.19 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली अर्ज क्रमांक : 34/2010 वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.04/08/2010 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.14/12/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या कु.तेजस रामचंद्र कांबळे करीता अ.पा.क.वडील श्री.रामचंद्र भिकाजी कांबळे रा.मु.पो.कारवांचीवाडी, पोमेंडीबुद्रुक, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द कल्पतरु बायोटीक कार्पोरेशन लि., करीता मॅनेजींग डायरेक्टर / अध्यक्ष श्री.जयकृष्ण सिंह राणा, रजि.ऑफिस- औरंगाबाद-आग्रा रोड, मथुरा (उत्तर प्रदेश) ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.ए.ए.शिंदे सामनेवाले : गैरहजर. -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी तक्रारदार यांनी दि.09/12/2010 रोजी विधिज्ञासह हजर होवून नि.16 वर पुरशीस दाखल केली. सदर पुरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत वसूली प्रकरण निकाली करणेत येते असा आदेश नि.1 वर करणेत आला. ब) सदर नि.16 वरील पुरशीसमधील मजकूर खालीलप्रमाणेः- “प्रस्तुत वसुली अर्जाच्या कामी मला सामनेवाला यांच्याकडून देय असलेल्या रकमेपैकी रु.24,000/- इतक्या रकमेचा धनादेश प्राप्त झाला असून सदर रकमेचा धनादेश मी कु.तेजस याला सर्टिफिकेट नं.R10008133 चे कामी मिळावयाच्या मॅच्युरिटी रकमेच्या पोटी full & final settlement म्हणून स्वीकारला आहे. सदर धनादेश वटल्याने सर्टिफिकेट नं.R10008133 चे कामी कु.तेजस याला आता कोणतीही रक्कम येणे बाकी राहिलेली नाही. तरी सदर वसुली प्रकरण निकाली करण्यात यावे.” याप्रमाणे पुरशिस आहे. क) सदर पुरशिसवर पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आला. ‘‘तक्रारदार विधिज्ञासह समक्ष उपस्थित. पूरशिसमधील मजकूर मान्य व कबूल करतात. नि.1 वर योग्य तो आदेश करणेत येतो.’’ तक्रारदारतर्फे नि.16 वर दाखल पुरशिसच्या अनुषंगाने प्रस्तुत वसूली अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 14/12/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |