Maharashtra

Kolhapur

CC/237/2015

Sandip Balbhim Deshmane - Complainant(s)

Versus

Kaizen Honda Through Pro.Rohan Nilakanth Bejangi - Opp.Party(s)

S.R. Kurne

18 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/237/2015
( Date of Filing : 02 Sep 2015 )
 
1. Sandip Balbhim Deshmane
518,Manin Road ,Renuka Nagar,A/P Yadrav Tal.Shirol
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Kaizen Honda Through Pro.Rohan Nilakanth Bejangi
3,Sangli Road
Ichalkarani
2. C.E.O.Honda Motorcycle and Scooter India Prv.Ltd
1,Sector 3,IMT Manesar
Girgaon
Hariyana
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 18 Nov 2021
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदयाचे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून होंडा CB TRIGGER या कंपनीची मोटरसायकल दि.17/2/2015 रोजी रक्‍कम रु. 83,762/- इतक्‍या रकमेला खरेदी केली आहे.  वि.प.क्र.2 ही मोटरसायकल उत्‍पादन करणारी कंपनी असून वि.प.क्र.1 हे त्‍यांचे अधिकृत डिलर आहेत.  सदर मोटरसायकल खरेदी केल्‍यानंतर लगेचच 15 दिवसांमध्‍ये इंजिनचे काम आले.  त्‍यानंतर वेळोवेळी इंजिन काम करुनदेखील दोष निघालेला नाही.  त्‍यामुळे सदरचे उत्‍पादनात उत्‍पादित दोष असलेबाबत तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेशी संपर्क साधूनदेखील त्‍यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.  सदर मोटरसायकलला एमएच-09-डीक्‍यू 5278 असा नंबर मिळालला आहे असे वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारास सांगितले. याउलट आर.सी.टी.सी. बुकला वि.प.क्र.1 यांनी चुकीची माहिती दिलेमुळे एमएच-09-डीक्‍यू-5268 व MCYL MOTORCYCLE UNICORN अशी चुकीची माहिती नमूद झाली आहे.  याबाबत तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे चौकशी केली असता त्‍यांनी व त्‍यांचे कर्मचा-यांनी, तुमचा व आमचा संबंध संपलेला आहे, तुम्‍हांला काय करायचे ते करा, अशी धमकी तक्रारदारास दिली.  अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्‍याने तक्रारदाराने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, वादातील मोटरसायकल दोषमुक्‍त करुन द्यावी व तसे न झालेस बदलून द्यावी व आर.सी.टी.सी. बुकच्‍या नोंदी बरोबर करुन देणेबाबत वि.प.क्र.1 यांना आदेश व्‍हावेत, वि.प.क्र.2 यांनी उत्‍पादित दोष असलेले वाहन दिलेबाबत व वि.प.क्र.1 यांनी सेवेत त्रुटी दिली म्‍हणून नुकसान भरपाई दाखल रु. 95,000/-, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत मोटरसायकल खरेदीचे बिल, इंजिन दुरुस्‍त केलेचे बिल, आर.सी.टी.सी. बुक, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली नोटीस, सदर  नोटीसची पोस्‍टाची पावती व पोहोचपावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुराव्‍याचे यांचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. क्र.1 यांनी याकामी दि.17/12/15 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी दुचाकीची डिलीव्‍हरी घेतलेनंतर 10 दिवसांतच वाहनाची तक्रार असलेचे सांगून तक्रारदार हे वि.प. यांचेकडे आले असताना वि.प. यांचे तंत्रज्ञ यांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनाचे इंजिन कंपनीच्‍या अपरोक्ष उघडले असलेचे प्रथमदर्शनी दिसत आहे असे तक्रारदार यांना दाखवून दिले.  त्‍यावेळी तक्रारदार यांनी वाद घातला.  परंतु ग्राहकहित विचारात घेवून वि.प. यांनी तक्रारदाराचे वाहन कोणत्‍याही मोबदल्‍याशिवाय दुरुस्‍ती करुन तक्रारदाराच्‍या ताब्‍यात दिले.  वि.प. यांचेकडील विक्री केलेल्‍या वाहनाची कागदपत्रे आर.टी.ओ. कार्यालयाकडे मुदतीत पाठवून देणे इतकेच मर्यादित काम वि.प. यांचेकडे जाते.  त्‍यानंतर संबंधीत कार्यालयाकडून वाहनाचे आर.सी.टी.सी. बुक तयार करणे, वाहन रजिस्‍टर करुन त्‍यास सिरियल नंबर देणे, आर.सी. बुकवरील संपूर्ण तपशील नमूद करणे तसेच सर्व काम पूर्ण झालेनंतर संबंधीत ग्राहकास त्‍याची प्रत परस्‍पर पोस्‍टल पत्‍त्‍यावर पाठवून देणे वगैरे कामे आर.टी.ओ. कार्यालयाकडून केली जातात.  त्‍याठिकाणी वि.प. यांचे काहीही काम असत नाही.  आर.टी.ओ. कडून झालेली चूक वि.प. यांचे माथी मारणेचा तक्रारदारांनी प्रयत्‍न चालविला आहे.  सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

4.    वि.प.क्र.3 यांनी याकामी दि. 06/06/17 रोजी म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे.  तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 यांचेतील व्‍यवहाराशी वि.प.क्र.3 यांचा कोणत्‍याही प्रकारचा संबंध नाही.  त्‍यामुळे वि.प.क्र.3 हे याकामी पक्षकार होत नाही.  त्‍यांना याकामी विनाकारण पक्षकार केलेले आहे.  वि.प.क्र.3 यांचेकडे वाहन नोंदणी करणेकरिता संगणकीकृत प्रणाली आहे. त्‍यानुसार प्रथमतः वाहन खरेदीदार आणि विक्रेते यांनी भरुन दिलेले विहीत नमुन्‍यातील अर्ज व त्‍यासोबतची कागदपत्रे यांचेमधील माहिती वि.प.क्र.3 यांचे कार्यालयातील संगणक प्रणालीमध्‍ये भरुन त्‍याची मुद्रीत प्रत संबंधीत विक्रेते आणि ग्राहक यांना भरलेली माहिती योग्‍य असलेची खात्री करणेकरिता दिली जाते.  संबंधीतांनी भरलेल्‍या माहितीमध्‍ये दुरुस्‍ती सुचवलेस तशी आवश्‍यक दुरुस्‍ती खात्री केलेनंतर केली जाते व त्‍यानंतर सदर माहितीबाबतचा डिस्‍क्‍लेमर फॉर्मवर स्‍वीकृती दिल्‍यानंतरच सदर वाहनाचे नोंदणीबाबत सदर भरुन दिलेले माहितीप्रमाणे नोंद केली जाते.  तक्रारदार व वि.प.क्र.1 यांनी दिलेल्‍या माहितीनुसार वि.प.क्र.1 यांनी वाहनाची नोंद केली होती.  त्‍यानंतर त्‍यांचे विनंतीनुसार वि.प.क्र.4 यानी आवश्‍यक ती दुरुस्‍ती करुन दिली होती.  सदर दुरुस्‍तीबाबतची कागदपत्रे याकामी दाखल केली आहेत.  वि.प. यांची सदरची कृती ही त्रुटी होवू शकत नाही.  तक्रारदार हा वि.प.क्र.3 यांचा ग्राहक नाही.  सबब, तक्रारअर्ज वि.प.क्र.3 विरुध्‍द फेटाळणेत यावा अशी मागणी वि.प.क्र.3 यांनी केली आहे.

 

5.    वि.प.क्र.2 हे याकामी हजर झाले नाहीत व त्‍यांनी म्‍हणणेही दाखल केले नाही. सबब, वि.प.क्र.2 विरुध्‍द दि.08/06/16 रोजी एकतर्फा आदेश केलेला आहे.

 

6.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहे का ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

7.    तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांचेकडून होंडा CB TRIGGER खरेदी केली होती.  वि.प.क्र.2 हे मोटरसायकल उत्‍पादन करणारी कंपनी असून वि.प.क्र.1 हे अधिकृत डिलर आहेत.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून ता. 17/12/2015 रोजी वादातील मोटारसायकल रक्‍कमरु. 83,762/- रकमेस खरेदी केलेची पावती दाखल केलेली आहे.  सदरची पावती वि.प.क्र.1 व 2 यांनी नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे वि.प यांचे ग्राहक आहेत.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र. 2

 

8.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  तक्रारदार याने सदरचे वाहन खरेदी केलेनंतर लगेचच 15 दिवसांमध्‍ये इंजिन काम आले.  वेळोवेळी सदरचे इंजिनचे काम करुन देखील डिफेक्‍ट निघालेला नाही. त्‍या कारणाने सदरचे उत्‍पादन उत्‍पादित दोष (Manufacturing defect) असलेबाबत वि.प.क्र.2 यांना तक्रारदार यांनी कळविले.  तसेच वादातील वाहनाचा होंडा CB TRIGGER या कंपनीची मोटारसायकलला MH09-DQ-5278 असा नंबर मिळालेला आहे असे वि.प.क्र.1 यांनी चुकीची माहिती दिलेमुळे MH09-DQ-5268 व MCYZ MOTORCYCLE UNICORN अशी चुकीची माहिती झालेची तक्रारदार यांना आर.सी.टी.सी. बुक मिळालेनंतर समजले.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना दोषयुक्‍त वाहन देवून व चुकीचे आर.सी.टी.सी. बुकवर नोंदी करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांचेकडे इंजिन दुरुस्‍ती केलेचे ता. 17/2/15 रोजीचे बिल दाखल केलेले आहे.  सदरचे बिलावर जॉब कार्ड नंबर, जॉब कार्ड डेट नमूद आहे.  सदरचे बिलाचे अवलोकन करता ता. 19/2/15, 3/3/15, 94/15, 11/4/15, 13/4/15, 6/5/15 इ. जॉबकार्ड डेट नमूद असून सदर तारखेदिवशी तक्रारदारांचे वाहन वि.प.क्र.2 यांचेकडून दुरुस्‍तीस आलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  सदरचे जॉब कार्डस वि.प. यांनी नाकारलेली नाहीत.  वि.प.क्र.1 यांनी प्रस्‍तुतकामी म्‍हणणे दाखल केले आहे. सदरचे म्‍हणणेचे अवलोकन करता तक्रारदार यांचेकडून सदरचे वाहनाचे इंजिन कंपनीच्‍या अपरोक्ष उघडले असताना देखील ग्राहकहित ध्‍यानात घेवून तक्रारदारांचे वाहनास वि.प.यांनी 5 वर्षांची जादा वॉरंटी दिलेली असलेने सदर वाहन कोणत्‍याही मोबदल्‍याशिवाय दुरुस्‍त करुन वाहन तक्रारदार यांचे ताब्‍यात दिले. 

 

9.    प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी ता. 9/1/18 रोजी वादातील वाहनामध्‍ये Manufacturing defect तपासणेसाठी कोर्ट कमिशन यांची नेमणूक करावी असा अर्ज दिला. सदरचा अर्ज आयोगाने मंजूर केला.  त्‍यानुसार ता. 27/8/18 रोजीचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था कळंबा रोड, कोल्‍हापूर कोर्ट कमिशनर यांचे अहवालाचे अवलोकन करता “ सदर गाडीचे सर्व्हिसिंग व इतर कामे कायझन व्हिल्‍स (होंडा) सांगली रोड, इचलकरंजी या वितरकाकडे दि.19/2/15 ते 13/4/15 पर्यंतच्‍या कालावधीमध्‍ये आपण दिलेल्‍या जॉब कार्डनुसार गाडीचे झालेले काम व त्‍या गाडीचे कि.मी. पाहता 500 किमी च्‍या दरम्‍यान नवीन गाडीचे मेजर पार्ट बदलले दिसतात.  सदर कि.मी.पर्यंत नवीन गाडीचे मेजर पार्ट बदलणे गरजेचे नसतात.  यावरुन या नवीन गाडीमध्‍ये उत्‍पादित दोष असण्‍याची शक्‍यता आहे.  सदर गाडी आज दि. 3/7/2018 रोजी आमचेकडे 32419 किमी असताना तपासणीसाठी आलेली आहे.  त्‍यामुळे सद्यस्थितीत त्‍यावेळचा उत्‍पादित दोष सांगू शकत नाही ” असे नमूद आहे.  सबब, सदरचे अहवालावरुन वादातील वाहनाचे वाहन नवीन असताना मेजर पार्ट बदलले असलेने उत्‍पादित दोष असण्‍याची शक्‍यता कथन केलेली आहे.  प्रस्‍तुतकामी वि.प. क्र.2 यांना संधी देवून देखील ते आयोगात हजर नाहीत.  त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.  वि.प.क्र.1 यांना वेळोवेळी संधी देवून देखील प्रस्‍तुतकामी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल न केलेने त्‍यांचेविरुध्‍द पुरावा नाही (No evidence) चा आदेश पारीत झालेला आहे.  प्रस्‍तुतचा कोर्ट कमिशन अहवाल वि.प. यांना संधी असून देखील वि.प.क्र.1 व 2 यांनी नाकारलेला नाही.  सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना सदोष वाहन देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे.

 

10.   प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 यांनी CB TRIGGER या कंपनीची मोटारसायकल MH09-DQ-5278 असा नंबर मिळारलेला आहे असे तक्रारदार यांना सांगितले.  याउलट आर.सी.टी.सी. बुकला वि.प.क्र.1 यांनी चुकीची माहिती दिलेमुळे MH09-DQ-5268 व MCYZ MOTORCYCLE UNICORN नमूद झालेचे तक्रारदार यांना सदरचे आर.सी.टी.सी. बुकवरुन समजून आले.  सबब, सदरचे वाहनाचे चुकीचे नंबरची नोंद आर.सी.टी.सी. बुकला करुन वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  त्‍याअनुषंगाने वि.प.क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या म्‍हणणेचे अवलोकन केले असता, वि.प.क्र.1 यांचेकडे विक्री केलेल्‍या वाहनाची कागदपत्रे आर.टी.ओ. कार्यालयाकडे मुदतीत पाठवून देणे इतकेच मर्यादित काम वि.प. यांचेकडे होते.  संबंधीत कार्यालयाकडून वाहनाचे आर.सी.टी.सी. बुक तयार करणे, वाहन रजिस्‍टर करणे, आर.सी. बुक वरील संपूर्ण तपशील नमूद करणे तसेच सर्व काम पूर्ण झालेनंतर पोस्‍टल अॅड्रेसवर पाठवणे वगैरे कामे आर.टी.ओ. कार्यालयाकडून केली जातात.  वि.प. यांचेकडून पाठवलेल्‍या कागदपत्रांमध्‍ये कोणत्‍याही त्रुटी नाहीत.  आर.टी.ओ. कडून चूक झालेली आहे. तक्रारदार यांना वि.प. कडील कर्मचारी यांनी आर.टी.ओ. कडील अमुक नंबर आला आहे असे सांगितले नव्‍हते असे वि.प.क्र.1 यांनी कथन केले आहे.  त्‍याअनुषंगाने वि.प.क्र.1 यांनी ता. 13/4/2015 रोजीचे सेल सर्टिफिकेट, वि.प.क्र.1 यांनी आर.टी.ओ ऑफिसकडे पाठविलेला फॉर्म 21, वाहनाचा विमा, वाहनाचा इन्‍व्‍हॉईस दाखल केला आहे. सदरची कागदपत्रे तक्रारदार यांनी नाकारलेली नाहीत.  सदरचे कागदपत्रांचे अवलोकन करता सदर कागदपत्रांवर MODEL HONDA CB TRIGGER CCBF-150MD) नमूद आहे. प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे फोटो व वाहनाच्‍या इंजिनचे फोटो दाखल केलेले आहेत. सदरचे फोटोंचे अवलोकन करता वाहनाचा नंबर MH09-DQ-5278 दिसून येतो.

 

11.   प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 यांनी म्‍हणणेमध्‍ये वि.प. यांचेकडून पाठविलेल्‍या कागदपत्रांत कोणतीही त्रुटी नसताना आर.टी.ओ. कडून झालेली चूक आहे असे कथन केलेमुळे तक्रारदार यांनी सदरकामी प्रादेशिक वाहतूक कार्यालय यांना पक्षकार केले आहे.  तक्रारदार यांनी सदरचे वाहनापोटी वि.प.क्र.3 यांचेकडे रजिस्‍ट्रेशन फी आणि रोड टॅक्‍स चार्जेस भरले असलेने तक्रारदार हे वि.प.क्र.3 यांचे ग्राहक आहेत.  त्‍याअनुषंगाने वि.प.क्र.3 यांचे म्‍हणणेचे अवलोकन करता, तक्रारदार व वि.प.क्र.1 यांनी भरुन दिलेल्या माहितीनुसार आणि स्‍वीकार केलेल्‍या डिस्‍क्‍लेमर फॉर्म स्‍वीकारलेनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांचे वाहनाची नोंदणी केलेली होती व आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले आर.सी.टी.सी. चे अवलोकन करता Class of vehicle Marker class – MCYL MOTOR CYCLE UNICORN नमूद आहे.  तथापि प्रस्‍तुतकामी तक्रारदार व वि.प.क्र.1 यांचे विनंतीनुसार वि.प.क्र.3 यांनी आवश्‍यक ती दुरुस्‍ती करुन दिलेली होती असे वि.प.क्र.3 यांनी म्‍हणणे दाखल केले आहे.  वि.प.क्र.3 यांनी ता. 20/2/17 रोजी आयोगामध्‍ये आर.सी. बुकमध्‍ये झालेल्‍या चुकीची दुरुस्‍ती करुन सदरचे वाहनाचा Vehicle Information आयोगात दाखल केला आहे.  त्‍याचे अवलोकन करता सदरचे Vehicle Information मध्‍ये Model Trigger CBS नमूद आहे.  सबब, वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता वि.प.क्र.3 यांनी सदरचे वाहनाचे मॉडेल नावामध्‍ये दुरुस्‍ती केलेली आहे.  तथापि वाहनाचा नंबर MH09-DQ-5268 असा असलेचे दिसून येते.  सबब, वि.प.क्र.3 यांनी वाहनाचे आर.सी.टी.सी. बुकमध्‍ये चुकीचे नावाची नोंद करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3      

 

12.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  त्‍या कारणाने तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार या आयोगात दाखल करणे भाग पडले.  त्‍याकारणाने सबब, तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून संयुक्तिकरित्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना तक्रारअर्जात नमूद मोटरसायकल दोषमुक्‍त करुन द्यावी तसेच वि.प.क्र.3 यांनी तक्रारदार यांना आर.सी.टी.सी. बुकमधील नोंदी त्‍वरित दुरुस्‍त करुन बरोबर करुन द्याव्‍यात.

 

  1. वि.प. क्र.1 ते 3 यांनी प्रत्‍येकी संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 
 
 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.