Maharashtra

Nagpur

CC/09/642

Smt. Rekha Ashokrao Pilpile - Complainant(s)

Versus

Kalamna Market Urban Credit Co-Op. Society, Nagpur - Opp.Party(s)

ADV.MRS.ANURADHA DESPANDE

02 Nov 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/09/642
1. Smt. Rekha Ashokrao PilpileNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. Kalamna Market Urban Credit Co-Op. Society, NagpurNagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 02 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर.
तक्रार दाखल दिनांकः 07/10/2009
आदेश पारित दिनांकः 02/11/2010
 
 
 
तक्रार क्र.     :     642/2009
 
 
 
 
तक्रारकर्ता   :    श्रीमती रेखा अशोकराव पिलपीले,
                वय : 52 वर्षे, व्‍यवसाय : .......,
द्वारा सतीश भाऊरावजी खरडकर,
श्रीमहालक्ष्‍मीनगर, प्रोसेस सर्वे सोसायटी,
प्‍लॉट नं. 230, म्‍हाळगीनगर पॉवर
हाऊसमागे, नरसाळा रोड, नागपूर.
 
 
                   //- विरुध्‍द   -//  
 
गैरअर्जदार     :1 कळमना मार्केट अर्बन क्रेडीट को-ऑप.सोसायटी
मर्यादित नागपूर, द्वारा संचालक-प्रमोद अग्रवाल,
      कार्यालय - 1132/1133, आशिर्वाद भवन,
      पहिला माळा, सेंट्रल एव्‍हेन्‍यु, हॉटेल जनकसमोर,
गांधीबाग, नागपूर 02.
 
 2.   मा. प्रशासक,
       कळमना मार्केट अर्बन क्रेडीट को-ऑप.सोसायटी
 मर्यादित नागपूर, कार्यालय - 1132/1133, आशिर्वाद भवन,
       पहिला माळा, सेंट्रल एव्‍हेन्‍यु, हॉटेल जनकसमोर,
 गांधीबाग, नागपूर 02.
 
 
a.            
 
तक्रारकर्त्‍यातर्फे          :    ऍड. सौ. अनुराधा देशपांडे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे     :     एकतर्फी कारवाई.
 
 
गणपूर्ती               :     1.    श्री.विजयसिंह राणे    -    अध्‍यक्ष.
                           2.    श्री. मिलिंद केदार     - सदस्‍य.
 
 
 
 
 
                                
मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलिंद केदार, सदस्‍य
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 02/11/2010)
1.     तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तिने गैरअर्जदाराच्‍या महादेव बचत कुंभ या योजनेत आवर्ती खाते क्र. 343 व 344 मध्‍ये प्रत्‍येकी रु.1,000/- प्रती महिना याप्रमाणे 24.03.2009 पर्यंत प्रत्‍येकी रु.12,000/- ची बचत केली. दि.25.04.2009 रोजी तक्रारकर्तीने दोन्‍ही आवर्ती ठेवीतील रक्‍कम रु.25,464/- परत मागितली असता गैरअर्जदाराने आजतागायत रक्‍कम परत केली नाही, म्‍हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करुन रु.25,464/- ही रक्‍कम 12 टक्‍के व्‍याजासह परत करावे, नुकसान भरपाईदाखल रु.50,000/- मिळावे व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.25,000/- मिळावे अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
2.    सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्‍यानंतर मंचामार्फत गैरअर्जदारांवर नोटीस बजावण्‍यात आला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा नोटीस ‘घेण्‍यास नकार’ या पोस्‍टाच्‍या शे-यासह परत आला, म्‍हणून मंचाने गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला.
 
3.    सदर तक्रार मंचासमोर युक्‍तीवादाकरीता दि.20.10.2010 रोजी आली असता तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी उपस्थित होऊन युक्‍तीवाद केला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यावेळेस अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
4.    तक्रारकर्तीने दाखल केलेले पृष्‍ठ क्र. 5 ते 8 वरुन तक्रारकर्तीचे आवर्ती खाते गैरअर्जदाराकडे होते ही बाब स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ती ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे.
5.         सदर तक्रारीबाबत गैरअर्जदाराचे म्‍हणणे काय आहे हे मंचासमोर आलेले नाही. त्‍यामुळे मंचाने सदर प्रकरणी उपलब्‍ध कागदपत्रांच्‍या आधारे व गुणवत्‍तेच्‍या आधारे सदर प्रकरण निकाली काढण्‍याचे ठरविले तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तिने आवर्ती खाते क्र. 343 व 344 मध्‍ये प्रत्‍येकी रु.1,000/- प्रती महिना याप्रमाणे 24.03.2009 पर्यंत प्रत्‍येकी रु.12,000/- ची बचत केली. असे एकूण दोन्‍ही खाते मिळून रु.24,000/- जमा झाले होते व तक्रारकर्तीने मागणी केलेल्‍या पत्रानुसार परीपक्‍वता रक्‍कम ही रु.12,732/- प्रत्‍येकी खात्‍यात असे दोन्‍ही खाते मिळून रु.25,464/- परीपक्‍वता रक्‍कम        तक्रारकर्तीला गैरअर्जदाराकडून घेणे आहे. याबाबत तक्रारकर्तीने दि.25.04.2009 रोजी पृष्‍ठ क्र. 9 अन्‍वये मागणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. परंतू गैरअर्जदाराने सदर पत्राची दखल घेतलेली नाही व तक्रारकर्तीला रक्‍कमही परत केलेली नाही. तसेच सदर प्रकरणी मंचासमोर ते हजरही झाले नाही किंवा तक्रारीस उत्‍तरही दाखल केलेले नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या पृष्‍ठ क्र. 5 ते 9 वरील कागदपत्रावरुन तिने तक्रारीत केलेले कथन सिध्‍द होत असल्‍याने व गैरअर्जदाराने उपस्थित होऊन ते नाकारले नसल्‍याने प्रतिज्ञापत्रावरील तक्रारकर्तीचे कथन सत्‍य समजण्‍यास मंचाला हरकत वाटत नाही व तक्रारकर्ती परीपक्‍वता रक्‍कम रु.25,464/- ही तक्रार दाखल दिनांकापासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
6.    प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्तीने मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु सदर मागणी पुराव्‍यानीशी सिध्‍द केलेली नाही. तथापि, मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्तीने एवढी मोठी रक्‍कम गैरअर्जदाराकडे गुंतविली होती व मागणी करुनही गैरअर्जदाराने ती परत न दिल्‍याने तक्रारकर्त्‍याला सदर रकमेचा उपभोग घेता आला नाही. त्‍यामुळे त्‍याला शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला, म्‍हणून तक्रारकर्ती सदर त्रासाची क्षतिपूर्तीबाबत गैरअर्जदार क्र. 1 कडून रु.5,000/- मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे रास्‍त मत आहे. तक्रारकर्तीला पर्यायाने मंचात तक्रार दाखल करावी लागली, म्‍हणून तक्रारीच्‍या खर्चाबाबत गैरअर्जदार क्र. 1 कडून रु.2,000/- मिळण्‍यास पात्र आहे. गैरअर्जदार क्र. 2 विरुध्‍द तक्रारकर्तीचे तक्रारीत कोणतेच आक्षेप नसल्‍याने त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व उपलब्‍ध कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 ला आदेश देण्‍यात येतो की, तक्रारकर्तीची आवर्ती खाते क्र. 343      व 344 मध्‍ये जमा असलेली रक्‍कम रु.25,464/- तक्रार दाखल दिनांकापासून 07.10.2009 पासून तर रक्‍कम प्रत्‍यक्ष मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह      तक्रारकर्तीला परत करावी.
3)    गैरअर्जदार क्र. 1 ने शारीरीक व मानसिक त्रासाच्‍या क्षतिपूर्तीबाबत       तक्रारकर्तीला रु.2,000/- अदा करावे.
4)    तक्रारीच्‍या खर्चाबाबत गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्तीला रु.1,000/- अदा       करावे.
5)    गैरअर्जदार क्र. 2 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
6)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्‍याच्‍या  दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
 
      (मिलिंद केदार)                   (विजयसिंह राणे)
         सदस्‍य                            अध्‍यक्ष
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT