अंतिम आदेश तक्रार क्रमांक 143/2007 ,144/2007, 145/2007 सामनेवालेंनी खालील नमूद आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे 1 तक्रार क्र 143/07 मध्ये तक्रारदारांना तक्रारीत नमूद केलेल्या प्लॉट नं बी 42 सेक्टर 6 रुम नं 24 चा ताबा त्याचे बांधकाम पूर्ण करुन व त्या संदर्भात योग्य त्या ऑथॉरिटी कडून - सिडकोकडून ऑक्यूपन्सी सर्टीफिकेट घेऊन विना तक्रार द्यावा. या प्रमाणे त्यांनी न दिल्यास तो ताबा ऑक्यूपन्सी सर्टीफिकेटसह तक्रारदारांना मिळेपर्यंत दरमहा रु 2500/- प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत सामनेवालेंनी तक्रारदारास आदेश पारित तारखेपासून द्यावेत. 1अ याप्रमाणे भाडयाची रक्कम न दिल्यास ती सामनेवालेकडुन ती तो प्रत्यक्ष ताबा देईपर्यंतचे तारखेपर्यंत 5 टक्के व्याजदाराने वसूल करण्याचा अधिकार तक्रारदारास राहिल. 2 तक्रार क्रमांक 144 व 145/07 मधील तक्रारदारांना त्यांचे अर्जात नमूद असलेल्या या भूखंडातील रुम नं 11 व रुम नं 15 यांचा ताबा सामनेवालेंनी विनातक्रार द्यावा. 3 प्रतयेक तक्रारदारांस सामनेवालेने रु 10000 (रुपये दहा हजार मात्र) त्यांना झालेल्या शारिरीक,मानसिक खर्चापोटी द्यावेत. 4 सर्व तक्रारदारांना सामनेवालेंनी प्रत्येकी रु 2000/- (रुपये दोन हजार मात्र) न्यायिक खर्चापोटी द्यावेत. 5 सामनेवालेंनी वरील कलम 3 मध्ये नमूद केलेली रक्कम या आदेशाप्रमाणे न दिल्यास ती रक्कम तक्रारदारांना आदेश पारित तारखेपासून दर साल दर शेकडा 5 टक्के व्याजदाराने वसूल करण्याचा अधिकार राहिल. 6 सामनेवालेंनी स्वतःचा खर्च स्वतः सोसण्याचा आहे. 7 सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकारांना पाठविण्यात याव्यात. (आर.डी.म्हेत्रस) (बी.एम.कनिटकर) (ज्योती अभय मांधळे) अध्यक्ष सदस्य सदस्या रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग |